born insomniac....! झोप हविये झोप....!
💬 प्रतिसाद
(83)
स
स्पंदना
Mon, 08/23/2010 - 11:38
नवीन
सांगु नको सांगु , आणखी कोणी सांगेल म्हणुन वाट पाहुन शेवटी लिहिते आहे.
काही वर्षापुर्वी एका घटनेन मी जवळ जवळ एक महिना डो़ळे मिटु नव्हते शकत.
रात्र रात्र मी कुठे पेपर वाच , टी व्ही बघ अस काय काय करत दिवस रात्र घालवले. मग मी इनसोमनिया बद्दल वाचायला सुरु केल. त्यानी सांगितलेले उपाय.
झोप ही शरीराला विश्रांती साठी आवश्यक असते. तर ती विश्रांती शरीराला द्या. आता कशी?
ठराविक वेळेला झोप येवो अथवा न येवो बिछाना गाठणे. अन पुरे विचार थांबवुन श्वासावर लक्ष केन्द्रित करणे.
तुम्ही झोपा अथवा न झोपा सारी कवाड बंद करुन शरीराला ठराविक वेळ विश्रांती देण महत्वाच.
रात्री झोपताना स्वच्छ होउन झोपणे, तेन्व्हा पासुन मला बेड मध्ये शिरायच्या आधी पाय धुवायची सवय लागली ती आज तोवर.
झोपेचा विचार करुनच तुम्ही जास्त थकता, तेंव्हा तो विचार च नको करु. झोप अथवा न झोप सकाळी ठराविक वेळी उठायच म्हणजे उठायच. सार्या गोष्टी रात्रीचा विचार न करता पुर्या पाडायच्या, दिवस भर ,"अग मी झोपलेच नाही "म्हणुन वैतागत घालवण्या ऐवजी साधा सरळ नॉर्मल घालव. एकदा तु झोपेचा विचार सोडुन फक्त विश्रांतीचा विचार केलास तर तु या अॅबनॉर्मेलिटि वर विजय मिळवलास.
मी तरी झोप लागो न लागो ताजी तवानी होउन उठते, सांगते कोणाला? तिघ जण माझ्याकड पहात उभी असतात.
आणखी एक, तुला थोड जड जाइल. अती चोकलेट!! चॉकलेट कमी कर. अन दही भात वाढव, नाही तर तुझ्या पतिराजांची फेमस कढी रोज रात्री तडस लागे पर्यंत पी, बघ कशी झोपशील ते!
झो. सा. शु.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 08/23/2010 - 18:51
नवीन
पाय धुणे,शॉवर घेणे,दुध पून झोपणे हे कर्ते आहेच..
बाकी अजुनही सुचवलेले उपाय करुन पाहिन..!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 08/23/2010 - 11:59
नवीन
जाईकाकू,
आमच्या वैद्यबुवांनी सांगितलेला उपाय :
रोज सकाळी किमान ४५ मिनिटे भरभर चालणे. इतकं की घामानं शर्ट भिजला पाहिजे आणि घरी आल्यावर दहा मिनिटं पडुन रहावंसं वाटलं पाहिजे. आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम दुध+चिमुटभर सुंठ घ्यावी, झोपण्यापुर्वी डोक्याला आणि तळपायाला तेलानं मालिश करावं...
सध्या काहीदिवस झोपताना डोळ्यात काजळ घालतात तसं 'कैलासजीवन' घालुन डोळे मिटुन वर पापण्यांवर पुन्हा कैलासजीवन लाव.... आयच्यान सांगतो, पाच मिनिटात एकेक पापणी दहा किलोची असल्यासारखी जड होते आणि डोळेच उघडायची इच्छा होत नाही...एकदम मेल्यासारखं झोपतो मी तर. :)
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 08/23/2010 - 18:56
नवीन
कै.जी. ट्राईड
डोळे मेणचट्ट झाले..आणि परत चेहरा धुवून झोपेपर्यंत पार उडुन गेली झोप!
मालिश आपलं आपण करणं फार बोर होतं
नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी आहे...साडेतिनाव्या मिनटाला घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र
अजुन नविन काय असेल तर सांग.
बाय थ वे...काल फॉर अ चेंज भारतात आल्यावर फार थकव्यामुळे मी दिवसा पेंगत होते..
पण त्यावेळी झोपता आले नाही..
आज पाहु काय होते!
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 08/23/2010 - 19:03
नवीन
नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी आहे...साडेतिनाव्या मिनटाला घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र >>>>
=)) =))=))
अगागा !! हे आमच्या बाबतीत ऊलट आहे !! फक्त 'घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र'' सोडुन
धम्या, अजुन एका ध्यान्याची चाहुल लागली रे !!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 08/24/2010 - 13:02
नवीन
खी खी खी!
चुचुकाकू पार्ट-२ :D
लोकेशनही तेच. ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 08/23/2010 - 19:08
नवीन
>>डोळे मेणचट्ट झाले..आणि परत चेहरा धुवून झोपेपर्यंत पार उडुन गेली झोप!
=)) =)) आयला, तु काय कै.जी. लाऊन बाहेर हिंडायला जाणार होतीस का? चेहरा धुवायचा ते डायरेक्ट सकाळीच. पुन्हा ट्राय माड री..
>>मालिश आपलं आपण करणं फार बोर होतं
झोपण्यापुर्वी टिव्ही पाहतेस का? पाहता पाहताच पायाला तेल चोळत बसायचं...
>>नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी आहे...साडेतिनाव्या मिनटाला घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र
हा हा हा.....साडेतिनाव्या मिनिटाला... :D मस्तच.
>>अजुन नविन काय असेल तर सांग.
च्यायला! एक ट्राय कर, दुधात तुळशीचं बी भिजवुन ठेव आणि ते घे. शिवाय रात्री झोपताना गरम दुध+चिमुटभर सुंठ हे कर.
आणखी एकः डोळे मिटुन पडल्यावर स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित कर..पुर्ण सायकलकडे लक्ष दे..श्वास घेतला ->श्वास फुफ्फुसांपर्यंत पोचला -> उच्छ्वास सोडला असं...आणि त्यावेळी १०० ते १ असे आकडे हळुहळु मोजायला सुरु कर...
फँटॅस्टिक गुंगी चढते.
>>पण त्यावेळी झोपता आले नाही..आज पाहु काय होते!
तु चलच ट्रेकला..तुला १५-२० किलोमिटर पिदडवतो...मग बघ कशी गाडीतर घुर्रर्रर्र...घुर्रर्रर्र करत झोपशील. :)
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 08/23/2010 - 19:16
नवीन
जर ट्रेक ला जौन आल्यावर छान झोपले ना मी तर मस्त होइल रे..
तुझ्यासाठी डबाभर चॉकलेट मूस बक्षिस जाहीर करेन...!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 08/23/2010 - 19:17
नवीन
डबा तयार ठेवणे ही णम्र इनंती. :)
- Log in or register to post comments
स
संकेत
Mon, 08/23/2010 - 13:09
नवीन
लोक मारे सल्ले देताहेत आणि जाईतै काही बोलतच नाहीत. भारीतून भारी सल्ले ऐकून त्यांना झोप आलेली दिसते. :)
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 08/23/2010 - 14:11
नवीन
जाईतै, पोटभर जेवा, विशेषत: गोड (म्हणजे तुमच्या रावण पिठल्याची पाकृ पण छान आहे), आणि डोक्यावर महाभृंगराज (माक्याचं तेल) तेलाने मसाज करा झोप यायलाच पाह्यजे.
स्वगत: मी महाभृंगराज फक्त विकांतालाच लावतो डोक्याला, निद्रादेवी आमच्यावर आधीच प्रसन्न आहेत ईतर दिवशी लावलं तर आधीच मर्कट तशातच.....
- Log in or register to post comments
व
वाटाड्या...
Mon, 08/23/2010 - 17:26
नवीन
मलाही असाच त्रास सतत ६ महीने होत होता..आता गेला. मी काय केलं ते सांगतो...(म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाय..)
१. कॉफी १००% बंद,
२. १.३० तास कसुन व्यायाम (संध्याकाळी ६.३० - ८ / ७ - ८.३०),
३. सकाळी लवकर उठणे (५.३० ला सरळ),
४. नियमीत व वेळेत जेवणे,
५. संध्याकाळी ५.३० नंतर साखरयुक्त पदार्थांच सेवन बंद,
६. झोपताना शांत असे शास्त्रीय संगीत ऐकणे,(आमच्या वसंतरावांचा मारवा ऐका..मन शांत झालंच पायजे.)
७. चिंता न करणे (अवघड आहे..पण सरावाने जमते ..)
८. सकाळी ७५० मिली काटामोड गरम पाणी प्या...
९. कधीही ७ तासांपेक्षा जास्त झोपु नका (जेव्हा येइल तेव्हा),
ह्यातील जास्तीत जास्त उपाय करुन पहा. मला १५ दिवसांमधे फरक पडला...
- वाटाड्या...
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 08/23/2010 - 19:10
नवीन
रजा घेते आहेंआहे आली झोप तर प॑रत येईनच मि.पा वर! दोन तीन तासात!
धन्यवाद
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 08/23/2010 - 19:47
नवीन
मि.पा वर! दोन तीन तासात! >>
गुड नाईट !! मी ही चाललो गप्पा मारायला !!
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/24/2010 - 12:52
नवीन
आणि तेही काहिही न करता....... ना गोळी, ना कै.जी,ना गाणी......काहिही न करता मला झोप लागली आणि तीहि बेशुद्ध पडल्यासारखी!
घरच्यानीही किरकोळ प्रयत्न केला जागं करायचा.पण नंतर त्यानीहि विचार केला की इतक्या दिवसांनी झोपते आहे झोपु द्यावे!
१५ तास?
कदाचित मि.पा.कर मित्रांच्या शुभेच्छांमुळे असेल्....पण मला खरच मेल्यासारखी झोप लागली होती!
उद्याचं उद्या पाहु..पण काल मी झोपले!
धन्यवाद!
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/24/2010 - 13:45
नवीन
अभिनंदन जाईताई!
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 08/24/2010 - 15:12
नवीन
आता मी पंधरा पंधरा तास झोपते.झोप कशी कमी करु? असा धागा काढणार का काय? :D
(झोपाळु) योगेशु
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/24/2010 - 18:57
नवीन
मला तेच मनात आले होते. कि मिपा वर परत नव्या धाग्याची चाहुल...
झोप कमी करायची आहे....
हिहहहह :)
- Log in or register to post comments
प
प्रभो
Tue, 08/24/2010 - 15:45
नवीन
जेटलॅगचा परिणाम असावा. :)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 08/24/2010 - 15:48
नवीन
तीन तासाची फ्लाईट आणि जेटल्याग? =))
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/24/2010 - 19:00
नवीन
अरे धम्या...पहिल्यांदा रे एअर इंडिया भोगले रे!
डायरेक्ट पुणे च्या मोहात....
तुला उद्या फोटो पाठवते....गम्मत म्हणुन
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/24/2010 - 19:26
नवीन
ए, आता झाली ना १५ तासांची झोप?
मग दुसरा धागा सुरु कर नव्या विषयासाठी!;)
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/24/2010 - 19:55
नवीन
आता नविन धागा कोणता टाकु...याचे विषय सुचवा म्हणुन टाकु का एक नवा धागा?
;) ;)
- Log in or register to post comments
उ
उपेन्द्र
Tue, 08/24/2010 - 19:42
नवीन
मी आडवा पडलो तर ५ मिनीटात झोप लागते. बसून काही करत राहिलो तर रात्री २-३ वाजे पर्यन्त जागा रहातो. हा झोपेचा प्रोब्लेम म्हणजे काय आहे यार .. ?
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/24/2010 - 19:52
नवीन
... हुश्शार मानुस ऐ तुमी..
पण जावे त्यांच्या (म्हणजे आमच्या) वंशा तेव्हा कळे....
गम्मत बाजुला..
खरच सुखी आहात..
तसेच रहा
- Log in or register to post comments
उ
उपेन्द्र
Fri, 08/27/2010 - 19:39
नवीन
जाईताई,
एकदाच गाडी सहकुटुम्ब चालवताना २ सेकन्द झोपलो होतो. आता आठ्वले तरी अन्गावर काटा येतो. अजून सगळे सुखरूप आहोत. तेव्हा पासून झोप alert झाली आहे.
असो...
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 08/27/2010 - 20:20
नवीन
अरे देवा!! स्पीड किती होता?
ताशी ८० किमी स्पीड असेल तर २ सेकंदात गाडी तब्बल ४५ मीटर गेलेली असते एवढ्या अंतरात काहीही होऊ शकते!
खरोखरच नशीबवान आहात म्हणायचे.
- Log in or register to post comments
उ
उपेन्द्र
Sat, 08/28/2010 - 18:13
नवीन
शेजारी 'जाग्रुत' बायको होती आणि समोर कोणतीच गाडी नव्हती म्हणून ठीक.. डोळे उघडले तेव्हा गाडी पूर्ण उजव्या हाताला होती. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेन्टच्या पोलवरून उड्या मारत तिला जागेवर आणली. पुढचा बम्पर बदलावा लागला. आम्हा कोणाचेही स्पेअर पार्ट बदलावे लागले नाहीत.
तेव्हापासून बायको गाडीत झोपायची बन्द झाली. !!!
- Log in or register to post comments
A
Arun Powar
Fri, 09/10/2010 - 16:24
नवीन
जाई ताई,
झोप न लागणे ही गोष्ट मेंदूशी संबधित आहे. मला झोप लागत नाही अशी मानसिकता आपणच तयार करत असतो आणि आपला मेंदू ह्या गोष्टीचे आज्ञापालन करतो. मला झोप येत नाही असे म्हणण्यापेक्षा, मला खूप गाढ झोप लागते, असे सतत जाणीव ठेवली तर काही दिवसात गाढ झोप येणे सुरु होते.
फक्त झोपच नाही, तर आपल्या स्वभावातल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीं ह्या मेंदूशी संबधित असतात. म्हणून स्वतःमध्ये चांगले बदल घडवायचे असतील तर अगोदर चांगली मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.
- Log in or register to post comments
प
प्रणवजोशी
Fri, 02/19/2016 - 09:05
नवीन
नाशिकला आरोग्यधाम आश्रमात योगनिद्रेची सिडी मिळते. २ १/२ तासाची आहे. ती ऐकताना हमखास झोप लागते.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 02/19/2016 - 09:51
नवीन
कष्टाची कामे करा, जमल्यास झोपण्याआधी ७-८ मजले जिने चढा, ७-८ मजले नसतील तर दोन मजली जिने २-४ वेळा चढ उतर करा, ते ही नसतील तर दोन तास फास्ट चाला. नक्कीच झोप लागेल.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Fri, 02/19/2016 - 17:21
नवीन
अहो २०१० मधील धागा आहे हो! लै पाणी गेले पुलाखालुन त्यानंतर!
- Log in or register to post comments
आ
आरोह
Fri, 02/19/2016 - 19:44
नवीन
मनापासून हसलो.....2010 चा धागा आणि अजून हि उपाय सुचवतायत
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2