कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य ...
💬 प्रतिसाद
(101)
च
चिन्मना
Mon, 08/02/2010 - 19:27
नवीन
आत्ताच मी NDTV वर पाहिलं की मुलींना वॉर्निंग देऊन सोडून दिले आहे आणि मुलांना मात्र सुटण्यासाठी जामीन घ्यायला लावलेला आहे. याबाबत काय बोलायचे आहे तुम्हाला? हा भेदभाव कसा करु शकतात?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 08/02/2010 - 19:33
नवीन
जुन्या विचारसरणीचे लोक बघाना कसे असतात...त्यांना वाटले असेल मुली ताकीद दिल्यावर परत असे करणार नाहीत...आणि मुले मात्र करतील कारण मुलेच ती, दारू पिणारच, पार्ट्या करणारच...
अशी मुले कशी ओळखावी? (आजकाल लोक हातातल्या मोबाईल वरून आणि प्यांट कोणती घातली यावरून लोक आणि त्यांचा व्यवसाय ओळखतात म्हणे.)
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 08/02/2010 - 22:56
नवीन
मुलींना वॉर्निंग देऊन सोडून दिले आहे
तेवढीच पोलिसांवरची जबाबदारी कमी झाली हो!
एकदा का आपापली कन्यारत्ने ताब्यात घेतली की पालक पण सुटकेचा निश्वास टाकत असतील.
मग बाहेर जावून कुठे का उधळेनात!;)
तिथे पोलिस ठेसनात नुसता धक्क लागला तरी ओरडा व्हायचा!;)
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Tue, 08/03/2010 - 10:19
नवीन
दोन्ही घटक धन्यच! अगदी रोज त्यांचे पाय धुऊन तीर्थे घ्यावीत!
पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना काही विद्यार्थ्यांनी दमदाटी केली. अगदी ए शिपुर्ड्या चल फुट उगीच भानगडीत पडु नकोस एका मिन्टात नोकरी जाईल अश्या भाषेत. वैद्यकिय तपासण्या जवळपास रात्रभर चालल्या. ८१ मुलांनी अतिमद्यप्राशन केलेले सापडले तर सात जणांनी पार्टी आयोजित केली होती. त्यांना ताब्यात ठेवले अन बाकिच्यांना भल्या सकाळी तपासण्या झाल्यावर सोडुन दिले. मग मॅजिस्ट्रेट थेऊरला गेले अन त्या अतिमद्यप्राशन केलेल्या मुलांना जामीन मिळाला. दुपार पर्यंत सगळे ८८ जण बाहेर. त्यानंतरही पोलिसांना काहीजणांनी शिवीगाळ केली. बर्याचश्या मुलांचे पालक शेवटपर्यंत उगवलेच नाहीत. जे उगवले त्यांचे म्हणणे आमच्या मुलांनी काय खुन बिन केलाय की काय? कायदा मोडला, लोकांना त्रास झाला त्याबाबत खेद ना खंत.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/03/2010 - 19:18
नवीन
हे सगळे त्या बातमीत असायला हवे होते. ते न छापता परप्रांतिय मुली, दारू वगैरे गोष्टीच छापून आणल्या त्याचे काय?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 19:37
नवीन
श्री. पुनेरी जी...
तुम्ही आज मंगळवारी दुपारी हा वृत्तांत दिला आणि ४००-५०० पैकी ८१ मुले अतिमद्यप्राशन केलेले सिद्ध झाले (तर आपण असे म्हणू या की, आणखीन १०० मुलांनी कमी प्रमाणात का होईना मद्य प्राशन केले). ही बाब मी या अगोदर सोमवारीच वर प्रतिसादात लिहिली होती.
"(याला दुजोरा म्हणजे उद्या त्या वार्ताहराने या ४००+ मुलामुलींची पोलिसांनी घेतलेली अधिकृत मेडिकल टेस्ट मिळवावी. निम्म्यापेक्षा जास्त मुले "निगेटीव्ह" असतील. शिवाय ड्रग घेतलेले कुणी नव्हते हे पोलिसांनीच मान्य केले आहे.)"
त्यापुढे मुलांची आणि त्यांच्या थोर थोर पालकांची मग्रुरी, ती बाब वेगळीच. मी हेच म्हणत होतो की, असल्या धाडीतून काही म्हटल्या काही निष्पन्न होत नसते. केवळ वर्तमानपत्रांना त्या दिवसासाठी एक सनसनाटी बातमी.,...बस्स !! शासनातल्या भ्रष्टाचारी बुवानादेखील काही काळ प्रसिद्धीचा झोत आपल्यावरून दुसरीकडे गेला याचा आनंदच होत असतो.
जे पालक गुर्मी दाखवू शकत नव्हते त्यांनी कोणत्या प्रकारे आपल्या मुलाना पोलिस स्टेशनवरून घरी नेले असेल याचा अंदाज तुम्ही करू शकताच. खुद्द सिम्बायॉसिस मॅनेजमेंट या गटावर काही अॅक्शन घेणार नाही हे १००% सत्य.
विनाकारण आपण इथे डोकेफोड करीत असतो. चला विसरून जाऊ या !
इन्द्रा
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 08/03/2010 - 07:47
नवीन
समानतेचा ढोल पिटणार्यांचे यावर काय म्हणणे आहे ते पाहुया.
- Log in or register to post comments
च
चक्रमकैलास
Mon, 08/02/2010 - 17:09
नवीन
पन्हाळ्यावर पार्टी करण्यात लाज कशी नही वाटली तुम्हाला...खुशाल तोंड वर करुन सांगताय की बीयर पीत होती काहीजणं...स्थळा-काळा चे थोडे तरी भान ठेवायचे ना....
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 08/02/2010 - 18:53
नवीन
पन्हाळ्यावर बीअर घेणे हा जसा पराक्रम नाही, पण तशीच ती कुणीतरी घेतली म्हणजे जगबुडी झाली असे कृपया समजू नये. तसे असते तर याच पन्हाळ्यावर शासनमान्य बीअर बार आहेत आणि येथील टूरिस्ट हॉटेल्समधून ती सर्व्हदेखील केली जाते. शासनाला यातून अबकारी महसूल मिळतोच.
राहता राहिला पार्टी करण्याचा विषय, तर याबद्दल मी इतकेच सांगतो कैलासजी, की, कोल्हापूर जिल्हाधिकारी दप्तरी "पन्हाळा" हे "दख्खन पठारावरील निसर्गरम्य ठिकाण असून पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे." शासन ज्यावेळी पर्यटनस्थळ म्हणते त्यावेळे तिथे सहली येणारच आणि लोक पिकनिक म्हणून पार्टी ठेवणार हे आलेच. "ऐतिहासिक किल्ला" म्हणून तुमच्या लेखी पन्हाळ्याचे जे महत्व आहे ते इथल्या समस्त करवीरकरांना आहेच. मी त्या "बीअर" ग्रुपमध्ये नव्हतो, पण म्हणून इतरांना मी थांबवू शकत नव्हतो, तरीही त्यांना वाटेल तसे वागायची मुभादेखील दिली नव्हती (१०० मध्ये असे मोजून २० असावेत). अनेकापैकी एक संयोजक म्हणून या बाबी मी कटाक्षाने पाळल्या आहेत.
(जाता जाता ~~ प्रतिसाद देताना काहीतरी सभ्य भाषा आपल्या मायमराठीने आपणास दिली आहे, याची जाणीव ठेवलीत तर बरे. तुम्ही "लाज" काढली, मी वाचली. पण त्याच भाषेत मी कधीही लिहिणार नाही कारण तो माझा प्रांत नाही. घसरायचे ठरवलेच तर एक लक्षात ठेवा की मी कोल्हापुरात जन्मलो आहे, वाढलो आहे. 'ती' भाषादेखील माझ्या रक्तात आहे. तेव्हा मिसळपावच्या संपादकांनी प्रकटनाला मुक्त वाव दिला आहे म्हणून त्याचे भलतेच स्वातंत्र्य घेऊ नका. दुसरेही तो प्रयोग करू शकतात.)
मिपा संपादकाना असले प्रतिसाद चालत नसतील तर दोन्हीही उडवावेत.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Mon, 08/02/2010 - 20:03
नवीन
घसरायचे ठरवलेच तर एक लक्षात ठेवा की मी कोल्हापुरात जन्मलो आहे, वाढलो आहे. 'ती' भाषादेखील माझ्या रक्तात आहे.
पुन्हा कोल्हापूर ? साला, सुजय कुलकर्णीचा फ्यान काल झालो, आज पवार सायबांचा !
अरे कोणीतरी नागपूरच्या भाषेचा अभिमानी नाही काय रे इथे ?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 08/02/2010 - 20:19
नवीन
"अरे कोणीतरी नागपूरच्या भाषेचा अभिमानी नाही काय रे इथे ?"
श्री.मिभो, मी जितका कोल्हापुरचा तितकाच नागपूरी भाषेचा अभिमानी आहे. नागपूरच्या मित्रप्रेमाचा मी संयुक्त विद्यापीठ सोहळ्याच्या वेळी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि आजही नागपूरच्या हंसपुरी आणि महाल (की महल?) भागात राहणार्या माझ्या मित्रांच्या घरी हक्काने येजा करू शकतो. तसेच त्या तिघांना कोल्हापुरात बोलावून घेतो. असो.
प्रश्न इथे वापरायच्या भाषेविषयी आहे. मुद्दा पटणे वा न पटणे या बाबी इथे स्वीकृत असतातच. तुम्ही वा मी कितीही तारस्वराने म्हटले की, "आमच्या सचिन तेंडुलकरला जगात तोड नाही", तर त्यावेळी ती बाब सर्वानी मान्य केलीच पाहिजे असे तुम्हीही म्हणणार नाही. फक्त ती अमान्यता त्याने प्रमाणभूत भाषेत गुंफावी इतकेच. (खुद्द मिपा संपादक मंडळाचीदेखील हीच भूमिका असेल... असावी.)
श्री.कैलास यांना दिलेल्या उत्तरामुळे आपल्या (वा त्यांच्याही) भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व !
इन्द्र
- Log in or register to post comments
प
प्रभो
Mon, 08/02/2010 - 20:23
नवीन
मिभोकाका रॉक्स...
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/03/2010 - 06:13
नवीन
आयला देवगडातला कोणी नाही का इथे..? पूर्वी होते .. असो.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Tue, 08/03/2010 - 06:16
नवीन
देवगडातला कोणी नाही का इथे..? पूर्वी होते .. असो. >>>
हा हा हा !!! तुम्ही त्यांचे फॅन होता का ?
पुण्याचेच सुहास
येथे पेशव्यांच्या प्रतिसादांना पंख लावून मिळतील
- Log in or register to post comments
व
विराट
Mon, 08/02/2010 - 18:18
नवीन
पार्टीच राहुद्या आता पोलिस काय करतात ते बघा..!
पकडलेल्यांवर कारवाई करतात की त्यांना सोडतात?
(कसे सोडतात तो एक वेगळा मुद्दा आहे.....)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 08/02/2010 - 20:18
नवीन
डॉन्याशी बराचसा सहमत. किंचित असहमती इतकीच की ह्या पार्ट्या आहेत/होतात त्या स्वरूपात योग्य वाटत नाहित. त्या जास्त 'लिगलाईज' व्हाव्यात असे वाटते. जसे ठराविक संख्येच्या वर लोक जमणार असतील तर अशी पार्टी करायची असल्यास जवळच्या ठाण्यात नोंद, पार्टीला मुली/स्त्रिया येणार असल्यास 'सुरक्षित' वाहनव्यवस्था व त्यांना स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय कंपल्सरी करणे वगैरे वगैरे.
पार्टि करणे हा गुन्हा नाहिच नाही मात्र पार्टीत एखादा गुन्हा अनावधानानेही घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी संचालक/संयोजक घेत नसल्यास कायद्याचा बडगा हवाच
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 08/02/2010 - 20:37
नवीन
पार्टि करणे हा गुन्हा नाहिच नाही मात्र पार्टीत एखादा गुन्हा अनावधानानेही घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी संचालक/संयोजक घेत नसल्यास कायद्याचा बडगा हवाच
+ सहमत.
यातील "संयोजका"च्या भूमिकेतून मी कित्येकदा गेलेलो आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ती कायदेशीर खबरदारीच नव्हे तर ग्रामस्थांचाही देकार अगोदर घेतलेला असतो. लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे ज्या ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाईल तिथल्या स्थानिक बाजारातूनच भोजन, न्याहारी आदीसाठी लागणारी आवश्यक ती खरेदी झाली की ग्रामस्थांचे हार्दिक सहकार्य लाभतेच लाभते.
'थेऊर' प्रकरणातदेखील 'स्थानिक असंतोष' कोणत्या कारणास्तव झाला याचा शोध घेतल्यास या प्रकारचे पैलूही उघडतील. कुणी असे समजू नये की थेऊर गावात अशी वा तत्सम पार्टी याअगोदर झालेली नव्हती (वा इथुन पुढे होणार नाही.)
तासापूर्वी बातमी आली की, सर्व मुलींना सोडून दिले व आता उद्या मुलांच्या बापाकडून जामीन घेऊन सोडण्यात येईल. दोन दिवस ती पोरे गप्प बसतील आणि तीनचार दिवसांनी सिम्बॉयासिसचे डायरेक्टर अगदी स्वामी रामदेव बाबाच्या थाटात त्यांना एक लेक्चर देतील आणि "चला आता वर्गात". संपली "फ्रेंडशिप डे एक्साईटमेन्ट".... आता बघू पुढ्च्या वर्षी !
अशा एकदोन फालतु पार्ट्यामुळे आपली संस्कृती रसातळाला जाईल अशी वृथा भीती कुणीही बाळगू नये.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/03/2010 - 06:14
नवीन
अशा एकदोन फालतु पार्ट्यामुळे आपली संस्कृती रसातळाला जाईल अशी वृथा भीती कुणीही बाळगू नये.
जाईल??????
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Mon, 08/02/2010 - 20:49
नवीन
"पार्टी करायची जागा भाड्याने देणे" हा सुयोग्य, कायदेशीर धंदा असू शकतो.
पार्किंगची पर्याप्त सोय असल्यास, गोंगाट मर्यादित ठेवण्याची सोय असल्यास अशा स्थळांना लायसन द्यायला हरकत नाही.
(दारू पिऊन झिंगल्यावर गाडी चालवता येऊ नये, सार्वजनिक स्थळावर धिंगाणा घालता येऊ नये... वगैरे सर्व ठीकच. पण खाजगी ठिकाणी दारू पिऊन झिंगण्याविरुद्ध कायदा आहे काय?)
विनापरवाना गोंगाट-पार्टी केल्यास परप्रांतीयांना आणि स्वप्रांतीयांना एकसारखीच शिक्षा व्हावी असे वाटते. सज्ञान मुलींना आणि मुलांना एकाच कायद्याने शिक्षा व्हावी असे वाटते. वर्तमानपत्रातला "परप्रांतीय" आणि "मुली" हा उल्लेख कळलेला नाही.
"बाहेरगावचे" वसतीगृहात राहाणारे विद्यार्थी पार्ट्यांमध्ये अधिक असतील, असा कयास पटण्यासारखा वाटतो. परंतु ते कुटुंबाबरोबर राहात नसल्यामुळे असावे, परप्रांतीयतेमुळे नव्हे. आईबापांच्या घरी राहाणारे परप्रांतीय तरुणही बहुधा रात्री शांतपणे घरी जात असतील, असे वाटते.
वर्तमानपत्रात "अमुक संस्थेच्या वसतीगृहातील मुले" असा उल्लेख "परप्रांतीय" पेक्षा अधिक सुसंदर्भ ठरला असता.
माझ्या ज्युनियर कॉलजच्या वसतीगृहात जवळजवळ सर्वच गोव्यातली (पण पणजी शहरापासून दूरदूरच्या गावातली) मुले होती. वसतीगृहातली (गावठी) मुले स्थानिक पणजीकर (शहरी+उच्चभ्रू+परप्रांतीय) मुलांपेक्षा अधिक "रात्री धिंगाणा" घालत. बिचार्या वसतीगृह-संचालकाला बराच त्रास होत असे, असे मला आठवते.
- Log in or register to post comments
प
पंगा
Tue, 08/03/2010 - 00:04
नवीन
...तुमचा आयव्हरी टॉवर* आमच्या आयव्हरी टॉवरपेक्षा सफेद कसा?
* अमेरिकन इंग्रजीत लाकडाला 'आयव्हरी' आणि अपार्टमेंटला किंवा दोन मजल्यांच्या घराला 'टॉवर' म्हणतात.
(प्रतिसादातले मुद्दे पटले.)
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 08/02/2010 - 21:06
नवीन
"वसतीगृहातली (गावठी) मुले स्थानिक पणजीकर (शहरी+उच्चभ्रू+परप्रांतीय) मुलांपेक्षा अधिक "रात्री धिंगाणा" घालत"
.... याचाच अर्थ की, अशा प्रकारचे हॉस्टेल लाईफ (आजकाल) सर्वच ठिकाणी कमीजास्त प्रमाणात अस्तित्वात आहेच आहे आणि हीच मुलेमुली ज्यावेळी काही निमित्ताने पार्टीसाठी जातात त्यावेळी अधिकचा मुक्तपणा घेतात. पण म्हणून यात सामिल झालेल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंध:कारमय झाले, होईल, असे कुणी मानते का?
....या वर्षातील सर्वाधिक गल्ला जमविलेल्या "३ ईडियट्स" मध्ये जे हॉस्टेल लाईफ दाखविले आहे ते आठवा. देशातील सर्वोत्तम समजल्या गेलेल्या त्या इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेलच्या टेरेसवर नायक आमीर खान आपला मित्र माधवन याच्या बरोबर नशापाणी करत "अॅड्रेसच्या वेळी काय गंमत केली" याचे वर्णन करतो तर त्याच वेळी कॉलेजमधील स्कॉलर समजला जाणारा "बकरा" बनलेला संतापी ओम तितकीच नशा करून त्यांच्या अंगावर चाल करून येतो, असे दाखविले आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या हे काय लक्षात आले नसेल का की एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये दारू पीत बसलेले विद्यार्थी दाखविणारा हा सीन आहे तर तो ठेवावा की कापावा? पण ज्याअर्थी त्याला धक्का लावलेला नाही त्यावरून शासनानेदेखील हॉस्टेलमधील अशा गोष्टी "कॉमन" म्हणून स्वीकारल्या आहेत.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Mon, 08/02/2010 - 22:17
नवीन
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
"मग दारू पीत चला" हे सांगितले नाहीत चंद्रकिरणांना ?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 07:26
नवीन
वेल... अजून तरी त्यांना सोमरसाची गरज भासलेली नाही, शिवाय मी त्यातला नसल्याने असला आगाऊ सल्ला देवून त्यांच्या आनंदावर विरजण घालणे हे देखील माझ्या स्वभावात नाही. असो.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 08/03/2010 - 07:28
नवीन
इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती...
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 09:13
नवीन
"इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती..."
शिल्पाताई, असू दे. खूप विस्ताराने लिहायला हा काही वैचारिक विषय नक्कीच नाही, आणि ही बाब श्री.मिभोदेखील मान्य करतील. सहज कॅन्टीनमध्ये फावल्या वेळेत गंभीर न होता चर्चेला घ्यावा असा हा विषय.
(शक्य झाल्यास श्री.मुक्तसुनीत यांनी आताच प्रस्तुत केलेला "मुलांच्या शिक्षणाचा" धागा पहा, तो खरा विस्ताराने लिहायचा विषय.)
इन्द्र
- Log in or register to post comments
ब
बद्दु
Tue, 08/03/2010 - 09:37
नवीन
सेन्सॉर बोर्डाच्या हे काय लक्षात आले नसेल का की एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये दारू पीत बसलेले विद्यार्थी दाखविणारा हा सीन आहे तर तो ठेवावा की कापावा? पण ज्याअर्थी त्याला धक्का लावलेला नाही त्यावरून शासनानेदेखील हॉस्टेलमधील अशा गोष्टी "कॉमन" म्हणून स्वीकारल्या आहेत.
सेन्सॉर बोर्ड /शासनानेदेखील ..
फारच गुळमुळीत लोकं आहे हो ही..त्याना सगळं चालतं..मर्डर मधील उत्तान सिन पेक्षा दारु पितांना दाखविणे म्हणजे फारच साधी घटना.
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 08/02/2010 - 23:05
नवीन
आम्ही पण कालेजात असताना वर्गातील मुलामुलींबरोबर एका वर्गमित्राच्या एका ग्रामीण भागातील फार्म हाऊस वर गेलो होतो...पार्टीसाठी आणि रहाण्यासाठी. लई गोंधळ घातला. नाचणे, (पिणे माफक प्रमाणात होते कारण पिण्यावर पैसे घालवायला तेव्हा नोकर्या नव्हत्या लागलेल्या कोणाला) पण न पिता पण गोंधळ मात्र तेवढाच. बार्बेक्यू केला, गाणी , गप्पा झाल्या मुले मुली गाण्याच्या तालावर बेफाम नाचली.
पण कोणाची तक्रार वगैरे आली नाही. कारण आमचा ग्रूप छोटाच होता. (२० एक जण असतील) आणि आजूबाजूची घरे लांब लांब अंतरावर होती. (तरी आम्हाला तो एवढा मोठा बंगला माणसांनी भरुन गेल्यासारखा वाटत होता. )
आता इथे ३००-४०० मुले म्हणजे त्या सर्वाचा केवढा आवाज असेल. सेलिब्रेशन करायला आक्षेप नाही पण मुलांनीही थोडे तारतम्य बाळगायला हवे. एवढा मोठा ग्रूप एका बंगल्यात जमा झाल्यास जागा तर अपुरी पडली असेलच आणि आवाजाची पातळी ही किती वाढली असेल. शिवाय आजूबाजूच्या लोकांना गाड्यांच्या पार्किंगचा ही त्रास झाला असेल. बंगला म्हणजे रेसिडेन्शियल भाग असणार्..तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध नसणारच.
' हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते....विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले.' ही लेखातील वाक्ये मात्र अतिरंजीत वाटतात.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/03/2010 - 01:27
नवीन
पक्या ह्यांच्याशी सहमत आहे. त्या निमित्ताने पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या बाजूने समर्थन करणार्या पुनेरी वगैरे सदस्यांनी थोडे आत्मपरिक्षण करावे. थोडीफार शिस्त मोडून सगळ्यांनीच कधी ना कधी दंगा केला आहे. हा दंगा दुसर्याला त्रास होण्याइतपत असल्यास नक्कीच विरोध आहे पण विरोध हा फक्त त्या त्रासाला आहे. आणि हा त्रास कशानेही होऊ शकतो. उगाच मुली, दारू, परप्रांतिय वगैरे गोष्टी बातमीला मसाला लावण्यासाठी घातलेल्या आहेत. असल्या सवंग पत्रकारांचे समर्थन अजिबात करू नये. परप्रांतिय मुलिंनी एकत्र येऊन दुसर्याला त्रास न देता दारू पिण्यास तुमची आडकाठी आहे का?
एखाद्याने गणपतीची गाणी वाजवून डोके उठवले तर त्यात गणपतीचा काय दोष?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 07:22
नवीन
एखाद्याने गणपतीची गाणी वाजवून डोके उठवले तर त्यात गणपतीचा काय दोष?
+ बिनतोड दाखला, त्यामुळे श्री.पक्या आणि श्री.शिंदे यांच्या भूमिकेशी सहमत. अशा पार्ट्यांनी जणू काही महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली अशी जी ओरड काही महानुभव करीत आहेत त्यापेक्षा नवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या कल्लोळाबद्दल विचार करावा.
विद्यार्थी विश्व काय, कार्पोरेट जगत काय....असले पार्टी प्रकार राज्यात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू असतातच. फक्त एका ठिकाणी अतिरेक झाला म्हणून तो सर्वत्रच होतो असे समजण्याचे काही कारण नाही.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/03/2010 - 10:39
नवीन
अशा पार्ट्यांनी जणू काही महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली अशी जी ओरड काही महानुभव करीत आहेत त्यापेक्षा नवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या कल्लोळाबद्दल विचार करावा.
कुठलीही गोष्ट एकाएकी घडत असते. वर जे घडले आहे ती सुरुवात मानली तर "महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली" हि गोष्ट घडायला वेळ लागणार नाही हे ही लक्षात घ्यावं . जरी एकच प्याला असला तरी ती अजून वाईट परिस्थिती येण्याची सुरुवात असू शकते.
विद्यार्थी विश्व काय, कार्पोरेट जगत काय....असले पार्टी प्रकार राज्यात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू असतातच. फक्त एका ठिकाणी अतिरेक झाला म्हणून तो सर्वत्रच होतो असे समजण्याचे काही कारण नाही.
माझ्यामते सर्वत्र असे घडत आहे असे कोणी म्हटल्याचे मला तरी दिसत नाहीये, जरी तसे घडत असले तरी.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 11:07
नवीन
मान्य !.... नीट आणि योग्य प्रमाणभूत प्रतिसाद कसे द्यावेत हे श्री.पुण्याचे पेशवे यांच्याकडून शिकावे. धन्यवाद.
"त्या" संदर्भात तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत कसलाही मतभेद असण्याचे कारण नाही, नव्हे होऊच शकत नाही. समाजात आणि समाजाने ज्या चालिरिती निषिद्ध मानल्या आहेत त्यामागील भूमिका ही समाजस्वास्थ्याचीच असते. पण प्रत्येक वेळेला आकाश गडगडले म्हणजे प्रलय झाला, पृथ्वी आता बुडणार अशी गृहितके धरून चाललो तर जीवन अस्थिरच होऊन जाईल.
निव्वळ दाढीमिशा आहेत म्हणून प्रत्येकाला आपण स्वामी रामदेव बाबा मानत नाही, तद्वतच ताणतणाव हलका करण्यासाठी (असे होते असे समजले जाते) एखाद्याने एखादे दिवशी एकदोन पेग घेतले म्हणून त्याला सुधाकराच्या चेम्बरमध्ये बसवावे असेही नाही.
ज्या काही टोकाच्या भूमिका असतील तर ती करणार्या गटाविरूद्ध पाऊल उचलले पाहिजेच असे मी मानतो. ही बाब केवळ द्राक्षाच्या रसायनापासून येणार्या 'नशे' शी लागू नसून अन्यत्रही लावावी. मनसेने "उत्तर भारतीय" कामगाराविरूद्ध घेतलेला पवित्रा आणि त्यावर झालेले कंदन हाही नशेचाच भाग ना? [मनसेच्या या भूमिकेविरुद्ध मी व माझ्या समविचारी मित्रांनी शहरात मोर्चा काढला होता (पत्रक नव्हे) आणि त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले होते. असो; हे अवांतर आहे,]
इन्द्रा
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/03/2010 - 12:15
नवीन
प्रथमतः मला कुठलीही गोष्ट एकाएकी घडत नसते असं म्हणायचं होतं. माझ्या वरच्या प्रतिसादात नजरचुकीमुळे ते एकाएकी घडत असतं असं लिहीलं आहे.
पण प्रत्येक वेळेला आकाश गडगडले म्हणजे प्रलय झाला, पृथ्वी आता बुडणार अशी गृहितके धरून चाललो तर जीवन अस्थिरच होऊन जाईल.
मग प्रिव्हेंटीव्ह मेजर्स किंवा संरक्षणात्मक कारवाई याला काहीच अर्थ उरत नाही. प्रत्येक वेळेला आकाश गडगडू शकतं तेव्हा आपल्या इमारतीवर वीज पडू शकते म्हणूनच लोक आपल्या इमारतीवर लोखंडी शिग लाऊन ती ग्राऊंड करतात ना!
तद्वतच ताणतणाव हलका करण्यासाठी (असे होते असे समजले जाते) एखाद्याने एखादे दिवशी एकदोन पेग घेतले म्हणून त्याला सुधाकराच्या चेम्बरमध्ये बसवावे असेही नाही.
१-२ पेग बारमधे बसून घ्यायला किंवा स्ततःच्या घरी घ्यायला कोणीही (म्हणजे मी किंवा ते गावकरी) विरोध केला असे मला वाटत नाही.
ज्या काही टोकाच्या भूमिका असतील तर ती करणार्या गटाविरूद्ध पाऊल उचलले पाहिजेच असे मी मानतो. ही बाब केवळ द्राक्षाच्या रसायनापासून येणार्या 'नशे' शी लागू नसून अन्यत्रही लावावी. मनसेने "उत्तर भारतीय" कामगाराविरूद्ध घेतलेला पवित्रा आणि त्यावर झालेले कंदन हाही नशेचाच भाग ना?
आपण किती निष्पक्षपाती विचार करतो, आपण किती उदारमतवादी आहोत हे दाखवणे ही देखील एक मोठी नशाच आहे. मग तिथेही कायद्यांचा विसर पडून केवळ उदारमतवादावर भर सुरु होतो. आणि ते आंदोलन कुठल्या भागात रुजले वाढले याचाही विचार होत नाही. ना तिथल्या परिस्थितीची माहीती घेतली जाते.
[मी आणि माझ्या समविचारी मित्रांनी मनसेच्या आंदोलनाविरुद्ध आमच्या ऑफिसमधे बोलणारी मराठी , अमराठी तोंडे सडेतोड प्रतिवादाने बंद केली होती. आंदोलनामागची भूमिका समजावून दिली होती. पुढे जाऊन तुम्ही कोणीही अमराठी मराठीत बोलत नाही , मराठी समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि २ मराठी माणसे मराठीत बोलायला लागली तर हिंदीत बोला आम्हाला समजत नाही असे उर्मटपणाने म्हणता आणि ते लोक ऐकतात याचा अनेक मराठी लोकांना राग येतो हेही सांगितले. हे अती झाले तर जे बाहेर झाले ते आतही होऊ शकते त्यामुळे त्यांना 'असो. बदला' असेही म्हटले होते. ]
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 14:52
नवीन
"आपण किती निष्पक्षपाती विचार करतो, आपण किती उदारमतवादी आहोत हे दाखवणे ही देखील एक मोठी नशाच आहे. मग तिथेही कायद्यांचा विसर पडून केवळ उदारमतवादावर भर सुरु होतो."
नाही.... या नशेचा मी बळी झालेलो नाही कारण माझी "स्टुडंट युनियन"शी जवळीक ही कुठल्या आंदोलनाशी वा राजकारणाशी संबंधीत अशी नव्हती. कॉ.गोविंद पानसरे, भा.क.प. व लाल निशाण, यांनी "मनसे" च्या घटनाबाह्य आंदोलनाला घटना तरतूदीनुसार उत्तर देणे गरजेचे आहे असे सर्वव्यापी आवाहन केल्यानंतर ज्या ९ स्थानिक संघटनांनी ती ("घटनेने दिलेले हक्क") भूमिका पटली म्हणून मोर्चात सहभागी व्हायचे ठरविले त्यात आमच्या युनि.संघटनेचा सहभाग होता. आणि एक महत्वाची बाब म्हणजे "मराठी" बाबत श्री.राज ठाकरे यांचा ठामपणा तितक्याच तत्परतेने आम्ही मान्य केला होता त्याला कारण आपल्या भाषेबद्दलची अस्मिता. मुंबई-ठाणे-पुणे पट्ट्यात 'मराठी कि हिंदी' हा वाद जितक्या तीव्रतेने सामोरा आला आहे तशी स्थिती कोल्हापुरात नाही. इथे जे आंतरराज्य कामगार आहेत ते कामचलाऊ मराठी शिकलेले असेच आहेत आणि स्थानिक लोकांशी अगदी सहजरित्या मिळूनमिसळून वागतात (यात बिहारी मुसलमानदेखील आहेत.)
जाता जाता हेही आपणास सांगतो की मी दिल्ली इथे असतो म्हणून श्री.राज ठाकरे यांच्या "महाराष्ट्र हा मराठी लोकांसाठी" या भूमिकेला विरोध करतोय असे कृपया समजू नका. माझी ती भूमिका अजून कोल्हापुरात होतो त्यावेळेपासूनची आहे. "बिहार" बद्दल मला जास्त माहिती नाही पण दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात खरोखरी एकमेकाशी भ्रातृभावाने वागण्याची रित आहे. सुरुवातीला माझे हिंदी ऐकणार्याच्या अंगावर काटा आणत असे, पण मला कुणी हसले नाही. इंग्लिश फक्त ट्रेनिंग सेंटर वा कामाच्या ठिकाणी ठीक असते पण राजधानीत हिंदी, उर्दु, पंजाबीचाच दबदबा आहे. मी महाराष्ट्रातील तसेच माझे दोन मित्र केरळातील म्हणून या लोकांबरोबर वावरताना ते आम्हाला आपल्यातीलच मानतात (गुरुदासपूर, पंजाबमध्ये तर तेथील मित्राच्या घरी माझे "ओये आओ मेरे मराठा लाईट इन्फ्न्ट्री के सरदार" असे आरोळीयुक्त स्वागत झाले होते). काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत "अखंड हिंदुस्थान" ही संकल्पना मानणारे खूप भेटतात, दुर्दैवाने मूठभर राजकारण्यांच्या लबाड हितासाठी "प्रांतवाद, भाषावाद" ही शस्त्रे वेळोवेळी उगारली जातात.
इतकेच !
इन्द्रा
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Tue, 08/03/2010 - 10:32
नवीन
सेंसॉर्ड वर्णन आहे. जो प्रकार झाला तो किळसवाणा तर होताच पण बेकायदा पण होता. विद्यार्थिनींचा समावेश, महिलांचे मद्यप्राशन याबाबत काल काही लोकांशी चर्चा झाली. अल्कोहोलिक अॅनॉनिमस च्या एका काउंसेलरचे म्हणणे होते की दारु स्त्री-पुरुष यापैकी कुणीच पिऊ नये अन व्यसन तर अजुनच घातक. जर अश्या सामाजिक बंधनांमुळे समाजाचा पन्नास टक्के हिस्सा मद्यप्राशनापासुन लांब रहात असेल तर ते स्वागतार्हच आहे. गेली जवळपास तीन वर्षे स्त्रीमुक्तीवादी चळवळीचे नेतृत्व करणारी एक विदुषी म्हणाली अंमली किंवा मादक पदार्थांचे सेवन म्हणजे स्त्रीमुक्ती असे समजले जाणार असेल तर आम्ही जे केले ते चुकीचेच होते असे वाटते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/03/2010 - 10:40
नवीन
याच्याकडे कोणाचे लक्ष गेल्याचे दिसत नाहीये.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 08/03/2010 - 10:43
नवीन
किंवा लक्ष जाणे सोईस्कर नसेल म्हणुन दिले नसेल.
शेवटी काय ते व्यक्तिस्वातंत्र्य का काय असते ना... तेच खरे. नाही का ? असो.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Tue, 08/03/2010 - 04:43
नवीन
व्हिडीओ पाहून घ्या उडून जायच्या आधी.
http://www.youtube.com/watch?v=TkYlvUsl4dA
अन हा फटू दै. सकाळमधला. स्विमींग टँक च्या बाजूचा दिसतूया.
आमा गाववाल्यांना काय बी कळत नाय पगा. आता ह्ये समदे ऐमबीए वाले इद्यार्थी हायती म्हंजे लय मोटे सायब व्हतील तवा त्यांच्यावालं बराबर आसंल. गाववाल्यांनी गावागावात असली एखांदी जागा पार्टीसाठी कराया हवी. मस्त भाडं भेटलं आन सगळ्या सोई पुरवन्यामुळं पैशाची दळणवळन बी वाढल. बंद भिंताडाच्या मधी आसली पार्टी नको. समदं कसं उघड्याव झालं म्हंजी आमची गावातली प्वारं बी सामील व्हतील त्यात. आमच्या पोरीबाळी बाया यांना बी मजा पाह्यला भेटलं.
त्येच त्ये टिव्हीवरच्या शिरीयल पाहूनशान त्वांड आंबून ग्येलं हाय पगा.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 08/03/2010 - 08:27
नवीन
व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.
यात कुठेही ते लोक धिंगाणा करताना, हुल्लड किंवा ओरडताना दिसत नाहीत.
दारू पिणे वाईट आहे तर मग इथे मिपावरच कित्येक जण त्याचे उदातीकरण, गौरवीकरण करताना दिसतात, निरनिराळ्या पाककृती (cocktails) सादर होतात त्याचे काय ? हल्ली वाईट गोष्टींना समाजमान्यता मिळालेली आहे आणि लोकशाही असल्याने काहीच करता येत नाही.
स्त्रियांच्या सहभागाबद्दल आक्षेप घेण्यालाच स्त्रीवाद्यांचा आक्षेप आहे.
गुन्हेगारी आणि व्यसनांमधला स्त्रियांचा सहभाग पुरुषांपेक्षा पूर्वीही कमी होता आणि आताही परिस्थिती फार बदललेली नाहीये.
उदा. उभी बाटली- आडवी बाटली: गावांमधे व्यसनाधीन पुरुष आणि त्यामुळे कुटुंबाची होणारी वाताहत टाळण्याकरता दारूबंदी करण्यात स्त्रियांचा पुढाकार असतो. एक तरी अशी घटना आहे का जिथे पुरुषांनी स्त्रियांविरुद्ध ही मोहीम आखली ?
ही वस्तुस्थिती पाहता एखाद्या समाजगटाकडून (स्त्रिया) चांगल्या अपेक्षा ठेवणे वाईट/बुरसटलेले कसे काय :O त्यामुळेच कोणत्याहे गुन्ह्यात वा अप्रिय गोष्टींमधे जेव्हा स्त्रियांचा सहभाग असतो तेव्हा तो बहुसंख्य लोकांना आश्चर्यचकित करतो.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 09:58
नवीन
"दारू पिणे वाईट आहे तर मग इथे मिपावरच कित्येक जण त्याचे उदातीकरण, गौरवीकरण करताना दिसतात,"
श्री. पेन ~ प्लीज, प्रतिसादांतील वाक्यावरून मी कुठे तुम्हाला दारु पिण्याचे 'उदातीकरण, गौरवीकरण' करत असल्याचे दिसले हे मी आता विचारत नाही कारण माझी तशी भूमिका नक्कीच नाही, अन्य कुणाचीही असेल असे वाटत नाही. दारू पिणे ही समाजाला घातक आहे हे आधुनिक काळात अगदी गडकर्यांच्या सुधाकरापासून सांगण्यात आले आहे, अन ते चुकीचेही नाही; कारण काळाच्या ओघात त्यापुढे कित्येक घाणेकर, दुभाषी, निकते त्याच रस्त्याने अस्तंगत झाले. "दारू पिणे" ही संज्ञा "सातत्याने" घेणार्याला लावल्यास तिचा योग्य उपयोग होतो. कार्पोरेट जगात, पोस्ट-ग्रॅज्युएशन शि़क्षण जगतात पार्टीच्या वेळी अशा पद्धतीची एखादी संध्याकाळ संबंधितांनी व्यतीत केली म्हणजे ते समाजविघातक कृत्य ठरू नये.
आता "थेऊर" ची रात्र तिथेच संपुष्टात आली; पण उद्या त्यातील काही विद्यार्थी भर वर्गात नशा करून आली तर त्यांना चाबकाने फोडलेच पाहिजे.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 08/03/2010 - 20:02
नवीन
तुमचा गैरसमज होतोय. माझा प्रतिसाद तुम्हाला नाही.
तुमच्या कुठल्याच प्रतिसादावरून मी हा निष्कर्ष काढलेला नाही. किंवा या धाग्याचाही संदर्भ धरलेला नाही.
मी जेव्हापासून सभासद झालोय तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या प्रसंगी इथले काही लोक ते करताना आढळले आहेत. ते सर्व अट्टल दारुडे नसले आणि नियंत्रणात पीत असले ( दोन्हीही त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यात येते) तरिही दारू म्हणजे सेलिब्रेशन, पार्टीची शान, चैनीची परमावधी असा संदेश जातो, लोकमानसात रूढ होतो.
आनंदाच्या तसेच दु:खाच्या उदा. चित्रपट, मालि़कांमधे प्रेमभंग झाला--> घे दारू, धंदा बुडाला--> घे दारू, टेन्शन आले--> ओढ सिगरेट असे न चुकता चालू असते. या संकल्पनेला माझा विरोध आहे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/03/2010 - 20:15
नवीन
तुमच्या संकल्पनेला विरोध कुणाचाच असणे शक्य नाही. अखेरीस आपण सर्वजण समाजप्रियच नागरिक आहोत आणि त्या अनुषंगाने विचारधारणादेखील राखतो. माझा मुद्दा "असल्या सनसनाटी बातमीतून/धाडीतून काहीही निष्पन्न होत नाही" हा होता. ज्या पत्रकारांने ती भडक बातमी लिहिली "४००-५०० मुलेमुली दारू पिऊन धिंगाणा घालत होती....परप्रांतीय होते...." इ. इ. त्यामुळे खरे तर हा धागा निर्माण झाला.
आपण इकडे तीव्र भावना व्यक्त करणारे विचार मांडून बी.पी. वाढवून घेत होतो, तर तिकडे पोलिसांनी सायंकाळी मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केला.....४५० पैकी फक्त ८१ मुले मद्यप्राशन केलेली सापडली. म्हणजेच सुमारे ७५% सहभागी केवळ "फ्रेंडशिप डे" ची पार्टी म्हणून तीत सामील झाले होते असेच ना? काही स्थानिक तरूण मंडळाला तीत सामील करून घेतले असते तर पार्टीबाबतची एक मुंगीदेखील पुण्यापर्यंत आली नसती.
म.टा.सारखे पत्र बातमी देताना मजकूर संपादनाला महत्व देत नाही यामुळेच ही राळ उडते.
असो. विसरून जाऊ या हा धागा.
इन्द्र
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Wed, 08/04/2010 - 12:03
नवीन
हाहाहा!
तुम्ही होतात वाटते तिथे, प्रत्यक्ष परिस्थिती पहायला!
४५० पैकी फक्त ८१ मुले मद्यप्राशन केलेली सापडली. म्हणजेच सुमारे ७५% सहभागी केवळ "फ्रेंडशिप डे" ची पार्टी म्हणून तीत सामील झाले होते असेच ना?
नाही सगळेच अथर्वशीर्ष म्हणुन गणपतीला महाअभिषेक करत होते! त्या ग्रामस्थांनी गणपतीला अभिषेक करतात काय लेकाचे म्हणुन अन पोलिसांनी दोन पैसे मिळतील या आशेने बिच्चार्या `निर्दोष, निष्पाप, निरपराध, गुणी' बाळांना खोट्या प्रकरणात अडकवले.
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Tue, 08/03/2010 - 10:34
नवीन
यात कुठेही ते लोक धिंगाणा करताना, हुल्लड किंवा ओरडताना दिसत नाहीत.
व्हिडीओ पार्टीचा नाही तर वैद्यकीय तपासण्या सुरु असतानाचे आहेत. पार्टीतली दृष्ये इथे किंवा कुठेच दाखवणे कदाचित सभ्यतेला धरुन होणार नाही.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/03/2010 - 19:30
नवीन
बरोबर आहे. पाषाणभेद ह्यांनी हा विडीयो इथे देण्याचे काय कारण ते समजले नाही.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Wed, 08/04/2010 - 01:11
नवीन
आमी कुठं व्हिडीयो दिला? आमी तर तेथील पाण्यात पवनार्या मुलींना थंडी बिंडी वाजती का म्हून कांबळं घोंगडी घ्येवूनशान उभं व्हतो. पुरावा पायजे आसलं तर गाववाले संगती व्हते आमच्या.
आमी तर केवळ सकाळच्या व्हिडीओची लिंक दिली. काये, येथील वाचक त्या दिसाच्या सकाळपर्यंत कशे काय पोचू शकतील? त्येंला लिंक गावल का नंतर म्हूनशान आमी सोयपानी करून दिली.
आमी गाववाल्यांनी ठराव करायचं ठरवलं हाये. आमी जकात फाडायसारकी पावती फाडनार हाय आसल्या काय पार्टीसाठी. त्येंनी मातूर आमच्यावालं डीजे, केटरर्स, लायटींग बारची सोयपानी घ्येतलं पायजे. आमच्या गावातल्या पोरांनाबी नाचासाठी बलवलं पायजे. बाजूला आमी सर्कसमदी लावत्यात तशी गॅलरी लावू म्हंजे त्याच्याव आमच्या गावातल्या पोरीबाळी बायाबाप्ये, म्हातारं बसत्याल. लय भारी करमनूक व्हयील. सरकारचा करमनूक कर बी आमी भरू. समद कसं येळवारी आन कायद्यानं व्हया पाह्यजे का नगो? आता सर्कार एवढं दारू ची सोय करूं र्हायलंय त्याचा खप व्हाया नगो का? सर्कार एवढं ऐम्बीए कॉलेज काढूंशान एवढे सायेब लोकं तयार करूं र्हायलेय त्येंची करमनूक नगो का? सर्कार एवढ्या कालेजांना परवानंगी देवू र्हायलेय त्या कालेजांची सोयपानी पहाया नगं? कुठूं कुठूं पोरं पोरी येत्यात शिकाया म्हाईत हाये का तुमाला त्या शिंबायशीस कालेजात! आवो उत्तरप्रदेस, बिहार, हरीयाना झालंच तर झारखंड, वोरीसा अरूनाचल प्रदेस. आवं दक्षीन आफरीका, आमेरीगा आसल्या देशातनं बी पोरं पोरी येत्यात तिथं. त्यांच्यावाली सोय पाह्यनं म्हंजे पाव्हन्यांचा मान राकन्यासार्क हाये. तवा त्येंला जे जे लागलं त्ये त्ये आमी देवू. त्यातच आमचं आन आमच्या बांधवांचं हित हाये. जय हिंद. जय म्हाराष्ट्र.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 08/03/2010 - 20:10
नवीन
मान्य आहे.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 08/03/2010 - 05:30
नवीन
इंद्रराज पवार आणि पार्टी समर्थक यांचे सगळे प्रतिसाद ++.
पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे.
आपुण बी ह्या वीकांताला मित्राच्या खाजगी फार्म हाउस वर पिणे पार्टी करणार है. तसल्या (म्हणजे माडीवाल्या टाईप) गोष्टी करण्याची खूप इच्छा आहे. पण काही ज्येष्ठ मंडळी हजर राहणार असल्याने आखडता घेतला आहे. तरी कोणाची परवानगी काढावी लागेल ?
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Tue, 08/03/2010 - 10:38
नवीन
पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे.
संपुर्ण चुकीची माहिती. कारवाई पुणे शहरातही झालेली नाही किंवा पुणे शहर पोलिसांनीही केलेली नाही. थेऊर पुण्यापासुन तीस किमी दुर आहे. ते पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत नाही. कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांनी केली. मध्यंतरी आरोप झाले होते ते शहर पोलिसांबद्दल, ग्रामीण पोलिसांबद्दल नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसांवर असा दबाव असणे संभवत नाही.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Tue, 08/03/2010 - 07:59
नवीन
सहमत आहे. अशा गोष्टींना प्रसिद्धी पटकन मिळते आणि स्थानिकांना पण 'पैसेवाल्यांना लाईनीवर' आणल्याचे समाधान मिळते.स्थानिक लोकांना खरोखरच त्रास झाला असेल तर कारवाई योग्य आहे पण बातम्यांचा रोख स्थानिक लोक सोवळे आणि परप्रांतिय मग्र्रुर असा आहे तो चुकिचा आहे.
एवढीच सोवळेपणाची आवड आहे तर अनेक बेकायदेशीर धंदे(वेश्याव्यवसाय वगैरे) बिनदिक्कत चालु असतात त्यावर बंदी घाला की.
---
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 08/04/2010 - 05:59
नवीन
दारु पिण्याबद्दल इतका आकस का?
हल्लीचे एक जग्प्रसिद्ध वाक्य आहे, " वाईन हा एक पोषक आहार आहे!"
.......................विद्यार्थ्याना पोष्टिक आहार द्यावा!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »