सौदी मध्ये मशिदींवरील स्पिकरला बंदी यावर
💬 प्रतिसाद
(65)
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/31/2010 - 07:06
नवीन
आम्ही स्वतःसाठी गुरुवार हा एक वैकल्पिक सुटीचा दिवस द्यावा असे सुचवतो म्हणजे बुधवार यथासांग पार पडेल . ऐवजी आम्ही रविवारी काम करू.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/30/2010 - 18:41
नवीन
गेले तीन वर्ष मी सरकारी नोकर असून आमच्या कार्यालयास यातले एकही वर्ष पारशी नववर्ष दिनाची सुट्टी नव्हती. पण वैकल्पिक सुट्टी घेतल्यास ना नसते. या वर्षी सगळ्या सुट्ट्या देताना गुरूवार, शुक्रवार किंवा सोमवारचा मुहुर्त साधायचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे "माझ्यासारखे चंगळवादी पाश्चात्य संस्कृतीचे पाईक" सरकारवर अंमळ खूष आहेत.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Mon, 08/30/2010 - 16:46
नवीन
आपल्या ज्या गॅझेटेड सुट्टया असतात त्यात मुस्लीम बांधवांखातर किती व बाकीच्यां करता किती ह्या कोणी मोजल्या आहेत का.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 08/30/2010 - 17:30
नवीन
मी महाराष्ट्र राज्य गॅझेटच्या आधारे आपल्याकडील सुट्ट्यांची वर्गवारी करू शकतो. सन २०१० मध्ये अशा एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या शासनाने जाहीर केल्या. त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे :
१. देशव्यापी सुट्ट्या : ४ (प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, कामगार दिन, म.गांधी जयंती)
२. हिंदू सण : ८ (महाशिवरात्री, होळी, गुढी पाडवा, रामनवमी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी २ दिवस)
३. मुस्लिम सण : ४ (ईद-ए-मिलाद, रमजान ईद, मोहरम, बकरी ईद)
४. व्यक्ती २ : शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
५. पारशी १ : पारसी न्यू इयर
६. ख्रिश्चन २ : गुड फ्रायडे, नाताळ
७. जैन १ : महावीर जयंती
८. शीख १ : गुरू नानक जयंती
९. अन्य १ : बुद्ध पौर्णिमा
याशिवाय जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात त्या त्या जिल्ह्यासाठी ३ जादाच्या (स्थानिक म्हणून) सुट्ट्या जाहीर करू शकतात.
(* १ मे ची सुट्टी देशपातळीवर 'कामगार दिन' म्हणून जाहीर केलेली असत, तरी याच दिवशी 'महाराष्ट्र दिन' म्हणूनही सुट्टी मानली जाते.)
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर सातव
Mon, 08/30/2010 - 17:53
नवीन
तसेही आपल्याकडे शहरांत व गावांत पण आवाज हे धर्मश्रद्धेचे मोठे परिमाण आहे.ज्याचा आवाज जास्त मोठा ते मंडळ किंवा प्रभाग जास्त श्रद्धाळू.आपले धर्म रस्त्यावर जास्त आणि देवळात किवा मशिदीत कमी पाळले जातात.अर्थात, काही सन्माननीय अपवाद आहेत.निदान या बाबतीत तरी ख्रिस्चन धर्माकडून काही शिकण्यासारखे आहे,ते त्यांचा धर्म चर्च मध्येच पाळतात.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 08/30/2010 - 19:53
नवीन
एक तर मुसलमानांची बांग म्हणा, त्यांचे दर शुक्रवारचे भाषण म्हणा किंवा हिंदूंच्या सणाच्या आणि उत्सवाच्या दिवशींचे म्हणा ध्वनी प्रदूषण होतेच...काय कारण आहे एवढ्या मोठ मोठ्याने देवाच्या नावाने ओरडायची? देव (असलाच तर ) काय बहिरा आहे? अन बहिरा असेल तर तो तुमचे दुखः ऐकू न आल्याने दूर करू शकणार नाही...सगळं जगच असं ओरडून त्याची भक्ती करायला लागलं तर नसला तरी देव बहिरा होऊन जाईल..
दखल घ्यावी..
आणि हो उगाच शिवाजी महाराजांना यात ओढू नका...त्यांच्या दारातल पायपुसणं होण्याची लायकी नसलेले लोक सत्तेवर आहेत.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Tue, 08/31/2010 - 06:38
नवीन
सगळे सण आणि उत्सव ह्यातच वाया घालवतात.
वर मामा ने दिलेल्या
पैगंबर जयंती ७ दिवस,
रमजान इफ्तार ३० गुणीले ८
मोहरम ताजिय रोज रात्री ३ तास गुणिले १० दिवस
ऊरुस ईस्तेक्बाल जो प्रत्येक मशिदीत असतो ७ दिवस
दिवशी माझ्या बघण्यात तर कोणतेच मुस्लिम स्पिकर लावुन ओरडताना दिसले नाहीत. आजकाल सर्वधर्मियाना दंगा करुन,दारु पिउन,पत्ते खेळायला एकमेव हक्काचा सण म्हणजे गणेश चतुर्थी हा झाला आहे.मुस्लिम पोरे देखिल उत्साहाने पहिल्या दिवसा पासुन शेवटच्या दिवसा पर्यंत मंडपात नाचताना दिसताहेत्. क्रिस्ती धर्मियाच्यात दारु पिणे वर्ज्य नसलेमुळे त्याना काही अडचण येत नाही.त्याना नाचायला व पियायला कोणत्या सणाची वाट बघावी लागत नाही.
मामा मला तरी आर एस एस चा छुपा कार्यकर्ता वाटतोय.
- Log in or register to post comments
श
शेलार मामा मालुसरे
Tue, 08/31/2010 - 06:56
नवीन
तुमची शंका अथवा संशय चुकीचा आहे.
तुम्ही थोडे कोल्हापुर सोडुन इतर शहरात व मुस्लीम मोहल्ल्यात फिरल्यास तुम्हाला माझे म्हणणे पटेल.
मी मुब्र्यात राहत असतानाचे अनुभव तर खुप वाइट आहेत.
असो तुमच्या मताची मी कदर करतो.
तुम्ही सांगितलेला गणेशोसोत्सव शहरातला आहे.
अजुनही देशाची ६५ % जनता गावामध्ये राहते,
गणेशोसोत्सव फक्त महाराष्ट्रहोत् मोठ्या प्रमाणात होतो तर मशिदींवरील बांग सर्व देशातुन दिली जाते.
माझा प्रश्न तुम्ही डोळे उघडे ठेउन वाचावा,
मी आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतेबद्दल प्रश्न विचारलेला आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 08/31/2010 - 07:18
नवीन
>>गणेशोसोत्सव फक्त महाराष्ट्रहोत् मोठ्या प्रमाणात होतो तर मशिदींवरील बांग सर्व देशातुन दिली जाते.
प्रत्येक राज्यात आपापले उत्सव असतात. गुजरात - नवरात्र
बंगाल - दुर्गापूजा
वगैरे
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Tue, 08/31/2010 - 10:27
नवीन
कोणीच होळी/रंगपंचमीचा उल्लेख कसा केला नाही?त्यावेळी ध्वनीप्रदूषण नसते पण रस्त्यावरील कोणावरही (विशेषत: तरूण मुलींवर) हक्काने फुगे मारणे, रस्त्यावरील कोणावरही रंग फेकणे असे प्रकार चालतात. झाडे जाळून होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी या गोष्टींविषयी बोलायलाच नको.
मशिदींमधून किती प्रमाणात मोठ्याने बांगा दिल्या जातात याची कल्पना नाही कारण मी कधीच मशिदीच्या आसपास राहिलेलो नाही. अशा बांगा देऊन लोकांना दररोजचा त्रास दिला जात असेल तर त्याचे अजिबात समर्थन अजिबात नाही.तसेच बकरी ईदला बकऱ्यांना हलाल करायच्या प्रकाराचा मी नेपाळमध्ये एका देवळात कोंबडी कापायचा प्रकार अनवधनाने बघितला त्या प्रकाराइतकाच मला तिटकारा आहे. त्यांच्या इतर सणांविषयी मला काही कल्पना नाही म्हणून त्याविषयी काही लिहित नाही. पण हिंदुंचे सण म्हणजे बेशिस्तपणा आणि हुल्लडबाजींनी परिपूर्ण का असतात? गणेशोत्सवाचे काही विचारूच नका.नवरात्रांदरम्यान नाचण्यामागे कृष्णभक्ती हा हेतू किती जणांचा असेल? मला वाटते त्यात मुलींशी लगट करण्याचाच हेतू अनेकांचा असतो.किमान काही सणांदरम्यान (गणेशोत्सव, दुर्गापूजा) लाऊडस्पीकरवरून बोंबाबोंब कान फुटेपर्यंत चालू असते. आणि या सगळ्यांवर काही बोलले तर धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणून काही बोलायचे नाही! त्या मानाने ख्रिश्चन लोकांचे सण चांगले वाटतात. एक तर ख्रिसमस आणि गुड फ्रायडे-ईस्टर सोडून फारसे सण नाहीतच आणि जे आहेत त्यात असा धांगडधिंगा तरी नसतो. बहुतेक वेळी हे सण आले कधी आणि गेले कधी हेच कळत नाही.
हा असा public nuisance धार्मिक भावनांच्या नावाखाली किती दिवस आणि का सहन करायचा?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 08/31/2010 - 08:47
नवीन
"आजकाल सर्वधर्मियाना दंगा करुन,दारु पिउन,पत्ते खेळायला एकमेव हक्काचा सण म्हणजे गणेश चतुर्थी हा झाला आहे."
... सहमत. आता यात भर घाला "नवरात्री"च्या धुमाकुळाची ! कोल्हापुरात तर आजकाल 'गणराया` पेक्षा हुल्लडबाजांना `दुर्गामाते` च्या आगमनाची उत्सुकता जास्त असल्याचे दिसून येत आहे. कारण? अर्थातच तो फाल्गुनीच्या आणि बाबल्याच्या गर्बा रिमिक्स डिस्कोच्या तालावर नॉनस्टॉप चालणारा नाचाचा हैदोस. गणेशाच्या मूर्तीसमोर नाचता तर येते पण तीत 'मुली' नसतात, त्यामुळे 'नवरात्री' चे आकर्षण !
रात्री ११ नंतर डॉल्बीला बंदी आहे (पण कागदावर....). तक्रार केलीच तर पोलिसमामांचे ठरलेले उत्तर आहेच, "अहो, क्क्याय व्हतयं !! नऊ दिवसानंतर गुमान होत्यातच की सगळी !" त्यामुळे ऐकत/पाहात राहणे ही एकमेव स्ट्रॅटेजी.
इन्द्रा
- Log in or register to post comments
व
वेताळ
Tue, 08/31/2010 - 07:13
नवीन
भारतात जेव्हढी आजपर्यत सरकारे आली तेव्हढी सगळी मुलतत्ववाद्यामा खाद्य पुरवत आली आहेत. त्यामुळे दिवसा गणिक मुलतत्ववादी वाढत आहेत. प्रत्येक सामान्य गोष्टीत काहीतरी काळेबेरे आहे हे, हे लोक जाणिवपुर्वक समाजात पसरत आहेत्.त्यामुळे प्रत्येकाची नजर इतर धर्मियांकडे बघण्याची बदलत आहे.
मी कोल्हापुर मध्ये असु दे अथवा मुंबई मध्ये त्याचा काही फरक पडत नाही. एक सरळ साधे उदाहरण देतो. आजकाल हिंदु धर्मिंयांमध्ये किती एकी आहे? एक मराठा, एक ब्राम्हण,एक लिंगायत तर एक दलित असे एक ना हजार प्रकार आहेत्. यातला प्रत्येक जण दुसर्याला संशयीत नजरेने बघत असतो.मागच्या एका धाग्यात दादोजीचा पुतळा काढण्यावरुन जी चर्चा झाली त्यात किती लोक खालच्या पातळीला जावुन एकमेकांवर टिका करत होते ते तुम्ही पाहिले आहेच. मग कशाला तुम्ही इतर धर्मियाना नावे ठेवता?तुमच्या धर्माततच इतका पराकोटीचा द्वेष एकमेकां विरुध्द भरला असताना इतर लोकांची काळजी कशाला करता?
निदान तथाकथित धर्म निर्पेक्षपणा मुळे अजुन आपल्या देशात यादवी झाली नाही हे आपले भाग्यच मी समजतो.
- Log in or register to post comments
श
शेलार मामा मालुसरे
Tue, 08/31/2010 - 11:43
नवीन
भारतात जेव्हढी आजपर्यत सरकारे आली तेव्हढी सगळी मुलतत्ववाद्याना खाद्य पुरवत आली आहेत. त्यामुळे दिवसा गणिक मुलतत्ववादी वाढत आहेत. प्रत्येक सामान्य गोष्टीत काहीतरी काळेबेरे आहे हे, हे लोक जाणिवपुर्वक समाजात पसरत आहेत्.
ह्या २ ओळींशी मी सहमत आहे.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Tue, 08/31/2010 - 09:45
नवीन
मी गॅझेटेड म्हणजे केंन्द्रसरकार गॅझेट बद्दल लिहीत होतो. १८ सुट्ट्यांमधे मुस्लीम बांधवांकरता किती असतात ते.
आणि एका प्रसिद्ध मासिका नुसार आपल्या देशात रेल्वेकडे सगळ्यात जास्त जागेची मालकी आहे, त्या खालोखाल वक्फ बोर्डा कडे व त्या नंतर सैन्याकडे रिअल इस्टेट आहे.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Tue, 08/31/2010 - 18:07
नवीन
मशीदीतून निघणारी बांग कानाला फार सुखावह नसते. पण ती त्यामानाने अगदीच अल्पकाळ चालते. आणि वाद्ये वगैरेचा ठणठणाट नसल्यामुळे तितकी वाईट वाटत नाही. अर्थात तीही कमी आवाजात करता आली तर आनंदच आहे. मशीदीत अनेक वाईट गोष्टी घडू शकतात, घडल्या आहेत जसे डोकी भडकवणारी भाषणे, लोकांना कडव्या इस्लामची आठवण करून देणे, जिहादला उद्युक्त करणे, अतिरेक्यांना आसरा देणे, शस्त्रे साठवणे इत्यादी. पण ध्वनीप्रदूषणाचा क्रम बराच खालती आहे असे माझे मत.
पण गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, दांडिया, लग्ने, मुंजी, सत्यनारायण, सत्कार असल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जो काही ध्वनीप्रदूषणाचा धिंगाणा चालतो तो भयावह आहे. एखादे वाईट दृश्य असेल तर डोळे मिटणे, इतरत्र बघणे असे पर्याय असतात. पण ह्या उच्चरवात चालणार्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करणे केवळ अशक्य आहे. तिथून दूर जाणे एवढाच पर्याय उरतो. ज्यांची घरे त्या तथाकथित उत्सवाच्या जवळ आहेत त्यांना हाही पर्याय व्यवहार्य नाही.
लोकांकडून वर्गणी गोळा करून, महागडे कर्णे भाड्याने घेऊन त्यांच्यावरच अत्याचार करायचे हे प्रकार थांबवायला युद्ध पातळीवरून काहीतरी केले पाहिजे. असल्या आवाजाने लहान बाळांच्या कानाचे जन्माचे नुकसान होऊ शकते, वृद्ध लोकांचे स्वास्थ्य हरवते पण तरूण लोकांनाही झोप नीट न लागल्यामुळे विविध व्याधी जडू शकतात.
माझ्या मते भारतीय लोकांच्या दोन अत्यंत घाणेरड्या सवयी आहेत. एक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि दुसरे सार्वजनिक शांतताहरण करणारे ध्वनिप्रदूषण. याविरुद्ध काहीतरी केलेच पाहिजे असे मला वाटते. दोन्ही गोष्टी भारतीय लोकांचेच नुकसान करणार्या आहेत. आणि सहज टाळण्याजोग्या आहेत. ज्यांना हे करायची खाज असेल त्यांना अकूस्टिकली आयसोलेटेड चेंबर अर्थात ध्वनीकक्ष बनवायची सक्ती करावी. ते जमत नसेल तर बंदी. निसर्ग सौदर्य जसे जपण्याची गोष्ट आहे तशीच सार्वजनिक शांतताही आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2