Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढिसाळ, ढोबळ 'पीपली लाईव्ह'

च
चिंतातुर जंतू
Fri, 08/20/2010 - 11:25
🗣 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6943 वाचन

💬 प्रतिसाद (27)
म
मदनबाण Fri, 08/20/2010 - 11:41 नवीन
इतरांच्या प्रतिक्रिया वाचावयास उत्सुक आहे... बाकी तुम्ही केलेले परिक्षण आवडले. :)
  • Log in or register to post comments
अ
अनाम Fri, 08/20/2010 - 11:52 नवीन
परिक्षण आवडल. पण अजुन चित्रपट पाहिला नाही त्यामुळे माझ मत मांडता येणार नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 11:58 नवीन
अतिशय सुंदर व संयमी परिक्षण. धन्यवाद साहेब. तसेही हिंदी पिक्चर पैसे आणि बँडविडथ खर्च करुन पाहणे फार पुर्वीच थांबवलेले आहे. तेंव्हा आता २/३ महिन्यात शिणीमा सोनीवर आला की पाहिनच.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/20/2010 - 13:52 नवीन
अफलातून... आज पर्यंत वाचलेल्यापैकी एक उत्कृष्ट परिक्षण. वस्तुपाठच म्हणा. तरी बघणार हा चित्रपट.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/20/2010 - 15:37 नवीन
+१ मात्र वास्तुपाठ नीट कळावा म्हणून चित्रपट बघायची इच्छा होत आहे. (हेसुद्धा उत्तम : लेखामध्ये "चित्रपट बघू नका" असे पुष्कळदा अध्याहृत असते. असा कुठला अनाहूत सल्ला चुकूनही कोणाच्या मनात ध्वनित होऊ नये, याची काळजी श्री. चिंतातुर जंतु यांनी घेतलेली आहे. हासुद्धा वास्तुपाठच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सहज Fri, 08/20/2010 - 15:44 नवीन
+१ मात्र वास्तुपाठ नीट कळावा म्हणून चित्रपट बघायची इच्छा होत आहे अगदी हेच म्हणतो. पीपली लाइव्ह बघायची अशी काही इच्छा नाही आहे पण चिंतातूर जंतू यांच्या लेखाशी संबधीत पूरक अभ्यास म्हणुन... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 15:45 नवीन
अगदी! चांगलं परिक्षण कसं असावं हे शिकण्यासाठीतरी 'पीपली लाईव्ह' बघण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आळश्यांचा राजा Fri, 08/20/2010 - 19:48 नवीन
वरील सर्वांसारखेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रदीप Fri, 08/20/2010 - 15:48 नवीन
असेच म्हणतो. अत्यंत माहितीपूर्ण आणि संयत परिक्षण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मीनल Fri, 08/20/2010 - 14:18 नवीन
अगदी खरेच लिहिले आहे. तरी पण मला आवडला. इतरांना जरूर पहा असा सल्ला देईन. ( न विचारता)! ही ही ही ही ही ही ( स्मायली कुठे गेल्या रे??????????????)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 08/20/2010 - 14:28 नवीन
चित्रपट बघताना डोक घरात ठेवुन जावे म्हणतात.चित्रपट बघताना इतक्या गोष्टीचा जर विचार करावा लागत असेल तर तुम्ही कसे काय चित्रपट बघता हो?पैसे खर्च करुन डोकेदुखी किंवा दु:ख विकत घ्यायला कोण सांगते.चार घटका करमणुक जर होत असेल तर तो चित्रपट मस्त आहे असे सिंपल गणित आम्ही मांडतो. बाकी डोक घरात ठेवुन जर डोक्याला ताप होत असेल तर वेगळी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 08/20/2010 - 15:45 नवीन
य्ये हुई ना बात ! चला निदान समविचारी कुणीतरी भेटला हे समाधान आहे नाहीतर सध्या सगळीकडे 'पीपली लाईव्ह' म्हटल्यावर आपण पुढे फक्त जयजयकार करायचा अशी हवा आहे. मला तरी असं वाटतं की 'आमीर खान' हे एकच नाव 'पीपली लाईव्ह'शी कुठेही संबंधित नसतं तर कदाचित 'पीपली...'बद्दल लोकांचं मत वेगळं दिसलं असतं. अर्थात ज्याने त्याने सिनेमा बघावा आणि स्वत:पुरतं मत बनवावं :) ('शोले' ठीकठाक सिनेमा होता म्हणणारे लोकही भेटले आहेत ;) )
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 18:13 नवीन
चित्रपट पाहिला नाही अद्याप पण पाहताना हे परीक्षण आठवेल हे खास. एक 'ढिसाळ' सूचना: हे परीक्षण इतरत्र कोठे प्रकाशित करत असाल तर चॅप्लिन आणि हिटलरवरील परिच्छेद थोडा कमी करावा किंवा थोडक्यात टाकावा. तो वाचताना "पीपली" विसरून गेले आणि परिच्छेद संपल्यावर "आता पुन्हा पीपलीवर" :( असे वाटले.
  • Log in or register to post comments
ज
जिज्ञासु जिज्ञासा Fri, 08/20/2010 - 18:43 नवीन
पिपली लाईव्ह नंतर मी वेल डन अब्बा पहिला. तो जास्ती आवडला. कारण त्यात नुसती समस्या दाखवली नाही तर त्यावर उपाय देखील सुचवला आहे. बोमन इराणी यांनी फार छान काम केले आहे. हा चित्रपट यु ट्यूब वर उपलब्ध आहे. जरूर बघा.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/20/2010 - 18:53 नवीन
परीक्षण जंतु यांच्या लौकिकाला साजेसे. अर्थात चित्रपट पाहाताना याची आठवण येईलच. सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्‍या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते. उपरोक्त भाष्य चित्रपटाच्या शेवटाइतकेच प्रेक्षकांच्या "अटेंशन स्पॅन" बद्दल , "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" बद्दलही आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/20/2010 - 18:57 नवीन
काय आवडले आणि काय नाही ह्याबद्दल नेमकेपणाने सांगितले आहे आणि तरीही (किंबहुना त्यामुळेच) चित्रपट बघायची उत्सुकता टिकून राहिली आहे, ह्यातच परीक्षणाचे यश आहे!
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/20/2010 - 21:22 नवीन
काय आवडले आणि काय नाही ह्याबद्दल नेमकेपणाने सांगितले आहे आणि तरीही (किंबहुना त्यामुळेच) चित्रपट बघायची उत्सुकता टिकून राहिली आहे, ह्यातच परीक्षणाचे यश आहे!
--- सहमत आहे. उत्तम परीक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सन्जोप राव Sat, 08/21/2010 - 01:55 नवीन
सामान्यतः अशा चित्रपटांबद्द्ल मत व्यक्त करताना लोक सावध असतात. रविवारपर्यंत थांबावे, टाईम्स किती स्टार देतो ते पहावे आणि मग काय ते बोलावे असा धोपटमार्ग असतो. 'पीला' ढोबळ, ढिसाळ आहे हे सांगण्याचे धाडस आवडले. परीक्षणही आवडले. आता कुणीतरी 'हिंदू' भिकार आहे असे धाडसाने म्हणण्याची वाट पहात आहे. दिवाळी अंकांत अनिल अवचटांनी लिहिणे थांबवावे असे म्हणण्याचीही.
  • Log in or register to post comments
अ
अशक्त Sat, 08/21/2010 - 01:56 नवीन
चित्रपटाच्या सुरुवातीला नत्था शेणावरुन घसरुन पडतो, तेव्हाच लक्षात आल कि पुढे असेच विनोद असणार. चित्रपट ठिक ठाक आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 08/21/2010 - 05:07 नवीन
चित्रपट न पाहाताच त्याच्या बाजूने, विरोधी, विरोध म्हणून विरोधी, तक्रारी.. अशा दिलेल्या अनेक प्रतिक्रिया वाचून चित्रपट कलेकडे अत्यंत कोत्या दृष्टीकोनातूनच (संदेश काय आहे, काय जातकुळीचा आहे, तो मुळात समजला आहे की नाही) बघण्याची पद्धत आहे का असं वाटत होतं. सुदैवाने तुमच्यासारखे, खरोखरच संदेशाचं सादरीकरण परिणामकारक झालं आहे की नाही हे डोळसपणे बघणारं व इतरांना सांगणारं कोणीतरी आहे हे पाहून बरं वाटलं. मी चित्रपट पाहिलेला नसला तरीही परीक्षण भावलं. व एकाच वेळी फारसा चांगला नसलेला चित्रपट बघावा की केवळ तुमचं परीक्षण पुन्हा अनुभवण्यासाठी तो बघावा अशा द्विधा अवस्थेत आहे. राजेश
  • Log in or register to post comments
K
KHADADBHAU Sun, 08/22/2010 - 18:12 नवीन
चित्रपट बघायची उत्सुकता आहे "पैसे खर्च करुन डोकेदुखी किंवा दु:ख विकत घ्यायला कोण सांगते.चार घटका करमणुक जर होत असेल तर तो चित्रपट मस्त आहे असे सिंपल गणित आम्ही मांडतो." I AGREE WITH THIS . OTHERWISE FARMERS FROM VIDARBHA ARE CLAIMING THIS AS INSENSITIVE HANDLING OF SENSITIVE ISSUE ! FINALLY OPINION IS LIKE AN A**HOLE ,EVERYBODY IS HAVING ONE ! MARATHI KASE TYPE KARAVE ? , NAVIN MEMBER AAHE ! समजले ! प्रयत् न करुन थिक लिहिल .
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Mon, 08/23/2010 - 06:41 नवीन
जंतूंचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. हेही त्याला अपवाद नाही. परीक्षणातील नेमकेपणा आवडला. कलेच्या विश्वात काम केलेल्या व्यक्तीचे परीक्षण वाचताना जाणवणारी माध्यमाची ओळख आणि पकड दोन्ही लेखात जाणवते. जंतू यांना विनंती की त्यांनी अशीच चित्रपट परीक्षणाची मालिका लिहावी ज्यात त्यांना उत्कॄष्ट वाटलेल्या चित्रपटांबद्दल लिहावे. त्यामुळे कोणते चित्रपट पहावेत आणि ते पाहताना त्यात काय पहावे हे कळेल. अर्थात मिसळपाववर आणि इतर आंतरजालावर चांगली चित्रपट परीक्षणे आलेली आहेत पण त्यांचे स्वरूप 'रसिकांच्या नजरेतून' असे होते. पुन्हा एकदा लेखाबद्दल धन्यवाद. - ओंकार,
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/26/2010 - 07:53 नवीन
अजुन चित्रपट पाहिला नाही त्यामुळे परिक्षणाबाबत मत मांडता येणार नाही. तरीही परिक्षणाबद्दल धन्यवाद.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र गुरुवार, 08/26/2010 - 08:46 नवीन
आपल्याला काय त्यो शिनेमा आवडला नाही बा ! शेतकऱ्यांचे इषय हातालाय्चेत तर "गोष्ट डोंगराएवढी " शिनिमा झ्हाक व्हता.पिईपली लीवे मध्ये न धड इनोद होता न धड मांडणी.पांचट इनोदांचा आणि प्रसंगांचा ढीग. अशे सिनिमे अमीर खानच्या नावाने खपवून त्ये आपलाच नाव खराब करत हायेत.
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 08/26/2010 - 12:08 नवीन
अगदी हेच वाटलं मला पण फिल्म बघून. ओढूनताणून डार्क ह्युमरचा फसलेला प्रयत्न.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/26/2010 - 13:31 नवीन
हा सिनेमा पहायचा आहे. ह्या सिनेमाबद्दल एका मराठी संस्थळावर भरपूर शाब्दीक लढाया झालेल्याही वाचल्या आहेत. कधी पहायचा योग येतोय पाहूया. हे परिक्षण संयत शब्दांत लिहिलेले, म्हणून अधिक आवडले.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Fri, 08/27/2010 - 07:36 नवीन
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार. एका मित्रानं नुकतीच 'पीपली'बद्दलची एक रोचक गोष्ट लक्षात आणून दिली. ती अशी: पीपलीचा शेवट हा 'नो मॅन्स लँड' नावाच्या एका परदेशी चित्रपटावरून बेतलेला आहे. ज्यांनी 'पीपली' पाहिलेला नाही अशांना शेवटाबद्दल फार सांगून त्यांचं कुतुहल न मारता एवढंच सांगतो की गाडीची काच वर करून निघून जाणं, खड्ड्यात पडलेल्या भीषण सत्याला न शिवताच कोरडं माघारी जाणं असा तो संदर्भ आहे. आमीरचा 'लगान' जेव्हा ऑस्करच्या स्पर्धेत होता तेव्हा परकीय चित्रपटाचं ऑस्कर 'नो मॅन्स लँड'ला मिळालेलं होतं हेही विशेष. थोडक्यात, नक्कल ही स्तुती करण्याची एक पध्दत असते असंच म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा