संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!
💬 प्रतिसाद
(81)
न
नितिन थत्ते
Tue, 08/17/2010 - 07:55
नवीन
पुढच्या वर्षी नॉर्वेमध्ये जाणार्या मुस्लिम व्यक्तीने सूर्यास्तानंतर म्हणजे केव्हा जेवण घ्यायचे?
एकूण आरोग्याच्या दृष्टीने रात्री जेवण करणे अहितकारक समजले जाते.
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
P
Pain
Tue, 08/17/2010 - 08:02
नवीन
हेहेहे..फारच विनोदी लिहिता तुम्ही.
(ही लेखावरील प्रतिक्रिया आहे, थत्ते यांच्या प्रतिसादावरील नव्हे)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 08/17/2010 - 09:00
नवीन
ते नियम वाळवंटी प्रदेशातील लोकांनी वाळवंटी प्रदेशातील लोकांसाठी त्या काळात केलेले आहेत.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 08/17/2010 - 10:00
नवीन
लवकरच या लेखाच्या चिंधड्या उडवणारी लांबलचक प्रतिक्रिया इथे पोस्ट करुच. आत्ता जरा कामात आहे म्हणून आखडता घेतला आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 08/17/2010 - 10:12
नवीन
काय हे अप्पा ? असे ऐन कामात असताना आखडता घेणे बरोबर नाही ;)
- Log in or register to post comments
अ
अनुराग
Tue, 08/17/2010 - 14:46
नवीन
आप्पा लवकर लिहा.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 08/17/2010 - 10:11
नवीन
सर्वात वादग्रस्त वाक्य आणि स्वतःला ज्ञानी म्हणवुन घेणार्यांनी ह्या वाक्याचे काढलेले अर्थ तर अजुन वादग्रस्त.
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Tue, 08/17/2010 - 10:16
नवीन
मुळ शब्द...
"ला इलाह् इल्लल्लाह्."
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Tue, 08/17/2010 - 10:55
नवीन
तंबाकु , चुना पुडि आनि पार
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 08/17/2010 - 11:14
नवीन
करणारे या भावना वा भुमिका समजावुन घेउन मगच असा उपास करतात का?
या मुळे इस्लाम मधे मुलतत्ववाद फोफावला. सुदैवाने कुराणाचा कालसुसंगत अर्थ काढणारे काही पुरोगामी मुस्लिम विचारवंत आता येउ लागले आहेत.
- Log in or register to post comments
क
कराडकर
Tue, 08/17/2010 - 12:00
नवीन
चालेल... छान आहे....!
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Tue, 08/17/2010 - 13:43
नवीन
ईस्लाम हा पृथ्वीतलावर अवतरलेला सर्वात बांधीव धर्म आहे.
अंतिम ईश्वर (अल्लाह), अंतिम पुस्तक (कुराण), अंतिम प्रेषित(मुहम्मद पैगंबर), अंतिम न्यायपद्धती (शरिया) इ. सार्या अंतिम गोष्टी पाहिल्या की जनसमूहास एकत्र बांधून ठेवणार्या संकल्पनेचे सर्व पैलू किती बारकाईने विचारात घेतले असतील याचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटते. इतर एकेश्वरवादी धर्मांतही इतका काटेकोर विचार केलेला आढळत नाही.
एखाद्या नव्या राष्ट्राची राज्यघटना लिहिणार्यांनी या सर्व बाबींचा अभ्यास केल्यास एकसंघ राष्ट्र नक्कीच उभारता येईल.
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान मासाबद्दल शुभेच्छा आणि आगाऊ ईद-मुबारक!
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/17/2010 - 17:02
नवीन
"अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत."
श्री.मगदुम, लेखातील वरील वाक्य तुमच्या 'रोजा' च्या महतीला फार बदनाम करत्येय हे लक्षात घ्या. धर्म आणि धर्माची वचने हा सध्याच्या काळात फार नाजूक विषय बनला असताना जरी एखादी व्यक्ती आपल्या मताशी ठाम असली तरी ते मत व्यक्त करताना भाषेची बांधणी सौम्य असणे फार गरजेचे आहे. तुमच्या मनाला, कुराअनच्या शिकवणीमुळे जी गोष्ट मौलिक वाटली ती तुम्ही शुक्रवारच्या सायंकाळच्या नमाजाच्या वेळी मशिदीत जमलेल्या बांधवाना सांगणे आणि "ग्लोबल" पातळीवरील स्थळावर येऊन (जिथे विविध धर्माचे, विचाराचे, प्रांताचे लोक असतात) सांगणे यात फार फरक आहे. सर्वच संस्थळावरील लोक सहनशील असू शकतील असे नाही, त्यामुळे तुमच्या वरील वाक्याला (जरी ते धर्मग्रंथातील असले तरी) येथील एखाद्या सदस्याकडून जहाल भाषेत प्रत्युत्तर आले तर ते स्वीकारण्याची तुमची मानसिकता वा तयारी असणे फार गरजेचे आहे.
ज्या प्रेषित मुहम्मद (स.) यांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या प्रेषितांना असे वैचारिक मतभेद मान्य होते. इतकेच नव्हे की अशा मतभिन्नतेला त्यानी वैध ठरविले होते, त्याची प्रशंसाही केली होती. त्यांच्या मते धर्माधर्मातील असे मतभेद तर या गोष्टीचे लक्षण होते की समाजात विचार व चिंतन, जिज्ञासा व संशोधन आणि बोध या व्यासंगाच्या क्षमता आहेत. असे असले तरी मुद्दाम एखादा कळीचा मुद्दा लेखी स्वरूपात खुल्या मंचावर मांडून अन्य धर्मियांच्या श्रध्दास्थानाला डिवचणे हे (सध्याच्या वातावरणात) सूज्ञपणाचे लक्षण खचीत नव्हे.
हमीद भाईंचा १९७०-७५ च्या काळात असा विश्वास होता की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक शिक्षणाने मुस्लिम समाजाची एक नवी पिढी उदयास आली आहे. त्या समाजात मुलेच नव्हे तर आता मुलीही महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागल्या आहेत, त्यामुळे मुस्लिमांच्या विचारसरणीत जरी आता नाही तरी पुढील काळात धर्मापेक्षा विज्ञानविषयक दृष्टीला महत्व प्राप्त होईल.
पण आपली धर्मवचने आणि त्यांचे महत्व सांगण्याची धाटणी पाहिली की असे वाटते की हमीदभाईंना अभिप्रेत असलेला "पुढील काळ" अजून पुढेच आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 08/17/2010 - 14:06
नवीन
पहिलेच लेखन आणि तेही डायरेक्ट कुराणाचे आणि तेही एका विशिष्ट ईश्वराचे अंतिमत्व सांगणारे !!!!
इंद्रराज यांच्याशी सहमत आहे.
अल्ला हु अकबर (गॉड इज ग्रेट)
अंतिम तत्त्व सांगितले असल्याने लेखक काही चर्चा करतील अशी अपेक्षा करणे चुकीचेच आहे. लेख आल्यापासून आलेल्या प्रतिसादांवर पुन्हा काही भाष्य झालेले नाही.
(टंकनावर मात्र चांगले प्रभुत्व दिसते आहे).
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 08/17/2010 - 20:53
नवीन
धार्मिक दृष्टिकोनातून सांगितलेली रोजा या महत्त्वाच्या सणाविषयीची चांगली माहिती.
हे चोप्य पस्ते वाटतंय. काही विशिष्ट जोडाक्षरं, विशिष्ट पद्धतीने चुकलेली आहेत. उदा 'र्या'...
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 08/18/2010 - 05:06
नवीन
"हे चोप्य पस्ते वाटतंय."
शुअर. शिवाय लेख समाप्तीनंतर तो भ्रमणध्वनी देण्याचे काहीच प्रयोजन नाही. अशी प्रथा 'आकाशातून बाप बोलतो तुमच्याशी' छाप धर्तीचे बिल्स ख्रिश्चन धर्म प्रसारकांकडून वापरले जात असत. तीत दूरध्वनी क्रमांक असत, एवढ्यासाठी की "अंधारातून बाहेर येण्यासाठी" अधिकचे मौलिक मार्गदर्शक हवे तर फोन करा.
श्री.मगदूम यांनी अद्याप एकाही प्रतिसादावर आपले भाष्य व्यक्त केलेले नाही, ही बाब ठळकपणे ही बाब अधोरेखीत करते की, हा एक धर्म महत्व प्रसारणाचा एक भाग असावा.
असो. शेवटी धर्म कोणताही असो त्याबाबत आपण "नीरक्षीरविवेक" राखला तरी पुरे.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 06:50
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 08/17/2010 - 14:12
नवीन
इंद्रराज यांच्याशी सहमत!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 08/17/2010 - 14:13
नवीन
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान मासाबद्दल शुभेच्छा आणि आगाऊ ईद-मुबारक !!!
"अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत."
याच्यात बदल व्ह्यायला हवा...
बाकी मुस्लिम लोकांमधे जी कट्टरता आढळुन येते तिचा हिंदु लोकांमधे मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो याचे फार वाईट वाटते.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/17/2010 - 17:23
नवीन
"मुस्लिम लोकांमधे जी कट्टरता आढळुन येते तिचा हिंदु लोकांमधे मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो याचे फार वाईट वाटते."
.... याला मूळ कारण धर्म-शिकवण हीच आहे. 'एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर' ही नेमस्तता थेट रामायणापासून चालत आली आहे आणि अगदी आधुनिक काळातील शिक्षणपद्धतीतदेखील याच तत्वज्ञानाचा ऐसपैस पसारा झाला आहे. मुस्लिमांतील धर्म कट्टरतेला त्यांना धर्म प्रसारासाठी तलवारीच्या जोरावर करावा लागलेला संघर्ष कारणीभूत आहे. प्रसार मोहिमेत प्रेषिताची मुले, नातवंडे, जवळचे साथीदार यांचे रक्त जसे वाहिले गेले अगदी तसेच त्याचबरोबर इस्लामला विरोध करणार्यांचीही अशीच बेरहमपणे कत्तल करून रक्तांचे पाट वाहिले गेले होते असा इतिहास आहे. हिंदू धर्मात अशी रक्ताची शिकवण त्याज्य मानली गेली आहे. कोणत्याही हिंदू राजाने धर्म प्रसारासाठी आपल्या सैन्याला 'एल्गार हो' अशी आरोळी दिल्याची इतिहासात नोंद नाही. उलटपक्षी धर्माच्या नावाने संपूर्ण जीवनात एक प्रकारची संन्यासपूजेचीच शिकवण आहे, जी आपल्या पूर्वजांनी अंगीकारली होती; आणि पुढे कळतनकळत आपल्यातही उतरली आहे. त्यादृष्टीने या वस्तुस्थितीकडे पाहिल्यास श्री.मदनबाण यांना जी कट्टरता अभिप्रेत आहे ती याच काय पण पुढील पिढीतदेखील येण्याची कोणतीच शक्यता नाही.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 08/17/2010 - 17:50
नवीन
>>कोणत्याही हिंदू राजाने धर्म प्रसारासाठी आपल्या सैन्याला 'एल्गार हो' अशी आरोळी दिल्याची इतिहासात नोंद नाही. उलटपक्षी धर्माच्या नावाने संपूर्ण जीवनात एक प्रकारची संन्यासपूजेचीच शिकवण आहे, जी आपल्या पूर्वजांनी अंगीकारली होती
आँ. हे काय नवीनच ऐकतोय !!!
असो पण हिंदू धर्माची चर्चा इथे नकोच.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/17/2010 - 20:40
नवीन
"पण हिंदू धर्माची चर्चा इथे नकोच."
+ सहमत आहे. खूप काही लिहिता येईल त्या अनुषंगाने, पण पुढे पाहू. मला आवडेल नक्की.
इन्द्रा
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 05:10
नवीन
नवीन कुठे ? आग्नेय आशियाचा अपवाद वगळता ( आणि जो लष्करी बळाने झाला नव्हता) पवार यांनी सांगितलेले बरोबरच आहे. धर्मरक्षणासाठी आवाहन केल्याचे प्रसंग आहेत पण आपल्या कुठल्याही राजाच्या सैन्याने कधीही कुठेही धर्मांतरण घडवून आणलेले नाही. इतकेच काय काही तुरळक अपवाद वगळता मूळच्या हिंदू पण बळजबरीने मुस्लिम केलेल्या लोकांनाही परत हिंदू धर्मात घेत नसत.
असो पण हिंदू धर्माची चर्चा इथे नकोच.
सहमत. जर योग्य अस दुसरा धागा असेल तर तिकडे करू.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 05:06
नवीन
प्रसार मोहिमेत प्रेषिताची मुले, नातवंडे, जवळचे साथीदार यांचे रक्त जसे वाहिले गेले अगदी तसेच त्याचबरोबर इस्लामला विरोध करणार्यांचीही अशीच बेरहमपणे कत्तल करून रक्तांचे पाट वाहिले गेले होते असा इतिहास आहे
अजून एक -
याबरोबरच ज्यांचा याच्याशी काहीएक संबंध नाही त्या दूरदूरच्या प्रदेशात जाउन तिथल्या लाखो लोकांच्या रक्ताचेही पाट वाहावयाचे, रानटी अत्याचार, बलात्कार, सक्तीचे धर्मांतरण इ. नंगानाच हजारो वर्षे घालायचा हाही यांचा इतिहासच आहे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 08/17/2010 - 14:14
नवीन
रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवतो. .....
रोजा ही दिखाव्यापासून पूर्णत: अलिप्त अशी उपासनापद्धती आहे.
'उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण' म्हणजेच दिखावा असे मला वाटते!
मग नक्की काय करायचे?
- Log in or register to post comments
व
वारा
Tue, 08/17/2010 - 14:23
नवीन
शिर खुरमा कधी देताय ते सांगा....कमीत कमी त्याची पाकक्रुती तरी टाका....
लै भारी लागती बॉ ही खीर.....
नाव आठवुन तोंडाला पाणी सुटलय्..काजु, पिस्ते , बदाम , मनुका..


- Log in or register to post comments
व
विसुनाना
Tue, 08/17/2010 - 14:30
नवीन
तोपर्यंत हलीमचा आस्वाद घ्या. :)
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 08/17/2010 - 15:47
नवीन
आमच्या जुन्या धाग्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
बाकी रमजान म्हटला की आम्हाला दोन गोष्टींची फार्फार आठवण येते. त्यातील एक म्हणजे, रात्रीची महंमद अली रोडची सैर आणि दुसरी ... (जाऊदे...)
- Log in or register to post comments
व
वेताळ
Tue, 08/17/2010 - 14:47
नवीन
रमझान ईद दिवशी श्रावण महिना संपणार काय? म्हणजे त्या दिवशी मला मित्राकडे मांसाहार करता येईल.
मगदुम साहेबांनी मार्गदर्शन करावे.
बाकी वरील लेखात तुम्ही बर्याच गोष्टी तुम्ही गीतेतुन कॉपी केल्या आहेत काय?
- Log in or register to post comments
व
वारा
Tue, 08/17/2010 - 14:54
नवीन
>>तोपर्यंत हलीमचा आस्वाद घ्या.
श्रावणात कसे चालेल हो..विसुनाना..पण श्रावण संपला की लगेच करु. :)
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 08/17/2010 - 15:05
नवीन
माणूस सोडला तर कुठलाच प्राणी देव देव करत नाही. तरी देव त्यांच्याकडेही प्रेमानेच पहातो. कुठल्याही प्रकारे देवाला/ईश्वराला खूष करण्याचा प्रकार, हा रांग मोडून पुढे घुसण्याचा प्रकार वाटतो. या पृथ्वीतलावरील सर्व सजीव प्राण्यांकडे देव्/अल्ला/ईश्वर सारख्याच मायेने पहातो आहे. त्याचे मुद्दामहून लक्ष वेधून घेण्याची जरुर नाही.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 08/17/2010 - 15:16
नवीन
मिपावर स्वागत.. रमजानच्या शुभेच्छा!
- Log in or register to post comments
व
वेताळ
Tue, 08/17/2010 - 15:18
नवीन
हलिमची पाकृ वाचली . खुपच सुंदर आणी चविष्ट डिश दिसते. मगदुम साहेब तुम्ही ईदच्या दिवशी ही डिश बनवा व आम्हा मिपाकराना आग्रहाचे निमंत्रन द्या. तिथेच वरील विषयावर ऑनलाईन चर्चा करता येईल.
- Log in or register to post comments
अ
अनाम
Tue, 08/17/2010 - 15:44
नवीन
सदर धाग्याला आणि त्यातिल बुरसट विचारसरणीला योग्य त्या जागी मारलेले आहे ;)
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 08/17/2010 - 16:11
नवीन
>अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत.
मक्का येथे प्रेषीत महंमदांच्या काळात अनेक ट्राईब्ज / टोळ्या होत्या. व मक्का शहरात अनेक वेगवेगळ्या पंथ (वेगवेगळे देव मानणार्या - पेगनीझम) लोकांची "श्रद्धास्थाने" होती ज्याकरत मक्का शहर हे यात्रा, उरुसाकरता प्रसिद्ध होते.
पैगंबरांच्या काळात तो सर्व अरेबिया प्रदेश युद्ध, लुटालूटी गांजलेला होता (एक झलक - अफगणिस्तान जसे अनेक वॉर लॉर्डस इ आहेत) तर तुम्ही इस्लाम मधे (म्हणजे शांततेच्या पंथात) या, याचा एक नियम म्हणजे तुम्ही इस्लाम धर्माचे असाल तर एका इस्लाम धर्मीयाने दुसर्या इस्लाम धर्मीयाला त्रास द्यायचा नाही. (संपत्ती, बायका, पोरे बळकवायची नाही इ ) असा बंधुभाव प्रसार केला व तो तेथील लोकांना पंसद पडत गेला. हळुहळू तो पसरला. इस्लाम हा अब्राहमीक धर्म असल्याने तसेच भौगोलिक दृष्ट्या अरेबिया भागावर कधी ग्रीक, रोमन, पर्शीयन, टर्क, मंगोल सत्तांनी आक्रमण करुन राज्य केले असल्याने त्यांना इतर लोक व त्यांचे देव याची कल्पना नक्की होती. पण कायम गोंधळ व युद्धाच स्थिती असलेल्या त्याप्रदेशात (लोकल इनोव्हेशन ) इस्लाम धर्म आला व पसरला. पैगंबरांनंतर जे तिसरे खलीफा होते त्यांनी इस्लाम धर्माचा प्रसार करायला सैनिकांना बाहेर राज्यात युद्धावर घेउन जायला प्रेरणा देण्याकरता जिहाद, बिलिव्हर-नॉन बिलिव्हर,(realm of peace & realm of war ) त्या करता युद्ध निषिद्ध नाही ह्या कल्पनांना अजुन अधोरेखीत केले. सुरवातीला अगदी एकास तीन ह्या गुणोत्तरात कमी असुन आजुबाजुच्या राज्यांवर इस्लामधर्मियांनी स्वारी केली व जिंकले. ह्यामुळे त्या भागातील अजुन लोकांचा विश्वास बसत गेला की अल्ला असा देव आहे व त्याला मानणार्यांचा विजय होतो व त्या पंथातले सगळ्यांना शांतता प्राप्त होते. इस्लाम वाढायचे (पक्षी: इतर धर्म इश्वराचे अस्तित्व नाकारले जाण्याचे) ते अजुन एक कारण होते. सुरवातीला पंथाचे काही नियम (आता तुम्ही इस्लाम धर्मीय झाला तर इतर काही बघायचे नाही, मानायचे नाही) म्हणुन (धर्म टिकावा म्हणुन)उपयुक्त असे हे नियम. ह्या दृष्टीने पहावे. आता त्यातली अन्यधर्मीय कट्टरता का व कशी बघतात हे सगळे वेगळ्या चर्चेचा विषय. आजच्या जगात जसे तुम्ही समजा एका नोकरी करत आहात तर दुसरी नोकरी करायची नाही, नंतर रायव्हल कंपनीत जायचे नाही अशा काही शर्ती तुमच्या करारपत्रात असु शकतात. त्याच भूमीकेतुन मी वर उल्लेख केलेल्या वाक्याकडे बघतो.
पुस्तकाचे नाव आहे "Destiny Disrupted - A History of the world through Islamic eyes" -
Author - Tamim Ansary"
बर्याच गोष्टींची उत्तरे मिळतील. कट्टरता व फक्त त्या लिखीत ग्रंथालाच प्रमाण कसे व का मानले गेले यावर चांगले विश्लेषण आहे. इच्छुकांनी नक्की वाचावे असे पुस्तक.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 08/17/2010 - 16:03
नवीन
येथे आलेल्या नानाविध प्रतिक्रिया शाहजहान मगदुम संयमाने आणि सबुरीने घेतील अशी आशा व्यक्त करते.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Tue, 08/17/2010 - 18:43
नवीन
>>अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं..
प्रस्तुत लेखातील सदर वाक्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असे संपादक मंडळास नम्रपणे सुचवू इच्छितो..
श्री. मगदुम यांना रमजानच्या शुभेच्छा !
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 08/17/2010 - 21:04
नवीन
हा केवळ प्रतिसादखेचू धागा आहे असं वाटतंय...बाकी त्यातील मजकुराला फाट्यावर मारले आहे..
श्री राम जय राम जय जय राम.
- Log in or register to post comments
व
वारा
Tue, 08/17/2010 - 21:28
नवीन
असे कसे हो हे हळवे लोक, जरा काय झाल की म्हणे भावना दुखावतात...
आमच्या कधी भावना बिवना दुखावत नाहीत...
भलेही तो हुसेन येउदे किंवा आणि कोण येउदे.
आमचे देवही नागडे आम्हीही नागडे.
जन्माला आलो तेव्हाही नागडे...आणि जातानाही नागडेच जाणार..
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 08/18/2010 - 03:50
नवीन
देह अजस्त्र पहाड । सदा गर्वे बोलणार ।
पण केला त्याने । दक्खनचा चुहा हाती चिरडणार ।
स्वप्न स्वराज्याचे ऐसे । खंडीत होणे नाही ।
देह गर्व सर्व संपले । दक्खनी कबर राही ।
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 08/18/2010 - 06:25
नवीन
इंद्रराज पवार, सहज आणि इतर मंडळी यांनी जे प्रतिसाद दिले आहेत त्यानंतर इथे आणखीन काही लिहिण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. तरीदेखील एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो.
अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत.
सदर वाक्य हा एका विशिष्ट विचाराचा पूर्वार्ध आहे. त्या विचाराचा उत्तरार्ध लेखकाच्या मनात आहे. आणि तो असा आहे की "म्हणून इतर धर्म जे इतर देवांना भजतात त्या देवांची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, त्या धर्मीयांना नष्ट करणे, प्रेमाने,बळाने किंवा कपटाने त्यांना अल्लाहची शिकवण देणे यादेखील मौलिक गोष्टी आहेत."
अवांतर -
अर्थात कोणाच्या मनात काय आहे यापेक्षा कोणाच्या बाहूंमध्ये काय आहे यालाच अधिक मह्त्व दिले पाहिजे. गझनीच्या महंमदाने सोमनाथ फोडला तेंव्हा त्याचा हात धरण्यासाठी शंकर अवतरला नाही आणि चेंगीझखानाने मशिदींच्या घोडशाळा बनवल्या तेंव्हा किंवा विहिंपने मशीद जमीनदोस्त केली तेंव्हा त्यांचा हात धरायला अल्लाहसुद्धा अवतरला नाही.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 06:27
नवीन
इंटरनेटवर बागडताना सदर चित्र मिळाले.

- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 06:32
नवीन
तसाच डॅनियल पर्लच्या शिरच्छेदाचा व्हिडीओही इंटरनेटवर उपलब्ध आहे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 06:35
नवीन
काय घ्यायचं आणि काय नाही ही ज्याची इच्छा, विचार नाहीत का?
डॅनियल पर्लला मारणारे आहेत तसे गुजराथेत गरोदर स्त्रीला फक्त मुसलमान आहे म्हणून भोसकणारे कोणी हिंदूही आहेतच.
बाकी चालू द्या. या चित्राची अंमळ गंमत वाटली म्हणून ते डकवलं.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 06:47
नवीन
काय घ्यायचं आणि काय नाही ही ज्याची इच्छा, विचार नाहीत का?
डॅनियल पर्लला मारणारे आहेत तसे गुजराथेत गरोदर स्त्रीला फक्त मुसलमान आहे म्हणून भोसकणारे कोणी हिंदूही आहेतच.
तो पर्याय इथेतरी नाहीये. वस्तुस्थिती, उदा. आकडे बोलतात.
आजपर्यंत स्वत: च्याच देशात परकीय मुस्लिमांकडून मारले गेलेले, अत्याचारित हिंदू आणि हिंदूंकडून मारले गेलेले मुस्लिम यात कोणता आकडा दुसर्यापेक्षा शेकडो पटीने मोठा आहे ?
बाकी चालू द्या. या चित्राची अंमळ गंमत वाटली म्हणून ते डकवलं.
इतक साधसोप वाटत नाही. इतर बाबतीत गंमत, मस्करी ठीक आहे पण या धाग्यावर मात्र हे चित्र बेगडी धर्मनिरपे़क्षतावादी* किंवा ते लोक कसा चांगले आहेत असा खोटाच प्रचार करणार वाटत.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 06:50
नवीन
हा तुमचा विचार झाला! आणि तो तुम्ही माझ्यावर लादू शकत नाहीत.
हे चित्रं कुठेही पाहिलं तरी माझ्या डोक्यात हाच विचार येईल (/आला) धर्म ही ओळख बाजूला पडली आणि देशाची ओळख वरचढ ठरली.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 06:57
नवीन
मी तुमच्यावर कुठलाही विचार लादत नाहीये. तुम्ही तुम्हाला काय वाटले ते सांगितले आणि मीही.
धर्म ही ओळख बाजूला पडली आणि देशाची ओळख वरचढ ठरली.
हे नक्कीच आदर्श आहे (जर सगळ्यांनाच तसे वाटले तर)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 08/18/2010 - 07:05
नवीन
>>आजपर्यंत स्वत: च्याच देशात परकीय मुस्लिमांकडून मारले गेलेले, अत्याचारित हिंदू आणि हिंदूंकडून मारले गेलेले मुस्लिम यात कोणता आकडा दुसर्यापेक्षा शेकडो पटीने मोठा आहे ?
या धाग्यावर हिंदूंविषयक चर्चा करायची नाही असे माझे ठरले आहे.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 08/18/2010 - 08:07
नवीन
फॅन्सी ड्रेस खुप आवडले.
मुलाबरोबर असणार्या स्त्रीने देखिल एकदम वास्तव फॅन्सी ड्रेस घातला आहे.
पण इथे ह्या चित्राचे प्रयोजन समजले नाही.फॅन्सी ड्रेसेसचा व शाहजहान मगदुम ह्याचा काय संबध आहे काय?
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 08/18/2010 - 06:32
नवीन
"अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत."
हा लेख रमजान महिन्यातील रोजांविषयी माहिती देण्या साठी आहे. परंतू वरील वाक्य कारण नसतांना घालून, लेखकाने खोडसाळपणा केला अहे असे वाटते. इतर मुस्लीम बंधुंना अन्य धर्मियांविषयी असहिष्णुता शिकवण्यासाठी हे वाक्य आहे.
निधर्मी राष्ट्रा मधे एकमेकांनी एकमेकांच्या इश्वराचा आणि श्रद्धेचा आदर करायचा, की त्यांचे अस्तित्वच नाकारायला शिकवायचे?
मिपा सारख्या जबाबदार संस्थळाने असा खोडसाळ प्रचार कां चालू द्यावा?
त्या वाक्याचा लेखाच्या मूळ उद्देशा बरोबर काही संबंध नाही. ते वाक्य काढले तर लेख रोजा ची महती पटवण्या साठी आहे असे होईल. कदाचित चालू शकेल. त्या वाक्यामुळे उद्देशावर शंका येते.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »