Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

born insomniac....! झोप हविये झोप....!

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Sat, 08/21/2010 - 22:49
🗣 83 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24142 वाचन

💬 प्रतिसाद (83)
श
शानबा५१२ Sat, 08/21/2010 - 23:03 नवीन
चला तर फक्त आम्हीच फालतु लेख लिहत नाही. थॅन्क यु,जाई मॅडम् असो.......१०० ते १ हे आकडे उलट्या क्रमाने मोजावेत. सावलीतले उंट चालत जात असतानाचे चित्र डोळ्यासमोर आणणे. सुर्यप्रकाश व काही विटामिन्सची कमतरता झोप कमी करते.चहा व कॉफी संध्याकाळी ६-७ वाजल्यानंतर पिउ नका. अत्यल्प व्यायाम व आहार. सर्वात बेस्ट पहीला उपाय. कोणत्याही शब्दाला आक्षेप असल्यास सॉरी. बाकी आपले नाव जाई आहे का? म्हणुन तर झोप..............????
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Mon, 08/23/2010 - 08:13 नवीन
नाहीतरी तुम्ही निद्रानाशाचा वेळ वाचण्यात / गाणी ऐकण्यात घालावताच तर जरा जे. कॄष्णमूर्ती, सार्त्र, कार्ल मार्क्सचे "दास कॅपिटल" , आणि अशाच काही नावाजलेल्या तत्ववेत्त्यांची भयंकर बोअर मारणारी पुस्तके वाचत जा. वाचता वाचता कधी झोप लागेल कळणार पण नाही. मी स्वतः हे उपाय यशस्वीपणे वापरून बघितले आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शिल्पा ब Sat, 08/21/2010 - 23:10 नवीन
इथे लेख टाकण्यापेक्षा डॉक्टरकडे जा...ते काहीतरी उपाय सांगतीलच. (तरी म्हंटलं अजुन कसा तुमचा एकही लेख नाही )
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु Sat, 08/21/2010 - 23:28 नवीन
घ्या कोणाच काय तर कोणाच काय...... इथे लेख टाकण्यापेक्षा डॉक्टरकडे जा...ते काहीतरी उपाय सांगतीलच. मदत मागणार्‍याला मदतीची गरज असते.... उपदेशाची नाही........ ->(तरी म्हंटलं अजुन कसा तुमचा एकही लेख नाही->....... लाकूड जळतयं कस पहा...... :) मी काSSSय नाSSSय केलं.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sat, 08/21/2010 - 23:34 नवीन
मग तुम्ही जरा वेगळेपणा दाखवून उपाय सांगायचे होते... तुमचं तरी लाकूड का जळतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
स
स्वछंदी-पाखरु Sat, 08/21/2010 - 23:42 नवीन
valium 0.5 mg हा उपाय आम्हीच दिला............ बिचारी काही वेळी तरी शातं झोपते ही.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sat, 08/21/2010 - 23:49 नवीन
तुम्ही डॉक्टर आहात का? नसाल तर ही लिंक पहा... http://www.medicinenet.com/diazepam/article.htm कृपया डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sat, 08/21/2010 - 23:32 नवीन
valium 0.5 mg पासून सगळं try केलं आहे गं पण नाही म्हणजे ना... ही..!
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sat, 08/21/2010 - 23:32 नवीन
valium 0.5 mg पासून सगळं try केलं आहे गं पण नाही म्हणजे ना... ही..!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 08/21/2010 - 23:55 नवीन
गरम दूधात साखर आणि किंचित हळद घालून झोपण्याआधी प्या. संध्याकाळी जेवणखाण आटोपले कि घरातले दिवे मंद असू द्या. थोडक्यात, स्वत:ला झोपेकडे नेण्यासाठी असे निरुपद्रवी प्रयत्न करून बघा. रात्री दूरदर्शन पाहू नका, वाचन करू नका. मी तरी झोपण्याआधी वाचन करत नाही फारसे. तेच विचार डोक्यात असतात नाहीतर! तुम्हाला जे काय होते आहे तसे मला एकदा आठ पंधरा दिवस झाले होते. घड्याळ (वेळ)चक्क थांबल्यासारखे वाटते. वेळ सरता सरत नाही. चहा कॉफीची सवय फार लावून घेतली नाही ना हे तपासा. झोपण्याआधी थोडे दिर्घश्वसन वगैरे करा (याचा मला अजिबात उपयोग झाला नाही.);) श्लोक म्हणून बघा.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 08/23/2010 - 22:01 नवीन
हे करा, पेक्षा हे करू नका हीच यादी मोठी. त्यापेक्षा "झोपू नका", हे सोपे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
असुर Sun, 08/22/2010 - 00:33 नवीन
जाईतै, कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही आयटी कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करा. तुम्हाला इतके राबवून घेतील की रात्रीच काय, भरदिवसासुद्धा गाढ झोप लागेल. ;-) हा उपाय 'ट्राईड अँड टेस्टेड' आहे. अगदीच रामबाण, जालीम आणि खात्रीलायक उपाय आहे. डिसक्लेमर: या उपायाचे काही दुष्परिणाम आहेत, त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर उपाय करुन पहावा. अनिष्ट परिणांमास आम्ही जबाबदार नाही.
  • Log in or register to post comments
P
Pain Sun, 08/22/2010 - 20:59 नवीन
सहमत. पण आळशी लोक हे करून पाहू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
प
प्राजक्ताचि फुले Sat, 08/28/2010 - 08:43 नवीन
कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही आयटी कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करा. तुम्हाला इतके राबवून घेतील की रात्रीच काय, भरदिवसासुद्धा गाढ झोप लागेल. १००% सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
ग
गोगोल Sun, 08/22/2010 - 01:09 नवीन
ऑर्गॅज़म!! कुणाचाही कसलाही अपमान वा टर उडवयचा हेतु नहिए, पण शास्त्रीय संशोधनानुसार इट शुड वर्क.
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sun, 08/22/2010 - 01:15 नवीन
http://ezinearticles.com/?Masturbation,-Sex,-and-Insomnia---Endorphin-Journey&id=3468043
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 08/22/2010 - 02:01 नवीन
आयला, हे भारी आहे. एक तीर, दो निशान !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ध
धमाल मुलगा Mon, 08/23/2010 - 12:00 नवीन
=)) =)) ओ मेहेंदळे, तुम्ही द्वर्थी नाय ना टाकला? ;) असो, पण गंभीरपणे विचार केला तर खरंच गोगोल ह्यांनी दिलेला सल्लादेखील खुप उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 08/23/2010 - 22:44 नवीन
धमू साहेब, ते द्वर्थी नाही. त्याला एकच अर्थ आहे. तुमच्या मनात जो पहिला येईल तो. हाहाहा !!! पण मला उपाय खरच आवडला. ते म्हणतात ना, "आम के आम, गुठलीयोन्के भी दाम" तसे आहे हे. साधारणत: अनेक उपाय हे एकतर बोरिंग असतात किंवा निर्बंध घालणारे. त्यामुळे लोक ते करणे टाळतात. हा उपाय असला भारी आहे, एकतर तो अवलंबणे सहज शक्य आहे. आणि दुसरे म्हणजे त्याचा काही खास असा sideeffect नाही. हा उपाय अवलंबायला मिळावा म्हणून निद्रानाश होऊ दे अशी इच्छा लोक करायला नाही लागले म्हणजे मिळवली. (वरचे विचार विनोदी असले तर मी उपायाची खिल्ली उडवतो आहे असा अर्थ काढू नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 13:07 नवीन
साहेब गेला हो देश सोडुन...साहेबाला मारा गोळी. :) >>तुमच्या मनात जो पहिला येईल तो. हाहाहा !!! _/\_ मंडळ साष्टांग नमस्कार घालीत आहे. >>पण मला उपाय खरच आवडला. ते म्हणतात ना, "आम के आम, गुठलीयोन्के भी दाम" तसे आहे हे. ठ्ठो! =)) =)) =)) ओ तुम्ही म्हणी नका वापरु हो...निदान ह्या प्रतिसादात तरी....माझं इकडं हसुन हसुन माकड झालं! :D बाकी, ह्या वाक्यानंतरच्या सर्व मजकुराशी पुर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/23/2010 - 19:01 नवीन
ऑ! To : गोगोल CC : संपादक सो|| ??///.....!....??? "..." ? .........! धन्यवाद. गुरु आहात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
र
राजेश घासकडवी Sun, 08/22/2010 - 02:09 नवीन
अपुरी झोप झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. शिवाय मानसिक संतुलनही बिघडू शकतं. मी डॉक्टर नाही, अनुभवांतून सांगतो आहे. तेव्हा काही साधे घरगुती उपाय करून फायदा होत नसेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जा. मला निद्रानाश झाला होता तेव्हा मला डॉक्टरने दिलेली पथ्यं खालीलप्रमाणे. - सकाळी विशिष्ट वेळेला उठणे - दुपारी शक्यतोवर न झोपणे - सकाळी अगर दुपारी किमान अर्धा तास चालण्याइतपत व्यायाम करणे - सूर्यप्रकाशात काही वेळ काढणे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. - चहा, कॉफी झोपण्याआधी पाच ते सहा तास न पिणे - सिगरेटबाबतही तसंच - झोपण्याआधीचं एक रूटीन ठरवून ठेवणे, व ते कसोशीने पाळणे. - झोपायच्या तासभर आधी गरम पाण्याने आंघोळीचा फायदा होऊ शकतो. यातली बहुतेक पथ्यं नियमितपणे पाळली तर तीनेक आठवड्यात झोपेचं चक्र सुधारू शकतं. ते पटकन् मार्गाला लागण्यासाठी डॉक्टर गोळ्या वगैरे देऊ शकतील. कधी कधी झोप टाळणं हे डिप्रेशनचं चिह्नही असू शकतं. तेव्हा शक्य तितक्या लवकर डॉक्टरचा सल्ला घ्या. मिपाकरांचा नको.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 08/22/2010 - 03:59 नवीन
मला ही होतं असं क्वचित. विशेषतः दुपारी झोप काढली तर. मी तरी नामस्मरण करते. कधी तरी होतो उपयोग. अजून एक उपाय वाचला/ अवलंबला होता. बिछान्यात पडल्या पडल्याच श्वास आत घेताना सो S S आणि श्वास बाहेर सोडताना हंमS S असे मनात म्हणत राहायचे. या सोहंमS S या चा अर्थ आहे माझ्यातच ईश्वर आहे. आजारी लोकांची सेवा केली तर ही झोपेवर फायदा होऊ शकेल. अती शारीरिक काम ही योग्य नाही. बुध्दीचे असेल तर झोप लागयालाच हवी. तू काहीतरी काळजी /चिंतेत असशील तर काहीही करून झोप लागणार नाही. त्या चंतेचे मूळ शोधून काढ आणि त्यावर काही उपाय योजना कर. काही उपाय हातात नसतील तर आहे ती स्थिती मान्य कर आणि देवावर हवाला टाकून निश्चिंत हो. कुठलेही औषधी उपचार शक्यतो टाळ. हवेच असल्यास अर्थात वैद्यकिय मार्गदर्शन उत्तम. अमेरिकन `नॅचरल फूड` दुकानात मधे ही काही औषधे मिळतील अथवा रामदेव बाबांच्या औषधांचे साईड इफेक्ट्स नाही असे ऐकले.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sun, 08/22/2010 - 05:05 नवीन
शालेय भुगोल, इतिहासाची पुस्तकं वाचा. तात्काळ, हमखास झोप लागेल.
  • Log in or register to post comments
U
utkarsh shah Sun, 08/22/2010 - 05:39 नवीन
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात... असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४... नक्की भानगड काय आहे? कालयंत्राचा वापर करून घड्याळ उलटे फिरवता की काय जाई ताई?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sun, 08/22/2010 - 06:02 नवीन
बहुदा हा लेख लिहिताना जाईताईना झोप आलेली दिसतेय.!! जाईताई- Economist चे अंक विकत आणा. न आवड्णर्‍या एखाद्या टॉपिक वरचा एखाद्या तज्ञाचा लेख वाचायचा. नंतर ६/७ तासाची निश्चित झोप.!!असो. वर निद्रानाशाची कारणे सांगितली आहेतच. आहार हे महत्वाचे कारण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: utkarsh shah
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 08/22/2010 - 11:46 नवीन
....म्हणुनच तातडीचा सल्ला हवा आहे.. घड्याळ पाहताना पण घोळ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: utkarsh shah
भ
भारतीय Sun, 08/22/2010 - 07:16 नवीन
हृतिक रोशन नावाचे कुणीतरी सदगृहस्थ आहेत व त्यांचा काईट्स नावाचा सिनेमा बघताना हमखास झोप लागते असा अनुभव आहे...
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 08/22/2010 - 07:37 नवीन
जायफळ घातलेले पुरण वा जायफळ घातलेली कॉफी रात्री घेऊन पहा. गाढ झोप लागते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 08/22/2010 - 11:30 नवीन
एखाद्या कौटुंबिक धारावाहिक मालिकेचे 6 भाग बहुधा रविवारी एकामागोमाग एक लागतात ते बघा नाहीतर 12 वी चं अर्थशास्त्राचं पुस्तक पहिल्या धड्यापासून वाचायला सुरुवात करा
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 08/22/2010 - 12:50 नवीन
born insomniac..... म्हणजे खूप पूर्वी पासूनचा आजार आहे का ? तुम्ही आस्था किंवा संस्कार चॅनल वरील प्रवचनं का ऐकत नाही ? त्या मुळे खरच मन खूप शांत होतं आणि मग अपोआप झोपही चांगली लागते ...
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 08/23/2010 - 22:03 नवीन
तुम्ही आस्था किंवा संस्कार चॅनल वरील प्रवचनं का ऐकत नाही ? त्या मुळे खरच मन खूप शांत होतं आणि मग अपोआप झोपही चांगली लागते ... अगदी . अगदी. (झासारामजी बापू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 08/22/2010 - 13:19 नवीन
>>सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात... >>असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४... आय्ला तुम्ही उलट्या काळात कशा काय झोपता? आधी २:३० वाजतात आणि मग २:१४ कदाचित द्राक्षासवाच्या मात्रेत वाढ केल्याने काहि मदत होण्याची शक्यता आहे. ;)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 08/22/2010 - 13:39 नवीन
आमची हवी असेल तर घ्या ..झोपण्या शिवाय आयुष्यात आम्हास काहि जमले नाहि
  • Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे Sun, 08/22/2010 - 13:53 नवीन
निद्रानाशावर एक धागाच टाकावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 08/22/2010 - 23:11 नवीन
कृपा करा....! लवकर टाका...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.श्रीराम दिवटे
त
तेजोमय Sun, 08/22/2010 - 14:00 नवीन
ताई विचार करणे सोडून द्या.....डोक्यातली चक्र काही काळ थांबवा
  • Log in or register to post comments
क
कळस Sun, 08/22/2010 - 17:26 नवीन
तुम्ही झोप येत नाही याची चिंता करण्यापेक्षा तो वेळ सत्कारणी लावा.म्हणजे असे की जोपर्यन्त झोप येत नाही तोपर्यन्त जागे रहा व कहीतरी न आवडणारं काम करा. शक्य असेल तर एक / दोन दिवस झोप नाही आली तर झोपू नका , काही बिघडत नाही. त्यानंतर आपोआप झोप येते. झोपेच्या विचारानेच झोप न येण्याची शक्यता आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे जर सकाळी तूम्हाला फ्रेश वाटत असेल,स्मरणशक्ती व्यवस्थीत काम करत असेल तर तूमची झोपेची गरजच कमी आहे असे अनुमान येऊ शकेल .अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sun, 08/22/2010 - 20:32 नवीन
अरेच्चा पब्लिकनी इथे टर उडवालिये (नेहमीप्रमाणे) ! :) माझा मते भरपूर व्यायाम करा , सध्या आम्ही पायाचे तुकडे पर्यंत बैठका मारतोय (१००+) , त्याला ईंग्लिश मध्ये स्क्वॅट अस काही म्हणतात. बाकी सोप्पे उपाय ( तुमच्या जबाबदारीवर) :) १. किशन कुमार नामे सुपर-स्टार यांचे जे मिळेल ते चित्रपट पाहावे , नसतील तर सुभाष घई आहेतच २. डाल-बाटि + भरपूर तूप या वर आडवा हात मारावा ३. शक्य असतील तेवढे इन्दोरी गोड पदार्थ (रबडी , माल-पोवा ई. ) ओरपावे किवा चॉकलेट टार्ट सूप वा हॉट ब्राउनी फास्ट करावी
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 08/22/2010 - 21:38 नवीन
हॉट ब्राउनी फास्ट करावी
सगळ्यांनाच झोपा आलेल्या दिसतात. तुम्ही हे हॉट ब्राउनी 'फस्त' करून लिहिलं होतंत का? कारण फास्ट या शब्दाचा अर्थ उपास असा होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
व
वेताळ Mon, 08/23/2010 - 07:01 नवीन
लेका कुणाला काय सल्ला देशील. त्याना कश्या काय आता बैठका मारता येतील.त्यात खांद्यावर वेटलिफ्टिंगचा बार घेवुन स्कॉट मारणे त्याना जमायला पाहिजे.आणी बैठका मारल्या कि झोप येते हे पण नवीनच एकले. पैलवान व्यायाम झाला कि त्याची थंडाई पितात. त्यात जायफळ,बदम,पिस्ता,खारीक इत्यादी मुळे त्याना झोप येते. झोप न येण्यामागे मानसिक कारणच जास्त करुन असते.ज्यादा एकाद्या गोष्टीवर विचार करणे,२०१२ ला जग नष्ट होणार का अश्या चिंता करणे,सतत मनात असुरक्षिततेची भावना असणे इत्यादी कारणामुळे देखिल झोप उडु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
स
सुहास.. Mon, 08/23/2010 - 01:38 नवीन
ऊरकुन टाका !!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 08/23/2010 - 01:42 नवीन
या धाग्यावर असल्या प्रतिक्रिया? जाई, तुम्ही रोज काय करता? म्हणजे दररोजच्या जीवनात काय काय करता? ते थोडक्यात सांगता का? हाच प्रश्न मला कोणी विचारला तर मी सांगेन - नोकरी करते. घरकाम करते. बागकाम करते. नेटावर टवाळक्या करते*. फावल्या वेळात टिव्ही-सिनेमा पाहण्याचे काम करते*. व्यायाम करते.* * ही कामे नाहीत. विरंगुळे आहेत पण पहिल्या तीन कामांतून दिवसात फारशी फुरसत मिळत नाही. जेव्हा मिळते तेव्हा इतर तीन कामे ;) करते. या धर्तीवर तुम्ही रोज काय करता ते सांगा म्हणजे मी तुम्हाला साजेसा उपाय सुचल्यास सांगते. तुमच्या निद्रानाशाचे कारण तुम्ही ओळखले नसेल किंवा तुम्हाला ते मांडायचे नसेल तर इतरांनी सल्ले देऊन फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. जर, निद्रानाशाचे कारणच तुम्हाला माहित नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे सर्वात उपयुक्त ठरेल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 08/23/2010 - 04:35 नवीन
एक उपाय फसवणूक प्रकरण १ ते ?? वाचा. (काळेकाका मारतायत आता) आता थोडंसंच सिरिअस... कधीकधी कामाच्या किंवा तत्सम टेन्शनने झोप येत नाही. उदा काही प्रॉमिस केले आहे पण ते पाळलेले नाही. अशावेळी असा विचार करायचा..... जे काही झाले आहे ते झाले आहे. आत्ता जागे राहून परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? सकाळी बघू काय करायचे ते. बघा नक्की झोप लागेल.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 08/23/2010 - 04:51 नवीन
जाई मॅडम, मला तुमच्या बद्दल सहानुभुती वाटते. हा आमचा जुना धागा बघा.. आमचीदेखील अशीच टर उडवली काही लोकांनी पण काही सदस्यांनी मात्र चांगले उपाय सुचवले आहेत. http://www.misalpav.com/node/11392 आपल्या समस्येचे शीघ्र निराकरण होईल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Mon, 08/23/2010 - 07:49 नवीन
जाई, तू अस्सल कोल्हापुरी असल्यामुळे तुला हे नव्याने सांगण्याची गरज नाही की आपल्या कोल्हापुरातील लोक रंकाळ्यात, राजाराम तलावात, पंचगंगेत मनसोक्त पोहण्याचा किती आनंद घेतात. या दोन स्थळांव्यतिरिक्त आज कोल्हापुरात एक नाही दोन नाहीत तर चक्क सहा जलतरण तलाव झाले आहेत आणि ते सदोदित कार्यरत आहेतच. या विविध ठिकणी जलतरणाचा आनंद घेणार्‍यांमध्ये समान सूत्र कोणते असेल तर हे सर्व खास आपल्या लाडक्या कोल्हापुरी भाषेत म्हणतात, "च्यायला, काल लई पोवलो व्ह्तो, रात्री मेल्यासारखं झोपलो बगं !" 'मेल्यासारखं झोपणं' हे त्या इन्सोम्नियाला शेकडो मैल दूर पळवतं. थोडक्यात तुला सांगायचं तर रोज किमान अर्धा तास जर तू जलतरणासाठी देवू शकलीस तर एका महिन्यातच तू देखील त्या मेल्यासारखं झोपणं गटाची सन्माननीय सदस्य होऊ शकशील. (अर्थात आता "अंकल सॅम"च्या ज्या शहरात तू आहेस तिथे स्विमिंग टॅन्कची सोय असणारच हे गृहीत धरले आहे... तसेच जरी तुला पोहायला येत नसले, तरीदेखील कोणत्याही वयोगटासाठी स्वीमिंग हे सर्वदूर मान्य व्यायाम आहे. ~~ वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर रविन्द्रनाथांनी कथकली शिकायला सुरूवात केली होती अन् तू तर अजून सतराची असशील.) समजा या ना त्या कारणाने तू जलतरणाला जावू शकली नाहीस तर पहाटे किंवा सायंकाळी (रिकाम्या पोटी) किमान अर्धा तास 'वॉकिंग' (स्पोर्टस शूज घालून) करणे हा देखील एक "चलेगा" जैसा व्यायाम होतो जो तुला झोपेसाठी सहाय्यभूत ठरू शकेल. ~~ आता इथे "नाही रे इन्द्रादादा, मला कामातून चालायला जाण्यास एक मिनिटही मिळत नाही" ही सबब सांगू नकोस, प्लीज. ओके? बेस्ट लक रंकाळा गर्ल !
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/23/2010 - 18:45 नवीन
पण सध्या रंकाळा त र शक्य नाहिये.पण घरासमोर एमिरेट्स ड्रायव्हिन्ग शाळेचे प्रशस्त गाउंड आहे. पण heat मुळे जायला कंटाळा येतो...आणि मी कंटाळा करते चालायचा. तरी प्रयत्न करुन पाहते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
व
विसोबा खेचर Mon, 08/23/2010 - 08:43 नवीन
लग्न करण्यायोग्य वय असेल तर कृपया लग्न करण्याचा उपाय करून पाहा. रोजच्या रोज थकून गेल्यामुळे छानशी झोप येऊ लागेल.. ;) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/23/2010 - 18:49 नवीन
.....लग्न्?... आणि दुसर्‍यांदा? माणसाने आपल्या चुकांतुन शिकावे. परत तिच चुक कोण करणार बाबा? आहे हे ठिक आहे! परत नाय रे बाबा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चिगो Mon, 08/23/2010 - 09:36 नवीन
झक्कास प्रतिक्रिया आहेत.. शेवटची फर्मास..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा