Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज अचानक तुझी आठवण का यावी

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Fri, 07/16/2010 - 20:26

प्रतिक्रिया द्या
2203 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
निखिल देशपांडे Sat, 07/17/2010 - 07:34 नवीन
छान... पहाट होणे अशक्य आहे थांबवणे तरी वाटते रात्र जरा ही लांबावी या ओळी आवडल्या स्वगत : अरे केसुंनी अजुन या कवितेचे विडंबन केले नाही :-) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
श
शरद Sat, 07/17/2010 - 08:45 नवीन
एक चांगली गझल ही एक थोडी लांबलेली पण चांगली गझल वाटते. थोडीशी काटछाट करावयास हरकत नव्हती.मला गझल आवडली याचे एक कारण गझलेचे एक लक्षण म्हणजे प्रत्येक शेर हा स्वतंत्रपणे स्वयंपूर्ण असावयास पाहिजे हा नियम येथे पाळला गेलेला दिसतो. प्रत्येक शेरात एका नवीन गझलेची सुरवात होऊ शकेल .उदा. बरेच काही घडले ह्या मधल्या काळी तुला कहाणी कुठून आता सांगावी या दोन ओळीत न सांगितलेले बरेच काही वाचक आपल्या परीने वाचू शकतो व त्या आपल्याला आलेल्या अनुभुतीवर एकेक काव्य होऊ शकते. परत ही कहाणी प्रियकर-प्रेयसी यांच्यातीलच हवी असे नाही. तुमच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव देणारा शेर. दुसरा एक घेऊ. पहाट होणे अशक्य आहे थांबवणे तरी वाटते रात्र जरा ही लांबावी इथेही अटळ गोष्ट टाळण्याची मानवी इच्छा रात्र व पहाट या सामान्य प्रक्रीयेमधून दाखवली आहे. मिलनाची रात्र संपू नये असे वाटणे कितीही उत्कट असले तरी अशक्य आहे हेही जाणवत असतेच. रात्र विरहाची असती तर ती लवकर संपावी वा दिवस आहे तो संपू नये व रात्र येऊ नये असेही वाटले असते. येथे सुद्धा नविन कवितेचे बीज दिसून येते. ही झाली गझलची बलस्थाने. १० ऐवजी ७ किंवा ८ शेर जास्त शोभून दिसले असते. कारण जरा वेळ घालवून या मध्यवर्ती कल्पनेची भरारी आणखीन १० शेरांची भर घालू शकेल. पण मग तो वाण्याच्या घरसामानाचा कागद बनेल. Diminishing returns चा नियम कवितेलाही लागू होतो. आणखी एक सुचना. शक्य असेल तर शेराच्या अंताला चमत्कृतीजन्य झटका देता आला तर जास्त उठाव येईल. शरद
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 07/17/2010 - 08:53 नवीन
बरेच काही घडले ह्या मधल्या काळी तुला कहाणी कुठून आता सांगावी
वा... शरद म्हणतात तसे एका गझलेची उत्तम सुरवातच.
हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी
क्या बात है! पौर्णिमा हिशेबात मांडण्याची कल्पना खासच.
मनात आहे काय काय दडले माझ्या आज उडी डोहात मनाच्या मारावी
वा... वा... मनाचा खेळ!!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/17/2010 - 13:42 नवीन
सुंदर! गजल आवडली. अदिती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/17/2010 - 16:20 नवीन
खूप दिवसांनी लिहिलीस रे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Sun, 07/18/2010 - 23:54 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा