Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोडाधोडाचे पदार्थ

स
सुनील
Mon, 08/16/2010 - 20:43

प्रतिक्रिया द्या
8333 वाचन

💬 प्रतिसाद (22)
व
विलासराव Mon, 08/16/2010 - 20:51 नवीन
१ब) दूध न नासवता केलेले - उदा. गुलाबजाम
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Mon, 08/16/2010 - 21:05 नवीन
१ब म्हण्जे रसमलाइ,बासुंदी, दूधीहलवा, श्रीखंड वग्रै खूप आवडतात.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 08/17/2010 - 03:33 नवीन
जबरी! अगदी हेच! + खरवस खरवस देखील या यादीत येईल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
स
सुनील Tue, 08/17/2010 - 04:30 नवीन
खरवस नक्कीच येईल! खरवसावर आमचा जीव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चतुरंग Mon, 08/16/2010 - 21:08 नवीन
तुम्ही आम्हाला काहीही गोड द्या हो आम्ही हाणून दाखवतो! ;) तरीही तुमच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही लिस्ट देतो - विभाग १ मधे - श्रीखंड (ह्याचाच उपप्रकार आम्रखंड) (हे मी शक्यतो घरीच चक्का बनवून केलेले पसंत करतो), बासुंदी (बंबईवाला हलवाई नगर आणि नरसोबावाडी कुरुंदवाड), कुंदा, पेढे (हे फक्त महेंद्र पेढेवाला नगर यांचेच), खव्याची पोळी, फक्त खव्याचेच गुलाबजाम (गिट्सच्या गोळ्यांना मी गुलाबजाम म्हणत नाही), मलई बर्फी (पुन्हा एकदा बंबईवाला) विभाग २ - नारळाच्या वड्या, उकडीचे मोदक (फोडून आत भरपूर साजूक तूप भरलेले - अन्यथा समोर आणू नयेत ;)), नारळीपाकाचे लाडू, विभाग ३ - बेसनलाडू (बेदाणा वरती दिसायला हवा नाहीतर मजा नाही), म्हैसूरपाक, मोतीचूर लाडू विभाग ४ - अन्य मधे लै मोठी लिस्ट आहे हो पण वानगीदाखल काही - सत्यनारायणाचा शिरा (हा मी कितीही खाऊ शकायचो! गेले ते दिवस ;) ) पुरणपोळी, गुळाचीपोळी, सुधारस (केळ्याचे काप, वेलदोड्याची पूड आणि केशर मस्ट!), रवालाडू, बालूशाही, गरमागरम जिलेबी (ही बारीक नळीची असेल तर कुरकुरीत, थोडी जाड नळीची असेल तर पाकाने भरलेली आणि कडक हवी - मीटरवर मोजता येण्याजोगी जिलबी आम्ही खात नाही! ;)), आम्ही केलेले गोडाचे गुणवर्णन इथे चाखा! ;) (गोडघाशा)चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 08/16/2010 - 21:29 नवीन
बंबईवाला हलवाई नगर यांची बासुंदी, गुलाबजाम, मलाई बर्फीचा भरपुर आस्वाद घेतला आहे कॉलेजला असताना. रुचिराची जिलेबी तर मी कधीच विसरु शकणार नाही. आनी हो....माणिक चौकातला वडाही. थोडे अवांतर होतेय पण नगरची आठवण झाली की हे आठवतेच. सिध्दीविनायक मंदिरातली नारळबर्फी तर खासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुनील Mon, 08/16/2010 - 21:50 नवीन
वा वा वा!!! खरे खवैय्ये आहात. लगे हात तुमचा जुना लेखही वाचला. मस्त आहे. बाकी पुरणपोळी आणि जिलेबी हे पदार्थ "अन्य" मध्ये नव्हे तर, बेसनाच्या पदार्थात मोडतात बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
निखिल देशपांडे Tue, 08/17/2010 - 10:37 नवीन
आता गोडा बद्दलचा लेख आणि आम्ही काही बोलणार नाही असे होउच शकत नाही. वर रंगा काकांनी त्यांचा लेखाचा दुवा दिलाय त्याच लेखात आमचा प्रदिर्घ प्रतिसाद वाचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नगरीनिरंजन Tue, 08/17/2010 - 11:52 नवीन
जुने दिवस आठवून लाळावलो. सगळ्या यादीशी सहमत! गुलाबजाम बन्सीमहाराज चे फार छान असायचे. पानांच्या द्रोणात घेऊन गरमागरम चार-पाच हाणायचो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अर्धवट Mon, 08/16/2010 - 21:10 नवीन
अत्यंत अन्यायकारक धागा आहे हा.. असं कसं निवडणार ब्वॉ.. प्रत्येक वर्गातला एकेक पदार्थ निवडायचा असेक तर सांगा..
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 08/16/2010 - 21:58 नवीन
जरूर निवडा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
र
रेवती Mon, 08/16/2010 - 21:59 नवीन
सगळे गोड पदार्थ आवडतात. त्यातल्यात्यात पेठा आणि बॉम्बे हलवा कि कायसे नाव असलेला पांढरा चौकोनी प्रकार कमी आवडतो. गोडाचं काही खाल्लं की मनात अपराधी भाव आल्याशिवाय रहात नाहीत. कुठं फेडायच्या या कॅलरीज? असं वाटत रहातं.;)
  • Log in or register to post comments
क
कुक Tue, 08/17/2010 - 03:29 नवीन
मला गोड पेषा तिखट व आम्ब्ट खुप आवडते . गोड पदार्थ कमीच
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 08/17/2010 - 04:37 नवीन
मला वाटलं काही गोडाच्या पाकृ टाकल्यात कि काय ... असो, नगरच्या बंबईवाल्याचे गुजा मस्तच...नाशिकच्या बुधाचे गुजा, बर्फी, जिलबी छानच, पांडेच्या बर्फ्यासुद्धा मस्त...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 08/17/2010 - 06:40 नवीन
असा एकच पदार्थ निवडणे हा शुध्द अन्याय आहे, सबब ...... पुढे काय लिहिणार ते समजले असेलच,;) स्वाती
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/17/2010 - 10:08 नवीन
वर दिलेल्या यादीतील सर्व, पण मैसुरपाक हा साजूक तुपातला नसेल तर काही मजा नाही बॉ !! आमच्या ऑफिसमधील एक मल्लु त्यांच्याकडचा मैसुरपाक आणत असे तो अगदी जीभेवर विरघळायचा. सध्या जिम ट्रेनरने ताकीद दिली आहे म्हणून नाहीतर फक्त गोड वाढा, त्याहून मागणं लई न्हाई :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/17/2010 - 10:16 नवीन
सुनील शेठ, हि चौकशी आहे का आमंत्रण ?
  • Log in or register to post comments
स
संजा Tue, 08/17/2010 - 10:30 नवीन
गोड पदार्थ ? आजिबात नाही. से नो टु स्विट्स. ***साखरेचे खाणार त्याला देव नेणार ****
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 08/17/2010 - 12:04 नवीन
१ अ मधला एकही पदार्थ आवडत नाही (पनीरसह). (तरीसुद्धा कलकत्त्यात वर्ष काढलंय). बाकी सगळे आवडतात. हे गुलाब जाम यांच्यावर आमचा भारी जीव. Image removed. वजन कमी करण्याचे दुष्ट सल्ले मिळाल्यामुळे अलिकडे एवढे संपत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 08/17/2010 - 14:39 नवीन
खरवस अन् बेसनलाडू.. कधीही आणि कितीही द्या.. आमचे त्वांड सताड उघडे मिळेल!!
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 08/17/2010 - 16:12 नवीन
पण आज गोडाधोडाची आठवण केल्यावर कुणीतरी "या ,एकदा आमच्या इंदोरला,सराफ्यात जाऊ "अशी हाक मारली असा भास झाला.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/17/2010 - 20:15 नवीन
:-( चव गेली तोंडाची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा