Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अविस्मरणीय

अ
अनिकेत प्रकाश आमटे
Mon, 08/23/2010 - 17:27
🗣 47 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11147 वाचन

💬 प्रतिसाद (47)
च
चतुरंग Mon, 08/23/2010 - 17:46 नवीन
असल्या जीवघेण्या अनुभवातून सातत्यानं जात तुम्ही लोक वर्षानुवर्षे कामं करत राहता ह्याचंसुद्धा आता आश्चर्य वाटेनासं झालंय! तुमच्या कामाला आमचा सलाम. कधीतरी प्रकल्पाला भेट द्यायची मनोमन इच्छा आहे. कधी योग येईल हे माहीत नाही. तोवर तुम्ही लिहिलेल्या अनुभवातून तिथे मनाने जात राहू! असेच अस्सल अनुभव अजून लिहा. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 08/24/2010 - 02:00 नवीन
असेच/हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नंदन Tue, 08/24/2010 - 02:59 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
संदीप चित्रे Tue, 08/24/2010 - 16:13 नवीन
असेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अप्पा जोगळेकर Wed, 08/25/2010 - 05:40 नवीन
+१०. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अर्धवट Mon, 08/23/2010 - 18:05 नवीन
अनिकेतजी, काय बोलणार, लेख वाचताना कितीवेळा अंगावर सर्र्कन् काटा आला हे सांगताच येत नाही. आमची इवलीइवलीशी आयुष्य आठवली म्हणजे असलं आभाळभर आयुष्य जगणार्‍यांचे अनुभव आश्वासकही ठरतात, मार्गदर्शकही.. लेख वाचल्यानंतर खुप वेळ आमच्या आयुष्याची वैय्यर्थताच उफाळुन येत होती वारंवार.. तुमच्या आयुष्याचा एकतरी प्रकाशकण आमचे अंधाराचे दरवाजे ओलांडुन आमच्या कोत्या जगण्यात झिरपू दे हीच प्रार्थना..
  • Log in or register to post comments
च
चैतन्य दीक्षित Wed, 08/01/2012 - 07:11 नवीन
अर्धवटाशी सहमत आहे. असेच अनुभव लिहा म्हणजे आम्ही आमच्या 'प्रोटेक्टेड्/कम्फर्ट' झोनमधून बाहेर पडण्याचा किमान विचार तरी करू शकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
अ
अनाम Mon, 08/23/2010 - 18:20 नवीन
शाळेत असताना (ईयत्ता ८-९) आनंदवनाला भेट देण्याचा योग आला होता. तिथे २ दिवस राहीलो होतो. श्रमदान केल होतं. तो शांत परिसर आणि तिथेल ते प्रसन्न वातावरण..... काही गोष्टी अश्या विस्मरणात गेलेल्या असतात तुमच्या या लेखा मुळे रे सार सार आठवल. :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 08/23/2010 - 18:26 नवीन
दुर्गम भागातील, कठीण अशा कामात होणारे कष्ट काय असू शकतात याची ही एक झलक आहे! अनिकेत, मला यापलीकडचे अनुभवही वाचायचे आहेत. प्रामुख्याने सामाजिक देवाणघेवाण, त्यात येणारा संघर्ष, त्यावर मात करताना योजावे लागलेले उपाय, त्यासाठी द्यावे लागणारी किंमत वगैरे. ते कळणं अशासाठी गरजेचं आहे की, अशा कामांचं खरं मूल्य ती किंमत कळल्यानंतरच आमच्यासारख्यांना कळू शकेल.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/24/2010 - 13:43 नवीन
अनिकेत, तुम्ही लिहीत रहा. तुमच्यासारख्या सेवाव्रतींचं लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, आणि आमच्यासारख्या किडामुंग्यांपर्यंतही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
स्वप्निल.. Tue, 08/24/2010 - 20:54 नवीन
असेच म्हणतो!! जसं जमेल तसं लिहित रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रेवती Mon, 08/23/2010 - 18:27 नवीन
बापरे! तुमचे रोजचे आयुष्य असेच खडतर असते का? मागल्या वर्षी प्रकाशवाटा वाचले आणि सुन्न झाले होते. तिकडे पाऊस जर असा प्रचंड प्रमाणात होत असेल तर चांगल्या प्रतीचे पूल बनवूनही टिकतील का?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/23/2010 - 18:36 नवीन
आणि अशा खडतर प्रसंगांत कार्य!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 08/24/2010 - 15:06 नवीन
असेच म्हणते. मिपावर स्वागत आहे. (बहुदा वल्ली यांचेही आमटे यांना मिपावर आणण्यासाठी आभार मानले पाहिजेत)..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शाहरुख Tue, 08/24/2010 - 17:41 नवीन
थ्रिल जाणवले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सहज Wed, 08/25/2010 - 05:14 नवीन
एकंदर सर्व प्रतिक्रियांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
म
मिसळभोक्ता Mon, 08/23/2010 - 18:37 नवीन
आमटे कुटुंबातील समाजकार्यातील तिसर्‍या पीढीचा अनुभव वाचायला आवडला. आणखी येऊ दे. २५ वर्षांपूर्वी मोठा पाऊस झाला, की वरोड्यातून बाहेर पडणारे सर्वच रस्ते १०-१५ किमींवर दुथड्या भरलेल्या नाल्यांमुळे बंद असायचे. दुर्गम भागांत अद्यापही तशीच परिस्थिती असावी.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 08/23/2010 - 18:49 नवीन
अनिकेतराव.......वाढदिवसाच्या शुभेच्छा( उशिराने का होईना....तुम्ही साजरा करत नसले तरीही). मला आनंदवन, सोमनाथ्,नागपल्ली आणी हेमलकसा येथे भेट देण्याची खुप ईच्छा आहे. तिथे बरीच शिबिरे भरतात.त्याची माहीती मिळाली तर बरे होईल.शिबीरच पाहीजे असेही काही नाही. कधी येता येईल त्याबद्दल काही मार्गदर्शन करावे ही विनंती. आणखीही मिपाकारांना याचा उपयोग होईल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 08/23/2010 - 19:02 नवीन
जीवघेणा प्रसंग खराच. आताच हा लेख वाचण्यापूर्वी मटातील कुमार कदमांचा कोकणातील घाटरस्त्यावरील लेख वाचत होतो. पावसाळ्यात नेहेमीच धोकादायक ठरणार्‍या ठिकाणी काही कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही? त्या त्या ठिकाण॑चे लोकप्र॑तिनिधी आवाज का उठवत नाहीत?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 08/23/2010 - 20:13 नवीन
मिपवर आपले स्वागत आहे// लेखन आवडले. कामामधून वेळ काढून लिहित राहा, अशी विनंती करतो... आपले लेखन वाचण्यास उत्सुक आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 08/23/2010 - 20:25 नवीन
हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
अ
अर्धवटराव Mon, 08/23/2010 - 21:53 नवीन
असेच म्हणतो !! -अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
स्वाती२ Mon, 08/23/2010 - 20:46 नवीन
प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहीत!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 08/23/2010 - 21:11 नवीन
निशब्द. युद्धस्य कथा रम्य म्हणतात तसे काहीसे. तुमच्या पुढल्या लिखाणाची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 08/23/2010 - 22:01 नवीन
रोजच्या आयुष्यासाठी तुमचे झगडणे आणि तरीही कार्य कारत राहणे... याबद्दल काय बोलणार एकुणच तुमचे तिथे रोजचे य्रेणारे अनुभव सुद्धा वाचण्यास उत्सुक आहोत... वेळात वेळ कढुन लिहीत रहा ही विनंती. हेमलकसाला जायची ईच्छा प्रकाशवाटा वाचल्यापासुन मनात आहेच.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Tue, 08/24/2010 - 01:29 नवीन
स ला म
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 08/24/2010 - 07:09 नवीन
चि. अनिकेत, वेळात वेळ काढून एक जिवंत अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे अनुभव जरुर लिहित जा, त्यातूनच अनेकांना तुमच्यासारखे काम करण्याची प्रेरणा मिळेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 08/24/2010 - 07:51 नवीन
वरील सर्वांसारखेच म्हणते, वेळ काढून लिहित रहा. आपले अनुभव वाचायला अर्थातच आवडतील. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 08/24/2010 - 07:52 नवीन
आमटे कुटुंबियांचे खरोखर कौतुक वाटते. बाबा आमाट्यांनी घेतलेला वसा आज तिसर्‍या पिढीतही मोडला गेलेला नाही हे विशेषच. लिखाण तर उत्तम जमलेच आहे. पण त्याहुनही तुमच्या कार्याचे खुप कौतुक करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बबलु Tue, 08/24/2010 - 09:01 नवीन
श्री अनिकेत, हा अनुभव अफाट आहे. खूप ओघवतं लिहिलंय. रोजच्या आयुष्यासाठी तुमचे झगडणे आणि तरीही कार्य कारत राहणे..... तुम्हा सर्वांना मनापासून सलाम. वेळात वेळ कढुन लिहीत रहा ही विनंती. तुमचा लेख पाहून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 08/24/2010 - 10:41 नवीन
बाबा आमटेंनी सुरु केलेल्या समाजकार्याचा वसा त्यांची तिसरी पिढीही तितक्याच ताकदीने वाहतेय हे वाचुन आनंदही झाला आणि अभिमानही वाटला.. बाबांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई.. दु:ख उधळण्यास आता, आसवांना वेळ नाही..." अभिनंदन आणि सलाम..!!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/24/2010 - 21:44 नवीन
श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई.. दु:ख उधळण्यास आता, आसवांना वेळ नाही..." मी स्वतः ही कविता मुक्तांगणात डॉ. रूपा कुलकर्णींच्या आवाजात ऐकलेली आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ! ("उधळण्यास" नाही, "उधळायास".)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 08/24/2010 - 13:58 नवीन
मस्तंच लिहीले आहे.
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Tue, 08/24/2010 - 21:01 नवीन
एव्हढा जिवावरचा प्रसंग तुम्ही किती सहज शब्दांत सांगितलात !
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 08/25/2010 - 05:47 नवीन
प्रतिक्रीया द्यायला शब्दच सापडत नाहीत. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 08/25/2010 - 05:51 नवीन
अनिकेतराव छान लिहिले आहे. असेच तुमचे अनुभव वेळात वेळ काढुन इथे लिहित रहा. तुमच्या थोर कार्यास शुभेच्छा आणि सलाम.
  • Log in or register to post comments
स
समंजस Wed, 08/25/2010 - 07:28 नवीन
छान अनिकेतराव!! तुमचा हा अनुभव अर्थातच खुप रोमांचकारी आहे. अश्या प्रकारचे अनुभव येउन सुद्धा तुम्ही किंवा तुमच्या सोबतचे कार्यकर्ते आपल कार्य सतत चालूच ठेवतात हे मनाला जास्त भिडतं. तुमच्या आणि इतर कार्यकर्त्यांमुळे समाजकार्य हा शब्द अजूनही थोडं फार महत्त्व आणि सन्मान ठेउन आहे नाही तर या शब्दाला अपमानीत करून त्याचं अस्तित्व संपवण्याचं कार्य करण्यात तथाकथित लोकप्रतिनीधींनी काही कसुर ठेवला नाही. तुम्हाला मिपावर बघून आनंद झाला. आतापर्यंत आमटे परिवारानी केलेल्या आणि करत असलेल्या कार्याची माहिती इतरांच्या लिखाणातूनच(प्रत्यक्ष ते कार्य करत नसलेल्या) व्हायची. आता ती माहिती प्रत्यक्ष हे कार्य करत असलेल्या आणि विशेष म्हणजे त्याच परिवारातील सदस्याच्या लिखाणातून मिळतेय ही एक पर्वणीच आहे :) इतर मिपाकरांप्रमाणेच माझी सुद्धा विनंती आहे की, तुम्ही मिपावर लिखाण चालूच ठेवा आणि लोकबिरादरी या प्रकल्पाशी संबंधीत तसेच इतर कार्यांची, तुमच्या इतरही अनुभवांची माहिती देत रहा.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 08/26/2010 - 17:55 नवीन
श्री.अनिकेत.... लाज वाटते स्वतःची खरोखरी, ज्यावेळी असे अस्सल अनुभवाचे लिखाण समोर आल्यानंतर. आणखीन अशासाठी की, भाजीत थोडेसे मीठ कमी पडले म्हणून मेसवाल्याच्या नावाने ठणाणा करण्याचे दिवस आठवतात, अन् इथे तुम्ही (आणि त्या ड्रायव्हरदादालाही सलाम, जरूर कळवा आमचा रामराम!) जवळपास मृत्युच्या खेळात ४८ तास अडकून पडलात, तरीही ना निसर्गाबद्दल तक्रार, ना नशीबाबद्दल ! व्वा. विशेषतः जुरूला आणि त्याच्या घरातील लोकांना तुम्ही (तिथे दोन घास खावून) जो अवर्णनीय आनंद दिला त्यापुढे तुम्हाला झालेल्या त्रासाची पत्रास वाटली नसेल. श्री.विकास आमटे यांचे एक मित्र जळगांवचे श्री.जयंत पाटील (जे काही वर्षे हेमलकसा येथे बाबांच्यासमवेत कार्यरत होते ~ चित्रकारही आहेत) हे कोल्हापुरला कधी आमच्याकडे आले की येथील मित्रपरिवारात "आनंदवन, हेमलकसा" हे विषय प्रकर्षाने असतातच, त्यामुळे तेथील कार्याचा, वातावरणाचे उल्लेख त्यांच्याकडून ऐकणे फार उत्साहवर्धक वाटते. त्यांना थोड्याशा दृष्टीदोषामुळे संगणकावरील मजकूर वाचता येत नाही. पण पुढील खेपेस ते इकडे आले की, मी जरूर तुमचा हा लेख त्यांच्याशी चर्चेसाठी घेईन. या मंचावर आपले स्वागत आणि खूप आवडेल आपले लिखाण इथे सर्वांना !
  • Log in or register to post comments
च
चिंतामणराव Wed, 09/15/2010 - 13:47 नवीन
"एक जिवंत अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे अनुभव जरुर लिहित जा, त्यातूनच अनेकांना तुमच्यासारखे काम करण्याची प्रेरणा मिळेल." +१ असेच म्हणतो. ७ / ८ वर्षांपुर्वी आलो होतो. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत मित्रमंडळींबरोबर पुन्हा येणार आहोत. भेटु.
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Wed, 09/15/2010 - 20:17 नवीन
येथे कर माझे जुळती !!!
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 05/02/2011 - 16:08 नवीन
हे वाचायचं राहुन गेलं होतं. खरचं शब्दच नाहीत काय काय अडचणीतुन तुम्ही लोक जात आहात, आणि तरीही हे कार्य वर्षानुवर्षे चालु आहे. तुमच्या सवडीतुन अजुन अनुभव लिहावेत, यातुनच खरोखर आमच्यासारख्या सामान्यांना प्रेरणा मिळेल. सलाम आहे तुम्हाला, आमटे परिवाराला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना! अर्धवट: तुमचीही आभारी आहे, या लेखाचा दुवा दुस-या लेखात दिल्यामुळे या लेखाबद्दल कळले.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/11/2012 - 08:14 नवीन
असेच म्ह णतो. वर कुणी म्हटल्याप्रमाणे वल्लीला देखील धन्स, श्री. अनिकेत आमटेंना मिपावर आणून लेख लिहवला त्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी
अ
अनिकेत प्रकाश आमटे Wed, 08/01/2012 - 06:27 नवीन
सप्रेम नमस्कार.....प्रतिक्रिया देणाऱ्या - न देणाऱ्या सर्व वाचक मित्रांचे आभार....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Wed, 01/29/2014 - 20:33 नवीन
धागा वर आणतेय!..
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Wed, 01/29/2014 - 22:09 नवीन
उत्तम आणि वाचायलाच हवा असा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. त्यानिमित्ताने अनिकेत आमटेंचे इतरही लेखन वाचता आले. वाचन खूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
P
psajid गुरुवार, 01/30/2014 - 08:09 नवीन
तुम्ही अक्षरशः बाबांच्या "श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही..." या शब्दामध्ये जगता आहात. अडचणींवर मात करून समाजासाठी विधायक कार्य करण्याचं व्रत बाबांच्या तिसऱ्या पिढीनंही अखंडितपणे जपलं आहे याचं नवल वाटत नाही कारण समाजकारणाचे बाळकडू आपणास आपल्या कुटुंबातूनच मिळाले आहे. तुमचे आणखीही अनुभव मीपावर वाचायचे आहेत. मला आपल्या पकल्पांना भेट देण्याची खुप ईच्छा आहे. कधी येता येईल त्याबद्दल काही मार्गदर्शन करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/30/2014 - 10:23 नवीन
येथे कर माझे जुळती !!! अनिकेत साहेब, केवळ तुमच्यासारख्या "खर्‍या" समाजसेवकांमुळे माणूसकीवरचा आणि भारताच्या भविष्याबद्दलचा आशावाद कायम आहे ! @ आनन्दिता : धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा