कलादालन

सोबत....

Primary tabs

मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला................... Image removed."
किल्लेदार

मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला...................

Bhoot upload copy"

चतुरंग

खतरनाक!!
(एक शंका - फोटोत तुम्ही आणि पाठीमागे 'सोबत' दिसतेच आहे पण मग फोटो कोणी काढलाय?? :? )

(शंकितसमंध)चतुरंग

तुम्हाला "टाईमर" नांवाची गोष्ट म्हायती आहे का हो, इंजिनियर?:)
आयला, आमी धोंडो भिकाजी जोशी बरे!!!!
:)

चतुरंग

'टाईमर' आता तुमच्याकडूनच शिकायला लागणार असे दिसते! ;)

(वाळूचे घड्याळ वापरणारा)चतुरंग

आमी धोंडो भिकाजी जोशी म्हणून सांगितलं ना एकदा!
आमी कसं शिकवणार?
ते कोन्ला तरी घाटी इंजिनेरला इचार ने!!!:)
इथे लई मोठेमोठे इंजिनेर हायेत, एकसे एक जबरा कॅपिटेशन फीवाले...
:)

बाय द वे, किल्लेदारांनू!
फोटू मात्र झकास आहे हो!
खूप आवडला!!

चतुरंग

बरं बरं, खुलाशाबद्दल धन्यवाद!!
विषय संपला!! :)

मुक्तसुनीत

फोटो पाहून "फोटोंच्या दुकानाची" आठवण झाल्याखेरीज राहावले नाही !
लय भारी कामगिरी !

सहज

जबरी फोटो आहे.

यावरुन आठवले, सध्या भडकमकर मास्तर आहेत कुठे?

मेकप करायला आणि उतरवायला किती वेळ लागला?

मेकअप ही डिजिटल असावा.(फोटोशॉप वा तत्सम सॉफ्टवेअर चा वापर करुन.)

राघव

क्लास!
शुंभा.. लेका, तुझ्या कलेला सलाम! हॅट्स ऑफ!!

(चकित) राघव

नंदन

मस्त आहे!
( सरळ सज्जन मूळ आयडी आणि त्रस्त समंध डुप्लिकेट आयडी असं आंतरजालीय भाष्य करण्याचा लेखकाचा हेतू असावा की काय, अशी एक चुकार शंका मनात डोकावून गेली ;))

किल्लेदार

माझा भूत-पिशाच्चावर विश्वास नाही पण नेहमीच तो विषय मला आवडतो. आणि खरे सांगायचे झाले तर थोडाफ़ार असा अनुभव मला एकदा आला होता पण कदाचित तेव्हा माझी झोप नीट झाली नव्हती.

प्रियाली

अनुभव सांगा. ऐकायला आतुर आहोत.

(भूतप्रेमी) प्रियाली

अंगावर काटा आला.
मेकअप आणि चेहर्यावरचे भाव जबराच!
तुम्हाला आलेला अनुभव ऐकायला उत्सुक आहे.

(घाबरट) योगेशु

किल्लेदार

मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच.
मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................

प्रियाली

मी बडोद्याला असताना नेहमी वाटायचे की रात्री कोणितरी ड्रावरशी खुडबूड करत आहे. मी रूम चेन्ज करून पाहीली पण परत तेच.

उंदरांचा सुळसुळाट

मुम्बई ला तर चक्क कोणीतरी पलंगावर बसले आणि हसले.सकाळचे ४ वाजले होते. मला भीती ऐवजी वैताग आला.................

स्वप्न!

जरा सविस्तर लिहा की भौ, नाहीतर लोक सोयिस्कर निष्कर्ष काढणार.

कंदिलासारखी मस्त गोष्ट लिहून टाका.

तू पाठीमागे उभा आहेस हे कळलं ?????
( पण तो पलंगावर कोण आहे? )
हा हा हा हा ! छान फोटोशोपचा वापर केला आहे !!!

कुक

फोटो पाहताच भिती वाटली....
अन्गावर एकदम काटा उभा राहीला
वास्तुशात्र पिक्चर आठवला.

मीनल

एकदा उघडला हा धागा. घाबरून बंद केला.

पण पुन्हा आले इथे. पटकन खाली खाली स्क्रोल केले( फोटो बघणे टाळण्यासाठी)
माझी प्रतिक्रिया लिहायला.
आज सकाळपर्यंत तूमची ती सोबत डोक्यात होती.

असली सोबत असण्यापेक्शा नसलेलीच बरी !!!!!!!!!!!!!!!!!!

प्यारे१

मागच्याचं लगीन झालंय काय? मिपावर बरीच 'स्थळं' आहेत त्याच्यासाठी. ;)

सवंगडी

काय भाउ हे? मारायचं का काय आमच्या सारख्या हलक्या हृदयाच्या माणसांले
मला तर वाटून ऱ्हायल हे किल्लेदारच भूत आसल! ( अभ्यासू दिसायलय लई त्ये )
सध्या मिपा वर पण तेच लिहितय वाटतं.