कलादालन

वेध गणेश उत्सवाचे... {२}

Primary tabs






श्री गणेश स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... :)

नविन मूर्ती बनवण्याची जागा दिसली, मग काय परत बाप्पाची छबी टिपण्याची इच्छा प्रबळ झाली... :)

आधीचा धागा :---
वेध गणेश उत्सवाचे...

(हौशी फोटुग्राफर)

छान फोटो पण मला अशा वेगवेगळ्या पोझांमधल्या ग्लॉसी मूर्ती विशेष आवडत नाहीत. गणपतीबाप्पाची पारंपरिक मूर्तीच आवडते.
स्वाती

सहमत आहे. मांडी घालून चौरंगावर बसलेला आणि एक पाय खाली सोडलेला किंवा दोन्ही पावले जवळ घेऊन गुढगे वर काढलेले गणपती बाप्पा फार आवडतात. काही अपवादात्मक गणपती पण आवडतात जसे मंडईचा शारदा-गजानन, राजाराम मंडळ , भाऊ रंगारी, हत्तीगणपती मंडळाचा युद्धमान गणपती, डोके तालमीचा पैलवान गणपती इ. पण गणपतीला इतर कोणत्या देवाचा मेकअप केलेला नाही आवडत.

Bhaau Rangari
श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ

Mandai
मंडईचा गणपती


नागनाथ पार मंडळ. ऋद्धीबाई - सिद्धीबाई या आपल्या पत्न्यांसमवेत बसलेले गजाननराव. :)
या वेगळ्या पण गणपतीरूपातच असलेल्या मूर्ती मला फार आवडतात.

सूड

>>पण गणपतीला इतर कोणत्या देवाचा मेकअप केलेला नाही आवडत.
असेच म्हणतो.

मदनबाण

नागनाथ पार मंडळ. ऋद्धीबाई - सिद्धीबाई या आपल्या पत्न्यांसमवेत बसलेले गजाननराव.
सुंदर... :)

रेवती

हा धागाही मस्त!
तू खरच हौशी फोटोग्राफर आहेस रे बाणा!
काही गणपतींचे बुकिंग झालेले दिसते आहे, त्या मूर्तींवर अडकवलेले ट्याग पाहून गणपतीचे दिवस अगदी जवळ आल्यासारखे वाटतात.

चित्रा

फोटो चांगलेच आले आहेत. पण वर स्वातीने आणि पुण्याच्या पेशव्यांनी म्हटले आहे तसेच म्हणते.
गणपती बाप्पा नेहमीच्याच रंगात छान दिसतात.
माझे आवडते गणपतीचे देऊळ - मुरुड जंजि़राजवळचे नांदगाव येथील.
इथे काही फोटो मिळाले.
http://picasaweb.google.com/gupteprasad/Utsav2010#5429875691304148098

मनीषा

तू वेद, दिशा, परब्रम्ह
तू गुण, देह, अन् काल
तूच स्थिती, उत्पत्ती , लय
मंगलमय, महागणपती ||

सुरेख छायाचित्रे !

पुण्याच्या गणपतीं चे दर्शन घडवल्याबद्दल पेशव्यांना धन्यवाद !

शिल्पा ब

छान फोटो...मलापण साधासा पारंपारीक गणपतीच आवडतो..