सावजी मटण
💬 प्रतिसाद
(21)
च
चित्रा
Fri, 08/06/2010 - 13:55
नवीन
छान पाककृती..
नागपुरी मटण - करून पाहिले पाहिजे.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/06/2010 - 14:00
नवीन
तुम्ही जो काळा मसाला म्हणता तो गोडा मसालाच का? आजवर चिकन/मटणाच्या पाकृंत गरम मसाला, मालवणी मसाला, कांदा-लसूण मसाला इ. ऐकले/खाल्ले होते. पण गोडा मसाला घालून केलेली ही पहिलीच दिसते. छान दिसते. करून पहायला हावी.
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 08/06/2010 - 21:06
नवीन
वर काळा मसाला म्हटले आहे खरे, पण खाली एके ठिकाणी 'खोबरे,तिळ्,खस्-खस्,जिरे,धणे,गरम मसाल्याचे सर्व पदार्थ कोरडे भाजुन घ्यावे आणी १/४ कोथिबिर घालुन वाटावे' असेही म्हटले आहे. पण नंतर पुन्हा पुढे 'तीखट्,हळ्द,काळा मसाला घाला' असे म्हटले आहे. नक्की काय ते कळत नाही.
काळा मसाला म्हणजे गोडा मसाला, बरोबर. पण तो मांसाहारी पाककृतींमध्ये कधी वापरला गेलेला ऐकलेला नाही. (आमच्या (पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे) 'अभागी शाकाहारी समाजा'चा फेवरिट.) मटणाबरोबर कसा लागेल, कल्पना करू शकलो नाही.
- Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१०
Fri, 08/06/2010 - 14:01
नवीन
अगदी झणझणीत असेल हे नाही का?
पण रश्मी फोटो हवा होता अग...जमेल तर नक्की अपलोड कर
मस्तच आहे पाकृ..
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Fri, 08/06/2010 - 16:24
नवीन
फोटु फोटु फोटु फोटु फोटु फोटु
- Log in or register to post comments
र
रश्मि दाते
Fri, 08/06/2010 - 14:37
नवीन
ध्न्यवाद चित्रा,सुनील आणी प्रितम
हो नागपुरी जेवण तसे जहाल पण आपण तिखट आप्ल्या आवडीनुसार टाकावे
सुनीलजी आम्च्या नागपुरला एक वेगळा मसाला मिळ्तो थोड्या फार फर्काने गोड्या मसाल्याचेच साहित्य पण काळ्पट भाजुन करतात्,नाहितर विकतचा काळा मसाला/सावजी मसाला घातला तरि चालेल
पुन्हा कधि त्या मसल्यचि पाक्रु टाकेन
फोटो जमत नहिये हो टाकणे पण प्रय्त्न करेन नक्कि
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Fri, 08/06/2010 - 16:10
नवीन
मस्त .. फोटो टाका लवकर .. त्यावरच समाधान :)
कसा टाकायचा जमत नसल्यास, गणपाचा http://www.misalpav.com/node/13573 धागा बघा :)
- Log in or register to post comments
ज
जानम
Fri, 08/06/2010 - 16:53
नवीन
छान .... मी पण करुन बघेन ...मी देखिल नागपुरचा :-)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 08/06/2010 - 18:42
नवीन
फोटो?
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 08/06/2010 - 20:58
नवीन
बरेच दिवस शोधत होती ही पाकृ...आता श्रावणाच्या आधीच करेन पटकन, चिकनही बनतं कां अस्संच?
- Log in or register to post comments
P
piu
Fri, 08/06/2010 - 21:09
नवीन
ह्याच्यामध्ये कच्ची पपई टाकली नाही तर चवीत काही फरक पडतो का?
- Log in or register to post comments
र
रश्मि दाते
Fri, 08/06/2010 - 21:48
नवीन
1)पियु कच्चि पपई मटण लवकर शिजावे म्हणुन घालावि,
2)चिकन घालावे मटणा च्या जागी
3)काळा मसाला वेगळा आणी गोडा मसाला वेगळा .आणी ते बाकि सामान वाटणाचे आहे काळा मसाला फक्त २ चमचे आहे तेव्ह्ड्याने १ किलो मटणा ला रस्सा कसा होणार हो,म्हणतात ना कि COMMON SENSE IS NOT SO COMMON :D
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 08/06/2010 - 21:58
नवीन
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः आमच्या 'अभागी शाकाहारी समाजा'त (म्हणजे पु.लं.च्या भाषेत हो! हौ कन्वीनियंट, किनै?) गोड्या मसाल्याला काळा मसाला म्हणतात.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 08/06/2010 - 21:13
नवीन
चिकन/मटण कुकर मधे वेगळं शिजवलं की चव तेवढी चांगली लागत नाही. (लोखंडी कढई बेस्ट)
मसाला परतत असताना त्यातच चिकन्/मटण चांगले परतुन घ्यावे, मग हवं तर कुकर मधे एक शिटी काढण्यास हरकत नाही, मसाला चांगला मुरतो आणी मग चवही छान येते.
तसेच कांदा गॅसवर/चुलीत भाजुन मसाल्यात घातल्यास तर विचारायलाच नको. :)
बाकी काळ्या मसाल्याचं मटण आणि सोबत "बाजरीची" भाकरी म्हणजे जीव की प्राणच. :)
- Log in or register to post comments
म
मेधा खेंगरे
Sat, 08/07/2010 - 09:14
नवीन
पट कन जेवायला बसावे वाटत आहे...
मस्त मस्त मस्त मस्तच.............
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 08/07/2010 - 20:57
नवीन
मटण कुकरात शिजवण्यापेक्षा पितळेच्या जाड पातेल्यात शिजवलेले चांगले.
कच्ची पपई मटण मऊ शिजण्यासाठी वापरतात. (तशी गरज नसते. पपईशिवायही ४०-४५ मिनिटात मध्यम आंचेवर चांगले शिजते).
वरील पाककृतीत कच्ची पपई केव्हा वापरायची हे सांगितलेले दिसत नाही. पण कच्च्या मटणाला कच्च्या पपईची पेस्ट लावून अर्धा तास ठेवावे. नंतर पेस्ट हाताने काढून टाकावी . (मटण धूवू नये.) आणि बाकी मसाल्यांसहित पितळेच्या पातेल्यात मटण शिजवावे. छान शिजते.
काळ्या मसाल्यालाच गोडा मसाला किंवा ब्राह्मणी मसाला म्हणतात.
काळा मसाला = रंगाने काळा असतो म्हणून.
गोडा मसाला = धणे, जिरे, खोबरे वगैरे जास्त असते गरम मसाला (काळीमिरी, लवंग इ.) अत्यल्प असतो, म्हणून.
ब्राह्मणी मसाला = ब्राह्मणांच्या घरात शाकाहारी पदार्थात (उदा. भाज्या, उसळी, खिचडी इत्यादीत) मुख्यत्वे करून वापरला जातो म्हणून.
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 08/07/2010 - 21:12
नवीन
एक्स्पर्ट कमेन्ट्स म्हणूनच आमची नो कमेन्ट...
तरीही, पितळेची भांडी सध्याच्या न्युक्लीयर फॅमिलीत सापडणे जरा कठीणच! तेव्हा कूकराला पर्याय नाही!
मीट टेन्डरायझर म्हणून पपई उत्तमच. पण उपलब्ध नसेल तर, आलं-लसूण + दही हा पर्याय चांगला, नाही का?
काळा मसाला = गोडा मसाला = ब्राह्मणी मसाला हे समिकरण नागपूरात अवैध ठरते, हे नुकतेच कळले!
बाकी बर्याच दिवसात तुमची पाकृ आली नाही!
- Log in or register to post comments
र
रश्मि दाते
Sat, 08/07/2010 - 21:42
नवीन
बरोबर बोललात सुनीलजी आपण
- Log in or register to post comments
म
मी कोल्हपुरी…
Mon, 08/16/2010 - 09:29
नवीन
व्वा रश्मी जी........... तोन्डाला पाणी सुट्ल की हो.........सावजी मट्ण म्हणजे आपला विक पॉईन्ट आहे.......त्यात जर बरोबरिला भाकरी असेल तर अजुन मजा येते.....
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Mon, 08/16/2010 - 12:18
नवीन
मटन कश्याचे?
माझ्या माहिती प्रमाणे नागपुरकडे बकरीचे मटण खातात आणि पश्चिम महाराष्ट्रात बोलाइचे (बोकडाचे).
अजून एक माहिती हवी आहे. 'खूर' बनताना हाच मसाला वापरतात का?
- Log in or register to post comments
र
रश्मि दाते
Mon, 08/16/2010 - 12:32
नवीन
आपल्याला जे आवडेल ते मट्ण घ्या हो,आम्ही बोकडाचे घेतो.
खुरा साठ हाच मसाला फक्त करायची पध्त वेगळी
- Log in or register to post comments