एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन
💬 प्रतिसाद
(21)
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 07/15/2010 - 22:57
नवीन
मीटरचे गणित जुळवताना प्रस्तुत यतिचा भंग झाला आहे. (पहा :""यति की पती ? " करि मनोरंजन जो पाध्यांचे जडेल नाते मिपाशी तयांचे. इत्यादि इत्यादि)
- अमेरिक्कन हिरवा "येटी".
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 07/16/2010 - 10:38
नवीन
थोड्या दुरुस्त्या केल्यामुळे जे "मीटरात घोळा झाला" (संदर्भ केशवसुमार यांची खालची कविता) ते बहुतेक सर्व "व्यवस्थिता झाला" आहे. निदान मिपाच्या शुद्धलेखनाच्या मानदंडांनुसार तरी. संपादक आता तो दंडही उगारायला लागले म्हणायचे.... :)
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 07/16/2010 - 11:32
नवीन
मानदंड शब्दावरून दंड उगारण्यावर केलेली कोटी रोचक आहे. त्यापेक्षा "मानगूट धरणे" वगैरे जास्त रोचक झाली असती. ;-)
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 07/15/2010 - 23:53
नवीन
एका स्थळात येता, विडंबने अनेक
भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक
कोणी विचारले ना, अपुल्या मतास सांगा
समजून चालती ते आम्हीच केसुरंगा
अन ऐकुनि तयांना, चेकाळती अनेक
भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक
कवड्यास खाज भारी, खेळे विडंबनाशी
मीटरात घोळा झाला, सांगेल ते कुणाशी ?
मुसु तयास टोची, मारी हळूच हाक
भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक
केसुस डाव त्यांचे जेव्हा इथे कळाले
नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले
धुरळा जरी उडाला, धाग्यावरी क्षणैक
होती मुळात सगळी ती विडंबने सुरेख
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 07/16/2010 - 10:39
नवीन
;)
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 07/16/2010 - 11:25
नवीन
>नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले
रोचक!
अजुन एक नोंद केली केली आहे. (कुत्राचे शेपूट वाकडे ते वाकडेच, सदस्याच्या खवमधे धमकी, आजकाल कोणीही विडंबन करायला लागले आहे, दिवा विझायच्या आत मोठा होतो, आता नतद्रष्ट वेडे. )
-------------------------------------------------
लायसेन्स आहे मग खुशाल वाट्टेल ते बोला!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 07/16/2010 - 11:31
नवीन
रोचक प्रतिसाद. ऑरवेलला कधीही विसरु नका सहजराव.
--अवलिया
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 07/16/2010 - 11:51
नवीन
सहमत कुंपणानेच शेत खाल्ले तर काय?
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 07/16/2010 - 11:57
नवीन
(कुत्राचे शेपूट वाकडे ते वाकडेच, सदस्याच्या खवमधे धमकी, आजकाल कोणीही विडंबन करायला लागले आहे, दिवा विझायच्या आत मोठा होतो, आता नतद्रष्ट वेडे. )
प्रस्तुत परिच्छेदातल्या एका विधानाचा दुसर्याशी असलेला संबंध मला जोडता न आल्याने , या परिच्छेदाचे साधर्म्य नानू सरंजाम्याच्या कवितेशी जुळते असे मला वाटले ;-)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/16/2010 - 12:00
नवीन
मी देतो रोज संपादकांना ढुशी ...
पुढची मूळ कविता नसल्याने विडंबन करणे जमणार नाही. क्षमस्व.
अदिती (सरंजामे)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 07/16/2010 - 11:57
नवीन
कूल सहजराव, कूल. तुमचा लिबरल विचारवंत होतोय. काय आहे या विचारवंताना माओवाद्यांची बाजू घेताना कळत नसतं की माओवाद खरंच सत्तेवर आला तर पहिला बळी त्यांचाच जाणार आहे. दुसरी एक गोष्ट अशीही आहे - माओवादी व्यवस्थेला आव्हान देत उभे राहतात, पण वेळ आली की त्याच भारतीय घटनेने केलेल्या न्यायव्यवस्थेचा आधार घेत हेबियस कॉर्पस वगैरे करत बसतात. तेव्हा हे सारं जाणून घेऊनच व्यवस्थेचा विचार करावयाचा असतो. बरोबर?
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 07/16/2010 - 13:24
नवीन
अता सहजासहजी समजणार्या साध्या आणि सरळ विडंबनात कोणी वाकड्यात शिरायचे ठरवले तर त्याला आम्ही काय करणार.. शिरो बापडे.. ह्या विडंबनाच्या / प्रतिसादाच्या इतक्या वाचकातून काही लोकानांच नोंद कराण्या सारखे काही तरी दिसले हे ही रोचक!! बाकी चालू दे !! आम्ही ही नोंद करून ठेवतो..
(चो.म.चा.)केशवसुमार
स्वगतःनतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले...केसुरंगाच्या ह्या फटक्यात काय भलती जादू आहे.. फटके पडले एकीकडे आणि वळ उठले दुसरी कडे.. रोचक!!
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Fri, 07/16/2010 - 00:25
नवीन
आता कसे करावे , बदकेच हिंस्त्र झाली,
काठावरील पोरे ,गळ टाकुनि पळाली.
हलवीत काव्यनांगी ,फुगवून काव्यकल्ले,
घालून काव्यकाडी , खा अडगळा तु चोप.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 07/16/2010 - 02:39
नवीन
इतके नतद्रष्ट एका ठिकाणी गोळा झालेले पाहून मन भरून आले आणि सामना चित्रपटातले हे वाक्य आठवले -
मास्तर: "काय करणार? जुनी खोड. स्वतःला सुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच. नतद्रष्ट कुठला?"
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 07/16/2010 - 07:15
नवीन
+१
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/16/2010 - 08:35
नवीन
+२
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/16/2010 - 09:16
नवीन
वीडंबन थोडेसेच आवडले.
अदिती
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 07/16/2010 - 04:47
नवीन
इडंबन आवडले.
-नतद्रष्ट
-Nile
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 07/16/2010 - 04:52
नवीन
शंकामूल्यांचा 'उपद्रव' कि ' उपयुक्तता' या भानगडीत न पडता विडंबनाचा आनंद घेतला.
(नीर्विकार)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 07/16/2010 - 10:48
नवीन
एक विडंबन म्हणुन आवडले :)
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 07/18/2010 - 01:20
नवीन
हे पाध्ये कोण? :?
(डोमकावळा) योगेशु.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
- Log in or register to post comments