Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सासऱ्याच्या घरावर सुनेचा अधिकार नाही

य
युयुत्सु
Wed, 08/04/2010 - 12:20
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8822 वाचन

💬 प्रतिसाद (20)
आ
आंबोळी Wed, 08/04/2010 - 12:59 नवीन
गरिब नवर्‍यांचे तारणहार आणि भांडखोर सुनांचे कर्दनकाळ युयुत्सु पुन्हा फॉर्म मधे....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 08/04/2010 - 13:11 नवीन
आजकाल समस्त बायकाच्या कुंडलीत शनीचा फेरा आलेला दिसतोय. तिकडे न्यायमुर्ती अंबादास जोशी एकदम स्फोटक निर्णय देतात त्याच्या तुलनेने ह्या निर्णयात काही दम नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
क
कार्लोस Wed, 08/04/2010 - 15:28 नवीन
KON KONACHE KON AANI GHODYA CHE TOND EK DUM SAHI FAISLA HAI BHAI :)
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Wed, 08/04/2010 - 15:47 नवीन
हल्ली मुलींना मुलान्रमाणे समान हक्क आल्यामुळे त्या दोन्ही कडून ओरबाडू शकत होत्या ! सासरकडून आणि माहेरकडून सुद्धा.ह्याला कुठेतरी छडा बसेल असे वाटते. मुलींनी फक्त तेच हक्काने घ्यावे जे त्यांच्या नवर्याच्या स्वकमाईचे आहे ...उगाच सासर्याच्या Property वर डोळा कशाला हवा काही नाही तर या निर्णयामुळे त्या सासू सासर्यांचा आदर तरी करतील आणि करायला शिकतील !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/04/2010 - 15:48 नवीन
मस्त बातमी. युयुत्सुं सारख्या पुरुषांच्या कैवार्‍यांचे अभिनंदन. हे तुमच्याच प्रयत्नांचे यश आहे.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 08/04/2010 - 16:07 नवीन
पण मग आता त्या बाईने कुठे जायचे? भांडणाचे कारण काय? आणि खरच जर सासरची मंडळी तिचा छळ करत असतील,तर तिच्यावर विश्वास का नाही ठेवला जात? दागिने वगैरे घेउन गेली मग रहायला मागते हे चुकीचे वाटते,पण घर सास-याच्या नावावर असल्याने बाईला त्यात अधिकार मिळणार नाही,हेही योग्यच आहे. पण................... जर सासरची मंडळी तिचा पैश्यासाठी छळ करत असेल व मुद्दाम तिला बाहेर काढले असेल आणि आता त्या दुर्दैवी बाईला कुठेच थारा नसेल्,तरीही तुम्हाला हा निर्णय योग्य वाटेल का? हो,असे आपले उत्तर असेल तर वाजवा फटाके!
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Wed, 08/04/2010 - 16:34 नवीन
या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरीकांच्या काही संघटना ही मागणी अनेक दिवस करत होत्याच. इतर अनेक मागण्या अजुनही प्रलंबित आहेत. रेपची झाली तशी डोमेस्टिक व्हायोलंसची व्याख्या नव्याने करावी का हा देखील प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/05/2010 - 05:50 नवीन
चांगला निर्णय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 08/05/2010 - 06:30 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
र
रामदास Wed, 08/04/2010 - 16:34 नवीन
केवळ राहण्याच्या हक्कापुरता मर्यादीत आहे असे मला वाटते. घटस्फोटाच्या खटल्याचे काय ? तो मंजूर झाला आहे का ? जर ही मुलगी मिळवती नसेल तर खटल्याला वेगळे वळण लागू शकते. अशा एका दाव्यात मी सासरच्या मंडळींकडून पुढील काही वर्षांची भाड्याची रक्कम वसूल केली आहे. हे घटस्फोटाचे खटले फार गुंतागुंतीचे असतात . त्यात न्यायाधीशाच्या मनाचा कलही महत्वाचा असतो असे मला काही अनुभवानंतर समजले आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 08/04/2010 - 16:56 नवीन
रामदास यांच्याशी सहमत आहे. पण आता एकत्र राहणार्‍या स्त्रियांसाठी हे नवे झेंगट झाले. मॅट्रिमोनिअल घरात राहण्याचा अधिकार या कारणाने हिरावला गेला तर ते अयोग्य होईल. सध्या या अधिकाराचा वापरकरून बाहेर काढल्या गेलेल्या स्त्रीला घरात पुन्हा प्रवेश मिळवून देता येतो. पण ते घर नवर्‍याचे नसून सासर्‍याचे आहे म्हणून जर हा हक्क गेला तर ते चुकीचे आहे असे वाटते. प्रस्तुत दाव्यात सासर्‍याच्या घरात वेगळे बिर्‍हाड करण्याचा हक्क नाही हा निर्णय योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
नीधप Wed, 08/04/2010 - 18:40 नवीन
प्रस्तुत दाव्यात सासर्‍याच्या घरात वेगळे बिर्‍हाड करण्याचा हक्क नाही हा निर्णय योग्य वाटतो.<< हे बरोबर. मालकी हक्कही नाही हे ही योग्य. पण रहाण्याचा हक्क नाही हे विचित्र आहे. नको असलेल्या सुनेला घरातून बाहेर काढणे फारच सोपे आहे की यामधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
P
Pain Wed, 08/04/2010 - 20:43 नवीन
तुम्ही नावडत्या व्यक्तीस आपल्या फ्रेंडलिस्टमधेही ठेवण्यास तयार नसता आणि त्याने तिला घरात का ठेवून घ्यावे ? वा रे वा (सून आहे वगैरे कारणे लागू होत नाहीत. भांडणे होउन पटत नसल्याने / किंवा त्याच्या मुलाने सासर्‍याच्या मनाविरुद्ध लग्न केले असल्यास सासरा - सून नात्याला सासर्‍याच्या लेखी काहीच अर्थ नाही)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 08/04/2010 - 20:52 नवीन
आयटीतील सून सासर्‍याला स्वतःच्या घरी ठेवून घ्यायला तयार होईल का ? नाही ना ? मग तसेच. ह्म्म्म, पण समजा सासर्‍याला स्वयंपाक करता येत असेल तर ? शक्य आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 08/05/2010 - 04:03 नवीन
हे मात्र आवड्ले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ब
बरखा Fri, 08/06/2010 - 17:49 नवीन
मी आपल्याशी सहमत आहे.अशा सुना सासु- सासरे या॑ना घरतिल अडगळ म्हणुन आश्रमात पाठ्वतात मग वाटा घाटीची वेळ आलि कि त्या॑ना तेवढ्यापुरता प्रेमाचा पाझर फुटतो. पण गेलि अनेक वर्ष ते याच घराचे मालक होते कि॑वा याच घरात त्या॑नि पण स॑सार केला होता हे त्या विसरतात. सासर्‍याच्या घरावर सुनेचा ह्क्क असुच शकत नाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
क
कवितानागेश Wed, 08/04/2010 - 21:05 नवीन
पण नातवंडांचे काय? त्यांचा आजोबांच्या इस्टेटीवर हक्क असू शकतो!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 08/05/2010 - 01:43 नवीन
म्हंटल कुठे गेले तुम्ही? काहीच प्रतिसाद नव्हते म्हणून हो...असो. माझं असं म्हणणं आहे कि नवऱ्याच्या मालमत्तेवर हक्क सांगावा पण सासऱ्याच्या मालमत्तेवर नाही....कारण काय? नवर्याचं घर ते आपलं घर म्हणून त्याच्यावर आपलापण हक्क.. सासर्याचा बंगला असू, झोपडी असू कि राजमहाल...काय करायचाय? पण सुनेला जायला कुठेच जागा नसेल तर घरातली एखादी खोली द्यायला काय हरकत आहे...नवा घरोबा करायचा असेल तर त्याच घरोब्यात राहावे....कसे? बाकी तुमचे पुरुषमुक्तीवाले काय म्हणतायेत या बाबतीत? काही मोर्चा वगैरे? सहजच विचारलं.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/05/2010 - 02:07 नवीन
मध्यंतरी एका नामवंत मराठी अभिनेत्रीने आपल्या सासर्‍यांना घराबाहेर हकलले होते (बहुतेक) त्याची आठवण आली !!! या अभिनेत्रीने तिच्या सासर्‍यांचा छळ केला म्हणे... अधिक वाचायचे आहे ? ;) मग इथे टिचकी मारा :--- http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/1001/14/1100114033_1.htm
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 08/05/2010 - 06:02 नवीन
अर्रर्र आम्ही तर वर्षाचे अजून लग्न झालेले नाही असे समजत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा