संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!
💬 प्रतिसाद
(81)
P
Pain
Wed, 08/18/2010 - 06:38
नवीन
त्या वाक्याचा लेखाच्या मूळ उद्देशा बरोबर काही संबंध नाही.
संबंध नाही कसा? हे तर हजारो वर्षे भारतात घडत आले आहे. हे २०१० मधील संकेतस्थळ आहे म्हणून लेख लिहिलाय. स्थळकाळ थोडा वेगळा म्हणजे इ.स. ८०० ते १८०० मधल्या कोणत्याही काळातील भारतात हेच तलवारीच्या धाकावर तुमच्या गळी उतरवले गेले असते.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 08/18/2010 - 06:43
नवीन
लेखाचा उद्देश रोजाची महती पटवणे हा असावा असा आभास निर्माण केला अहे. मग तो आभास राहू द्या की. आणखी खोडसाळपणा कशाला?
- Log in or register to post comments
न
नंदू
Wed, 08/18/2010 - 06:45
नवीन
श्री इंद्रराज पवार आणि मनोहररावांशी पूर्णपणे सहमत. दुसरी नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे सदर लेखकाने लेखाच्या शेवटी दिलेला स्वतःचा फोन नंबर. मलातरी यात छुपा (प्रचारकी) अजेंडा दिसतो.
वादग्रस्त विधान वगळून हा लेख पुनऱप्रकशित करावा असं वाटतं.
संपादक मंडळाकडून खुलाशाच्या अपेक्षेत.
नंदू
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 06:49
नवीन
एवढेच पुरेसे नाही. हा लेख आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टींना इथे थारा दिला जाउ नये.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 08/18/2010 - 06:51
नवीन
हा लेख अस्सच्या अस्सा कुठेतरी वाचल्याचे स्मरते ..बहुधा लोकमत मध्ये ...पण रमजान दरम्यानच !! ते आपणच का ?
असो जेव्हा ईतक लिहीताय तर सकाळ्ची पहिली अजान आणी बाकी अजान मधला फरक सांगा बर !!
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Wed, 08/18/2010 - 07:08
नवीन
श्री इंद्रराज पवार यांच्याशी पूर्णपणे सहमत,
>> अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत
मूळ लेखात काही विधाने आक्षेपार्ह केल्यामुळे माझ्या आणि माझ्या बर्याच मित्रांच्या भावनांस ठेच पोहोचली आहे.
प्रिय शाहजहान मगदुम साहेब ,
इतका वेळ तोंड बंद ठेऊन गप्प होतो याचा असा अर्थ असा समजू नये कि आम्हाला बोलता येत नाही.
संपादक साहेबांना नम्र विनंती,
त्यांनी लवकरात लवकर आक्षेपार्ह विधाने वगळून लेख पुन्हा प्रकाशित करावा.
अन्यथा शाहजहान मगदुम यांनी एक अतिजहाल प्रतिक्रियेसाठी तयार राहणे आणि पुढे चालू होणार्या हिंदू मुसलमान आंतरजालीय लढ्यास आम्ही/मी जबाबदार नसेन ह्याची प्रखर दाखल घ्यावी.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 08/18/2010 - 08:09
नवीन
एका गांधीवाद्याला जहाल होताना पाहिल्यामुळे मन अगदी विषण्ण झाले.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 08:11
नवीन
:D
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 08/18/2010 - 07:39
नवीन
"आणखी खोडसाळपणा कशाला?"
कोणतीही नदी ही मुखापाशी स्वच्छ, नीतळ अशीच असते, पण नंतर तिला प्रवाहाचे रूप आल्यानंतर विविध प्रकारच्या "खोडसाळ" पणामुळे मूळचे निर्मळ रूप जावून जो "ताकदवान" घटक असेल तसे तो आपल्या बळावर तिला दिशा देत असतो तद्वतच श्री.मगदूम (ज्यांनी अद्यापि प्रतिसादावर भाष्य दिलेले नाहीत) यांचा हेतू रोजाची महती पटवणे असला तरी पडद्याआडून त्यांनी इतर धर्मापेक्षा "मुस्लिम"च आगळावेगळा (म्हणून "अल्ला"ला प्रिय) आहे हीच थाळी वाजवली आहे.
"कुरआन" च्या मूळ प्रतीवर वेळोवेळी (हवा बदलेल त्यानुसार) भाष्यकार आणि अनुवादक यानी आपल्या मताची पुटे चढविली असल्याने ज्यावेळी "त्या" वाक्यातील भाष्य हे एखाद्या कट्टर धर्ममार्तंडाच्या सुपीक डोक्यातूनदेखील पैदा होत असते त्यावेळी उत्तरादाखल अन्य धर्मीयांनी त्याचे खंडन करणे म्हणजे मूळ ग्रंथावर टीका करणे नसून अशा प्रवृतीला आवर घालणे होय.
इस्लाममध्ये "सजदा" या कृतीला फार महत्व आहे असे ते मानतात. "सजदा" चा मूळ अर्थ "झुकणे" असा आहे. पण त्यांच्या भाष्यकारांनी "आदरार्थी स्वरूपात हात, गुडघे आणि कपाळ जमिनीवर टेकणे" असा सोयिस्कर अर्थ घेतला आणि त्याची अंमलबजावणी मौलवी, बादशहा, पातशहा, जमिनदार यांच्याशी व्यवहार करताना जनतेने केली पाहिजे असा (लिखाणातून) हुकूमनामा बजावला. (आखाती देशात, जिथे आजही राजेशाही चालू आहे, तिथे "सजदा-ए-ताजीमी" कार्यरत आहे.). मूळ कुरआनात तर "अनिष्टापासून वाचविण्यासाठी अल्लाहसमोर उपासनात्मक सजदा करणे" असे म्हटले आहे, इतकेच नव्हे तर "ईश्वराशिवाय इतरांना केलेले सजदे हराम ठरविले गेले आहेत."
पण आता पेट्रोडॉलर्सच्या गुर्मीवर धर्मगुरूना नाचविणार्यानी इस्लामी परिभाषेच्या संकल्पना बदलण्याचे ठरविले असल्याने श्री.मगदूम यांच्यासारख्यांनी धर्मवचनाला त्या हवेनुसार झुकविले, असेच म्हणावे लागेल.
इन्द्रा
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 09:29
नवीन
एखाद्या धर्मातल्या विशिष्ट उपासनापद्धती विषयी लेख लिहिला तर त्यात उपासना का महत्त्वाची, व उपासकांचे व त्या धर्मग्रंथातले अंतिम शक्तीविषयी विचार काय आहेत, हे येणारच. जर क्ष धर्माच्या धर्मग्रंथात लिहिलं असेल की क्ष धर्मच सर्वश्रेष्ठ, तर ते मत, ('त्या ग्रंथात तसं लिहिलं आहे' हे सत्य विधान) यायला काय हरकत आहे? यात आक्षेपार्ह काय आहे?
जर कोणी मॉर्गनने किंवा मेघवेड्याने सचिन तेंडुलकर सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असं म्हटलं तर ते त्यांचं मत म्हणून मान्य करायला काय हरकत आहे? ते कोणावर लादलेलं नाही. जर कोणी लिहिलं की 'ब्रॅडमन म्हणाला सचिन सर्वश्रेष्ठ' तर ते आणखीनच पत्रकारितेच्या जवळ जातं.
असं जर झालं तर अनेक विचार, मतं मिपावर मांडलीच जाऊ शकणार नाहीत.
'खानाचा कोथळा काढा' अशी विधानं मिपावर चालतात, पण 'अल्लाह एकमेव व सर्वश्रेष्ठ आहे असं मुसलमान मानतात' हे आक्षेपार्ह वाटतं?
काय चाललंय हे?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 09:35
नवीन
का हो. सगळ्या धाग्यांवर बाजूने , विरोधी प्रतिक्रिया येणारच ना? मग इथेही आल्या तर काय वाईट आहे?
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 09:37
नवीन
धर्म जात पात इ. बद्द्ल अ/ब्/क श्रेष्ठ/सर्वोत्तम/उच्च/नीच्च आहे अशी कुणाचीच मते इथे येउ नयेत असे आमचे मत आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 09:44
नवीन
बरं बरं इतरत्र त्याची खिल्ली कोणी उडवली तर चालते.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 09:52
नवीन
आम्हीच खिल्ली उडवतो हो.
मुद्दा असा आहे की, अशी हास्यास्पद विधानेच (धाग्यात) येउ नये असे आमचे मत आहे(मग कुठल्याही बाजुने असोत. (खिल्ली मात्र उडवायला अजिबात हरकत नाही, उलट त्याशिवाय काय करावे असाच प्रश्न अशा धाग्यांवर पडतो.)
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 10:06
नवीन
@ पुपे - तुमची जशी 'काहो' म्हणणारी प्रतिक्रिया आहे, तशीच माझी पण समजा...
नाईल, तुम्ही इथे सेक्युलारिझमचा अतिकठोर अर्थ लावता आहात असं वाटतं. एखाद्या धर्माच्या लोकांना आमची उपासनापद्धती योग्य आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आम्ही ती पद्धत वापरतो असं म्हणण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत त्यांचं म्हणणं ते इतरांवर लादत नाहीत, किंवा ते लादण्यासाठी इतरांना आवाहन करत नाहीत तोपर्यंत ते जाहीर करण्याचा देखील अधिकार आहे. ते मत चुकीचं आहे म्हणून खंडन करणं वेगळं आणि ते विधान नष्ट करण्याचं आवाहन करणं वेगळं.
मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला. कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली. पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते. हे योग्य संतुलन आहे का? याला सेक्युलरिझम म्हणावं का?
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 10:50
नवीन
धर्म जात पात ह्या गोष्टी हद्दपार व्हायला हव्यात अशी इच्छा असल्याने माझे मत वर लिहल्या प्रमाणे आहे. आजही जर कुणी अश्या बाबींवर उच्च निच्चता ठरवत असेल तर ते हास्यास्पद आहे. संस्थंळांनी याबाबत पुरोगामी राहुन अशा विचारसरणीला प्रोत्साहन देउ नये असे थोडेसे आज कठोर वाटले तरी स्पष्ट असे माझे मत आहे.
त्याशिवाय, समाजात चार लोकांशी बोलताना मी माझ्या धर्मातील्/जातीतील(इत्यादी, 'अ/क्ष')(मी काही मानत नसलो तरी) प्रथा समोरच्याच्या धर्मा/जातीतील प्रथांपेक्षा थोर आहेत असे सहसा बोलायचे टाळतो. त्याउलट समोरचा आणी मी दोन्ही एकाच 'अ/क्ष' चे असु तर मात्र असे विचार व्यक्त करताना मोकळेपणा असतो. (समोरचा जर समजुतदार असेल तर मात्र अजातीय्/धर्मीय असताना ही चर्चा करतो, पण हे अनुभवाने). ह्या कारणानेही सोशल फोरम्स वरती माझा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे असे मत मांडले जाउ नये असे वाटते.
(आमचा देव श्रेष्ठ हे विधान माझ्यासाठी प्रक्षोभक नसले तरी अनेकांसाठी आहे, म्हणुनही सोशल फोरमवर असे वाक्य नसावे.)
वरील मुद्द्यांना काही अपवाद आहेत, पण त्यावेळी त्यावर सांगोपांग चर्चा व्हावी, सर्वश्रेष्ठ का आहे याची तर्कसंगत (दुसर्याला चुक का वाटेनात) पुष्टी वगैरे द्यावी मग ठीक. पण क्ष पुराणात आम्हीच सर्वात श्रेष्ठ आहोत अश्या विधानांना विरोध असेल. (इतर अंधश्रद्धांना जसा विरोध असतो त्याप्रमाणेच हा विरोध आहे)
राहिला प्रश्न संतुलनाचा तर ते नाहीच हे मान्य आहे. समाजात मुर्ख जास्तच हे ही मान्य आहे,(मिपावर मुद्दाम धिंगाणा करण्यासाठी डुप्लीकेट आयडीतुन खानाचा कोथळा काढा म्हणणारेही आहेत हे ही कृपया ध्यानात घ्यावे) अश्या मुर्खांबद्दल काय बोलावे?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 11:32
नवीन
तसं अनेक देशांत स्त्रियांनी चेहेरा किंवा केस दाखवणं हे तिथल्या अनेकांसाठी प्रक्षोभक आहे. म्हणून त्यावर बंदी योग्य का?
तुम्ही याबाबतीत संयम पाळता हा शिष्टाचार झाला, तुमचा चांगूलपणा झाला. त्यात एकंदरीत तुमच्या आयडेंटीटीमध्ये धार्मिक संस्थांना फार स्थान नाही. त्यामुळेही ती वेळ येत नसेल. पण म्हणून तुम्ही जाहीर फोरममध्ये तो विचार मांडूच नये असं बंधन नाही. तसं असतं तर अनेक धर्मग्रंथ छापायलाच बंदी घालावी लागेल.—
"As the different streams having their sources in different places all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take, through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee!" and "Whosoever comes to Me, through whatsoever form, I reach him; all men are struggling through paths that in the end lead to Me."
हे स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत म्हटलं होतं. यात कोणीतरी हिंदू देव हा एकमेव व अंतिम, सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हटलेलं नाही का?
हे होणं आदर्शच. पण 'माझा विश्वास आहे, प्रत्यक्ष देवाने अमुक तमुक प्रेषिताला सांगितलं, त्याने इतरांना सांगितलं (व ते खरं आहे हाही माझा विश्वास आहे)' ही कारणं धार्मिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांसाठी पुरेशी होतात. केवळ तर्ककठोरच राहायचं असेल तर धर्म या विषयावर चर्चा होणं कठीण आहे. 'क्ष विधानावर अमुकतमुक लोकांचा विश्वास आहे' असं म्हटल्याने ते खरं थोडंच होतं? असं म्हणण्यालाच विरोध करणं हे जेम्स लेन प्रकरणासारखंच झालं नाही का?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 11:42
नवीन
तसं अनेक देशांत स्त्रियांनी चेहेरा किंवा केस दाखवणं हे तिथल्या अनेकांसाठी प्रक्षोभक आहे. म्हणून त्यावर बंदी योग्य का?
त्या देशात ते सर्वमान्य असेल तर त्यावर बंदी योग्य का अयोग्य हे तुम्ही आम्ही कसे ठरवायचे. आपण आपल्या देशाबद्दल बोलू शकतो. आपल्या देशात तसे करायला लावणे हे अयोग्यच आहे.
यात कोणीतरी हिंदू देव हा एकमेव व अंतिम, सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हटलेलं नाही का?
असं कुठं दिसलं नाही त्यात. ते देवाबद्दल सांगताहेत असे वाटते. हिंदू देवाबद्दल नाही.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 12:03
नवीन
अरे वा, तसं असलं तर 'आपण ज्याला मराठीमध्ये देव म्हणतो, त्याला काही भाषांमध्ये अल्ला असं म्हणतात' एवढं साधं मान्य केलं, की प्रश्नच मिटतो.
'अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम
सबको सन्मती दे भगवान'
शेवटी सन्मती असली की झालं. आता तुम्ही म्हणाल की, 'पण त्यांना नाही ना, म्हणून आम्ही आमची सन्मती सोडतो', तर आपण व ते वेगळे नाही हे लक्षात ठेवणं हीच सन्मती. विवेकानंददेखील बंधु आणि भगिनी म्हणाले होते हे आठवा.
He greeted the youngest of the nations in the name of "the most ancient order of monks in the world, the Vedic order of sannyasins, a religion which has taught the world both tolerance and universal acceptance."[77] And he quoted two illustrative passages in this relation, from the Bhagavad Gita—"As the different streams having their sources in different places all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take, through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee!" and "Whosoever comes to Me, through whatsoever form, I reach him; all men are struggling through paths that in the end lead to Me."[77] ....
ते हिंदू देवाविषयीच (किंवा हिंदूंच्या देव या कल्पनेविषयीच) बोलत होते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 13:00
नवीन
अरे वा, तसं असलं तर 'आपण ज्याला मराठीमध्ये देव म्हणतो, त्याला काही भाषांमध्ये अल्ला असं म्हणतात' एवढं साधं मान्य केलं, की प्रश्नच मिटतो.
नाही इस्लामिक कॉन्टेक्स्ट मधे त्याला देव म्हणत नाहीत. इस्लाममधे सांगितलेला देवच म्हणजे 'अल्ला'च देव असतो आणि तो सोडून मूर्तीपूजेत पूजले जाणारे देव खोटे असतात म्हणून ते फोडायचे असतात. त्यावरूनच पुढे गाझी, बुतशिकन अशा पदव्या दिल्या जात असतात.
आता तुम्ही म्हणाल की, 'पण त्यांना नाही ना, म्हणून आम्ही आमची सन्मती सोडतो', तर आपण व ते वेगळे नाही हे लक्षात ठेवणं हीच सन्मती. विवेकानंददेखील बंधु आणि भगिनी म्हणाले होते हे आठवा.
हो आम्ही पण त्यांना बांधव म्हणू. मग जेव्हा सख्ख्या भावांमधे प्रॉपर्टी वगैरे वादातून कज्जे खटले होत असतात झालंच तर मारामार्या खूनही होतात (म्हणजे आम्ही करू असे नाही). पण मग ह्या बांधवानांही त्यांच्या असल्या आगळीकीबद्द्ल शिक्षा देऊ. कमीतकमी खरमरीत निषेध तर नक्कीच करू.
ते हिंदू देवाविषयीच (किंवा हिंदूंच्या देव या कल्पनेविषयीच) बोलत होते.
हो पण ते त्या वेळेला इतरांच्या देवांना 'तथाकथित' म्हणून नाकारत नव्हते हे ही लक्षात घेतले पाहीजे. वरील लेखात नेमके याच्या विरुद्ध केले गेले आहे.
बाकी, सेक्युलर सिद्ध करण्यासाठी शब्दांचे बुडबुडे कितीही काढता येतील.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 13:18
नवीन
see, was that so difficult? चला, आजच्यापुरतं एवढं यश मला रगड.
बाकी मूर्तीपूजन व देव ही संकल्पना या वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगत बसत नाही...
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 14:29
नवीन
see, was that so difficult? चला, आजच्यापुरतं एवढं यश मला रगड.
यश ??? कसलं बॉ?
आणि त्याच न्यायानी सर्व गुन्हे करणारे गुन्हेगार, चोर हेही आमचे बांधवच आहेत असे आम्ही मानतो. फक्त ते फाशी देण्याच्या लायकीचे आहेत असे मानतो. कारण भगवत गीतेत श्रीकृष्णाने कायम धर्माची बाजू घ्यायला सांगितली आहे. अधर्माच्या बाजूने आपले बांधव जरी उभे असतील तरी त्यांच्याशी युद्ध करा अशी भगवंताची आज्ञा आहे. 'तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय युधस्य कॄतनिश्चयः'
बाकी मूर्तीपूजन व देव ही संकल्पना या वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगत बसत नाही...
स्वामी विवेकानंदांनीच म्हटल्यानुसार 'जेव्हा आम्ही मूर्तीची पूजा देव म्हणून करतो तेव्हा तो देव तिथे असतो' . त्यामुळे माझ्यापुरत्या त्या वेगळ्या नाहीत असे म्हणतो.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 11:51
नवीन
थोडासा(की बराच?) फरक आहे असे वाटते.
अनेक देव-जाती-धर्म एकत्र नांदत असताना (प्रत्येकाने) माझाच देव सर्वश्रेष्ठ अशी भुमिका ठेवल्याने एकत्र नांदण्यालाच अडथळा होतो. आता सदर समाजच जर एकत्र राहण्यात अडचण होत असेल तर अशी कारणे निर्माण होउ नयेत असे वाटले तर फार काय चुकले? (अर्थात, देव धर्म वगैरे थोतांड आहेत हे माहित असताना)
स्त्रीयांनी चेहरा दाखवल्याने कोण कसा प्रक्षोभित होईल माहित नाही, मात्र कुठल्या समाजात जर तसे खरेच होत असेल आणि त्यामुळे समाजाच्या अस्तित्वालाच धोका असेल तर स्त्रियांना चेहरा इ. झाकण्याच नियम समाजाने केला तर समजु शकतो.
म्हणुनच सर्वात पहिला प्रतिसाद तसा लिहला. (मला कळले, पण इतके अवघड लिहलेत तर मात्र अनेकांना समजावयाचे नाही. :-) )
:-)
हे ज्यांकरता आहे ते उत्तर देतील अशी आशा करुयात, नवीन धोरणात मी द्यायचे म्हणले तर उत्तर बसेल की नाही कुणास ठावुक, पण पुन्हा तुमचे म्हणणे कळालेच नाही तर? ;-)
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 11:31
नवीन
मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला
असे किंवा अशा अर्थाचे एकही विधान या धाग्यावर नाही (तुमचा प्रतिसाद वगळता).
कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली. (तीही तुमच्याच प्रतिसादात)
आता तुमच्या प्रतिसादात जी वाक्ये येतात त्याबद्दल आम्हाला का जबाबदार ठरवता ?
पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते.
हे विधान तुम्ही फारच सौम्य बनवले आहे, संदर्भ द्यायचा असल्यास ते जसे आहे तसे द्या.
आणि का उडू नये ? गेल्या हजार वर्षांचा इतिहास पाहता अशी छुपी धमकी दिली तर राग येणारच.
हे योग्य संतुलन आहे का? याला सेक्युलरिझम म्हणावं का?
त्यांचा धर्म स्वीकारा अथवा मरा अशी धमकी देणे आणि ती हजारो वर्षे खरी करून दाखवणे याला काय म्हणतात हो ?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 08/18/2010 - 10:45
नवीन
मत मान्य करायला काहीच हरकत नाही हो, कारण आणि मॉर्गन आणि मेवे सचिन श्रेष्ठ आहे असे नुसते लिहुनच मोकळे होतात. तो श्रेष्ठ नाही म्हणणार्यांचे गळे कापायला आणि घरदार जाळायला ते जात नाहीत :) हा सगळ्यात मोठा फरक आहे.
असो...
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 11:09
नवीन
राव तुम्ही अतिशयोक्ती अलंकार वापरून वापरून झिजवणार बघा. ८७ साली दिल्ली स्टेशनासमोर 'हम है हिंदू साठ करोड, हड्डी पसली देंगे तोड' अशी सहा फुटी अक्षरांची पाटी लागलेली होती. 'संयम व सबुरीचा महिना रमजान' असल्या मिपावरच्या धाग्यात अल्ला सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय आहे असं म्हटल्याबरोबर गळे कापले जाण्याची भीती वाटते तुम्हाला... फारच तुम्ही सेन्सिटीव्ह बॉ.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 08/18/2010 - 11:13
नवीन
१६८९ मध्ये इस्लाम स्विकारला नाही म्हणुन संभाजी महाराजांची निर्घॄण हत्या झाली होती.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 11:40
नवीन
आय रेस्ट माय केस.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 08/18/2010 - 11:45
नवीन
श्री.राजेश घासकडवी (ज्यांचे लिखाण मी कायम आत्मियतेने वाचत असतो) यांच्या प्रतिक्रियेमधील काही वाक्ये ही सर्वसमावेशक असल्याने वैयक्तिकरित्या त्यातील काहीचे खंडन प्रथम करणे मला निकडीचे वाटते.
१. जर क्ष धर्माच्या धर्मग्रंथात लिहिलं असेल की क्ष धर्मच सर्वश्रेष्ठ, तर ते मत, ('त्या ग्रंथात तसं लिहिलं आहे' हे सत्य विधान) यायला काय हरकत आहे? यात आक्षेपार्ह काय आहे?
आक्षेपार्ह काही नाही; पण याचा अर्थ असा नाही ते मत मांडताना भाषेचा संयम सोडावा. त्यातही विशेषतः ज्यावेळी लेखाचे शीर्षकच मुळी "संयम आणि सबुरी" याचे महत्व सांगणारा आहे. "अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत" ~~ 'रोजा'चे महत्व विशद करताना इतर ईश्वरांना नाकारा असे लिहिताना ज्या "तथाकथित" शब्दाचे प्रयोजन करण्यात आले आहे ते माझ्या हिंदू मनाला अपमानस्पद वाटले तर तसे प्रतिसादात (भाषेचा तोल न ढासळता) दिले तर आक्षेपार्ह मानले जाईल का?
२. कुठले वाक्य चालते, कुठले नाही या विषयावर इथे वारंवार मंथन झाले आहे आणि संपादक मंडळानेदेखील त्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे, करीत आहेत. पण तुम्हाला व मला जे शब्द, वाक्य वा विधान आक्षेपार्ह वाटतात त्यावर संपादकांचीही नजर असेलच कारण ती मंडळी तुम्हाआम्हापेक्षा वेगळी नाहीत. आपण केवळ तशी सूचना करू शकतो, शेवटी कात्री त्यांच्या हातात आहे.
३. "असं जर झालं तर अनेक विचार, मतं मिपावर मांडलीच जाऊ शकणार नाहीत."
बरोबर आहे हा मुद्दा. पण मतमांडणीतही काही ताळतंत्र असणे अपेक्षित नाही का? उद्या श्री.मगदूम मशिदीतील त्यांच्या एखाद्या शिष्याने मिपावर "इस्लामला मानणारे पुण्यात भरपूर आहेत म्हणून दर शुक्रवारी शनिवारवाड्यावर भगव्याऐवजी हिरवा फडकविण्यात यावा काय?" असा विचार मांडला तर तोदेखील एक "वैचारिक अभिव्यक्ती" म्हणून चर्चेला घ्यायचा काय?
४. "ते मत चुकीचं आहे म्हणून खंडन करणं वेगळं आणि ते विधान नष्ट करण्याचं आवाहन करणं वेगळं. "
यावर माझे वैयक्तिक मत मी प्रतिसादात मांडले आहे. तरीही थोडक्यात सांगत आहे की, शक्य त्या योग्य आणि सौम्यरितीने मी 'त्या' मताचे खंडन केले आहे. विधान नष्ट करण्याचे आवाहन केलेले नाही.
५. "मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला. कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली."
यात मी नाही. माझ्या अत्यंत जवळच्या मित्रात तीन मुसलमान आहेत आणि ते हमीद दलवाई, हुसेन जमादार यांच्या पंथातील आहेत. माझ्या अनेक आवडत्या शिक्षकांपैकी एक मुस्लिम होते ज्यांचा "मराठी" हा विषय होता. त्यांच्या व त्यांच्या सहकार्यांसमवेत कुरआनवर वारंवार मी विचारांचे आदानप्रदान केले आहे. त्यामुळे वरील वाक्यात दिसणारी अतीटोकाची मते मी कधीही करू शकणार नाही.
६. "पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते."
मतांचे जे रूप वर प्रकट झाले आहे त्याला "राळ" म्हणणे अन्यायकारक आहे कारण "राळ" याला इंग्रजी प्रतिशब्द आहे "डिस्ग्रेस" अन ६० पेक्षा जास्त प्रतिक्रिया या "डिसग्रेसफुल" आहेत असे कृपया मानू नका. मी दोनतीन ठिकाणी लिहून श्री.मगदूम याना येथील लेखावरील चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. पण तसे झालेले नाही.
शेवटी "धर्म" आणि "सचिन" या दोन्ही अभिमानाच्या गोष्टी असल्या तरी त्या एकाच तराजूत येत नाहीत. आज २०१० मध्ये 'सचिन' ने तुमच्या आमच्या हृदयात घर केले आहे. १९७५ साली तिथे "सुनील" होता, कुणी सांगावे २०२५ ला तिथे एक "सत्यजीत" येईल. पण धर्माचे स्थान एकमेव म्हणून अढळ आहे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 14:11
नवीन
सर्वप्रथम इंद्रराज, तुम्ही वैयक्तिक खुलासे देण्याची काहीच गरज नव्हती. माझा रोख तुमच्या प्रतिसादावर नव्हता. तुमचं म्हणणं नेहेमीच तुम्ही विचारपूर्वक मांडता.
एकंदरीत 'तथाकथित' या शब्दाला जोरदार आक्षेप दिसतोय. पण हा आता शब्दच्छल व्हायला लागला. माझा जर ठाम विश्वास असेल की माझ्या देवाचा संदेश हाच खरा संदेश आहे, माझा देव हाच खरा देव आहे, तद्वतच इतर लोकांची दिशाभूल झालेली आहे. तर तो विचार मांडायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. विचार लादायला आक्षेप आहे. जिथे काहीच व्यक्तिनिरपेक्ष नाही, सर्वच विश्वासावर आधारित आहे, तिथे नक्की कुठची विधानं त्याज्य हे ठरवणं कठीण जातं. कुराणात अमुकतमुक लिहिलं आहे हे विधान त्याज्य असेल तर तुम्ही कुराण त्याज्य आहे असंच नाही का म्हणत?
हिरव्या झेंड्याचं उदाहरण थोडंसं टोकाचं असलं तरी विचारणाऱ्याला तो विचारल्याबद्दल शिक्षा करू नये इतकंच. त्याला सरळ नाही म्हणावं, त्याच्या अविचाराबद्दल हसावं, दुर्लक्षाने मारावं वगैरे ठीक आहे. शिवरायांनी मोठ्या मनाने हेच केलं असतं बहुधा.
त्याबद्दल शंका नाही, पण इतर काही होतेच ना. माझा मुद्दा असा आहे की तथाकथित ने भावना जितक्या पटकन दुखल्या तितक्याच तीव्रतेने नायनाट व कोथळा त्याज्य सगळ्यांनीच म्हटले असते तर काहीच हरकत नव्हती.
राळ ऐवजी धुरळा हा शब्द बरोबर ठरला असता कदाचित. शब्द एकंदरीत जपूनच वापरावे लागतात.
- Log in or register to post comments
अ
अनाम
Wed, 08/18/2010 - 12:15
नवीन
अरे प्रिय मिपाकरांनो, कुणी एक उपटसुंभ एक काडी टाकुन जातो आणि मग आपण सगळे आपापल्या परीने त्यात तुप, तेल, घासलेट,डिझेल, पेट्रोल ओतत बसतो.
जर का धागा प्रवर्तक स्वतः या काथ्याकुटात भाग घेत आसेल वा निदान विचारलेल्या शंकांना उत्तर तरी (मग ती चुक वा बरोबर असो) देत असेल तर एक वेळ समजु शकतो.
सदर धाग्यातही शाहजहान मगदुमने एक काडी सारली आणि आपण सगळे बसलोय चर्वण करत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2