मिपा टॉप २५
💬 प्रतिसाद
(71)
म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 00:30
नवीन
ह्या निमित्ताने, प्रतिसादांच्या संख्येने उतरती भाजणी केल्यास, तुम्ही कितव्या पानावर येता, ते कळवावे.
आम्ही चौथ्या पानावर आहोत. (८२ प्रतिसाद)
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Tue, 08/24/2010 - 00:42
नवीन
सर्व टॉपर्सचे अभिनंदन !
- तळागाळातला.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 01:09
नवीन
मुसुशेठ,
तुम्ही तिसर्या पानावर आहात. (चैत्र, ८७).
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/24/2010 - 02:28
नवीन
अहो माझा नंबर तर पाताळात आहे :) लोकप्रियतेच्या शर्यतीत माझे नेहमीच असे असते. :(
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 08/24/2010 - 01:03
नवीन
गेल्या आठेक महिन्यात पॉप्युलेशन दीडपट झालेली आहे (बिल्लाक्रमांकाप्रमाणे). त्यामुळे आठ महिन्यांपूर्वीचे शंभर प्रतिसाद हे आजच्या दीडशेच्या बरोबर. (किमान. खरं तर वादविवादांची परम्युटेशनं अजूनच वाढतात, पण तेवढा छिद्रान्वेषीपणा करायला नको) तर तसं नॉर्मलायझेशन करून ही यादी पुनर्प्रकाशित करता येईल का?
दुसरं म्हणजे अदितीचा धागा बंद करण्यात संपादक मंडळाचा तो टॉपला जाऊ नये अशी इच्छा असावी अशी दाट शक्यता आहे. ही तक्रार मी मंडळाच्या खवतही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर हघे असंही म्हटलं आहे. आयला, आम्हाला आमच्या जिवाची काळजी आहेच. नाहीतर मारुती कांबळे व्हायचा आमचा.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 01:08
नवीन
(किमान. खरं तर वादविवादांची परम्युटेशनं अजूनच वाढतात, पण तेवढा छिद्रान्वेषीपणा करायला नको) तर तसं नॉर्मलायझेशन करून ही यादी पुनर्प्रकाशित करता येईल का?)
उत्तम सूचना. याला आमचे उत्तर, म्हणजे: "तुम्हीच करा."
धन्यवाद.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 08/24/2010 - 02:48
नवीन
जल्ला आम्हाला तुम्ही केलाय त्यवढा पण येत नवता.
आणि आम्ही नवखे. आम्हाला नक्की कुठच्या काळी किती (खरे) सभासद होते, केव्हा काही आयडीमात्र होते वगैरे भानगडी नीट माहीत नाहीत. तेव्हा कोणीतरी थोरामोठ्यांनी, जाणकारांनी ते करावं.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/24/2010 - 02:19
नवीन
दुसरं म्हणजे अदितीचा धागा बंद करण्यात संपादक मंडळाचा तो टॉपला जाऊ नये अशी इच्छा असावी अशी दाट शक्यता आहे.
सहमत आहे. मी आळश्यांचा राजा ह्यांना लिहिलेला भलामोठा प्रतिसाद सुर्पुर्त केल्यावर ती लाल पाटी समोर आली. :(
एक शंका: २३० + प्रतिसाद आले की चर्चा बंद करण्याचे काय कारण? सर्वरवर ताण तितकाच पडणार ना? (म्हणजे पुढचे प्रतिसाद नविन चर्चेत टाकले काय तिथेच टाकले काय ह्याने काय फरक पडतो?)
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 08/24/2010 - 01:28
नवीन
मिभोची फॅक्टरी सुरु झालेली दिसते.
टॉपर्ससोबत मिभोंचेही अभिनंदन!
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 01:48
नवीन
तुम्ही सहाव्या पानावरः (ठेव प्रियाली 74 )
- Log in or register to post comments
स
सन्जोप राव
Tue, 08/24/2010 - 01:38
नवीन
प्रतिसादांच्या संख्येवरुन 'टॉप २५' वगैरे ठरवणे - त्यातही 'टॉप २५' हे तद्दन फिल्मी नाव वापरणे हे मिभोंच्या लेखनपरंपरेशी विसंगत आहे.
मिभो, लहानपणी आम्ही अशा सूरपारंब्या खेळत असू. लहानपणी तू अशा सूरपारंब्या खेळत असस. 'बघीतलंस, मनात आणलं तर तात्याला ५०-६० प्रतिसाद काही अवघड नाहीत' या अजरामर वाक्याची आठवण आली आणि डोळे भरुन आले.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 01:45
नवीन
तुम्ही पाचव्या पानावर (अगा लेखकांनो सन्जोप राव 78)
टुक टुक !
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 08/24/2010 - 02:06
नवीन
आणखी छिद्रान्वेष : कित्येक बहुशतकी चर्चा अप्रकाशित झालेल्या आहेत. त्या सर्व दिसल्या असत्या तरी बहुधा मी चवथ्या पानावरच असतो.
अदृश्य शतकवीरांचेही अभिनंदन.
(चवथ्या पानावर असल्यामुळे) ब्यांकखात्याऐवजी पिनसह हातगोळा पाठवावा असा विचार करतो आहे. पिन तपासून सोबतच्या पाकिटातून परत पाठवावी.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Tue, 08/24/2010 - 02:12
नवीन
मिभोकाका, ह्या प्रयोगाला किती माकडे लागली??? ;)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 08/24/2010 - 08:02
नवीन
प्रयोगासाठी लागणारी माकडे ही द्राक्षासवाच्या अंमलाखाली असत्यात. त्यो बी येक वायलाच प्रयोग म्हनायचा!
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/24/2010 - 02:22
नवीन
मिसळभोकांनी सुरु केला आहे म्हणजे हा धागाही टॉप २५ मधे जाणार हे नक्की :)
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 08/24/2010 - 02:22
नवीन
१) सांख्यिकी विदा विश्लेषण हे मिभोंच्या लेखनपरंपरेशी सुसंगत आहे असे वाटते. मिपाकरांना त्यांच्या लोकप्रिय चर्चेच्या गुर्हाळापाशी नेउन पुन्हा एकदा आरसा दाखवल्याप्रमाणे हे असावे असे समजतो.
१.१) यात लेखांची वाचनसंख्या कळली तर अजुन लोक कुठल्या चर्चा रस घेउन वाचतात ते कळेल.
१.२) यात अवांतर प्रतिसाद किती?
१.३) मुख्य म्हणजे एकाच धाग्यात जास्तीत जास्त प्रतिसाद कोणत्या सदस्याचे? व वरील सर्व २५ चर्चात मिळुन जास्त प्रतिसाद कोणाचे?
२) धनंजय म्हणाल्यासारखे हुतात्मा शतकवीर चर्चांना आदरांजली :-)
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Tue, 08/24/2010 - 14:53
नवीन
१.२) यात अवांतर प्रतिसाद किती?
१.३) मुख्य म्हणजे एकाच धाग्यात जास्तीत जास्त प्रतिसाद कोणत्या सदस्याचे? व वरील सर्व २५ चर्चात मिळुन जास्त प्रतिसाद कोणाचे?
मिभोंनी चांगला विषय ठेवला आहे. हा पहीलाच प्रयत्न असावा. परन्तु वरील मुद्दा विचार करण्यासारखा आहे. वर उल्लेखिलेल्या अनेक विषयांमधे दोन्ही प्रकार दिसतात.
पुढील टॉपर्स जाहीर करतान जरूर विचार करावा या मुद्यांचा.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Tue, 08/24/2010 - 02:27
नवीन
ह्या चर्चांचे दुवेही त्यात एंबेड केले तर वाचायला सोपे जाईल.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 08/24/2010 - 08:12
नवीन
आजुक येक सुचवनी धपा धप येनारे प्रतिसाद खरे लेखांन्ला असत्यात कि प्रतिसादांना हे ठरवायला सोपी आयडिया काय हाय कि नाय?
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Tue, 08/24/2010 - 02:28
नवीन
.
- Log in or register to post comments
न
नंदन
Tue, 08/24/2010 - 02:49
नवीन
धर्म, नथुराम, पाकिस्तान, पुणे, अनिवासी, आयटी, स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामी वृती आणि अभाव, स्वातंत्र्य/स्वैराचार, ओळखी/तक्रार/प्रश्न आणि गाणी हे नेहमीचे यशस्वी विषय/कीवर्ड्स आले आहेत अपेक्षित २५ मध्ये :). अजून पाच वर्षांनी काय शीर्षकं येतात ते पहायचं. विषय बहुतेक बदलायचे नाहीत.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Tue, 08/24/2010 - 07:55
नवीन
धर्म, नथुराम, पाकिस्तान, पुणे, अनिवासी, आयटी, स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामी वृती आणि अभाव, स्वातंत्र्य/स्वैराचार, ओळखी/तक्रार/प्रश्न आणि गाणी हे नेहमीचे यशस्वी विषय/कीवर्ड्स आले आहेत >>>
एक नंबर नंदनराव !!
टॉपर्सचे अभिनणंद !! (बोलनेमे क्या जाता है)
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Wed, 08/25/2010 - 13:26
नवीन
नंदन-जी,
'काश्मीर' हा विषय राहिला असं वाटतंय्.
सुधीर काळे
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 08/25/2010 - 13:52
नवीन
तो पाकिस्तान या विषयात इन्क्लूडेड आहे. :)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 08/25/2010 - 14:38
नवीन
हाण्ण! आता या धाग्यावरचे प्रतिसाद 'वाढता-वाढता वाढे' होणार... :)
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 08/24/2010 - 03:37
नवीन
मिपावर मिपाविषयी असणारे लेख म्हणजे हिटच जातात.
आपला लेख ह्याला अपवाद नसावा.
आणखी काही आकडे शोधालया जमले, तर बघा.
(चला महिनाभराच्या विरझणाची सोय झाली)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Tue, 08/24/2010 - 03:42
नवीन
पण चक्क तिसर्या पानावर 'पाहुणा संपादक' म्हणून आमचे संपादकीय आहे ९० प्रतिसाद!
आता स्वतःचीच पाठ थोपटायला हवी! ;)
चतुरंग थोपटे
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 08/24/2010 - 03:54
नवीन
चतुरंगराव,
आपले विधान मी पटकन वाचताना चुकून "पेज ३ वर पाहुणा संपादक" असा अर्थ घेतला ;)
नंतर अर्थातच गैरसमज दूर झाला. ;) (काळजी नसावी :) )
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Tue, 08/24/2010 - 04:05
नवीन
अहो 'पेज ३ संपादक' असेच आले आधी माझ्याही मनात पण म्हटले स्वतःच कशाला स्वतःची स्तुती करा! ;)
शेवटी आम्ही जात्याच विडंबक पडलो ना त्यामुळे ते बरोबरच आहे! ;)
(पेज३संपादक)तीनरंग
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 08/24/2010 - 04:17
नवीन
अहो...आमच्या कोणत्यातरी धाग्याला १०० मिळाले कि..आम्ही पण स्वताचीच पाठ थोपटतो..
मिभोंना एक रिक्वेष्ट : मिपावर जास्तीत जास्त लिखाण करणारे आय डी यांची पण एक लिष्ट बनवा... म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लिखाण कोणाचे?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 08/24/2010 - 04:32
नवीन
>>मिपावर जास्तीत जास्त लिखाण करणारे आय डी यांची पण एक लिष्ट बनवा... म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लिखाण कोणाचे
हॅ हॅ हॅ. त्यात रिसर्च काय करायचा?
सामंत काका (आणि लवकरच काळेकाका) सगळ्यांना हॉलो मारतील.
अवांतर: बिकांनी एकदा कॉम्पिटिशनचा प्रयत्न म्हणून खोबार भाग १ ते २८८ लिहायला घेतले होते पण ते ६-७ भागातच आउट झाले.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 08/24/2010 - 06:34
नवीन
आमच्या शुचीला विसरलात का? आणि आता जाई बाई...(रागावू नका हो..) ;)
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 08/24/2010 - 12:19
नवीन
नितिन,
खरं सांगायचं म्हणजे माझे जे लेखन मला आवडते त्या लेखनाला त्या मानाने कमीच प्रतिसाद आले. काश्मीरच्या प्रश्नावरचा माझा लेख एक लेखन या नात्याने कांहीं खूप चांगला नव्हता. 'टाइम्स'मधील बातमी आणि पंतप्रधान/राष्ट्रपतींना मी लिहिलेले पत्र यापेक्षा त्यात माझे असे कांहींच कौशल्य नव्हते. केवळ वादविवादातून त्याला इतके प्रतिसाद मिळाले.
असो. आज आणखी एक टाइम्स'मधील बातमी व माझे कालच्या जकार्ता पोस्ट'मधे प्रकाशित झालेले पत्र जरूर वाच. हे पत्र लिहिल्याचा मात्र मला अभिमान आहे कारण कांहींसा अभ्यासही त्यामागे आहे व परदेशी राहून किरकोळ देशसेवाही होते. तरी जरूर वाच.
काका
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/24/2010 - 04:28
नवीन
लवकरच एखाद्या प्रक्षोभक विषयावर काथ्या कुटावा म्हणते आहे.
पान क्र. ३१ वरून किती वरच्या क्रमांकावर उडी मारता येते ते तरी कळेल.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 07:52
नवीन
"संपादकांच्या कथा आणि व्यथा" असा एक विषय सुचवतो :-) कमीत कमी दुसर्या पानावर गारंटीड !
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/24/2010 - 13:28
नवीन
रेवतीताई, सुपारी दे! तुला पहिल्या पाचात आणून सोडते! ;-)
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/24/2010 - 16:23
नवीन
सुपारी दे!
थांब गं देते! देवघराजवळच्या पेटीत चार सुपार्या, हळकुंडं ठेवलीत जपून.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 08/24/2010 - 16:28
नवीन
रेवती! =))
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/24/2010 - 17:26
नवीन
ही ही ! जर पाचकळपणा दुसरं काही नाही.;)
पण आता खरच अदितीच्या मदतीनं एखादा धागा काढावा असं वाट्टय.
आमच्या चटण्या कोशिंबीरींच्या धाग्याला येउन येउन असे किती प्रतिसाद येणार?;)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/24/2010 - 18:14
नवीन
तसं नाही रेवती ताई! चटण्या कोशिंबीरीचे धागे काढच; माझ्यासारख्या विसरभोळ्या आळसटांसाठी चांगले संदर्भ तयार होतील. पण त्यात अमक्याची चटणी करता येईल, तमक्याचं भरीत करता येईल असल्या टिमक्या वाजव. आपल्याला सुपरवुमनायटीस* झाला आहे याची प्रचंड जाहीरात कर. शिवाय या सुपरवुमनायटीसचे फायदे तोटे यावर एक मोठ्ठं लेक्चर दे ... की झालाच समज धागा हिट!!
*सदर शब्द मंगला गोडबोले यांच्या 'पर्स हरवलेली बाई'मधून साभार उचलला आहे.
अवांतरः मिभोकाकांनी टॉप-२५ मधे माझाही धागा टाकल्यामुळे मलाही त्यांच्यासाठी थोडेफार प्रतिसाद देणं आलंच!
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/24/2010 - 19:48
नवीन
धन्यवाद!
प्रयत्न करते.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 08/25/2010 - 12:23
नवीन
असं बनायचं असतं होय सुपरवूमन! मला ठाऊकच नव्हतं ब्वॉ! स्वतःची जाहिरातही करावी लागते? त्यासाठी मिपावरच्या विवक्षित कंपूला सुपारी देईन म्हणते! :D
- Log in or register to post comments
प
पाहुणा
Wed, 08/25/2010 - 13:32
नवीन
सुपारी चे ठिक आहे पण हळकुंडं कशाला ?
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Wed, 08/25/2010 - 20:15
नवीन
हॅ हॅ हॅ ?
किती हळकुंडं जपून ठेवली आहेत, त्यावर अवलंबून आहे.
आम्ही फक्त अर्धेच जपून ठेवतो.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 08/25/2010 - 20:19
नवीन
अर्धे वापरून पिवळे होण्यासाठी
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/25/2010 - 20:25
नवीन
मीच ती, मीच ती, मीच ती!
मारत्ये आता रेवतीताई मला!!
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 08/25/2010 - 20:42
नवीन
आम्ही पान क्र. ३१ वाले म्हणून कुणाला धाकच राहिला नाही बुवा!;)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/25/2010 - 20:52
नवीन
मी दिलेली रेसिपी वापरून तर पहा! ३१ चा १३ तर ऑपॉप* होईल, पुढे १३ चं तीन करायला मी आहेच. तीनचं एक मात्र नशीबाचा भाग आहे! ;-)
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 08/26/2010 - 00:12
नवीन
म्हणजे तुम्ही तीन तेरा करणार तर. :-)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »