१५ ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन आहे ?
💬 प्रतिसाद
(83)
प
प्रियाली
Fri, 08/13/2010 - 14:19
नवीन
दोन्ही उद्बोधक! ;)
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 15:48
नवीन
माझ्या अत्यंत साध्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर व्यासंगी मिपाकरांकडून मिळाले नाही. असो.
दुसरा साधा प्रश्न.
सार्वजनिक सुट्टयांचा सुकाळ असलेल्या आपल्या देशात, जर ह्या सुट्ट्या कमी करण्याचा प्रस्ताव आला आणि स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन यांपैकी कोणतीही एकच सुट्टी ठेवण्याचा निर्णय झाला, तर कोणती सुट्टी ठेवावी?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/13/2010 - 16:02
नवीन
दुवा पाहा आणि दुव्यावरील ’स्वातंत्र दिवस’ यावरही क्लीक करावे......!
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन याच्यात काय फरक आहे, याबाबतीत मी अनेकांचा गोंधळ पाहिलेला आहे. मला आपल्या प्रश्नाचं बिल्कूल नवल नाही.
विकिपीडियावर गेलात तर तिकडे काही माहितीही भरा.....! :)
-दिलीप बिरुटे
[मराठी विकि सदस्य]
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 16:09
नवीन
धन्यवाद!
ह्याला म्हणतात प्रा. विद्यार्थ्यांची तहान ज्ञानामृत देऊन पूर्ण करणारे प्रा.
एक लघुशंका.
स्वांतत्रदिन साजरा न करणे हा भारतात गुन्हा आहे काय?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/13/2010 - 16:25
नवीन
शासकीय कार्यालये, शाळा,महाविद्यालयात , स्वातंत्र्य दिनानिमित्त ’ध्वजारोहण’ करणे प्रशासकीय आदेशानुसार आवश्यक आहे. [खरे म्हणजे प्रशासकीय आदेशाची गरज पडू नये] न केल्यास आणि कोणी तक्रार केल्यास गुन्हा दाखल होतो. अधिक अधिकृत माहिती विचारुन देतो. नागरिकांना स्वातंत्र्य दिन साजरा करणे न करणेबाबत कोणतेही आवश्यक बंधन नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 16:35
नवीन
धन्यवाद!
सरकारी आस्थापनांचे सोडा. पण गैरसरकारी संस्था किंवा संघटना यांनी स्वातंत्र्यदिन साजरा न केल्यास त्यांच्यावर तशी जबरदस्ती करता येते काय? त्यांनी साजरा न केल्यास संबंधित संस्था/संघटना ह्या देशद्रोही ठरतात काय?
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 18:27
नवीन
उत्तराच्या अपेक्षेतेत...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/13/2010 - 18:46
नवीन
>>>पण गैरसरकारी संस्था किंवा संघटना यांनी स्वातंत्र्यदिन साजरा न केल्यास त्यांच्यावर तशी जबरदस्ती करता येते काय ?
नाही.
>>>त्यांनी साजरा न केल्यास संबंधित संस्था/संघटना ह्या देशद्रोही ठरतात काय ?
नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 18:53
नवीन
पुन्हा धन्यवाद!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Sat, 08/14/2010 - 20:41
नवीन
चला, म्हणजे 'नागपूर'ची सुटका होतेय तर...
काय सुनीलराव, याचसाठी केला होता का अट्टाहास? ;)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 08/13/2010 - 16:12
नवीन
जी शनिवारी किंवा रविवारी येणार नाही ती द्यावी.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ताचि फुले
Sat, 08/14/2010 - 09:13
नवीन
काय भिकारपणा चालला आहे ; लोकाना राष्ट्रीय सण फक्त सुट्टीसाठी हवे आहेत....!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 08/14/2010 - 16:45
नवीन
काय भिकारपणा आहे हा? सुट्टीसाठी हवी असे कोणी लिहिले आहे?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 08/13/2010 - 15:56
नवीन
इतकी दिरंगाई मुंबईकरांकडून अपेक्षित नव्हती.
असे गृहीत धरा की ५ महिने लवकर साजरा केला.
हे पुण्यात झाले असते तर गोष्ट एक वेळ समजण्यासारखी होती - शेवटी पुणेकरच ते, दिरंगाई ही चालायचीच. वेळच्या वेळी कोठले काम कधी पुणेकराने केलेय?दुपारची वामकुक्षी पूर्ण करायची सोडून प्रजासत्ताक दिन वेळच्या वेळी साजरा करण्यासाठी उठेल तो पुणेकर कसला? वगैरे वगैरे. पण मुंबईत?
आमच्या पुण्यात झेंडावंदन सकाळी सकाळी होते. त्यानंतर जाउन आम्ही जेवण करुन वामकुक्षी घेतो.
मुंबईचे नाव बदलून आख्ख्या बृहन्मुंबईस पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करावे काय?
कृपया पुण्याचा इतका वाईट अपमान करु नये.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 08/13/2010 - 18:41
नवीन
अरे यार क्यु शोर मचा रहे हो? बडे बडे शहरोमे ऎसी छोटी छोटी बाते होति रहति है..
- Log in or register to post comments
झ
झंम्प्या
Fri, 08/13/2010 - 19:07
नवीन
तिकडे निरुपम काय करतोय हे पहायचं सोडुण मुंबइकर आणि पुणेकर या वरुण भाडताय तुम्ही लोक...
म्हणुन कोणी मराठी माणुस झेंडा वंदन न करता तो निरुपम करतोय...
चालायचच....
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 08/13/2010 - 19:12
नवीन
आज १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांपैकी नेमके काय आहे, झेंडावंदन करायला?
१५ ऑगस्टचे १५ ऑगस्टला बघू. दोन दिवस आधीपासून कशाला?
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 19:28
नवीन
आता एक राहिलेला अनुत्तरीत प्रश्न.
स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताकदिन यात अधिक महत्त्वाचा दिवस कोणता? थोडक्यात, जर दोहांपैकी कोणत्याही फक्त एकाच दिवशी सुटी देण्याचा निर्णय झाला, तर कोणत्या दिवशी मिळावी?
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 08/13/2010 - 19:51
नवीन
दोन प्रकारे पाहता येईल.
स्वातंत्र्यदिनी भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला, म्हणजे फक्त अधिकृत सत्तांतर झाले (तसे 'आपले' सरकार थोड्या आधीपासून होतेच). ब्रिटिश सार्वभौमत्व तरीही राहिलेच, पण नाममात्र राहिले इतकेच. घटना बदलली नाही. १९३५चा गवर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट हाच घटनेसमान सर्व कारभारासाठी आधारभूत राहिला. मात्र प्रजासत्ताकदिनी नवी घटना अमलात येऊन इंग्लंडच्या राजाचे सार्वभौमत्व पूर्णपणे आणि कायमचे हटले, नवीन घटनेने नागरिकाचे मूलभूत अधिकार आणि एकंदरीत व्यवस्थेतले स्थान निश्चित झाले (नागरिक हा केवळ 'प्रजाजन' न राहता खर्या अर्थाने 'नागरिक' झाला) आणि भारत (आणि पर्यायाने भारतीय मनुष्य) 'खर्या अर्थाने' पूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम झाला. या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक. हा झाला एक दृष्टिकोन.
मात्र, प्रजासत्ताक घडण्याकरिता आणि घटना निर्माण होण्याअगोदर स्वातंत्र्य हा एक अतिशय महत्त्वाचा पहिला टप्पा होता, स्वातंत्र्य / अधिकृत सत्तांतर ही एक मोठी सुरुवात होती, एक महत्त्वाचा मैलाचा दगड होता, आणि म्हणून स्वातंत्र्यदिन अधिक महत्त्वाचा, अशाही दृष्टिकोनातून याकडे बघता येईल. (मात्र, ब्रिटिश अधिपत्याखाली असतानाच घटना निश्चित करून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे वेगवेगळे न ठेवणे तत्त्वतः अशक्य होतेच का, याबद्दल साशंक आहे.)
थोडक्यात, दोहोंपैकी एकाचीच निवड करायची झाल्यास निश्चितपणे सांगणे कठीण आहे, पण माझा वैयक्तिक कल काहीसा प्रजासत्ताक दिनाकडे आहे.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 20:15
नवीन
१५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० ह्या सुमारे अडीच वर्षांच्या काळात भारताचा कारभार हा ब्रिटिश पार्लमेन्टने पास केलेल्या १९३५ च्या गवर्मेन्ट ऑफ इन्डिया अॅक्ट द्वारे सुरू होता. वॉईसरॉय हे पद जाऊन पुन्हा (सी राजगोपालाचारी ह्यांच्या रुपाने) गवर्नर जनरल हे (तात्पुरते) पद आले होते. हेच काय पण आपले (आणि पाकिस्तानचेही) सेनाधिकारीदेखिल ब्रिटिश होते!
(मात्र, ब्रिटिश अधिपत्याखाली असतानाच घटना निश्चित करून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे वेगवेगळे न ठेवणे तत्त्वतः अशक्य होतेच का, याबद्दल साशंक आहे.)
ह्याबाबत अन्य देशांचा काय अनुभव आहे?
अमेरिका स्वतंत्र झाली ४ जुलै १७७६ रोजी आणि अमेरिकेने घटना स्वीकारली १७ सप्टेंबर १७८७ रोजी. तब्बल ११ वर्षांनी! तोवर अमेरिकेचा कारभार कसा चालला होता?
स्वांतंत्र्य मिळालेल्या कोणत्या देशाने, स्वतंत्र होण्यापूर्वीच पुढील व्यवस्था कशी असेल याची घटना बनवली होती? बहुधा कोणीच नाही. तरीही, सहसा कुठलाच देश असे दोन स्वतंत्र दिवस साजरे करीत नाही. असे का?
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 08/13/2010 - 22:45
नवीन
अमेरिका स्वतंत्र झाली ४ जुलै १७७६ रोजी आणि अमेरिकेने घटना स्वीकारली १७ सप्टेंबर १७८७ रोजी. तब्बल ११ वर्षांनी! तोवर अमेरिकेचा कारभार कसा चालला होता?
हा कारभार आर्टिकल्स ऑफ कन्फेडरेशनच्या आधारे चालला होता, असे वाचल्याचे आठवते.
(दुवादार)बेसनलाडू
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 08/13/2010 - 23:54
नवीन
किंचित सुधारणा. (माझ्या त्रोटक माहितीनुसार) ४ जुलै १७७६ला अमेरिकेने आपल्या स्वातंत्र्याची एकतर्फी घोषणा केली. या दिवशी सत्तेचे अधिकृत हस्तांतर वगैरे झाले नाही. तसेच अमेरिकेचे इंग्लंडविरुद्धचे स्वातंत्र्ययुद्ध या दिवशी सुरूही झाले नाही (ते आधीच सुरू झालेले होते) किंवा या दिवशी संपलेही नाही (ते बर्याच नंतर संपले) किंवा ब्रिटनने अमेरिकेवरचा आपला दावा सोडला नाही (तो बर्याच नंतर सोडला).
मात्र, 'आम्ही आजपासून आमच्या वतीने ब्रिटनच्या सम्राटापासून संबंध तोडले' या निर्धाराच्या घोषणेचा दिवस म्हणून या दिवसाचे भावनिक महत्त्व प्रचंड आहेच.
(याहून अधिक तपशिलांत शिरण्याकरिता आवश्यक असलेला या बाबतीतला अभ्यास माझ्याजवळ नाही, तेव्हा क्षमस्व.)
भारताच्या स्वातंत्र्यदिनाची गोष्ट थोडी वेगळी आहे. या दिवशी दोन्ही बाजूंच्या संमतीने फक्त सत्तेच्या हस्तांतराची घोषणा झाली. (याचेही भावनिक महत्त्व नाकारायचे नाहीच, पण...) सार्वभौमत्व बदलले नाही. इंग्लंडच्या राजानेही आपल्या सार्वभौमत्वाचा (नाममात्र) दावा सोडला नाही, की स्वतंत्र भारतानेही इंग्लंडच्या राजाचे हे (नाममात्र) सार्वभौमत्व मानायचे एकतर्फी नाकारले नाही. २६ जानेवारी १९५०पर्यंत. मला वाटते अमेरिकन स्वातंत्र्याच्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या परिस्थितींमधील हा फरक महत्त्वाचा आहे. (अर्थात महत्त्वाबद्दल मतांतरे असू शकतील.)
कदाचित अमेरिकन स्वातंत्र्याची तुलना बांग्लादेशी स्वातंत्र्याशी करता येईल, असे वाटते.
कल्पना नाही. शोधावे लागेल. मात्र, यात जेथे स्वातंत्र्यदिनी सत्तेचे आणि सार्वभौमत्वाचे अधिकृत हस्तांतरण झाले अशाच उदाहरणांचा विचार करावा लागेल असे वाटते.
(हाँगकाँगची हस्तांतरणानंतरची घटना अगोदरच निश्चित झाली होती किंवा कसे, ते शोधावे लागेल. बहुधा झाली होती. अर्थात, हाँगकाँगच्या 'स्वातंत्र्या'चा प्रश्न येत नाही, परंतु सत्तेच्या हस्तांतरणाचा येतो.)
अधिक विचाराअंती, घटना बनणे हाही कदाचित तितकासा महत्त्वाचा घटक नसावा, पण सार्वभौमत्वाचे हस्तांतरण (अधिकृत किंवा एकतर्फी) हा असावा, असे वाटते. (४ जुलै १७७६ला अमेरिकन दृष्टिकोनातून ब्रिटनचे अमेरिकेवरील सार्वभौमत्व (अमेरिकेने धुडकावून लावल्याने) संपले. मग भले ब्रिटनला तसे वाटो अथवा ना वाटो. २६ मार्च (?) १९७१ला बांग्लादेशी दृष्टिकोनातून पाकिस्तानचे बांग्लादेशवरील सार्वभौमत्व (बांग्लादेशने धुडकावून लावल्याने) संपुष्टात आले. मग पाकिस्तानला तसे वाटो वा ना वाटो. भारतीय आणि ब्रिटिश दोन्ही दृष्टिकोनांतून ब्रिटनचे भारतावरील उरलेसुरले नाममात्र सार्वभौमत्व २६ जानेवारी १९५०ला संपुष्टात आले. मध्यंतरी भारताने ते धुडकावले नाही.)
मग १५ ऑगस्ट १९४७चे नेमके महत्त्व काय? या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटचा भारताच्या व्यवहारांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार संपुष्टात आला किंवा कसे? कल्पना नाही, पण या दिशेने तपास केल्यास रोचक ठरण्याची शक्यता आहे असे वाटते. (आणि कदाचित असे काही असल्यास या दोन्ही दिवसांच्या आपापल्या महत्त्वाचे रहस्य बहुधा उलगडावे.)
कल्पना नाही. तपासावे लागेल.
वर हाँगकाँगबद्दल बोललोच.
सिंगापूरवरचे अधिपत्य तीनदा बदलले. एकदा ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्यावर, एकदा मलेशियामध्ये सामील होताना आणि एकदा मलेशियापासून वेगळे झाल्यावर. पैकी प्रत्येक वेळी घटना अगोदर तयार होती का, कल्पना नाही. तपासावे लागेल. (पण निदान शेवटच्या बाबतीत तरी घटना - किंवा घटनादुरुस्ती - अगोदरच तयार असावी अशी शंका यायला वाव आहे असे वाटते. तपशील तपासावे लागतील.)
ऑस्ट्रेलिया, कॅनडासारखे देश सार्वभौम कधीही झाले नाहीत. येथे नेमकी काय परिस्थिती आहे ते पहावे लागेल. माझ्या (विकीवरून मिळालेल्या) अर्धवट माहितीप्रमाणे, ऑस्ट्रेलियाची ब्रिटिश राजाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रदेश या नात्याने राज्यघटना निश्चित करणारा ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला कायदा ज्या दिवसापासून प्रत्यक्षात अमलात आला (१ जानेवारी १९०१), तो दिवस ऑस्ट्रेलियाच्या स्वातंत्र्यदिनासमान मानला जातो. (याचाच अर्थ, ऑस्ट्रेलियाच्या स्वातंत्र्यदिनी घटना नुसती तयारच नव्हती, तर ती त्या दिवसापासून अमलात आली.) मात्र, त्यानंतरही ब्रिटिश पार्लमेंटला ऑस्ट्रेलियामध्ये कायदे करण्याचे मर्यादित अधिकार दीर्घकाळपर्यंत राहिले, आणि शेवटी ते १९८६च्या एका कायद्यान्वये संपुष्टात आले, असे समजते.
(कॅनडाची स्वातंत्र्य आणि घटना यांबाबतची नेमकी परिस्थिती माहीत नाही.)
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 08/14/2010 - 05:03
नवीन
धन्यवाद पंगासाहेब!
थोडक्यात नोशनल स्वातंत्र्य आणि प्रत्यक्ष सार्वभौमत्वाचे हस्तांतरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जगातील बहुतेक सर्वच नवस्वतंत्र देश हे यापैकी कोणतातरी एकच दिवस "स्वातंत्रदिवस" म्हणून साजरा करतात, हे मात्र खरे. मग आपल्यालाच दोन वेगळे दिवस का, हा प्रश्न राहतोच!
- Log in or register to post comments
प
पंगा
Sat, 08/14/2010 - 20:29
नवीन
कदाचित असे काही असू शकेल काय?
जिथे नोशनल स्वातंत्र्य अगोदरच सार्वभौम असल्याच्या थाटात हिसकावून घेऊन (नोशनल किंवा खर्या) सत्तेचे आणि सार्वभौमत्वाचे 'हस्तांतरण' झाले, आणि सत्तेचे किंवा सार्वभौमत्वाचे 'अधिकृत हस्तांतरण' जिथे झालेच नाही, तिथे (उदा. अमेरिका, बांग्लादेश) नोशनल स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व.
जिथे सत्तेचे अधिकृत हस्तांतरण झाले, पण (नोशनल) सार्वभौमत्वाचे हस्तांतरण झाले नाही, तिथे (उदा. ऑस्ट्रेलिया, कॅनडा) या हस्तांतरणदिनाचे महत्त्व.
भारताच्या बाबतीत नोशनल स्वातंत्र्याचे आणि सत्तेचे हस्तांतरण आणि सार्वभौमत्वाचे हस्तांतरण हे वेगवेगळ्या दिवशी झाले. म्हणून भारताच्या दृष्टीने दोन्ही दिवसांचे महत्त्व.
नोशनल स्वातंत्र्याचे हस्तांतरण आणि सार्वभौमत्वाचे हस्तांतरण यांचे बाबतीत भारताची आणि पाकिस्तानची स्थिती साधारण सारखी असल्याने, पाकिस्तानमध्ये अशा दोन वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आहे किंवा नाही, हे तपासून पाहणे उद्बोधक ठरावे. (अर्थात पाकिस्तानमध्ये दोन्ही दिवसांचे महत्त्व असो वा नसो, त्याने भारताच्या धोरणांमध्ये काहीच फरक पडण्याचे कारण नाही, हे ओघानेच आले.)
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 08/14/2010 - 22:41
नवीन
माहितीबाबत धन्यवाद!
पाकिस्तानमध्ये अशा दोन वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आहे किंवा नाही
बहुधा नसावे.
भारताने २६ जानेवारी १९५० रोजी लिखित घटनाधारीत राज्यव्यवस्था सुरू केली. पुढे ह्या घटनेत अनेक दुरुस्त्या झाल्या तरी, घटनेचा मूळ साचा काही बदलला नाही. त्यामुळे २६ जानेवारीचे महत्त्व अबाधित राहते.
याउलट पाकिस्तानात मूळात घटनाच तीन वेळा लिहिली गेली (१९५६, १९६२ आणि १९७३). त्याखेरीज, घटनेलाच गुंडाळून लश्कराने सता बळकावण्याचे प्रकारही अनेक झाले. त्यामुळे तिथे ह्या दिवसांचे फारसे महत्त्व नाही/नसावे.
तसाही पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा होतो कारण पाकिस्तानी घड्याळ आपल्या अर्धा तास मागे आहे. खेरीज, काही पाकिस्तान्यांच्या मते हा त्यांचा स्वांतंत्र्यदिन नसून निर्माणदिन आहे. अर्थात त्याने आपल्याला काहीच फरक पडण्याचे कारण नाही, हे खरे!
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Fri, 08/13/2010 - 21:05
नवीन
सर्व मुंबई आणि पुणेकरांना व्हॅलेण्टाईन डेच्या शुभेच्छा.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 08/13/2010 - 21:17
नवीन
अवो पावनं, वॅलेन्टाईन दिन गेल्याच आठवड्यात झाला की! पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा अॅडवान्समधे देताय का?
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sat, 08/14/2010 - 06:01
नवीन
मुंबईच्या लोकांच्या हातालाच नाही तर नशिबालाच घड्याळ बांधलेले असते ... इति - पु.लं
त्यांना अजिबात वेळ नसतो. ज्या वेळी ज्या गोष्टीची सवड असते ती गोष्ट त्या वेळी ते करतात...
आता १५ ऑगस्ट ला त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला तर बिघडलं कुठे ? २६ जाने. ला स्वातंत्र्य दिन साजरा करतील.
काही (पुणेकर) लोकांना उगीचच टीका करायची सवय असते ...
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
Sat, 08/14/2010 - 07:51
नवीन
हा जो फोटो अंतर्जालात फिरतोय त्यामुळे रेडिओ मिरची चा फायदा झाला ...सकाळीच ऎकले ...मैं संजय निरुपम साभिको स्वतंत्र दिवस कि बधाई देता हुं....
च्यायला असे बोर्ड आणि बेनर लिहिणाऱ्या आणि छापणाऱ्या बोर्डे आणि बेनर्जी चा सूळ सुळात झालाय ..अगदी वीट आणलाय यांनी
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Sat, 08/14/2010 - 23:26
नवीन
सदर विषयावर आलेल्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियांवरच्या विक्षिप्त प्रतिक्रिया वाचून प्रथमतः तर एक गोष्ट स्पष्ट झाली की जाज्वल्य भारतीय अभिमानावरून सुरु झालेल्या थ्रेड वर वादी-प्रतिवादींच्या (मुंबईकर-पुणेकर, किंवा वाइसे वर्सा) जाज्वल्य प्रांतवादानेच पकड धरली. चालायचच, भारतीय म्हटलं की असेच प्रकार व्हायचे (याचा भारतीय म्हणून सार्थ अभिमानही आहे आणि असली सिक मानसिकता बदलता न येण्याबद्दल खंतही).
मूळात एक प्रश्न उपस्थित रहातो की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६३ वर्षांनतरही स्वतंत्र नागरीकाची किती कर्तव्ये आपण पार पाडतो? किंवा, ६० वर्षांच्या या प्रजासत्ताकात जेवढी आपापली (हपापलेली) आयुष्यं गेली त्यात किती वेळा आपण 'स्पिरीट ऑफ डेमॉक्रसी' आचरणात आणलीये? काही आठवतय का? नाही? बरं घटनेप्रमाणे काही अधिकार व जबाबदार्या आहेत आपल्यावर याची काही माहिती? काय म्हणालात, ’हो हो माहितीये, उगाच शहाणपणा नको शिकवूस’? तसं का असेना, घटनेने असं बोलायचा अधिकार दिलाच आहे तुम्हाला. जमलं तर वाचा थोडं पुढचं...
वागण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर माणूस जबाबदारीच्या पारतंत्र्यात कायमचा ढकलला जातो. आपण तर जमेल त्या मार्गाने आपल्यावर आलेल्या जबाबदार्या टाळतो. आज प्रत्येकजण आपापली वैयक्तिक आयुष्ये सजवायच्या मागे लागलेला आहे. मग तो एखाद्या मल्टीनॅशनलचा चेअरमन असो, भारताचा पंतप्रधान (आणि त्यांचे ’रिस्पेक्टिव’ आणि ’रिस्पेक्टेड’ हायकमांड) असो किंवा विमा पॉलिस्या विकणारा टेलिकॉलर. वाढत्या भ्रष्टाचाराबद्दल हळहळणारे आम्ही आजही ’मामा’ने पकडल्यावर ’चिरीमिरीत’ त्याने सोडावं म्हणून त्याच्यासमोर लाचार विनवण्या करतो. एखादं सरकारी काम करताना एक छदामही लाच न देण्याच्या वल्गना करणारे आम्ही, काम होतच नाहीये म्हटल्यावर सरतेशेवटी ती तडजोड करतोच हो. आम्हाला पेशन्स वगैरे नाहीये आणि एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा कंटाळाही आहे जाम. आता हेच बघाना की एखादं काम पैसे न देता नाही होत म्हटल्यावर त्याच्यासाठी थांबणार कोण? बरं असही नाहीये की कोणी एखादाच हे करतोय. पैसे घेणारे अगदी न शिकलेल्या चपरासी, मंत्र्यांपासून ते शिकलेल्या ’आयएस’ ऑफिसर्स पर्यंत तर देणारे एकजात सगळेच. चांगले सुशिक्षित लोकही ’त्यापेक्षा द्या पैसे आणि व्हा मोकळे’ असल्या खाक्याचे. खाजगी कॉलेजातून स्वत:च्या पैशाने किंवा सरकारी कॉलेजातून (आयआयटी धरून) सबसिडाइस्ड फीवर इंजिनीयरींग करणारे आम्ही आपल्या कोअर फिल्डमधे न रहाता एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून आयटीत मिरवतो. त्यातूनही एखादा राहिलाच जर कोअर सब्जेक्टमधे तर रिसर्च करायला परदेशात (काही अतिसन्माननिय अपवाद वगळून). का? कारण जास्त पैसे मिळतात ना हो आम्हाला तिकडे. वर, "इकडे इंडियामधे (बाहेरची वारी घडली की भारत नाही म्हणायच बरं का) रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. तिकडे (सहसा अमेरिकेत) किती डेव्हलपमेंट आहे यु नो..." हे बोलायला आम्ही मोकळे. अरे पण भावड्याहो आन तायड्याहो, इकडे राहून एखाद्या कामासाठी लागणारं पोषक वातावरण लगेच थोडीच बनतं, तसं असतं तर कशाला त्या स्वातंत्र्यसैनिकांनी या स्वातंत्र्याचा अट्टहास धरला असता?
आपण प्रश्न का नाही विचारत हो? गटारं साफ नाही झाली, रस्त्यावरचे खड्डे नाही बुजले, एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्ला ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ लागला तर आपण सरळ पालिकेत (किंवा जबाबदार विभागात) जाऊन त्याबाबतची कारणं का नाही जाणून घेत? (प्रश्न पत्रकार विचारतातच हो. नाही, ते केवळ एखाद्या प्रश्नाला वाचा फोडतात आणि ते बघून किंवा वाचून आपण फक्त घरातल्या घरात घसे फोडून ओरडतो किंवा हतबलतेचे उसासे टाकतो.) खरं म्हणजे या व अनेक सरकारी कामांबद्दल जाणून घेणे हा आपला ’अधिकार’ आहे. आपण नाही प्रश्न विचारत म्हटल्यावर आपल्यातलेच जे पुढारी बनतात, ते ही असेच असणार ना. म्हणून तर भारताला दहशतवादावर सबूरीचा सल्ला देण्यार्या अमेरिकेने जेव्हा इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला चढवला, पाकिस्तानला अगणित हत्यारे, पैसे पुरवले, तेव्हा आपल्या नेत्यांनीही नाही विचारला प्रश्न बुशला आणि ओबामाला किंवा युएनला. सद्दाम दादाला कोणत्याही ’दृश्य’ पुराव्याशिवाय झटपट फाशी देऊन मोकळे झाले पण कसाबच्या केसच्या डाकुमेंटाची भेंडोळी आपण का दाखवतो त्यांना? कारण, ते सारखं सारखं काही बाही विचारत रहातात हो आपल्याला.
एखादा समाज, राष्ट्र हे लोकांमूळेच बनतं. त्यामूळे प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वातंत्र्याचा आणि प्रजासत्ताकाचा उपभोग जबाबदार्यांसकट घेतला तर भारत जाइलच पुढे (आताही चाललाच आहे, गती धिमी आहे एवढाच काय तो फरक) पण त्या दिवशी असल्या वादाला (जो वाद या थ्रेडचा प्रणेता आहे) अर्थ प्राप्त होईल. तोपर्यंत असे झगडण्यापेक्षा, आपल्या स्वार्थाचा त्याग करून बाबा आमटे, प्रकाश-मंदा आमटे, अभय-राणी बंग यांचासारख्याच अनेक अपरिचीत व अप्रकाशित लोकांनी जे देशोपयोगी काम चालवलेलं आहे, त्याला सलाम करूया.
(अवांतर: १५ ऑगस्टसारखा हक्काचा सुट्टीचा दिवस रविवारी आल्या कारणाने जे जे बंधू आणि भगिनी व्यथित झाले आहेत, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्याचबरोबर, स्वातंत्र्यदिवस किंवा प्रजासत्ताक दिवस जर विकेण्डला आल्यास आदल्या दिवशी ती सुट्टी मिळावी (अमेरिकेतल्या बांधवांनी आपले मत नोंदवावे, तिकडे असतं असलं काही असं ऐकून आहे) असा कायदा करण्यासंदर्भात मनुष्यबळ मंत्रालयाकडे आग्रहाची मागणी करत आहोत.)
(अतिअवांतर: वेळ मिळाल्यास, नारायण मुर्तींचे ’अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड’ या पुस्तकातेल ’व्हॉट कॅन वि लर्न फ्रॉम द वेस्ट’ हे भाषण जरूर वाचावे.)
(खुलासा: या प्रतिक्रियेत जवळपास सगळ्याच ठिकाणी आम्ही, आमचे वगैरे लिहीलेलं आहे. हे माझे स्वत:बद्दलचे आदरार्थी बहुवचन आहे असे समजू नये.)
(विनंती: तुम्हालापण आजूबाजूची विदारक परिस्थिती समजत असूनही काही न करता येण्याची मळमळ होत असेल तर इथे जरूर काढा, आम्ही साफ करू.)
इथपर्यंत वाचत आलात, त्याबद्दल धन्यवाद!
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!
भारी समर्थ
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Sun, 08/15/2010 - 00:21
नवीन
झालेला प्रकार अत्यंत खेदजनक आहे. आपल्या सर्वांचे लाडके परिकथेतील राजकुमार यांनी सदर बाब आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणुन दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
- Log in or register to post comments
P
Pain
Sun, 08/15/2010 - 09:57
नवीन
पुणे आणि पुणेकरांवर हसणारे, तोंडसुख घेणारे लोक मुंबईवर वेळ आल्यावर मात्र मेरा भारत महान, भेदभाव नको, भांडणे नको इ. बोधामृत पाजताना दिसत आहेत!
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Sun, 08/15/2010 - 11:04
नवीन
अरे वा! परासेठ! काय मस्त धागा! आवल्डा बॉ आपल्याला.. निखळ करमणूकीची ग्यारंटी आणि तुमच्या सर्कशीत असले पंडित विदुषक असल्यावर तर शंभरी सहज! ;)
बाकी गागाभट्ट साहेब, तुमच्या कंपणीत एखादी व्हेकन्सी असल्यास कळवा. नोकरी लावून दिलात तर बरं होईल. मग मीही असले लांबलचक प्रतिसाद लिहित जाईन आणि मिपावर फेमस होईन!
=)) =))
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2