Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काश्मिर आणि लेह

ऋ
ऋषिकेश
Tue, 08/10/2010 - 06:47
🗣 75 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14662 वाचन

💬 प्रतिसाद (75)
श
शिल्पा ब Tue, 08/10/2010 - 06:50 नवीन
काश्मिर हे राजकारणातील प्यादे झाले आहे दुसरे काही नाही.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 06:54 नवीन
काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का?
का वागवायच? पाकीस्तानात जायचाय त्यांना,मग जाउ दे. कधी भारताचा झेंडा जाळताना विचार नाही करत आम्ही भारतात राहतो म्हणुन! आणि हे सर्व होतंय,कारण हा निसर्गाचा कोप आहे.अन्याय वाढले की हे होणारच!गायी/म्हशी कापतात्,मग असच होणार. जय हींद!!!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 08/10/2010 - 06:57 नवीन
कोणाला पाकिस्तानात जायचंय? सामान्य काश्मीरवासियांना? कुठून मिळाली हि माहिती? <<<अन्याय वाढले की हे होणारच!गायी/म्हशी कापतात्,मग असच होणार. हे गमतीशीरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 07:08 नवीन
उगाच माझ्या हींदुप्रेमी भावनांना ठेच पोहचवु नका! हो त्या काश्मिरच्या लोकानांच जायच आहे पाकीस्तानला. http://www.dawn.com/2008/08/16/top17.htm अजुन एका ईमेलमधे फार उत्तेजक(?) फोटोज आहेत्,ते ईथे दीले तर गोंधळ होईल. (ही कामे काही लोकांची असु शकतात्,पण ह्यांचे प्रमाण मोठे आहे) तिथले लोक आतंकवाद्यांना मदत करतात तेव्हा ते नेहमीच मजबुर नसतात.(स्त्रोत: माझे काही ओळखीचे आर्मीमेन)
हे गमतीशीरच.
बर्,बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Tue, 08/10/2010 - 07:26 नवीन
<<<उगाच माझ्या हींदुप्रेमी भावनांना ठेच पोहचवु नका! तुम्हीच लिहिलेल्या प्रतिसादाविषयी विचारलं मी...आणि त्यात तुम्च्या हींदुप्रेमी भावनांना कशी काय ठेच पोहोचवली...आणि तुम्हीच काय ते एकटे भारतप्रेमी हिंदू सॉरी हींदु आणि बाकीचे नाही या थाटात लिहिले नाही तर बरे. पाकिस्तानी पेपरच्या लिंक देऊन काय होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
ऋ
ऋषिकेश Tue, 08/10/2010 - 07:00 नवीन
अपेक्षित प्रतिसाद. हेच म्हणतोय मी जर आपणासारखे भारतीयच काश्मिरला भारताचा भाग मानत नाही तर जगाने तो मानावा हा अट्टाहास का चालु आहे? मी काश्मिरला भारताचा भाग मानतो आणि म्हणूनच इतर भारतातील कोणत्याही नागरीकांइतकीच मला काश्मिरींचीही काळजी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
छ
छोटा डॉन Tue, 08/10/2010 - 07:03 नवीन
मी काश्मिरला भारताचा भाग मानतो आणि म्हणूनच इतर भारतातील कोणत्याही नागरीकांइतकीच मला काश्मिरींचीही काळजी वाटते.
+१, हेच म्हणतो. चर्चा रोचक आहे, हळुहळु भर घालत जाईन. @ शानबा : आपण जरा आपल्या लेखणीला लगाम घालाल तर बरे होईल. उगाच काहीही खरडण्यात आपले भले नाही इतकेच सांगतो, इथे संयमाने लिखाण अपेक्षित आहे. कुठलाही मुद्दा संयमानेच आला पाहिजे, जमत नसल्यास आपल्यापुढे 'न लिहण्याचा ' पर्याय उपलब्ध आहे. उगाच तुमच्या एखाद्या तिरसट आणि बेसलेस प्रतिसादामुळे चर्चेची वाट लागु नये अशी इच्छा आहे. कळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 07:09 नवीन
माझी ही प्रतिक्रीया बेसलेस नाही,तिरसट असावी. http://www.dawn.com/2008/08/16/top17.htm http://weirdindia.blogspot.com/2006/09/holy-cow-beef-eating-great-sin-among_21.html भावना कधी कधी संयम ओलंडतात्,मी लिहल आहे ते एखाद्या धर्माविषयी तेढ आहे म्हणुन नाही,तर हे खर आहे,माझ्यामते तरी(सिद्ध करु शकतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/10/2010 - 07:12 नवीन
हो, पण भारतीय असोत वा पाकिस्तानी, नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना मदत करण्याविषयी अढी का? मागे पाकिस्तानात भूकंपाने बरेच बळी गेले होते तेव्हाही भारताने मदत पाठवली होती. का तुम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करतानाही देशाच्या सीमांचा विचार करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 07:22 नवीन
का तुम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करतानाही देशाच्या सीमांचा विचार करता?
मानवता हा सर्वात उच्च धर्म,हे माझं मत. पण ह्याला अंधश्रद्धा म्हणा नाहीतर अजुन काही पण आज आपण जे काही नवीन आजार वगैरे बघतोय त्याचा उगम हा आपण प्रगतीच्या नावाखाली केलेला अन्याय हाच आहे.असो. माझा आक्षेप काश्मिरमधल्या लोकांना खरे भारतीय समजण्याला आहे.आपणास हव असल्यास मी काही ईमेल पाठ्वीन ते पहा,मी हे का लिहतोय हे पटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
इ
इंटरनेटस्नेही Wed, 08/11/2010 - 01:05 नवीन
आदिती यांच्याशी सहमत. (मानवतावादी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
छ
छोटा डॉन Tue, 08/10/2010 - 07:18 नवीन
माझी ही प्रतिक्रीया बेसलेस नाही,तिरसट असावी.
आणि हे सर्व होतंय,कारण हा निसर्गाचा कोप आहे.अन्याय वाढले की हे होणारच!गायी/म्हशी कापतात्,मग असच होणार. मी ह्याला "बेसलेस" म्हणालो आणि ते "बेसलेस"च आहे. निसर्गाचा कोप असा जाती / धर्म पाहुन होत असतो असा अंदाज बांधणे किंवा तसे मत व्यक्त करणे म्हणजे शुद्ध तर्कटीपणा आहे. >>भावना कधी कधी संयम ओलंडतात्, मान्य आहे, म्हणुनच मी आपल्याला "संयमाने लिहा" असे सुचवले आहे, मी माझ्या प्रतिसादात कुठेही "लिहु नका" असे सुचवले नाही केवळ तो संयमाने जमत नसेल तर न लिहण्याचा पर्याय वगळता. >>मी लिहल आहे ते एखाद्या धर्माविषयी तेढ आहे म्हणुन नाही,तर हे खर आहे,माझ्यामते तरी(सिद्ध करु शकतो) असु शकेल. पण उपरोक्त 'निसर्गाच्या कोपाचे' विधान मात्र चुकच आहे. आता तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल : असे १००० दुवे देता येतील, पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' काय भारताच्या बाजुने बोलणार आहे काय ? बाकी कुठल्याही दुव्यापेक्षा तिथल्या सामान्य जनतेला अजुनही भारतात राहु वाटते ही भावना महत्वाची. सिद्ध काय मी ही करु शकतो, माझेही काश्मिरी मित्र आहेत, अगदी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम दोन्हीही. हे आजचे नाही तर गेल्या ६-८ वर्षाचे संबंध आहेत, आमचीही बरीच चर्चा होते. त्यांना भारतातच रहायचे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास धरणे म्हणजे त्यांचा अपमान आहे, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 07:32 नवीन
माझेही काश्मिरी मित्र आहेत, अगदी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम दोन्हीही. हे आजचे नाही तर गेल्या ६-८ वर्षाचे संबंध आहेत, आमचीही बरीच चर्चा होते.
माझे काही नातेवाईक बॉर्डरहुन आल्यावर जे काही कथन करतात्,ते ऐकुन आपणही रागाने लाल व्हाल. पण जे तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसांकडुन ऐकता ते विरुध्द आहे,त्यात फक्त चांगली बाजु मांडलेली असते. माझ्यामते ह्या नाण्याच्या दोन बाजु आहेत. मला वाद निर्माण नाही करायचा पण खर(निदान मला दीसत तस) बोलुन वाद निर्माण होत असेल्,तर त्याला चर्चा म्हणुन संभाळुन घ्याव ही माफक अपेक्षा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
वेताळ Tue, 08/10/2010 - 16:09 नवीन
सिद्ध काय मी ही करु शकतो, माझेही काश्मिरी मित्र आहेत, अगदी काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लिम दोन्हीही. हे आजचे नाही तर गेल्या ६-८ वर्षाचे संबंध आहेत, आमचीही बरीच चर्चा होते. मग डानराव साहेब तुमचे मित्र अजुनही काश्मिरात राहतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 17:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
C
chipatakhdumdum Wed, 08/11/2010 - 15:23 नवीन
वेताळ भाउ , असले अडचणीत आणणारे प्रश्न तुम्ही विचारणार आणि आमची वाचा बसली की सेक्युलर म्हणून तुम्ही आमची संभावना करणार.. हे बर न्हव. अवांतर : धागा काय आणि चर्चा काय... सं डु म्हणावे काय , या प्रकाराला. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
छ
छोटा डॉन Wed, 08/11/2010 - 16:44 नवीन
अरेच्चा, आता ह्या धाग्यात चर्चा करण्यासारखे काही राहिले नाही ह्या कल्पनेने आम्ही हा धागा उघडला काय नाही आणि इथे लगेच 'आमची बोल्ती बंद केल्याच्या बाता' काय सुरु झाल्या. असो. >>मग डानराव साहेब तुमचे मित्र अजुनही काश्मिरात राहतात काय? होय, अजुनही ते काश्मिरमध्येच राहतात, अर्थात सगळेच नाही, पण काही जण नक्कीच आहेत. अजुन डिटेलमध्ये सांगतो. आमचा एक मित्र पुण्यातुन 'सिव्हिल इंजिनियर' झाला आणि आता काश्मिरात परतुन तिकडे काहीबाही करतो आहे लोकांसाठी, सरकारी आणि खासगी कंत्राटे वगैरे घेतो तिकडेच. त्याचे एकंदरीत बरे चालले आहे असे आम्हाला ज्ञात आहे. दुसर्‍याचे असेच आहे काहीसे, तो डॉक्टर आहे, काही काळ श्रीनगरमध्ये त्याने प्रॅक्टिस केली आणि आता उच्चशिक्षणासाठी सध्या दिल्लीत आहे, पण तिकडे चक्कर असतेच. बाकी उरलेले जरी आता तिकडे रहात नसले तरी वर्षातुन २-३ वेळा जंगी सुट्टी वगैरे घेऊन अगदी रेग्युलरली जातात हे माहित आहे. एकाने तर शिक्षण चालु असतानाच त्याला रामराम ठोकुन तिकडे वडिलोपार्जित धंद्यात हात घातला होता, त्याचेही उत्तम चालु आहे. बाकी हे दंगेधोपे, आतंकवादी कायवाया वगैरेंचा त्रास त्यांनाही होतो पण ते म्हणुन काश्मिर सोडायच्या किंवा आपले आख्खे कुटुंबच इकडे स्थलांतरीत करुन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला ज्ञात नाही, बाकी असो. सेक्युलरवरुन आठवले बरं का, हे मित्र हिंदु आणि मुस्लिम असे दोन्हीही धर्माचे आहेत आणि दोघांनाही अलमोस्ट सारखाच त्रास होतो, कमाल आहे नाही सेक्युलॅरिझमची ! बघु, त्यातल्या एखाद्याला मिपावर आमंत्रित करावे म्हणतो त्याचे मत मांडण्यसाठी, तो लिहु शकतो आरामात ह्यावर पण ते 'इंग्रजीत' असेल, लेट्स सी ! - ( अडचणीतल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
पंगा Wed, 08/11/2010 - 18:08 नवीन
बघु, त्यातल्या एखाद्याला मिपावर आमंत्रित करावे म्हणतो त्याचे मत मांडण्यसाठी, तो लिहु शकतो आरामात ह्यावर पण ते 'इंग्रजीत' असेल, लेट्स सी !
कल्पना चांगली आहे. (इंग्रजीत तर इंग्रजीत. निदान एक बाजू फर्स्टहँड तरी कळेल.)
सेक्युलरवरुन आठवले बरं का, हे मित्र हिंदु आणि मुस्लिम असे दोन्हीही धर्माचे आहेत आणि दोघांनाही अलमोस्ट सारखाच त्रास होतो, कमाल आहे नाही सेक्युलॅरिझमची !
आतंकवाद्यांच्या 'सेक्युलरिझम'विषयी बोलत असाल तर गोष्ट वेगळी. अन्यथा सेक्युलरिझमचा संबंध कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रसन्न केसकर Wed, 08/11/2010 - 21:11 नवीन
त्यातल्या एखाद्याला मिपावर आमंत्रित करावे म्हणतो त्याचे मत मांडण्यसाठी, तो लिहु शकतो आरामात ह्यावर पण ते 'इंग्रजीत' असेल, लेट्स सी छान कल्पना! ते मराठी आंतरजाल वगैरे जाऊ दे. जेव्हा काश्मीर धडाड्न पेटलं होतं ना ८० च्या दशकात, तेव्हा तिथे गेले ते महाराष्ट्रातलेच तरुण. क्ष्थानिक लोकांना बरोबर घेऊन जेकेएलएफचं, हुर्रियतचं कंबरडं मोडलं ना, ते आपल्या मराठी पोरांनीच बरं. अगदी यासीन मलीक परत भारतीय लोकशाहीत आला तेव्हाच. अन आजही काश्मीरच्या दहशतवादग्रस्त लोकांच्या पोरांसाठीची रेसिडेंशियल स्कुल कुठं आहे माहिती आहे? ती आहे महाराष्ट्रातच. जेव्हा काश्मीर म्हणल्यावर सगळ्यांना कापरं भरायचं तेव्हाही महाराष्ट्र अन काश्मीरचं भावनिक नातं होतं अन आजही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
भ
भारतीय Tue, 08/10/2010 - 07:30 नवीन
का वागवायच? पाकीस्तानात जायचाय त्यांना,मग जाउ दे. कधी भारताचा झेंडा जाळताना विचार नाही करत आम्ही भारतात राहतो म्हणुन ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा करू नका.. ऊचलली जीभ लावली टाळ्याला! मूलतत्त्ववाद माणसाला आंधळा करतो हेच खरे, मिपावर असले प्रतिसाद अपेक्षित नव्हते. मुळात काश्मिरमधील जनता हि भारतीय आहे हे सांगण्याची गरजच नाही.. अन सध्या काश्मिरींचा संघर्ष तिथल्या राज्य सरकाराविरुद्ध असलेल्या असंतोषामुळे सुरू आहे, सुरक्षा दलाच्या कारवाईचे फक्त निमित्त ठरले.. काही देशविघातक शक्ती असल्याच गोष्टींचे भांडवल करून भारताची प्रतिमा मलिन करु पहात आहेत.. त्याचप्रमाणे काश्मीरबद्दल ऊर्वरीत भारतीयांच्या मनात असंतोष तयार होईल असेही कृत्य ह्याच देशविघातक शक्ती करीत असतात.. अन काही ऊंटावरचे शहाणे ह्याच गोष्टींना प्रमाण मानून आपली मतं तयार करीत आहेत.. घरातीलच एखादा सदस्य डावलले गेल्याच्या भावनेतून थोडी कुरबुर करीत असेल तर आपण त्याला हाकलून द्यायची भाषा करायची कि त्याच्या मनातील गैरसमज दूर करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 07:39 नवीन
ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा करू नका.. ऊचलली जीभ लावली टाळ्याला!
हे देशप्रेम की आमच्याबद्दलची नाराजी माहीती नाही. पण एखाद्या तुमच्या ओळखीच्या माणसाला तिथल्या सो कॉल्ड भारतीयांनी शत्रुशी मिलीभगत केल्याने जखमी व्हायला लागल की राग येतोच.आपणास ईथे बातम्या वाचुन ह्या गोष्टी कळतात का? नाही ना,मग तुम्हाला 'त्यांचा' पुळका येणारचं! सर्व जनमत माझ्याविरोधात असल तरी मी माझ्या मतांवर ठाम आहे/राहीन. जय हींद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय
भ
भारतीय Tue, 08/10/2010 - 08:02 नवीन
हे देश्प्रेमच असावं, तुमच्याबद्दल नाराजी नाही.. ऊलट ईतर धाग्यांमधले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल आदरच आहे.. पण तुमच्या ह्या मताशी सहमती अजिबात नाही.. अन तुमच्या काश्मिरविषयक दृष्टीकोणाला एकच उत्तर आहे,, मी वर म्हटल्याप्रमाणे.. "घरातीलच एखादा सदस्य डावलले गेल्याच्या भावनेतून थोडी कुरबुर करीत असेल तर आपण त्याला हाकलून द्यायची भाषा करायची कि त्याच्या मनातील गैरसमज दूर करायचा?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
भ
भारतीय Tue, 08/10/2010 - 08:49 नवीन
ओ.के. ऊलट ईतर धाग्यांमधले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल आदरच आहे. ह्या वाक्यामुळे आपल्या प्रतिसादाच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झाली. तुमच्या आग्रहाखातर तुमच्याविषयीचे मत बदलत आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/10/2010 - 09:15 नवीन
"घरातीलच एखादा सदस्य डावलले गेल्याच्या भावनेतून थोडी कुरबुर करीत असेल तर आपण त्याला हाकलून द्यायची भाषा करायची कि त्याच्या मनातील गैरसमज दूर करायचा?" १००% मान्य पण त्याला काही मर्यादा असाव्यात.
या संवादाला काही जालीय संदर्भही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Tue, 08/10/2010 - 10:30 नवीन
मी माझी मतं असे व्हीडीओ बघुन नाही बनवली,पण असे चित्र खुप काही सांगुन जाते. (I am talking about content of the video,and not about any other content on the webpage!) हे बघा कशाला असल्या भारतद्वेष्ट्यांना जवळ करायचं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ज
ज्ञानेश... Tue, 08/10/2010 - 07:16 नवीन
काश्मिरातही मदत करण्याची इच्छा असणे ठीक आहे, पण ते शक्य आहे का? पाकव्याप्त काश्मिरात कशी मदत पोचवणार?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 08/10/2010 - 16:03 नवीन
कसली? लढाऊ इसमांची व दारुगोळ्याची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 07:33 नवीन
शानबा शी पुर्णपणे सहमत नाही आहे. पण पुर्णपणे असहमत देखील नाही आहे. कश्मिरी जनतेला भारतापसुन वेगळे निघायचे नाही आहे अशी आपल्याला स्वत:ची समजुत करुन घ्यायची असेल तर आपली अवस्था डोळे मिटुन दुध पिणार्‍या मांजरीसारखी होइल. १. जागोजागी तिथे जो हिंसाचार चालतो तो केवळ पाकिस्तानी अतिरेकी करतात असे वाटते की काय आपल्याला? स्थानिक लोकांची फूस आणि मदत नसेल तर हे सगळे शक्य आहे का? २. वाऱंवार तिथे जे पाकिस्तानी झेंडे फडकवले जातात ते काय प्रत्येकवेळेस पाकिस्तानी अतिरेकी येउन फडकवतात का? ३. इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्यावर (एवढे मोठे सैन्य असताना) आणि इतर ठिकाणी ही तिथे जे हल्ले होतात ते नक्के कोण करते? ४. हे सगळे केवळ पाकिस्तानी दहशतवादी करत असले असते तर आत्तापर्यंत सैन्याने त्याचा कधीच बीमोड केला असता. स्थनिक लोकांची फूस असल्यामुळे आणि स्थानिक लोकच या कार्यांमध्ये असल्यामुळेच सैन्य हवालदिल होते असे नाही का वाटत? माझा मित्र २ वर्षांपुर्वी तिथे गेला होता. तेव्हा तेथील स्थानिक बोट चालक त्याला म्हणाला "आप हिंदुस्थान से आये हो. हमारे देश मे आपका स्वागत है". तुम्ही हिंदुस्थानी नाही का असे मित्राने विचारल्यावर "साब आप मेहेमान हो मेहेमान की तरह रहो. कश्मीर जन्नत है उसके मजे लुटो. क्यो ऐसे सवाल पुछ्कर मुसीबत मोड लेना चाहते हो?" असे त्याला सुनावले गेले. टुर गाईड ने नंतर लगेच मित्राला शांत राहण्याची आणि जास्त प्रश्न न विचारण्याची विनंती केली. मित्राने तरीही नंतर चिकाटीने नावड्याकडे विषय काढला आणि मुद्दाम आडुनआडुन विचारले की "यहा हमे कुछ खतरा तो नही?" त्यावर नावडी शांतपणे म्हणाला "साब हम लोग आप हिंदुस्थानी टुरीस्ट्स को कुछ तकलीफ नही देते. आपसेही तो हमारी रोजी रोटी चलते है. ये सब तो पाकिस्तानी आतंकवादी करते है. अगर आप यहा पर हमारे मेहमान बनके रहोगे तो हमारे लोग आपको कोई तकलीफ नही पहुचायेंगे" तिथले लोक स्थानिक आतंकवाद्यांना अतिरेकी मानतच नाहीत. ते तर त्यांच्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आहेत. अतिरेकी म्हणजे फक्त पाकिस्तानी आणि तालिबानी. एकुण काय त्यांना पाकिस्तानात जायचे नसेलही कदाचित. पण त्यांना भारतातही रहायचे नाही आहे. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांची मदत घेण्यात त्यांना काही गैरही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 08/10/2010 - 07:39 नवीन
तुमच्या स्नेह्याने स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणून स्वीकारली...तरीही केवळ काही "स्वातंत्रसैनिक" म्हणवणारे लोक अशा देशविघातक कारवाया करून देशाचा एक तुकडा जर वेगळा करू इच्छित असतील तर त्याला विरोध हा केलाच पाहिजे....उद्या माओवादी असेच म्हणतील...द्यायचा का त्यांना हवा असलेला भाग तोडून? श्रीलंकेसारख्या देशाने इतका काळ लढा देऊन अशाच पद्धतीने देशाचे तुकडे करायच्या प्रयत्नात असलेल्या तामिळी वाघांना काबूत आणलं....लगेच एक भाग तोडून दिला नाही...असा विचारच कसा करू शकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 08:10 नवीन
अजिबात तोडुन देऊ नये. शेवटी कश्मिर भारताचाच भाग आहे. आणि मदत देखील केलीच पाहिजे. जसा महाराष्ट्र तसेच काश्मीर. शेवटी कश्यपांची भूमी आहे ती. आपलेच बांधव आहेत. माझा मुद्दा केवळ स्थानिकांच्या मनात असलेल्या आप्ल्या अढीविरुद्धा मर्यादित आहे. बाकी मी असे अजिबात मानत नाही की तो भारताचा भूभाग नाही किंवा त्यांना मदत करु नये. हे सगळे होण्यास भारतीय राजकारण्यांनी कश्मीरकडे केलेले दुर्लक्षच कारणीभूत आहे असेही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
व
वेताळ Tue, 08/10/2010 - 16:06 नवीन
पण लंकन लोकानी तामिळवाघाना पिटाळले ते अहिंसेच्या मार्गाने का हो?ह्याबद्दल जरा माहिती घ्याल का? त्याचा मार्ग काश्मिरात अमंलात आणयला तुमचा विरोध असणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Tue, 08/10/2010 - 19:01 नवीन
अहिंसेचा मार्ग अवलंबवावा (कोणत्याही अतिरेक्यांच्या बाबतीत) असे मी कुठे म्हंटले ते दाखवून द्या... लिहिण्याआधी जरा वाचून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
भ
भारतीय Tue, 08/10/2010 - 07:55 नवीन
मृत्युन्जय.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. कश्मिरींच्या मनात हि भावना (वेगळे निघण्याची) आली असल्यास ती का आली ह्याचासुद्धा विचार आपण करायला हवा.. आणि केवळ ऐकिव माहीतीवर आपले मत तयार करुही नका.. आपण आपल्या मित्राचा जो अनुभव वर सांगितला आहे अगदी तसाच अनुभव माझ्याही एका मित्राला आला होता.. फक्त ठिकाण वेगळे होते, काश्मिरऐवजी ईशान्य भारत! आता तुमच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर.. १)जागोजागी तिथे जो हिंसाचार चालतो तो केवळ पाकिस्तानी अतिरेकी करतात असे वाटते की काय आपल्याला? स्थानिक लोकांची फूस आणि मदत नसेल तर हे सगळे शक्य आहे का? --- होय! तो हिंसाचार पाकिस्तानी अतिरेकीच बहुतांशी ठिकाणी करतात.. काही ठिकाणी काश्मिरी युवक देखील हिंसाचारात सामील असू शकतील पण ते केवळ वाट चुकलेले आहेत असे समजण्यात काय चूक आहे? बहुतांश काश्मिरी तरुणांना हिंसाचार नकोच आहे.. २)वाऱंवार तिथे जे पाकिस्तानी झेंडे फडकवले जातात ते काय प्रत्येकवेळेस पाकिस्तानी अतिरेकी येउन फडकवतात का? पाकिस्तानी झेंडे जिथे फडकवले जातात तो भाग पाकीस्तान सीमेलगतचाच आहे. अन तुम्हासही सांगणे कि शितावरून भाताची परिक्षा नको! ३)इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्यावर (एवढे मोठे सैन्य असताना) आणि इतर ठिकाणी ही तिथे जे हल्ले होतात ते नक्के कोण करते? नेमके काय म्हणायचे आहे ? ४)हे सगळे केवळ पाकिस्तानी दहशतवादी करत असले असते तर आत्तापर्यंत सैन्याने त्याचा कधीच बीमोड केला असता. स्थनिक लोकांची फूस असल्यामुळे आणि स्थानिक लोकच या कार्यांमध्ये असल्यामुळेच सैन्य हवालदिल होते असे नाही का वाटत? सहमत! काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना करवाया करता येणार नाहीत. पण परत एकदा फिरून आपण तिथेच येत आहोत.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. काश्मिर भारतात सामील झाले ते त्यवेळच्या परिस्थितीमुळे.. पाकिस्तान नको व स्वतंत्र अस्तित्त्व असल्यास पाकिस्तानचा धोका होता म्हणुन भारतात सामील होण्याचा निर्णय काश्मिरने घेतला होता.. भौगिलिक परिस्थितीमुळे व धार्मिक समानतेमुळे आजही काही (सीमेलगतच्या) काश्मिरींमध्ये पाकिस्तानबद्दल सहानूभूती असु शकते, पण ते प्रमाण अत्यल्प आहे अन ते शून्य करण्याची जबाबदारी उर्वरीत भारताची आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 08:24 नवीन
मृत्युन्जय.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. कश्मिरींच्या मनात हि भावना (वेगळे निघण्याची) आली असल्यास ती का आली ह्याचासुद्धा विचार आपण करायला हवा.. मान्य. परंतु काहीही कारण असले तरीही आत्ता ती भावना आहे ना. यावर उपाययोजना करणे जरुरीचे आहे आणि हे करताना तिथली जनता आपल्या विरोधात आहे याची पण जाणीव होणे गरजेचे आहे. आणि केवळ ऐकिव माहीतीवर आपले मत तयार करुही नका.. ज्याच्याकडुन महिती मिळाली तो **दोस्त आहे. त्याने जे काही सांगितले त्यावरुन अजुन काही मत तयार नाही करता येत. आपण आपल्या मित्राचा जो अनुभव वर सांगितला आहे अगदी तसाच अनुभव माझ्याही एका मित्राला आला होता.. फक्त ठिकाण वेगळे होते, काश्मिरऐवजी ईशान्य भारत! तिथे किती हिंसाचार चालतो. कृपया बोडो अतिरेक्यांचे उदाहरण देऊ नका. काश्मिरी अतिरेकी आणि बोडो यामध्ये जमिनस्मानाचा फरक आहे. --- होय! तो हिंसाचार पाकिस्तानी अतिरेकीच बहुतांशी ठिकाणी करतात.. काही ठिकाणी काश्मिरी युवक देखील हिंसाचारात सामील असू शकतील पण ते केवळ वाट चुकलेले आहेत असे समजण्यात काय चूक आहे? काहीच चुक नाही. वाट चुकलेल्यांची संख्या खुप जास्त आहे हे मात्र नक्की. बहुतांश काश्मिरी तरुणांना हिंसाचार नकोच आहे.. जे ऐकले आहे जे पाहिले आहे आणि जे वाचले आहे त्यावरुन त्यांना वेगळे व्हायचे आहे हे नक्की आणि त्यांना सत्याग्रहाचा मार्ग योग्या वाटतो असे मला तरी वाटत नाही. पाकिस्तानी झेंडे जिथे फडकवले जातात तो भाग पाकीस्तान सीमेलगतचाच आहे. मान्य. पण झेंडे फडकवणारे सगळे पाकिस्तानी आहेत की काय? अन तुम्हासही सांगणे कि शितावरून भाताची परिक्षा नको! भातावरुन शिताची केलेली चालेल का?
  1. नेमके काय म्हणायचे आहे ?
एवढ्या मोठ्या सैन्यावर हल्ला करण्याचे धारिष्ट्य ते दाखवतात यातच सगळे आले. सहमत! काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना करवाया करता येणार नाहीत. पण परत एकदा फिरून आपण तिथेच येत आहोत.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. काश्मिर भारतात सामील झाले ते त्यवेळच्या परिस्थितीमुळे.. पाकिस्तान नको व स्वतंत्र अस्तित्त्व असल्यास पाकिस्तानचा धोका होता म्हणुन भारतात सामील होण्याचा निर्णय काश्मिरने घेतला होता.. मान्य. भौगिलिक परिस्थितीमुळे व धार्मिक समानतेमुळे आजही काही (सीमेलगतच्या) काश्मिरींमध्ये पाकिस्तानबद्दल सहानूभूती असु शकते, पण ते प्रमाण अत्यल्प आहे पुर्णपणे अमान्य. तिथे ज्या प्रमाणात हिंसाचार चालु आहे ते बघता. प्रमाण अत्यल्प आहे असे म्हणवत नाही. अन ते शून्य करण्याची जबाबदारी उर्वरीत भारताची आहे! हे मात्र मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय
भ
भारतीय Tue, 08/10/2010 - 08:38 नवीन
मृत्युन्जय.. आता प्रतिवादात पडत नाही.. काही काश्मिरींच्या मनात भारताबद्दल अढी असू शकते हे पुर्णपणे मान्य ! पण म्हणून आपणही पुर्ण काश्मिरबद्दल अढी बाळगावी हे पटत नाही. फक्त हे विसरू नका कि ते काही काश्मिरी (तुमच्यामते बहुतांश) वाट चुकलेले जरी असले तरी त्याच्या भारतीय असण्यावर प्रश्नचिन्ह कृपा करून ऊठवू नका.. (तुम्ही ते उठवलेही नाहीये, म्हणुन आभार).. शेवटी तेही भारताचच कार्ट आहे हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 08:48 नवीन
मला तुमचे म्हणने पुर्णपणे पटले आहे. शंका नसावी. काश्मीर भारताचाच भूभाग आहे आणि त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे याची पुर्ण जाण आहे मला. काश्मीरबद्दल अढी देखील बाळगुन नाही आहे मी. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की पुढची पावले उचलताना आपल्याला वास्तवाचे भान असणे गरजेचे आहे. नाहीतर "हिंदी चिनी भाई भाई" चे जे झाली तसे व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय
च
चिंतामणी Tue, 08/10/2010 - 07:42 नवीन
काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे मी आणि येथील सर्वजण मानतात. कोणिही म्हणत नाही की तो भाग पाकिस्तानला द्या. तु म्हणतोस की "काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का? त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुख्य धारेतील राज्यांना दिली जाते तद्वत वागणूक मिळते आहे का?". याचे प्रकारे मी विचारतो की भारताच्या नागरीकाला देशात कुठेही घर, जमीन घेता येते. फक्त काश्मीरात नाही असे का? त्यांना घटनेने जे विषेश अधीकार दिले आहेत ते इतर राज्यांना का नाहीत? यातील सर्वात महत्वाचा प्रश्ण. हे सारे संपवुन शांतता नादायला पाहीजे असेल तर काय करायला पाहीजे? ती कोणाची जबाबदारी आहे? ज्यांना सत्ता नाही ते फुटीरवादी नेत्यांना आणि अतिरेक्यांना मदत करतात हे काश्मीरमधील सर्वात मोठे दुखणे आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेचे वेळीसच दंगली का होतात याचे उत्तर कोणिही देइल. काश्मिरला भेट दिलेल्या आणि टुरीस्ट कंपन्याबरोबर काम करणा-या लोकांचा अनूभव आहे की सामान्य माणूस यात भाग घेत नाही. काही जण बळजबरीमुळेच भाग घेतात. त्यांना जाणीव आहे की शांतता असेल तरच त्यांची "रोजीरोटी" चालू रहाणार आहे. पण तसे झाले तर भारताचा वरचश्मा होईल. मग हे होउ न देण्यासाठी सिमेपलीकडुन बळ दिले जाते आणि त्याला स्थानीक फुटिरतावादी नेते साथ देतात. त्यांच्या जोडीला असंतुष्ट आत्मे (मेहबुबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहंमद सैद सारखे नेते) असतात. मग प्रश्ण सुटायचा कसा? "ऑपरेशन सदभावना" याला चांगले यश येत होते. पण केंद्रात सत्ताधारी बदलल्यावर ते काम बंद का केले याचे उत्तर मिळाले तरी बरीच दुखणी कमी होतील.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/10/2010 - 09:22 नवीन
नागरीकाला देशात कुठेही घर, जमीन घेता येते. फक्त काश्मीरात नाही असे का? त्यांना घटनेने जे विषेश अधीकार दिले आहेत ते इतर राज्यांना का नाहीत?
ह्या व अश्या प्रश्नांना गृहित धरूनच मी उदाहरण देताना लेहचे दिले आहे. तेही जम्मु आणि काश्मिर राज्यातच आहे. तिथेही हेच नियम आहेत. इतर भारतीयांना लेह-लडाखमधेही जमिन खरेदी करता येत नाही. त्यांनाही विषेश अधिकार आहेत. तरीही इतर भारतीय लेह, जम्मुच्या नागरीकांना भारतीय मानतात मात्र काश्मिर खोर्‍यातील नागरीकांना काही भारतीय परकेच मानतात, असा सापत्न भाव का? काश्मिरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन नाहि अथवा तेथील राजकीय परिस्थितीवरही तुर्तास भाष्य करत नाहि आहे. सध्या काश्मिरात आहे ती नैसर्गिक आपत्ती. अश्यावेळी त्यांना सहृदयतेने त्यांना तुम्ही आमचे आहात, आम्ही तुम्हाला मदत करतोय सांगायचे का तुम्ही आमचे नाहीत, बघा तुमचे तुम्ही म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
स
सहज Tue, 08/10/2010 - 09:32 नवीन
लेह मधे नको इतकी, उतू जाईल इतकी मदत होते आहे व भारतव्याप्त काश्मिरमधे मदतीविना रोज जीव जात आहेत इतके असंतुलन आहे की काय? असे असेल असे वाटले नव्हते. असे असल्यास अरेरे!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/10/2010 - 09:54 नवीन
लेह मधे नको इतकी, उतू जाईल इतकी मदत होते आहे
नाही परिस्थिती इतकी भयाण आहे की लेहला होणारी मदतही अपुरी आहे. तिथेही मदतीची गरज आहेच आहे. मात्र फरक असा आहे की सबंध देशाची निदान तिथे मदत करण्याची इच्छा आहे, आणि केवळ इच्छा नसून सार्‍या भारतातून लेहच्या नागरीकांना मदत करण्याची कृती घडते आहे. त्याच वेळी काश्मिर मधील भारतीयांचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 08/10/2010 - 10:13 नवीन
काश्मिर घाटीतील लोक स्वतःला भारतीय समजतात का? मागेच एका चर्चे काश्मिरातल्या लोकांना पाकिस्तानात जायचे होते पण नेहरुंनी त्यांना फसवून भारतात आणले असा सूर दिसला . :) असो. वरील प्रश्नाचे उत्तर हो असे असेल तर पुढे मत लिहू शकेन.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/10/2010 - 10:30 नवीन
मागेच एका चर्चे काश्मिरातल्या लोकांना पाकिस्तानात जायचे होते पण नेहरुंनी त्यांना फसवून भारतात आणले असा सूर दिसला :) बाकी लेखाबद्दल नो कमेंटस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नितिन थत्ते Tue, 08/10/2010 - 11:37 नवीन
नाही. असा सूर नव्हता. लोकांना कुठे जायचे हे कोणालाच माहिती नव्हते. राजाने नाइलाजाने भारतात यायचे ठरवले. असा सूर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 08/10/2010 - 12:12 नवीन
नाही नाही. असाही नव्हता. मुस्लिम बहुल काश्मिर भारतात कसा आला? त्यासाठी राजाला त्याचा दिवाण किंवा प्रधान अकाश्मिरी देऊन कसे भारतात ओढले असा होता. नेहरु काश्मिरी होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ऋ
ऋषिकेश Tue, 08/10/2010 - 10:30 नवीन
माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, आणि प्रश्न असा आहे की "तुम्ही काश्मिरिंना भारतीय समजता का?" (ते स्वतःला काहीही समजो) याचे उत्तर जर हो असेल तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 11:05 नवीन
"तुम्ही काश्मिरिंना भारतीय समजता का?" (ते स्वतःला काहीही समजो) मला वाटते दोन्ही गोष्टी परस्पर संबंधीत आहेत. ते जर स्वतःला भारतीय समजत नसतील (नसतील तर बर का. समजत नाहीतच य अर्थाचे विधान नाही हे) तर आपण काय समजतो हे गैरलागु आहे इथे. हे म्हणजे "तुम्ही ऐश्वर्या रायला स्वतःची बायको समजता का (ती स्वतःला काहीही समजो)" या धाटणीचे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Tue, 08/10/2010 - 11:40 नवीन
उदा रोचक आहे. :) ;) फक्त फरक असा आहे की मी ऐश्वर्या रायवर माझा हक्क सांगत नाहि. जर मी तो हक्क सांगत असेन व तो तिच्यासकट इतरांनीही मान्य करावा अशी अपेक्षा असेल तर निदान मला तिच्याशी बायकोप्रमाणे वागणे अपेक्षित आहे. अर्थात मी तिच्याशी कसेही वागलो आणि तिची इच्छा नसेल तर ती माझी होणार नाहि. पण तिच्यावर हक्क सांगताना "निदान" मी तिला बायको मानणे गरजेचे आहे. तसेच काश्मिरवर जर आपण हक्क सांगत असु तर... वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 08/10/2010 - 12:01 नवीन
अर्थात मी तिच्याशी कसेही वागलो आणि तिची इच्छा नसेल तर ती माझी होणार नाहि हेच वाक्य ऐकायचे होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
य
यशोधरा Wed, 08/11/2010 - 10:38 नवीन
अरे ऋ, ऐश्वर्या रॉयचा पण काही चॉईस असेल हे ध्यानात असूदेत रे बाबा :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
वेताळ Tue, 08/10/2010 - 16:18 नवीन
पण उद्या त्याना भारतिय समजुन घरात घेतले आणि त्यानी आणलेला बॉम्ब जर घरात फुटला तर आपले मत कसे दुसर्‍याला कळणार? ह्यावर तुमचे मत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा