कलादालन

वरंधा घाट

Primary tabs

नमस्कार मंडळी,

वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता.
पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं? तिथे जाऊन आम्ही नुसती धमाल केली.

आमच्या साथील हे देखील होते...नंतर आमच्या मानव चेष्टा पाहून त्यांनीही काढता पाय घेतला.

काही जण गाडीचे निरिक्षण करण्यात दंग झाले होते.

आणि त्यांचं आवडतं खाद्य आम्ही त्यांना पुरवत होतो, त्यामुळे मस्त पोझेस सुद्धा देत होते.

हा शिलेदार पहा...

हिरवीगार शिवारं..

कितीही वेळा इथे या...दर वेळी निसर्ग नवीच कमाल दाखवतो...

जय जय रघुवीर समर्थ!

धबाबा आदळे तोय...

या शनिवारी कदाचित पुन्हा जाणार आहे..( पुन्हा तेच तेच फोटो टाकणार नाही, काळजी नसावी )

अवांतर : राजगड ते शिवथर घळ जायचा योग कधी येणार???

बेसनलाडू

आषाढ-श्रावण यंदा जोरदार दिसत आहेत. अशी नयनरम्य प्रकाशचित्रे पाहून निदान या घाटांसारख्या काही ठिकाणी ते दरवर्षीच तसे असतील, यात शंका नाही.
(ओलाचिंब)बेसनलाडू

Nile

मस्तच! फोटो पाहुन गार-गार वाटलं!

jaypal

१,५ व१० विषेश आवडले

शिल्पा ब

मस्त फोटो...माकडाचा त्याच्या पिलाबरोबरचा फोटो खूप आवडला...

आर आर

फोटो खरच खुप छान आहेत...
पहिला फोटो खुप आवडला.....

शिल्पा ब

याला वरंधा म्हणतात हे माहिती नव्हतं...बोलताना बरेचदा रंधा fall असंच ऐकलं होतं...

ऋषिकेश

येडाखुळा!
पार येडा अन खुळा करून टाकलंस राव!

बाकी शिवथर घळीचं पाणी कमी झाल्यासारखं वाटलं.. एकदम सुरवातीला गेला होता का? त्या धबाब्याच्या खाली एक झाड होते ते आहे का अजून? (फोटोत दिसले नाही)

शिवथर घळीचं पाणी कमी नाही झालेलं. ते कंट्रोल केलंय वरती बांध घालून. गेल्याच महिन्यात जाउन आलो.

स्पंदना

शेवटच्या फोटो मध्ये धबधबा शंकराच्या जटांसारखा दिसतो आहे.
इव्हन सगळ्यात वरचा फोटो पण अतिशय सुन्दर!
थँक्स टु कलादालन ट्रेकिंग सुटुन इतके दिवस झाले पण नयन सुख मात्र तस्सच राहिल.

येडाखुळा

ऋषिकेश , गेल्या जुलई महिन्यातले फोटोज आहेत. झाडाचं काही समजलं नाही. आता या वेळी नीटपाहतो.

हुप्प्या

पावसाळ्यातला सह्याद्री हा माझा एक वीक पॉईंट आहे. इतके पर्वत बघूनही ह्याची सर येत नाही असे वाटते.

सुरेख फोटो. आभारी आहे.

>>कितीही वेळा इथे या...दर वेळी निसर्ग नवीच कमाल दाखवतो...

१००% सहमत!