कलादालन
ठोसेघर धबधबा
Primary tabs
आज संध्याकाळीच सातार्याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे. हा रस्ता सज्जनगडाजवळून हिरव्यागार डोंगरा मधुन जातो.
जाताना सज्जनगड तसेच उरमोडी धरणाचंही दर्शन होतं.
रस्त्यापासून धबधबा थोडा आत आहे.पण तिथपर्यंत जाण्यासठी आता चांगल्या पायर्या बांधल्या आहेत. सतत पाऊस पडत असल्याने आम्हाला जरा जपूनच जावं लागलं. मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला एक लहान धबधबा आहे. त्याचे हे फोटो..
मुख्य धबधब्याच्या ४ धारा आहेत. त्यांचं मनोहारी दर्शन घेताना आणि पडणार्या पाण्याचा नाद ऐकताना आपल्याला तिथून हलावसं वाटत नाही. पावसापासून कॅमेरा जपावा लागत असल्याने फार फोटो काढता आले नाहीत. पण जे पाहिलं ते असं..

हे सुंदर आले आहेत.
आता छान.
हिरवे हिरवे गार गालिचे!
सुंदर....
छान..... हिरवळ....
खरच गालिचे दिसताहेत!
चरणार्या गायी, देऊळ पाहून अगदी याच पाउली देशी जावसं वाटलं.
पावसाळ्यात बहुतेक सगळ्या घाटांमध्ये असं चित्र दिसत असावं.
मन अगदी ताजतवानं आणि गार होउन जातं.
राग लोभ यांच्या पलिकडे असं असणं नेहमी जमायला हवं.
उपेंद्र, असे फोटू चढवल्याबद्दल आपले आभार!
सातार्याला भेट द्या या दिवसात. निसर्ग सौंदर्य खूपच आहे. थोड्याच दिवसात कास पठारावरील फुलांचे फोटो पण अपलोड करेन..
मन भरुन आलं आमच्या सातार्याचे फोटो बघुन!
जबरदस्त!!
सुंदर फोटो
अमोल