Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी लिहीलेले उखाणे- संग्रह

स — सिंधू वडाळकर, Sun, 08/22/2010 - 07:49

प्रतिक्रिया द्या
9915 वाचन

💬 प्रतिसाद (27)
श
शिल्पा ब Sun, 08/22/2010 - 08:19 नवीन
छान...लग्नाळू मुलीनी वाचनखुण साठवून ठेवावी...आणि वाचनखुण उपलब्ध नसेल तर एक प्रिंट काढून ठेवावी...उपयोगी पडतात या गोष्टी.. चंद्राच्या रथाला चांदण्यांची जोडी ---- रावांचं नाव घेते लाडी गोडी.. कसंय हो आजी?
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 08/22/2010 - 08:45 नवीन
एक गोष्ट आठवली. बालगंधर्वांना कोणीतरी म्हटलं, की स्टेजवर काम करणं ठीक आहे हो, पण तुम्ही स्त्रीवेशात हळदीकुंकवाला जाऊ शकणार नाही. त्यांनी ती पैज स्वीकारली. एका मोठ्या प्रतिष्ठित घरच्या हळदीकुंकवाला गेले. कोणीही हा पुरुष आहे असं ओळखलं नाही. वर त्यांनी उखाणाही घेतला, राजहंस पक्ष, त्याला मोत्याचं भक्ष नारायणरावांचं नाव घेते, इकडे द्या लक्ष स्वतःचंच नाव व आडनाव घेऊन, लक्ष द्या म्हणूनही कोणाला शेवटपर्यंत कळलं नाही. मिसळपाववर स्वागत.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/23/2010 - 07:24 नवीन
बालगंधर्वांना काही स्त्रियांनी ओळखले होते असे म्हणतात. विड्याच्या पानाला चुना लावण्याच्या पद्धतीवरुन. तेव्हाच्या बायका चुना डब्यातून काढताना बोटाने काढत आणि पानाला लावत आणि पुरुष मंडळी नखाने काढत. :) त्यावरून ओळखले म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
त
तिमा Sun, 08/22/2010 - 09:52 नवीन
सर्व उखाण्यांमधे --- रावांना देवपद दिल्यासारखे वाटते म्हणून उखाणे आवडत नाहीत. संसारामधे नवरा-बायकोला सारखेच महत्व आहे तर या नवरोबांची आरती का ओवाळायची ?
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 08/22/2010 - 10:00 नवीन
लग्नात हुंडा म्हणून बापाने दिलीय मोटर ---रावांशिवाय माझं थोडंच अडलंय खेटर कोणाला इतर काही इरसाल उखाणे सुचताहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
क
कानडाऊ योगेशु Mon, 08/23/2010 - 07:36 नवीन
हे घ्या रा.घासाहेब काहीच्या बाही उखाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आनंद Sun, 08/22/2010 - 11:12 नवीन
कबीराचे दोहे आणि कांदा पोहे वाला आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 08/22/2010 - 13:36 नवीन
सर्व उखाण्यांमधे --- रावांना देवपद दिल्यासारखे वाटते म्हणून उखाणे आवडत नाहीत. संसारामधे नवरा-बायकोला सारखेच महत्व आहे तर या नवरोबांची आरती का ओवाळायची ? ----------------------------------------------------------------------------------------- प्रत्येक गोष्ट स्त्री पुरुष समानतेवर आणली तर संसाराची मजा फिकि होते.....एव्हढे असेल तर वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे रहावे समविचाराचा असेल तर पुढचे पाऊल टाकावे ..सरकारने व कायद्याने सोय केली आहे..
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 08/22/2010 - 16:08 नवीन
>>सरकारने व कायद्याने सोय केली आहे.. वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे रहावे .सरकारने व कायद्याने सोय केली आहे...... ह्या विषयाव आधिक माहिति कुठ मिळल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/23/2010 - 07:25 नवीन
वर्ष सहा महिने लिव्ह इन मधे रहावे .सरकारने व कायद्याने सोय केली आहे...... ह्या विषयाव आधिक माहिति कुठ मिळल? झकास.. म्हणजे सरकार हल्ली मित्रांसाठी मैत्रिणींची सोय पण करतं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/22/2010 - 16:16 नवीन
मिपावर स्वागत आहे. उखाणे आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 08/22/2010 - 18:00 नवीन
लिव्ह इन टाकुन गुगळा.....
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 08/23/2010 - 06:16 नवीन
मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण. लेखक/लेखिका वयोवृद्ध असल्यास त्यांच्या लिखाणातल्या ऑब्वियस विसंगती दाखवू नयेत अशी आमच्या एका ताईने आम्हाला गळ घातल्यामुळे आमच्या "नो कॉमेंटस्!!":) (काय करणार? ताई सलामत तो वयोवृद्ध पचास!!!) :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 08/23/2010 - 06:33 नवीन
त्यांनी आधी तिकडे लेख टाकला असेल आणि मग तसाच इथे पेष्ट केला...असं मानून मी त्याकडे दुर्लक्ष करून उरलेला लेख वाचला जो कि छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अर्धवट Mon, 08/23/2010 - 06:43 नवीन
काकांचा इतरांना वयोवृद्ध संबोधुन, शिंग मोडुन वासरात सामिल होण्यचा निष्फळ प्रयत्न आवडला.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
च
चतुरंग Mon, 08/23/2010 - 16:07 नवीन
हेच म्हणणार होतो! ;) (तरणाबांड)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
प
पिवळा डांबिस Mon, 08/23/2010 - 21:07 नवीन
तुम्ही म्हणणारच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अशक्त Mon, 08/23/2010 - 06:37 नवीन
खोक्यात खोका टिव्ही चा खोका खोक्यात खोका टिव्ही चा खोका ------------ माझी मांजर मी तिचा बोका
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 08/23/2010 - 06:42 नवीन
लै भारी...अशक्तराव, लै जाडजूड उखाणा लिवलायं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशक्त
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 08/23/2010 - 10:19 नवीन
राग मानू नका, पण हा उखाणा मला मित्राने १९९९ साली ऐकवला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशक्त
अ
अशक्त Mon, 08/23/2010 - 16:02 नवीन
अरे वा! तुमची स्मरणशक्ति चांगली आहे....( या वयात सुध्धा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 08/23/2010 - 06:54 नवीन
लग्नात नवर्‍या मुलालाही उखाणा घ्यावा लागतोच की.. मी माझ्या लग्नात घेतलेला हा उखाणा.. "अस्मानीच्या पर्‍या होत्या सुंदर आसपास तरी मनाला आवडली एक मुलगी खास साध्या सुंदर त्या मुलीचा आसमंती भास अन *** ला भरवितो जिलबीचा घास!" बाकी आचरट उखाण्यांचेही एक कलेक्शन नेटवर उपलब्ध आहे, फॉरवर्डेड मेल्समध्ये सापडेल " संपात संप कामगारांचा संप गणपतरावांच्या हातात ढेकणांचा पंप" इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय गणपतराव अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 08/23/2010 - 06:58 नवीन
आमचा फेवरिट.... चहाचा कप, कपाखाली बशी.... *** माझी उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
र
राजेश घासकडवी Mon, 08/23/2010 - 08:37 नवीन
कोल्ह्याला काकडी, सशाला गाजर ****च्या मी ताटाखालचं मांजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
आ
आमोद शिंदे Mon, 08/23/2010 - 21:53 नवीन
संडासाच्या दारात देते लोटा ठेवुन रायांना लागली जोरात मी घेते दाबुन हा उखाणा अतिच इरसाल आहे असे वाटल्यास संपादक मंडळाने काढुन टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चिगो Mon, 08/23/2010 - 09:15 नवीन
जोडीत जोडी, लक्ष्मी-नारायणाची जोडी, ...राव ओढतात विडी, आणि मी लावते काडी, चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे घास भरवतो/ते तूला, थोबाड कर इकडे...
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 08/23/2010 - 21:59 नवीन
उखाणे आवडले. तुमचे अनुभव नक्की येऊ द्यात इथे आता ! (ता. क. आपण कधी अमेरिकेला आल्याचे अनुभव लिहू नयेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मालेगावचे अनुभव खूप आवडतील.)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा