कलादालन
CE मार्कची वांगी!!!!?????
Primary tabs
शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो)
त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो. बहिणीने तिच्या छोट्याशा बागेतली वांगी दिली भरीत करायला. पण मग या वांग्यावर CE मार्क कसा आला? हे तपासण्याकरीता मी माझी पिशवीही तपासली. मग या मागचे कोडे उलगडले. बहिणीच्या डेस्कटॉपच्या किबोर्डचा प्रॉब्लेम होता. तो किबोर्ड बदलण्यासाठी मी पुण्यात आणला येताना निघण्याची घाई झाल्याने तो वांगी असलेल्या पिशवीतच भरला. त्यावरचा CE मार्क मग वांग्यांनी प्रवासादरम्यानच उचलला असावा. असो भाव खाऊन गेली हो ही वांगी. पण नंतर त्याचं भरीत करुन उट्ट काढलं.
क्वर्टी कळफलकावर सी खालच्या ओळीत आणि ई वरच्या ओळीत. मधल्या ओळीत डी आहे, तो कसा काय नाही आला बॉ ?
हा मार्क असा आहे
हा इलेक्ट्रिकल कॉनफॉर्मन्सचा CE आहे. इथे पहा.
(कीबोर्डाच्या खालच्या भागावर वांगे दाबले जाऊन हा उमटला असणार.)
:)
हा हा हा
मला वाटल की CE वाले आता Farm Ville सारखए शेती करायला लागले की काय =)) =))