धपाटे- खास कोल्हापुरी!
💬 प्रतिसाद
(27)
स
स्पंदना
Fri, 08/13/2010 - 18:04
नवीन
हेल्प! हेल्प! जरा कुणी फोटो कडे बघेल का?
दमले मारामारी करुन.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sat, 08/14/2010 - 02:35
नवीन
वाचताना प्लिज 'गणपा भाउला' असे वाचावे.
फोटोच्या गोंधळात पॅरेग्राफ वा दोन वाक्यात थोड अंतर ठेवायच हे सगळ विसरुन गेल. वर तर वर गणपा यांचा फोटो कसे चिटकवावे हा लेख पण दिसत नाही आहे.
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Fri, 08/13/2010 - 19:25
नवीन
पाकृ फोटोशिवाय अपूर्णच वाटते.. आता छान वाटले....
आम्ही लहान असताना धपाटे धपाटे म्हणून एकमेकांना छळायचो त्याची आठवण झाली!!!
- Log in or register to post comments
अ
अनाम
Fri, 08/13/2010 - 19:33
नवीन
वाह झक्कास आहे एकदम.
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Sat, 08/14/2010 - 02:48
नवीन
१ पेला तांदूळ, १ वाटी गहू, १ वाटी ज्वारी, १ वाटी हरभरा डाळ, २ टेबल स्पून धने, १ टेबल स्पून जिरे.
हे सार छानस भाजून घ्या. सर्व भाजत आल कि शेवटी धने अन मग आच बंद करून जिरे मिसळा. याच बारीक पीठ दळून आणा......
इथपर्यंत वाचत येउन अडकलो!
आता इथे परदेशात बारीक पीठ दळून कुठून आणायचं हो? तयार पीठं मिळतात तांदुळ, ज्वारी वगैरेची, त्यांत कणीक आणि डाळीचं पीठ घातलं तर चालायला हरकत नसावी, प्रमाण काय असावं?
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sat, 08/14/2010 - 08:34
नवीन
बहुगुणींना पडलाय तोच प्रश्न मलाही पडलाय. उत्तर मिळाले तर(च) बायको धपाटे करेल (नाहीतर मला घालेल)
(खवय्या)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sat, 08/14/2010 - 14:55
नवीन
बहुगुणी अन बे.ला. कष्टाविण फळ ना मिळते....
मी दिवस भर लिटल इंडियात एक चक्की आहे म्हणुन शोध शोध शोधल, अन ती बंद होता होता तिथे पोहोचले!
चक्की वाला लय भारी, ११ ते ५ फक्त, त्यात ही दुपारी १ ते २ आराम!
पण शेवटी मिळाल दळुन! अदरवाइज भारतातुन येताना आणने.
- Log in or register to post comments
न
नंदू
Sat, 08/14/2010 - 08:54
नवीन
खुमासदार लेखन. धपाटे पण रुचकर असावेत.
या वाक्यात गुरूजी (घासकडवी) दिसले. :)
नंदू
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 08/14/2010 - 08:59
नवीन
अपर्णातै कुठे फेडाल ही पापं ??
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Sat, 08/14/2010 - 09:25
नवीन
मस्त झालेत धपाटे . लवकरच करुन बघणार.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ताचि फुले
Sat, 08/14/2010 - 10:01
नवीन
शन्का :
एकाच बाजुने भाजले तर कच्चे नाही रहात का???
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sat, 08/14/2010 - 14:50
नवीन
नाही. त्यावर जे पाण्याचा शिपका मारुन नंतर झाकण ठेवायचे असते ना, त्यामुळे अतिशय छान भाजुन निघतात, वरुन थोडे सॉफ्ट अन तव्याकडील बाजुने कुर कुरीत. करुन बघा आवडेल.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sat, 08/14/2010 - 10:40
नवीन
वाव !!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 08/14/2010 - 11:22
नवीन
हा पदार्थ खाउन कोणाचे धपाटे मिळत नाहीत ना !!! ;)
- Log in or register to post comments
क
कुक
Sat, 08/14/2010 - 11:38
नवीन
आमच्या शेजारील देशावरचे लोक असे धपाटे दसरा या सणाला करतात. एरव्ही हि करतात . मला खुप आवडायचे
म्हणुन ते माझ्या साठि राखुन मला ते देत असत . आता शेजार धर्म राहिलाय कुठे//
- Log in or register to post comments
क
कुक
Sat, 08/14/2010 - 11:41
नवीन
उद्याच सामान आणुन करायच विचार करतोय
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 08/14/2010 - 11:46
नवीन
मस्त! बहुतेक हे खाल्ले आहेत पण तेव्हा मी हा काय थालपीटचा प्रकार दिसतोय आज जरा वेगळा लागतोय असे म्हणुन संपवले असावे.
- Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी
Sun, 08/15/2010 - 04:36
नवीन
मस्तच आहे.
हे राज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा.
- Log in or register to post comments
स
स्मृती
Sun, 08/15/2010 - 14:17
नवीन
वा वा वा.. तोंडात खळकन पाणी आलं!...
कधी एकदा तुमचे हे कोल्हापुरी धपाटे करते असं झालंय.. आपण गाववाले.. तो चक्कीवाला नक्की कुठे आहे गं? ;)
- Log in or register to post comments
स
सुनील
Sun, 08/15/2010 - 14:37
नवीन
मस्त! मल्टी ग्रेन थालिपिठ म्हणाना!
बाकी धपाटे हा तोंडानेदेखिल खायचा पदार्थ आहे हे नव्यानेच कळले!
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Sun, 08/15/2010 - 16:07
नवीन
अपर्णा, फोटो व पाकृ दोन्ही एकदम झक्कास!!! :-)
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Sun, 08/15/2010 - 16:47
नवीन
आयायायायायायायायाया... हिरव्या मिरचीचा गोळा कसला दिसतोय........... बाय.. दे.तु.भ.क.
- Log in or register to post comments
क
कुक
Mon, 08/16/2010 - 07:50
नवीन
कालच केले होतो , झाले चागले पण मिठ कमी पडल होते व थोडे कमि तिखट झाले मि दोन्ही बाजुनी भाजले होते
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 08/16/2010 - 08:02
नवीन
छ्या! हे असलं काही करायचं आणि आम्हाला खायला बोलवायचं नाही हे बरोबर नाही. तुम्ही ती फोन करायची स्टेप गाळली की काय? :-)
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 08/24/2010 - 16:38
नवीन
आमच्या शेजारी एक काकू राहत त्या बाजरीचे धपाटे करायच्या आणि अर्थातच चार पाच आमच्याकडे धाडायच्या.....अतिशय छान असायचे ते...
- Log in or register to post comments
A
Arun Powar
Fri, 09/10/2010 - 11:49
नवीन
मी लहान होतो त्यावेळची गोष्ट-
एक दिवस आईने स्वयंपाक खोलीतून मला हाक मारली आणि विचारले, "आज कारले नि चपाती खाणार की धपाटे खाणार?" मी घाबरून म्हणालो, "कारले नि चपाती खातो". पण नंतर इतरांच्या ताटात धपाटे वाढलेले पाहून मला कळून चुकले की आई जेवणातल्या धपाट्यांविषयी विचारत होती आणि मला वाटले होते की गेल्या आठवड्यात, कारले खात नाही म्हणून आई माझ्यावर भडकली होती आणि हात ऊगारून म्हणाली होती, "पुढच्या वेळेस जर तू कारले खाल्ले नाहीस, तर 'धपाटे' खाशील!".
त्यावेळी मी झालेल्या शाब्दिक गोंधळाबद्दल स्वतःलाच दोष देत, मला न आवडणारी कडू कारल्याची भाजी मुकाट्याने खात बसलो होतो.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 09/10/2010 - 12:59
नवीन
च्यायला...धपाट्यांसारखी चीज नाय बा. आता ते कसे करतात अन काय ह्याच्याबद्दल आपलं ज्ञान शून्य! आपल्याला माहितीये ते फक्त हादडायचं :)
मस्त सकाळी सकाळी सहा-साडेसहाला उठावं, अंगणात भुंकणार्या कुत्र्यांना सोडावं, त्यांच्यासोबत पळत पळत रानात जावं..तिथं त्या कुत्र्यांना मातीत लोळवावं, त्यांच्याशी मस्ती करावी आणि मग निवांत विहीरीत पोहत बसावं....कधीपर्यंत? घड्याळ गेलं खड्ड्यात..पोटात भुकेचा आगडोंब उसळेपर्यंत! मग ओल्या अंगानंच परत घराकडं येतायेता एखादा ऊस खात यावं आणि दारात पोचल्याबरोब्बर धपाट्यांचा खमंग वास यावा.......खल्ल्लास तिच्यायला! हातपाय धुवुन दे दणादण हादडायला सुरुवात. हे मुठमर खरड्याचा गोळा, सुगडभर दही आणि एकापाठोपाठ एक धपाटे....अगदी म्हातारीनं, "आता ऊठा मेल्यांनो..हात दुखायला लागले रांधून रांधून.." असं म्हणेपर्यंत खा खा करायचं आणि मागं बागेत जाऊन पडी टाकायची.....हॅट्ट तिच्यायला.... आठवणींनीच जीव कसनुसा झाला.
- Log in or register to post comments