Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बंगलोरला धोका बीजिंगचा

म
मिसळभोक्ता
Sun, 09/05/2010 - 19:06
🗣 101 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14210 वाचन

💬 प्रतिसाद (101)
य
युयुत्सु Sun, 09/05/2010 - 19:14 नवीन
\सहमत आहे. भारत महासत्ता होणे शक्य नाही कारण ते आपल्या रक्तात नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/05/2010 - 19:18 नवीन
नी'हा! सगळ्याच राजकीय पुढार्‍यांची मतं मला पटतात. म्हणून मी सगळ्याच भाषा शिकून घेते आहे!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:21 नवीन
शेशे. घरी परत गेल्यावर मँडारिन शिकणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:20 नवीन
बंगलोर अणि बीजिंगमध्ये एक निवडण्याचा निर्णय करण्यासाठी मला कंपनीने पाठवले. माझा निर्णय झाला. खरोखरच वेळेवर काम करून घ्यायचे असेल, तर (अमेरिकेव्यतिरीक्त) बीजिंग. कामाला उशीर का झाला, हे ग्राहकांना सुंदर भाषेत समजवून द्यायचे असेल, तर बंगलोर. बाय बाय बंगलोर.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 09/06/2010 - 19:13 नवीन
मिभो, कौतुक आहे तुमचं हा व्यावसायीक निर्णय पूर्णतः व्यावसायीक, कठोर पातळीवर घेतल्याबद्दल. पण एक सांगा कुठेतरी वाईट वाटलं का निर्णय घेतल्यानंतर ...... व्यक्तीशः ? काय आलं मनात की जे मनात आलं ते तुम्ही इथे शेअर केलत आहेत ऑलरेडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 19:23 नवीन
फारसे कठोर वगैरे व्हावे लागले नाही. कॉमन सेन्स वापरायला हृदयावर दगड वगैरे ठेवावा लागत नाही. व्यक्तिशः देखील अजीबात वाईट वाटलेले नाही. आय हॅव ऑलरेडी पेड माय ड्यूज. आय अ‍ॅम अ फ्री एजंट नाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 03:44 नवीन
>>बंगलोर अणि बीजिंगमध्ये एक निवडण्याचा निर्णय करण्यासाठी मला कंपनीने पाठवले. माझा निर्णय झाला. ओह्ह, ओक्के !!! निर्णय झाला असेल तर अजुन पुढे बोलण्यात काय अर्थ ? कुठल्यातरी विशिष्ठ स्किलसेट्स आणि पुर्वानुभव किंवा अजुन कसल्या कसल्या गोष्टींची बॅलन्सशीट मांडुन तुम्ही 'निर्णय घेतला' असे समजतो. आता ती प्रोसेस कंप्लिट झाल्याने अजुन पुढे काय बोलायचे ? बाकी समजा अजुन निर्णय झाला नसेल तर आम्ही सुंदर भाषेत एवढी बडबड करु की तुम्हाला हे काम बिजींग सोडुन बेंगलोर द्यावे वाटेलच पण त्यापुढेही जाऊन अमेरिकेतले हापिस बंद करुन बेंगलोरात येऊन बसावे असे वाटेल ;) आम्हाला बोलबच्चन काय उगाच नाय म्हणत :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विंजिनेर Sun, 09/05/2010 - 19:21 नवीन
सध्या बेंगलोरला धोका नाहिये. बेजिंगवासी भल्या मोठ्या ट्राफिक जाम मधे अडकल्येत सो रिल्याक्स :) बायदवे, मिभो तुम्ही मजल-दरमजल करत कुठवर आलात? हाँगकाँग की बेजिंग?
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:27 नवीन
बीजिंगला फक्त पाच वर्षे द्या. चायना मोबाईल रिसर्च इंस्टिट्यूटच्या प्रमुखाला भेटलो. त्याचे प्रकल्प पाहिले. त्यावरून २ वर्षेच फक्त, असे वाटले. व्हावे चे पण तसेच. काई फू ली ने नवा व्हेंचर फंड सुरू केलाय. त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे. पण बाकी लोकांना अद्याप इंग्रजी येत नसल्याने, मल्टिनॅशनल कंपन्यांसमोर ती समस्या आहे. पण ५ वर्षात हे सगळे बदलेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 19:25 नवीन
चीनी लोक आक्रमक आहेत...त्यांचे नेतृत्व आक्रमक आहे...ते कोणत्याही महासत्तेला फाट्यावर मारतात जे आपल्या लोकांना जमत नाही...काम करण्यात हयगय करीत नाहीत जे आपल्याला उत्तम जमते...भारत महासत्ता होणे नजीकच्या काळात तरी शक्य नाही..केवळ दोनतीन आयटी कंपन्यांना चांगले दिवस आले कि संपूर्ण देश महासत्ता कसा काय होईल हे मला कधीच कळले नाही... चीनचे infrastructure भारतापेक्षा चांगले आहे...आणि मुख्य म्हणजे तिथले नेतृव त्यांना हवे ते करू शकते...भारतात लोकशाही आहे..
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:31 नवीन
.आणि मुख्य म्हणजे तिथले नेतृव त्यांना हवे ते करू शकते हे चूक आहे. माझ्याकडे ठोस उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 19:35 नवीन
कृपया दोनतीन उदा. द्याल का? मला माहिती नाहीत... माझा असा समज होता कि communist देशात सरकार आर्मीच्या जोरावर (विरोध झाला तर ) हवे ते बदल करू शकते...त्यांना हवे ते प्रोग्राम राबवू शकते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:47 नवीन
१. रिंग रोड क्र. २ च्या आतली एकमजली घरे पाडून बहुमजली स्वस्त निवासिका बांधण्यात सरकार यशस्वी झालेले नाही. २. रिंग क्र. ६ पर्यंत आगगाडी नेण्यात अद्याप जुन्या घरमालकांचा विरोध सरकारला मोडता आलेला नाही. ३. घरांच्या किंमती वाढू नयेत, ह्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न निश्फळ ठरलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 19:49 नवीन
ह्म्म्म...मी याविषयी नेटावर वाचते..धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नितिन थत्ते Mon, 09/06/2010 - 06:53 नवीन
आँ !!!!! आम्ही तर गेली कैक वर्षे ऐकत आलो की नेतृत्व (पक्षी=सरकार) जिथे तिथे लुडबुड करीत असे म्हणून भारताची प्रगती झाली नाही. तुम्ही तर म्हणताय चीनचे नेतृत्व(पक्षी=सरकार) त्यांना महासत्ता बनवतंय म्हणता? मला वाटलं तिथले कॉर्पोरेटस् त्यांना महासत्ता बनवतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:25 नवीन
समजा सरकारच कॉर्पोरेट सारखे विचार करू लागले, तर काय होईल ? हा विचार करा. आणि तेच चीनमध्ये होत आहे हे समजा. आर ओ आय हा विचार सरकारात होतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शाहरुख Sun, 09/05/2010 - 19:36 नवीन
बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते.
मग कामं बेंगळुरुला पाठवायचा काय फायदा ? का अमेरिकेत लोकच नाहीत ?? बाकी तिथं लेबर तुलनेनं येव्हढं स्वस्त आहे का ? (जे भारतात काही वर्षांपूर्वी होतं )
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:44 नवीन
जशा प्रकारचे लोक हवे आहेत, तसे लोक खरेच अमेरिकेत नाहीत. आहेत ते शोधणे खूप कठीण आहे. गेली दहा वर्षे भारताचा रेट एकास तीन असा अमेरिकेच्या तुलनेत आहे. पण ते तीन नग असे असतात, की एका अमेरिकन इंजिनियर इतके काम करून घेणे त्यांच्याकडून कठीण असते. बीजिंग मध्ये मला खूप उत्कृष्ट लोक मिळाले. आणि फक्त मलाच नाही, तर मायक्रोसॉफ्ट, गूगल ह्यांना देखील मिळाले. २-३ वर्षात बीजिंगचा रेट पण एकास तीन होईल. पण ह्या तिघांकडून मी दोन अमेरिकन इंजिनियरचे काम करून घेऊ शकतो. नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
क
कुंदन Sun, 09/05/2010 - 19:47 नवीन
समद्यानाच मॅनेजर बनायचे. ग्राउंड लेव्हलला लढाइ करायला आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करायला कोणी तयार नाही .
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:51 नवीन
आजवर बंगलोरच्या कुठल्यही कंपनीतला "आर्किटेक्ट" हा अमेरिकेतल्या सीनियर सॉफ्टवेयर इंजिनियर पेक्षा अधिक चांगला आढळलेला नाही. ता. क. श्रेणी खालीलप्रमाणे: सॉफ्टवेयर इंजिनियर सीनियर सॉ इं टेक्निकल लीड प्रिन्सिपल सॉ इं सीनियर प्रिन्सिपल आर्किटेक्ट सीनियर आर्किटेक्ट इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
अ
अवतार Sun, 09/05/2010 - 22:37 नवीन
ह्या बद्द्ल जालावर माहिती कोठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:30 नवीन
कशाबद्दल माहिती हवी आहे ? श्रेणीबद्दल ? की बोलबच्चनांनी श्रेणीची कशी वाट लावलीये, याबद्दल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार
अ
अवतार Mon, 09/06/2010 - 19:12 नवीन
बोलबच्चनांनी श्रेणीची कशी वाट लावलीये, याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 19:20 नवीन
तुम्ही भारतीय आयटी कंपनीत काम करता का ? असल्यास तिथल्या एका आर्किटेक्टचे नाव आणि फोन नंबर मला व्यनितून कळवा. मी त्याला फोन करतो, आणि आमच्या बंगलोर हापिसासाठी त्याची मुलाखत घेतो, आणि मग कळवतो तुम्हाला त्याचे निकाल. (गंमत करतोय बरे का, नाहितर खरेच पाठवाल नाव आणि नंबर. आणि मग एथिक्सशून्य माणसांत तुमचीदेखील नोंद होईल.) असो. उदाहरणे बरीच आहेत. खाजगी आहेत. त्यामुळे देऊ इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार
अ
अवतार Mon, 09/06/2010 - 20:11 नवीन
http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20100126004935AAv8XzS पण त्यातही चिनी लोकाच्या इंग्रजी बद्द्ल ताशेरे ओढ्ले आहेत. तुमचा अनुभव काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
आ
आजानुकर्ण Mon, 09/06/2010 - 10:52 नवीन
भारतीय कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या चढती भांजणीतील लेबले वेगळी असू शकतात. हे म्हणजे आजवर भारताचा कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाइतके हक्क नसतात असे म्हणण्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
छ
छोटा डॉन Mon, 09/06/2010 - 11:02 नवीन
>>भारतीय कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या चढती भांजणीतील लेबले वेगळी असू शकतात. +१, हेच म्हणतो. इनफॅक्ट ही लेबले क्षेत्र ( उदा सॉफ्टवेअर, सर्व्हिसेस, ऑटो, बीपीओ ) व देश ह्याप्रमाणे बदलतात. उदा : समजा ऑटो क्षेत्रातल्या बेंगलोरमधल्या एखाद्या 'क्ष' या कंपनीत 'अ' हा इंजिनीयर ५ वर्षे अनुभव झाल्यानंतर 'टीम लिड' चे काम करत असेल तर त्याच्याएवढाच अनुभव असलेला पुण्यातल्या 'क' ह्या कंपनीतला इंजिनीयर त्याच्या बार्गेनिंग पॉवरप्रमाणे 'डेप्युटी मॅनेजर किंवा मॅनेजर' म्हणुन मिरवतो. मात्र तेवढ्याच अनुभवाचा ( ज्ञानाचा नव्हे, त्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, त्याचेही बरेच पैलु आहेत, ज्ञान असुन जर ते सांगता किंवा दाखवता येत नसेल तर ते युसलेस ज्ञान आहे असे आमचे सुपरिचित मत आहे ) जर्मनीत 'ख' ह्या कंपनीत बसलेला इंजिनियर हा केवळ 'इंजिनियर'च असतो तर अमेरिकेत त्याच पातळीवर तो 'इंजिनियर किंवा टेक्निशियन' असु शकतो. ह्यावर काय मत आहे ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/06/2010 - 11:06 नवीन
पण प्रोफेसरपद मात्र कोणत्याच देशात सहजासहजी मिळू शकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विजुभाऊ Mon, 09/06/2010 - 12:20 नवीन
प्रोफेसरपद मात्र कोणत्याच देशात सहजासहजी मिळू शकत नाही! आपल्याकडे बरेचदा आसि. लेक्चरर स्वतःला प्राध्यापक म्हण्वून घेतात आणि क्लासेस चालवणारे प्रोप्रायटर स्वतःला प्रोफेसर असे म्हण्वून घेतात. : ..........कधितरी अशाच प्रकारचा प्राध्यापक असलेला विजुभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/06/2010 - 15:16 नवीन
आपल्याकडे बरेचदा आसि. लेक्चरर स्वतःला प्राध्यापक म्हण्वून घेतात आणि क्लासेस चालवणारे प्रोप्रायटर स्वतःला प्रोफेसर असे म्हण्वून घेतात.
काही काही रायटर पण स्वतःला प्राध्यापक म्हणवुन घेतात असे मध्ये पुनम मध्ये झालेल्या गजालीत ऐकल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:37 नवीन
नोकरीला लेबल काय लावायचे हे कंपन्यांच्या हाती असते. ते लेबल देशांनुसार बदलू शकते. परंतु श्रेणी पेक्षा पगाराची लेव्हल महत्त्वाची. समजा अमेरिकेत कॉलेजातून नुकतेच बाहेर पडलेल्याला वर्षाला ७५००० यूएस्डी मिळत असतील, तर भारतातील कॉलेजातून बाहेर पडलेल्याला वर्षाला सहा लाख मिळतात. म्हणजे हे गुणोत्तर झाले १:६ असे. २-३ वर्षांचा अनुभव असला की सुरुवातीचे ३५% दरवर्षी पगारवाढीचे ध्येय लक्षात घेता, १:३ हे पगारांचे गुणोत्तर येते. सीनियर सॉफ्टवेयर इंजिनियर आनी आर्किटेक्ट ह्यांच्यातील पगाराचे गुणोत्तर १:२ आहे. म्हणजे भारतातील आर्किटेक्टने साधारणतः अमेरिकेतील प्रिन्सिपल इंजिनियर (७-८ वर्षे अनुभव) इतके काम करावे ही अपेक्षा. पण खेदाची बाब अशी, की सदर लोक ४-५ वर्षाच्या अनुभवी लोकांएवढे काम करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 09/06/2010 - 10:53 नवीन
भारतीय कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या चढती भांजणीतील लेबले वेगळी असू शकतात. हे म्हणजे आजवर भारताचा कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाइतके हक्क नसतात असे म्हणण्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अर्धवटराव Sun, 09/05/2010 - 19:50 नवीन
पण मुख्य मुद्दा असा कि बंगलोर (केवळ प्रातिनिधीक... हैदराबाद, पूणे काहि वेगळे नाहि) यापासुन काहि धडा घ्यायला तयार नाहि. (आय. टी. वाला) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 19:54 नवीन
भारतीय असल्याचा पुरावाच नष्ट करायल निघाले तुम्ही तर? असले धडे वगैरे घेणे आमच्या रक्तात नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 19:55 नवीन
मान्य आहे. रोमेनियातले बुखारेस्ट हे असेच शहर आहे (बीजिंगसारखे). तिथे तर आणखी स्वस्ताई, संस्कृती, आणि ज्ञानाचे भांडार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चिरोटा Sun, 09/05/2010 - 20:15 नवीन
नक्की? मला काही खास अनुभव नाही आला तिकडे.अर्थात लोकसंख्या खूपच कमी आहे त्यांची. पण घरे स्वस्त वगैरे नाही आहेत्. ज्ञानाचे भांडार? कुठल्या क्षेत्राबाबत म्हणताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
छ
छोटा डॉन Sun, 09/05/2010 - 20:00 नवीन
ह्या लेखाचे शिर्षक वाचुन मिभोकाका आता पुढच्या दौर्‍यासाठी बीजिंगहुन डायरेक्ट बेंगलोरला येणार आहेत असा आमचा ग्रह झाला ;) आता तो 'धोका' हा वेगळाच आहे असे समजले. असो, बाकी ह्या विषयावर सविस्तर प्रतिसाद देईनच पण तुर्तास "कॉस्ट" ह्याबाबत मिभोकाकांचे काय म्हणणे आहे ते जाणुन घ्यायला आवडेल. शिवाय "अमेरिकन घड्याळाप्रमाणे इथले इंजिनियर्स ( सर्वच नाही ) जे काम करतात तसे बीजिंगबाबत शक्य आहे" हे ही विचारतो. - ( संभाव्य धोक्यामुळे (मिभोकाकांचा दौरा नव्हे) बेंगलोर सोडायच्या बेतात असलेला ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sun, 09/05/2010 - 20:09 नवीन
कॉस्ट हा चुकीचा शब्द आहे. आर ओ आय, बघा. ऑपेक्स नको, असे आमचे मत सुपरिचित आहे. डॉनराव, आपण बंगलोरात आहात असे कळते. तुमचे मत कळलेले आवडेल. वरवर काही तरी थातुरमातुर करून गंडवणे हा बंगलोरचा मुख्य धंदा आहे असे आमचे मत आहे. त्यावर तुमचे काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
च
चिरोटा Sun, 09/05/2010 - 20:43 नवीन
१. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
आय टी की एकूण सर्वच?
२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.
गेल्या तीन वर्षात कीमती फार वाढलेल्या नाहीत.३५ लाखाचा ३ वर्षापूर्वीचा फ्लॅट ३८-३९ लाखापर्यंत आता मिळतो. (बीजिंगला दोन वर्षात दुप्पट झाल्या असतील तर बरेच आहे!!)
३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.
हम्म. Third world countries मध्ये हा प्रॉब्लेम पूर्वीपासून आहे.चीनची आता सरशी झाली आहे हे मान्य.ACM मध्ये पण caltech,Berkeley ऐवजी रशिया किंवा हे लोक असतात.
४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.
अमेरिकन गोर्‍या लोकांना बोलबच्चनगिरी आवडते असा माझा(आणि बर्‍याच लोकांचा) अनुभव आहे.शिवाय भारतिय अभियंते जास्त बोलत नाहीत असे गोर्‍या लोकांकडून ऐकले आहे.
५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)
तेवढ्याच पैशात आउटपूट तेवढेच असेल तर उपद्व्याप कराच कशाला तो?(कुशल टॅक्सी चालकाचे ड्राय्व्हींग सामान्य टॅक्सी चालकापेक्षा दुप्पट चांगले असु शकेल्.सॉफ्टवेयर्/अभियांत्रिकीत तो फरक बर्‍याच प्रमाणात असु शकतो(बर्‍याचवेळा असतोच. उ.दा. चांगला तंत्रज्ञ सामान्य तंत्रज्ञापेक्षा २५ पट चांगला असु शकेल.)थोडक्यात तंत्रज्ञ कुशल असेल तर त्याचा जॉब दुसर्‍या किनार्‍यावर जाण्याची शक्यता कमी.(भारतात आय टी संबंधीत येणारे जॉब्स हे बर्‍याच वेळा grunt work टाइपचे असतात्.अर्थात ह्याला अपवादही आहेत.)
६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.
वर्क एथिक, येस. पण ह्या घाणीला कंपन्याच कारणीभूत नाहीत का? पूर्वी भारतात सगळीकडेच एकदा लोक कुठेही चिकटले की चिकटायचेच की!! बॅन्क असो वा कंपनी वा रेल्वे. आणि J2EE अभिमानाने म्हणजे? जवळपास सगळ्याच कंपन्यांनी Y2K सोडवल्यावर जावाच्या नावाने तुतार्‍या फुंकल्याच की! त्यात भारतिय पण सामिल झाले.आता क्लाउडच्या नावाने कंपन्या ढोलकी वाजवत आहेत.
७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा.
हम्म. हा कल्चरचा प्रॉब्लेम आहे.४५ वर्षाचा अभियंता हे ऐकायलाच काहीतरी वाटते. तो मॅनेजरच पाहिजे!!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/05/2010 - 20:47 नवीन
किती वेळा एकाच प्रतिसाद update करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Sun, 09/05/2010 - 20:50 नवीन
किती वेळा एकाच प्रतिसाद update करताय
माझा एकच प्रतिसाद होता. मग एकच प्रतिसाद्च अपडेट करणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 19:08 नवीन
आय टी की एकूण सर्वच? सर्व. हम्म. Third world countries मध्ये हा प्रॉब्लेम पूर्वीपासून आहे.चीनची आता सरशी झाली आहे हे मान्य.ACM मध्ये पण caltech,Berkeley ऐवजी रशिया किंवा हे लोक असतात. "ऐवजी" नाही, "बरोबरच" हा शब्द जास्त योग्य ठरेल. अमेरिकन गोर्‍या लोकांना बोलबच्चनगिरी आवडते असा माझा(आणि बर्‍याच लोकांचा) अनुभव आहे.शिवाय भारतिय अभियंते जास्त बोलत नाहीत असे गोर्‍या लोकांकडून ऐकले आहे. फूल मी वन्स, फूल मी ट्वाईस.. वगैरे वगैरे. "बंगलोरच्या टीम ने काय सांगितले ? तीन महिन्यांचा वेळ मागितला ना ? मग आपण ९ महिने धरू." हे वाक्य मी स्वतः गेल्या आठवड्यात ३ दा ऐकले आहे. हम्म. हा कल्चरचा प्रॉब्लेम आहे.४५ वर्षाचा अभियंता हे ऐकायलाच काहीतरी वाटते. तो मॅनेजरच पाहिजे!! का ? वयाच्या वीस बाविसाव्यावर्षी हा माणूस अभियंता झाला, मग गेली पंचवीस वर्षांचा त्याचा तंत्रज्ञानाचा अनुभव काहीच किंमतीचा नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
न
निखिल देशपांडे Sun, 09/05/2010 - 20:37 नवीन
म्हणुनच बंगालुरु च्या कंपन्या बिजिंग मधुन काम करायचे स्वप्न पहात असाव्यात. इन्फि ने साधारण २००३ च्या आसपास चायना मधे सब्सिडरी सुरु केली. टिसीएस ने ही २००२ मधे चीन मधे काम सुरु केली. टिसीएस चे चीन मधे पाच सेंटर्स आहेत. या कंपन्या सुद्धा तिथे जम बसवायचा प्रयत्न करतच आहेत. चीन चा तुम्ही वर्तवलेला धोका भारतीय कंपन्यांना नक्कीच आहे, यातल्या काही कंपन्या सध्या अमेरिकेतुन मिळणारे काम चायना मधुन पण डिलीवर करत आहेतच. त्यामुळे कंपन्या कदाचीत टिकतीलही पण त्यांचा कर्मचार्‍यांचे काय???
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 09/05/2010 - 21:22 नवीन
अगदी खरे आहे तुमचे निरीक्षण. बीजिंग इज गोइंग टु सरपास बेंगलोर/हैद्राबाद/पुणे (चेन्नै बद्दल मी इतके ठाम विधान करु शकणार नाही कारण मला चेन्नैचा अनुभव नाही. पण तमिळ लोक तसे एक्सेंट्रिक आणि चिवट असतात त्यामुळे ते कदाचित ह्या बदलाला वेगळ्या प्रकारे सामोरे जातीलही.) आमच्या कंपनीच्या तैवानमधल्या आणि त्यानंतर शांघायमधल्या हाफिसात मी काही महिन्यांपूर्वी गेलो होतो. इंजिनिअरांना इंग्लिश फार कमी येते. प्रत्यक्ष काम करुनच त्यांना आपली जागा सिद्ध करावी लागते. भारतातले इंजिनिअर्स आणि तिथल्या इंजिनिअर्स मधे फरक जाणवतो. एखादी गोष्ट मुळापासून समजून घेण्याची गरज त्यांना जाणवते. शांघाय टेक्निकल इंस्टिट्यूट मधे जगातले यच्चयावत नवनवीन कोर्सेस अगदी नॅनोटेक्नॉलॉजीसकट आहेत. तिथल्या इंजिनिअरशी बोललो त्यांची सगळी इंजिनिअरिंग टेक्स्टबुके सुद्धा मँडरिनमधेच आहेत. इंग्लिश ते अगदी जुजबीच वापरतात. आपल्याकडे थोडेफार माहिती झाले की इकडून तिकडून उचलेगिरी करुन कधी एकदा लॅडरमधे वरती सरकतोय असे होऊन जाते. त्याने सगळ्यात मोठा धोका हा असतो की नेमकी ग्रासरुट लेवलला कोणत्या स्किलसेटची गरज आहे, कामासाठी कोणता काँपिटन्स आवश्यक आहे ह्याचा आवाका मॅनेजमेंटला येतच नाही काही कारण मिडल लेवल मॅनेजर्स बर्‍याचदा असे अर्ध्या हळकुंडात वर सरकलेले असतात. वरती डॉनरावांनी अमेरिकन घड्याळाप्रमाणे काम करण्याबद्दल विचारले आहे - होय तिथले इंजिनिअर्स काम करतात. मी संध्याकाळी साडेपाचला ईमेल पाठवलेली असली तर शांघायमधे/तैवानमधे सकाळचे साडेपाच झालेले असतात. हटकून तासा दीडतासात उत्तर आलेले असते! वीडिओ कॉन्फरंसिंग तर सतत चालूच असतात. सकाळी ७ ते रात्री १०-११. एकूण चित्र असे आहे की भारतातल्या लोकांनी ह्या गोष्टींचा अंदाज तातडीने घेऊन पावले उचलायला हवीत अन्यथा दिवस अवघड होत जाणार आहेत!
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 09/05/2010 - 22:46 नवीन
आयटीमध्येही भारत इंचा-इंचाने माघार घेतोय तर! (छ्या. पत्र पाठवायलाच हवं!)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/06/2010 - 01:48 नवीन
घेताय का ड्राफ्ट करायला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 09/06/2010 - 05:07 नवीन
ते काम सध्या जाकार्ताला आउट्सोर्स झालय म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
य
यशोधरा Tue, 09/07/2010 - 13:08 नवीन
ते बुदबळांच्या ड्राफ्टचे काय झाले की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सहज Mon, 09/06/2010 - 01:42 नवीन
काय योगायोग बघा, काल आमच्याकडे डिनरला एक उच्चशिक्षीत मुळच्या बेजींगच्या तै होत्या. बरेच बोलणे झाले ह्या विषयावर. फॅक्टरी वर्कर कमी पैशावर तसेच पांढरी कॉलरवाले देखील कमी पैशात काम करत आहेत. तसेच स्वःता ह्या तै त्यांच्या टिम मधील इतर मंडळी वेळेचा 'सुदूपयोग' कसा करतात व ह्या ताई किती राबतात व तसे राबायची त्यांची श्रमसंस्कृती आहे हे कळले त्यामुळे मुद्दा क्रमांक ५ शिक्कामोर्तब तुम्ही भारतीय लोक फार छान इंग्रजी बोलता असे त्या ताईंनी अनेक वेळा ऐकवले, मिभोंनी एकच शब्द वापरला बोलबच्चन! बाकी ह्या तैंचा मोठा भाउ पि एच डी, स्वताचा सॉफ्टवेयर डेव्हेलपमेंट बिझनेस फारसा चालेना म्हणून साईडबदली आता सिग्रेटी विकतो, बक्कळ पैसा कमावतो. आपल्याकडे किती जण पीएचडी करुन दोन्-चार वर्षात पूर्ण वेगळे क्षेत्र निवडतील?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 09/06/2010 - 02:28 नवीन
१.. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख. जसे बीजींग > बंगलोर तसे हैदराबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, मद्रास यांचे काउंटरपार्टस उपलब्ध आहेत किंवा कसे याबद्दल आतापावेतो काही माहिती मिळाली का ? २. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात. या मुद्द्याचा बीजींग बंगलोर वर मात करत आहे या मुद्द्याच्या दृष्टीने कसा उपयोग होईल ? (असलाच तर हा मुद्दा काउंटरपॉईंट नाही का होणार ? म्हणजे जर बीजींग मधे इतकी मागणी असेल तर त्याचा अर्था असा लावायचा का , की बीजींगला ऑल्टरनेटीव्ह तयार झालेला नाही. (जशी भारतातली उपरोक्त केंद्रे आहेत. ) ) ३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत. हा मुद्दा बरोबर वाटतो खरा. आय आय् टी सारख्या संस्थाही चायनात असल्या पाहिजेत असे धरतो. ४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे. ज्यांना इंग्रजी येते - म्हणजे जे तुमच्या भाषेत बोलबच्चन आहेत - त्यांचे काम (इंग्रजी चांगले येत असल्याने आपोआपच !) सरसकट निकृष्टच असते असे तुमचे म्हणणे असल्यास तुमचा मुद्दा रोचक आहे इतपत म्हणता येईल. ५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.) या आकडेवारीत कम्युनिकेशनही धरले आहे काय ? ६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही. हा मुद्दा मला कळला नाही. थोडा कळेल अशा विस्ताराने सांगितले तर आनंद होईल. माझ्याकडे आकडेवारी नाही पण एकंदर भारतीय कंपन्या हमाली करत करत का होईना , पण साधारण दहाएक वर्षांत तीन-चारशे मिलियन्स च्या टर्नओव्हरच्या टप्प्यापर्यंत येतात. विप्रो-इन्फि-टाटा सारखे लोक जास्त यशस्वी कारण जास्त हमाल एकदम कामाला लावतात. यापेक्षा वेगळे बीजींगचे लोक नक्की काय करतात ? एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ? तुमच्या मुद्द्यात अर्थातच तथ्य वाटते. परंतु काही "फिल इन द ब्लँक्स" हव्यात असे वाटले. येत्या दहा वर्षांत अ‍ॅपल/ऑर्कल/मासॉ यांच्याशी स्पर्धा करणारे प्रोडक्ट बीजींगमधून येईल असे तुम्हाला वाटते काय ? की तुमची सर्व निरीक्षणे सर्व्हिस-ओरिएंटेड धंद्यापुरतीच आहेत ? तसे असेल तर , वोंट दे कम अ लिटील शॉर्ट ऑफ युअर एक्स्पेक्टेशन्स ? भारताच्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेस च्या प्राबल्याला आव्हान रशियाकडून असेल असे मी साताठ वर्षांमागे ऐकत आलो. कदाचित त्यांच्याकडे संख्येने इतके हमाल एकदम नसतील. चायना मधे अर्थात तो प्रश्नच नाही. तुमच्या लेखात बंगलोरच्या लोकांना (चोता दोन, तुम्हाला वैयक्तिक संबोधून नाही ! ) काही सल्ले असते तर आणखी चांगले झाले असते. अजूनही द्या. आनंद होईल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा