Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भेंडीची कुरकुरीत भाजी

श
शिल्पा ब
गुरुवार, 09/02/2010 - 09:17

प्रतिक्रिया द्या
14779 वाचन

💬 प्रतिसाद (27)
N
Nile गुरुवार, 09/02/2010 - 09:23 नवीन
काय हे!!! एकट्यापुरतीच भाजी करुन फोटु टाकला होय? अशी कंजुषी केल्याबद्दल प्रतिसाद देणार नाही. ;-) (बाकी एरवीही भाजी खाल्ल्याशिवाय काय प्रतिसाद द्यायचा? ;-) )
  • Log in or register to post comments
अ
असुर गुरुवार, 09/02/2010 - 11:15 नवीन
जर ही पाकॄ काल आली असती तर माझी भेंडीची भाजी बिघडली नसती! काल मला भेंडीचं भरित खायला लागलेलं आहे! काय झालं होतं देव जाणे, चव ओक्के होती पण जाम लगदा झाला होता! शिल्पातै, तुम्ही उशीर केल्याबद्दल जाहीर णिसेद(ज्याचा त्याचा कॉपीराईट)! पाकॄ वर प्रतिसाद देणार नाही!!! उलट आता मीच नवीन पाकॄ टाकतो, भेंडीचं भरीत! पुढच्या वेळी मी हीच भाजी केली आणि जमली तर मात्र न विसरता प्रतिसाद देईन! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/02/2010 - 09:27 नवीन
हाच का तो फोटु ? Image removed. साला भेंडी म्हणजे आमचा जिव कि प्राण. भेंडीवर आमचा भारी जिव.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 09/02/2010 - 09:34 नवीन
हो...धन्यवाद..मी किती वेळ प्रयत्न केला पण फोटू काही माझे ऐकेना...म्हणून लिंक दिली शेवटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्वप्निल.. गुरुवार, 09/02/2010 - 22:35 नवीन
>>साला भेंडी म्हणजे आमचा जिव कि प्राण. भेंडीवर आमचा भारी जिव. आमचा पण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
शुचि Fri, 09/03/2010 - 00:54 नवीन
तुम्हाला मसाला भेंडी म्हणायचय का परा? म खाल्लात वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/03/2010 - 09:35 नवीन
छे ! मसाला असे नाही, भेंडीचा कुठलाही पदार्थ, अगदी कच्ची भेंडी देखील आमचा जीव कि प्राण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मिसळभोक्ता Sat, 09/04/2010 - 17:23 नवीन
आजवर मी एक व्यक्ती शोधत होतो, की जिला कच्ची भेंडी आवडते, माझ्यासारखी. (पण, हा तर "ज्याला" निघाला, "जिला" नव्हे. तरी ओक्के.) जियो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/04/2010 - 18:03 नवीन
जिले इलाही, तुम्ही अनेक माणसं खाता तश्या भाज्याही कच्च्या खाऊ शकता हे नवीनच कळत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
क
कवितानागेश गुरुवार, 09/02/2010 - 09:46 नवीन
भेंडी उभी चिरली तर अजिबात चिकट होत नाही. शिवाय, टोमॅटो (शिजताना) / आमसुल(फोडणीत) / लिंबूरस ( शिजल्यावर) घातले तरी भाजी चिकट होत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 09/02/2010 - 14:54 नवीन
गोलपेक्षा उभी कापलेली भेंडी माझी जास्त आवडती. शिवाय, टोमॅटो (शिजताना) / आमसुल(फोडणीत) / लिंबूरस ( शिजल्यावर) घातले तरी भाजी चिकट होत नाही. चिंचदेखिल चालू शकेल. बाकी दाण्याचे कूट घातलेली भेंडी नवीनच. करूनच पहायला हवे. कदाचित म्हणूनच कुठल्याही आंबट पदार्थाची गरज भासत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सूड गुरुवार, 09/02/2010 - 10:14 नवीन
>>लिंबूरस ( शिजल्यावर) घातले तरी भाजी चिकट होत नाही. सहमत... भेंडी म्हणजे आहाहा....असो !! नवीन रेसिपी कळली..
  • Log in or register to post comments
स
सविता गुरुवार, 09/02/2010 - 14:14 नवीन
टाकायचा राहिला की शिल्पातै.... सामग्री मध्ये लिवलंय... कॄतीमध्ये नाय......
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 09/02/2010 - 19:26 नवीन
हो..राहिलं खरं. फोडणीत घालायचा लसूण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/02/2010 - 14:57 नवीन
करुन सांगेन ..मलाही भेंडी खूप आवड्ते.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 09/02/2010 - 16:08 नवीन
छान दिसतेय भाजी. कुरकुरीतपणा खाल्ल्याशिवाय कळायचा नाही. ;) तेलही अगदी व्यवस्थित मापात घातलंय. नाहीतर बर्‍याच ठिकाणी भेंडीची भाजी अंमळ तेलकटच असते. बाकी, मला मी पहिल्यांदा बनवलेली भेंडीची भाजी आठवली. त्यात भाऊ होता सोबत, आणि दोघांनी मिळून पाणी ओतले होते भाजीत. आणि मग रामा शिवा गोविंदा!!!! तेव्हा घरी म्हैस होती. तीनेही तोंड नाही लावले तिला. :(
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/02/2010 - 22:43 नवीन
>>तेव्हा घरी म्हैस होती. तीनेही तोंड नाही लावले तिला. पण म्हशीला भेंडी नक्की आवडेल असं का बरं वाटलं तुला मके? :) बाकी शिल्पा, भाजी मस्त दिसतेय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मेघवेडा गुरुवार, 09/02/2010 - 22:46 नवीन
तुला आवडते का भेंडी मके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/02/2010 - 23:17 नवीन
मला असं विचारायचं होतं की मांजर, कुत्रा, गाय, बकरी असे इतर पाळीव प्राणी सोडून तिला एक्दम म्हैसच का आठवली त्यामागचं राशनाल काय असेल? एव्हढंच, बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मस्त कलंदर Fri, 09/03/2010 - 09:33 नवीन
अहो, सहावीत असताना आमच्या शाळेत केक कसा करायचा हे कार्यान्भावात शिकवले. आणि शेवटी बिना ओव्हनचा कुकरमध्ये वाळू घालून कसा करायचा तेही सांगितले. मग मी कधीतरी माझ्या वाढदिवसाला दुपारी कुणीच घरी नव्हतं, तेव्हा हा प्रयोग करून पाहायचे ठरवलं. कुणीतरी म्हटलं होतं की अंड्याशिवाय केक चांगला होत नाही. मग मी आजीचा डोळा चुकवून, मुद्दाम घरापासून दूर असलेल्या दुकानातून अंडं आणलं. (कळलं तर लगेच बाहेर हो म्हणायची!!) आणि केला उपद्व्याप. काय नक्की बिघडलं होतं देव जाणे, पण तो केक काही भाजला गेला नाही. पोटात सुरी खुपसून खुपसून त्याची चाळण झाली. शेवटी मी पण हात टेकले. वरचा अगदी थोडासा भाजल्या सारखा वाटलेला केक मी, आणि राहिलेला म्हशीने खाल्ला. नंतर संध्याकाळी आईला हळूच सांगितले, "आज आजीची म्हैस बाटली" ;) या अनुभवावरून वाटले की ती माझे सारे अपराध असे "पोटात" घेईल म्हणून!!! पण तिनेही मान फिरवली. त्यानंतर स्वयंपाकाचे प्रयोग थांबवले ते गेल्याच वर्षी चालू केले. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मिसळभोक्ता Sat, 09/04/2010 - 17:26 नवीन
कुणीतरी म्हटलं होतं की अंड्याशिवाय केक चांगला होत नाही. मग मी आजीचा डोळा चुकवून, मुद्दाम घरापासून दूर असलेल्या दुकानातून अंडं आणलं. (कळलं तर लगेच बाहेर हो म्हणायची!!) एकदा मी मित्राच्या घरी अंडाकरी खाऊन आलो, हे कळल्यानंतर माझ्या आजीने मला घराबाहेर उभे करून अंगावर तांब्याभर थंड पाणी ओतले होते, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Sat, 09/04/2010 - 17:39 नवीन
माझ्या आजीला बाबांच्या बाबतीत साधा संशय जरी आला, तरी त्यांना बाहेरच उभं करून बादलीभर पाणी ओतायची, वर त्यांच्या अंगावर आणि घरभर गोमूत्र शिंपायची. वर गोमूत्र आणायला आम्हालाच पाठवायची. तिच्या या सततच्या आम्हाला पाठवण्याने गायी फक्त आमच्या आजीसाठीच शू करतात असे आम्ही म्हणायचो. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/04/2010 - 18:03 नवीन
त्यापेक्षा फ्रीजमधे स्टॉकच ठेवायचात ना! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
प्राजु गुरुवार, 09/02/2010 - 22:42 नवीन
मी बर्‍याचदा भेंडी, बटाटा उभे काप करून, गरम मसाला,हिरवी मिरची आणि सगळ्यात शेवटी ओला नारळ करते.. अफाट होते ती भाजी.. अशी करून बघेन आता.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 09/03/2010 - 00:52 नवीन
पिडा =)) भेंडी मस्त दिसतेय.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/03/2010 - 09:46 नवीन
हंस भेंडी खायला उतरला का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सविता Fri, 09/03/2010 - 13:03 नवीन
घ्या...म्हशीला नाय आवडली भेंडी... पण हंसाला आवडली असे दिसतेय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा