कलादालन

बिजापूर ते सोलपूर बस प्रवास....

Primary tabs

गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या. परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता. माझी तोफ (Canon) धडाडू लागली........ Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
रेवती

आम्हालाही फक्त तोफगोळेच दिसतायत!;)

पैसा

किल्लेदार राम राम घेवा. पन चित्रं दिसत न्हायीत. चिकटविताना गडबड झाल्याली दिसत्ये.

प्रभो

लईच भारी... साला दहा वर्षं झाली विजापूरला जाऊन.
बाकी, आमच्या गावच्या रस्त्याचं (सोलापूर) दुरुन दर्शन घडवल्याबद्दल धन्स रे.. :)

पांथस्थ

किल्लेदारा,

मस्तच आहेत फोटो!

असे आभाळ मला कधीच टिपता येत नाही काही टिप्स द्या की राव!

चतुरंग

फ्लिकरवरच्या फोटोवर राईट क्लिक - > प्रॉपर्टीज -> यूआरेल कॉपी -> मिपावरच्या चित्राच्या खिडकीत पेस्ट -> ओके ->
पूर्वदृश्य
(साईज अ‍ॅडजस्ट करायचा असल्यास मिपावरच्या चित्रखिडकीत हवी ती मापे भरुन बघू शकता. पूर्वदृश्यात कसे दिसते आहे हे समजतेच त्यानुसार कमीजास्त करता येईल.)

सगळे मनासारखे झाले की मग प्रकाशित करा

(मांत्रिक)चतुरंग

नंदन

ढगांचे फोटू मस्तच आलेत. विजापूरचेही येऊद्यात.

अरुंधती

सर्व ढग्गोबांचे पुंजके मस्त दिसत आहेत! आकाशाचा रंग तर खासच! :-)

सूड

झकास.....आताच वर्षावर्णन डकवलं त्यातलं ढगांचं वर्णन आठवलं.

Pain

फोटो आवडले.
सोलापूरला अनेकदा गेलोय. तिथून विजापूर किती दूर आहे ? आदिलशाहीच्या किती इमारती शिल्लक आहेत ?

मस्तानी

राहवलं नाही म्हणून हा एक आमच्या कडून सुद्धा ... आभाळ शेवटी सगळीकडे सारखंच, नाही का :)