काथ्याकूट
म्हातारी इतुकी न अवघे ७८ वयमान!
Primary tabs
६६ वर्षे सतत गात चित्रपट सॄष्टीत स्वतःचे नाव कायम ठेवलेली कदाचीत एकमेव व्यकी ठरणार्या लता मंगेशकर यांना आज ७८ वर्षे पूर्ण झाली. आता तीच्या आवाजातील (नवीन) गाणे आवडते का नाही हा एक वेगळाच मुद्दा होत असला तरी त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही. तेंव्हा खर्या अर्थाने जीवेत शरदः शतम असे लतादिदींना म्हणतो!
सुंदर चित्रे ! लता ७८ वर्षांची झाली हे खरंच वाटत नाही!
स्वाती
सकाळमधली ही पण चित्रफीत पहा
चित्रे सुंदरच (छायाचित्र कृष्णधवल असलं की अर्ध आधीच आवडलेलं असतं).
अवांतर : विकासराव, बॉस्टनातील आमच्या घरासमोरील वाय.एम.सी.ए. ची पाच मैलाची शर्यत एका ७८ वर्षाच्या तरुणीने "सरासरी" वेळेत पूर्ण केली होती, त्याची आठवण झाली. आम्ही आपले कॉफी पीतपीत घरातूनच गम्मत पाहत होतो. सप्टेंबरात थंडी सुरू होते हो! का उगाच बाहेर पडा :) ?
- कोंबडी
पण तिचा आजचा आवाज ऐकवत नाही.
पण तिचा आजचा आवाज ऐकवत नाही.
आता वयोमानाप्रमाणे काहीतरी फरक पडणारच ना! निसर्ग आहे शेवटी. प्रेमापोटी काही फरक पडला नाही अग्द्दि पुर्वीसारखा आहे असे म्हणणारे देखील आहेत. पण तेवढ चालायचचं!
प्रकाश घाटपांडे
दिदीला अनेक शुभेच्छा...
विकासराव, चित्रे छानच आहेत..
आपला,
(दिदीप्रेमी) तात्या.
छायाचित्रे. लताबाईंची काही गाणी या दुव्यावर ऐकता येतील -- http://www.indianscreen.com/Lata.htm
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
ही चित्रे खूप छान आहेत. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
- प्राजु.
लताजीना वन्दन