Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बंगलोरला धोका बीजिंगचा

म
मिसळभोक्ता
Sun, 09/05/2010 - 19:06
🗣 101 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14210 वाचन

💬 प्रतिसाद (101)
स
सन्जोप राव Mon, 09/06/2010 - 02:41 नवीन
एकंदरीत काहीतरी सनसनाटी लिहायचे आणि मग धूमधडाका उडवून द्यायचा अशा लिखाणाची सध्या मिसळपाववर चलती दिसत आहे. चला, मीही तसा एक लेख लिहायला घेतो. स्वीपिंग स्टेटमेंट्स हा बागुलबुवासारखा दोष सोडला तर मिसळभोक्ता यांच्याशी सहमत होण्याला पर्याय दिसत नाही. भारतियांची प्रॉडक्टिव्हिटी (चुकून 'प्रॉडॉक्टिव्हिटी' लिहीत होतो ) यावर लिहिण्यासाठी ग्रीन कार्ड असावेच लागते का हा एक रोचक मुद्दा आहे. मुसुराव, यावर काही प्रकाश टाकता?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 09/06/2010 - 03:36 नवीन
भारतियांची प्रॉडक्टिव्हिटी (चुकून 'प्रॉडॉक्टिव्हिटी' लिहीत होतो ) यावर लिहिण्यासाठी ग्रीन कार्ड असावेच लागते का हा एक रोचक मुद्दा आहे. हाहा. नाही नाही. यू एस सिटीझनशिप लागते. - बोलबच्चन-आय्टी-हमाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
च
चतुरंग Mon, 09/06/2010 - 03:55 नवीन
खास रावांचा पंच!! ;) (नॉनायटी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सन्जोप राव Mon, 09/06/2010 - 07:24 नवीन
सिटीझनशिपच. बरोबर. मग हिरव्या कोचावर (की काऊचवर? बरोबर अमेरिकन उच्चार शोधा बुवा!) बसून बारा-चौदा वर्षांची जुनी शिवास ( की चिवास? ब.अ.उ.शो.बु!) पितापिता भारतात कायकाय चुकीचे आहे (आणि म्हणून आम्ही भारतात रहात नाही बुवा!) असले वामकुक्षाळ विचार करता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:43 नवीन
जकार्तात बसून चीन भारताचा भूभाग बळकावते आहे, अशी आरडाओरड करणे म्हणजे सनसनाटी, हे नक्की. पण बंगलोरला दहा-वीस लोकांना नोकरीला लावून, त्या ऐवजी बीजिंगचे तीन लोक देखील ते काम चांगले करू शकतील, अशी खात्री पटल्याने बंगलोरच्या चमूला राम राम ठोकणे, आणि बीजिंगला ५ लोकांना नोकरी देणे, असे प्रत्यक्ष करून जे लिहिले जाते, त्याला वस्तुस्थिती म्हणावे, सनसनाटी लेखन नाही, असा माझा प्रामाणिक समज आहे. फक्त शिवास पीतापीता "भारतात काय चुकीचे आहे" अशी बोंबाबोंब करणारे असतील कदाचित. आम्ही त्यातले नाही. आणि आमची शिवास १८ वर्षे जुनी आहे. १२ तर सगळेच पितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
व
विंजिनेर Tue, 09/07/2010 - 03:04 नवीन
पण बंगलोरला दहा-वीस लोकांना नोकरीला लावून, त्या ऐवजी बीजिंगचे तीन लोक देखील ते काम चांगले करू शकतील, अशी खात्री पटल्याने बंगलोरच्या चमूला राम राम ठोकणे, आणि बीजिंगला ५ लोकांना नोकरी देणे, असे प्रत्यक्ष करून जे लिहिले जाते, त्याला वस्तुस्थिती म्हणावे,
सो इज धिस धागा अबाउट अस्वेजिंग युअर गिल्ट - दॅट यु चोज स्लाण्टाआईज ओव्हर देसिज अँड नाउ यु वाँट टु समहाउ कन्व्हिन्स समवन लाईक मिपाकर्स(हु डोण्ट मॅटर एनिवे) द्याट इट इज ओके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सहज Tue, 09/07/2010 - 03:18 नवीन
म्हणजे बोलबच्चनगिरीचा अजुन एक नमुना म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
म
मुक्तसुनीत Tue, 09/07/2010 - 03:26 नवीन
अ लॉट ऑफ पोलिटिकल इनकरेक्टनेस हिअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
व
विंजिनेर Tue, 09/07/2010 - 03:33 नवीन
मेबी सर मेबी. बट अ‍ ओनेस्ट डाउट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ग
गांधीवादी Mon, 09/06/2010 - 02:49 नवीन
>>बंगलोरला धोका बीजिंगचा मला असे वाटत नाही, माझा स्वतःचा अनुभव थोडा विपरीत असा आहे. चीनी जागतिक स्पर्धेत फार काळ टिकून राहतील कि नाही हे मला जरी माहित नसले तरी, काही अनुभव इथे मांडावेसे वाटतात. १) ह्यांना धंदा करण्यापेक्षा दुसर्याला लुबाडण्यातच जास्त रस असतो. दुसर्याशी सन्मानाने, प्रामाणिकपणे धंदा करणे ह्यांच्या रक्तातच नाही. २) सोन्याची अंडे देणारी कोंबडी मारून खाण्याची जात आहे हि. हे जगाच्या रथावर जरी स्वार झाले तरी त्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे ते लवकरच आपटेल देखील जातील. ३) हि लोक अतिशय क्रूर, निर्दयी आहेत. पैशासाठी वाट्टेल ते करण्याची यांची तयारी आहे. हे लक्षण दीर्घकाळ साथ देत नाही. याउलट भारतीय लोक सदरुदयी, सहिष्णू म्हणून गणली जातात. ४) आपल्याकडील नोकर मंडळी व धंदा करणारी लोक त्यांच्या पेक्षा जास्त प्रामाणिक आहेत. त्यांनी जागतिक बाजारपेठांत आपला एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. चीनी लोकांचा (भारतीय लोकांच्या तुलनेने) जगाशी अजून काही जास्त संबंध आलेला नाही. भारतीय लोकांनी आपली हुशारी कर्तबगारी ह्याच्या जोरावर जगभरात आपले नाव कमाविले आहे. जागतिक बाजारपेठेत नाव कमविणे यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते, पण नाव घालवायला फार वेळ लागत नाही. चिन्यांच्या बाबतीत एक उदाहरण मला नेहमी द्यावेसे वाटते, चीन म्हणजे असा एक माणूस आहे कि जो श्रीमंत आहे पण फक्त आपल्या घरात, जो कधी अजून घराच्या बाहेर पडला नाही. सर्व सुखसुविधा आहेत, पण घरात. बाहेरच काही माहित नाही. हा एक लेख आले होता मागे. चिमणे डोळे... मोठी स्वप्ने! ह्यातील एक वाक्य >>आपल्याकडच्या "बिजली - सडक - पानी'च्या राजकीय कंठाळ्या, अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मतांचा गलबला बरा की चीनमधला पोलादी पण सुरक्षित पिंजरा बरा हे न कळे. चीन म्हणजे पोलादाचा सुरक्षित पिंजरा . (पण पिंजरा म्हणजे पिंजराच कि हो ) घरातून बाहेर पडून जरा जगाशी लढा म्हणावं, मगच कळेल खरा धोका कोणाला ते. जी काही ह्यांनी प्रगती केलेली दिसत आहे ती प्रगती नसून राजकार्यांचे एकाच दिशेने चालेली वाटचाल आहे. भारताला खरा धोका बाहेरून नसून अंतर्गत आहे. तो कसा हे मी इथे सांगण्याची आवश्यकता नाही. आपण आख्या जगाला पुरून उरू, (ह्यात अतिशयोक्ती अजिबात नाही) पण जरा इथेच थोडी घाण साफ करायची वेळ आलेली आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 09/06/2010 - 06:53 नवीन
मिभो तुम्ही एकांगी विचार करत आहात असे वाटते आहे. एक सोफ्टवेअर कंपनी चालवायची म्हणजे केवळ संगणक अभियंते असुन चालत नाही. सगळेच व्यावसायिक पाहिजेत तिथे. आय आय एस सी शिवाय बँगलोर मध्ये एकही चांगली शिक्षणसंस्था नाही हे तुमचे मत म्हणजे या एकांगे विचाराचाच प्रभाव आहे. बँगलोर मध्ये नेशनल स्कूल ओफ लॉ आणि आय आय एम अश्या २ उच्च तोडीच्या शिक्षणसंस्था आहेत जिथुन बाहेर पडणारे विद्यार्थी हे कुठल्याही देशात चांगले आउटपुट देउ शकतात. संगणक कंपनी चालवण्यासाठी हे २ व्यावसायिक देखील लागतात. बाकी चीन बद्दल मला अनुभव नाही. कदाचित ते लोक आपल्यापेक्षा चांगले असतीलही. पण तुम्हीच म्हणता तसे इंग्रजी चा मुद्दा आहेच. या बाबतित खुप आनंदी आनंद आहे.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 09/06/2010 - 07:35 नवीन
६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.
-हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असे म्हणतो. हे नुसते आयटीबाबत नाही तर सर्वच तंत्रज्ञानाबाबत आहे. (ही चर्चा वाचण्यापूर्वीही माझे असेच मत होते.) भारत सर्वच बाबतीत वरवरची कामे करत आहे. 'भारताने निर्माण केलेले (तथाकथित) नवे तंत्रज्ञान' म्हणजे इतर देशांनी निर्माण केलेल्या कच्च्या मालाची जुळवाजुळव असते. (जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...) तो कच्चा माल (किंवा ओईएम्/ऑफ द शेल्फ माल) मुळातून तयार करण्याची कुवत जोवर भारतात येत नाही तोवर त्या 'नव्या' तंत्रज्ञानाचे पोकळ पडघम वाजवण्यात काहीच अर्थ नाही. इथे चीन भारताच्या कैकवर्षे पुढे आहे. (ही कुवत भारतीयांच्यात नाही असे नाही. पण ती कुवत त्यांना परदेशात जाऊन सिद्ध करणे भाग पडते ही खरी समस्या आहे. तोवर ते भारतीय रहात नाहीत. :()
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 09/06/2010 - 17:20 नवीन
एकदम चपखल शब्द! "भारत सर्वच बाबतीत वरवरची कामे करत आहे. 'भारताने निर्माण केलेले (तथाकथित) नवे तंत्रज्ञान' म्हणजे इतर देशांनी निर्माण केलेल्या कच्च्या मालाची जुळवाजुळव असते. (जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...) तो कच्चा माल (किंवा ओईएम्/ऑफ द शेल्फ माल) मुळातून तयार करण्याची कुवत जोवर भारतात येत नाही तोवर त्या 'नव्या' तंत्रज्ञानाचे पोकळ पडघम वाजवण्यात काहीच अर्थ नाही. इथे चीन भारताच्या कैकवर्षे पुढे आहे." You summed it up! सुधीरभाऊंनी चीनच्या बद्दल सुरु केलेल्या धाग्याच्या संदर्भातही भारत - चीन तुलना करता, संरक्षण संशोधन व उत्पादनात आपण इथेच मार खातो. भारतीय संरक्षण संस्था (तसेच इतर क्षेत्रातील खाजगी कंपन्या) एखादे तंत्रज्ञान विकत घेताना ते आधी जगात कोठे घेतले गेलेले असेल / सिद्ध झाले असेल तरच घेतात. कुठलेही तंत्रज्ञान मुळातुन निर्माण करायला कचरतात. कुठल्याही क्षेत्रात मुलभुत व नवीन कार्य (Pioneering Work in Technology) करायची आमची तयारी नाही. त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा असूनही आम्ही शेवटी हमालच आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
संजय अभ्यंकर Mon, 09/06/2010 - 17:43 नवीन
बाकी मिभोसाहेब पहील्या चीन भेटीत चीनवर भाळलेले दिसतात! वारंवार चीन मध्ये जाणारे लोक सांगतातकी चीन मध्ये तयार झालेल्या मुलभूत सुविधांमध्ये जर्मनीचा सहभाग फार मोठा आहे. अजून काहीवेळा चीन मध्ये गेल्यावर कदाचीत मत वेगळे होइल. आपल्या "बोलबचनगीरी" बद्दल वाद नाही. भारतीयांवर केलेल्या टीके बद्दलही वाद नाही. आपल्या देशात केबीन दिली नाही, कार दिली नाही, ड्रायव्हर (शोफर) दिला नाही म्हणून कंपनी सोडणारे, राजीनामा देणारे महाभाग जगोजागी आहेत. परंतु अजून काहीवेळा चीनला जावे मगच मत बनवावे, कदाचीत मत वेगळे होइल. (एका जर्मनाने मला खिजवण्या साठी एकदा सांगीतले की चीन मध्ये पहा चिमुरडी पोरंसुद्धा फाडफाड इंग्रजी बोलतात. मी ही आश्चर्याने डोळे मोठे केले. त्याला खेदाने सांगीतले की आमच्या देशात आम्हि फक्त मोठे झाल्यावरच इंग्रजी बोलायला लागतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:51 नवीन
परंतु अजून काहीवेळा चीनला जावे मगच मत बनवावे, कदाचीत मत वेगळे होइल. प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. मुक्तस्रोत प्रकल्पांत जगातील सर्व कान्याकोपर्‍यांतून सॉफ्टवेयरचे कोड निर्माण होत असते. त्यात चायनीज अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस, शिंघुआ, पेकिंग नॅशनल इत्यादि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचे योगदान बघा, आणि त्याची आय आय टी, आय आय एस सी, किंवा भारतातील इतर कुठल्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे योगदान बघा, आणि फरक समजून घ्या. किंवा चायना मोबाईल, बायडू, तावबाव, व्हावे ह्यांनी मुक्तस्रोत केलेले प्रकल्प बघा, आणि शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते. त्यासाठी चीनमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. इट्स द कोड. नथिंग एल्स मॅटर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
च
चिरोटा Mon, 09/06/2010 - 19:15 नवीन
शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते.
भारतातल्या आय टी कंपन्या प्रामुख्याने पॅकेज सॉफ्ट्वेयरवर काम करतात्.(पूर्वी म्हणजे ९६/९७ पर्यंत वेगळी परिस्थिती होती). पॅकेज सॉफ्ट्वेयरला genealized software(c/C++/Linux/mysql) पेक्षा जास्त डिमांड गेल्या १५ वर्षात आला. पॅकेज सॉफ्टवेअरची मागणी त्यामुळे वाढली. मुक्तस्रोत प्रकल्पांकडे कमी कंपन्या अर्थातच कमी लोक आकर्षित झाले. मुक्तस्रोत प्रकल्पांत भारताचा सहभाग कमी असण्याचे मुख्य कारण पॅकेज सॉफ्टवेयरला जास्त मागणी हे आहे. कोड मॅटर्स पण इकॉनॉमिक्स मॅटर्स टू. चीनमध्ये मुक्तस्रोत प्रकल्पांत जास्त लोक सहभागी आहेत त्यामागे मुख्य कारणे काय आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 19:16 नवीन
पॅकेज सॉफ्टवेयर (म्हणजे काय?) काही उदाहरणे द्याल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Mon, 09/06/2010 - 19:33 नवीन
Siebel/SAP/Informatica/weblogic वगैरे. मोठ्या प्रॉड्क्ट कंपन्यांनी बनवलेले सॉट्वेयर समजून घेणे आणि client च्या गरजेप्रमाणे customized करणे. हे करण्यासाठी insertion sort आणि bubble sort मधिल फरक जाणून घेण्याची गरज नाही!! मोठ्या कंपन्या मुख्य्त्वे अशा सॉफ्ट्वेयरवर काम करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 19:43 नवीन
हे करण्यासाठी insertion sort आणि bubble sort मधिल फरक जाणून घेण्याची गरज नाही!! सिबेल कस्टमायझेशनसाठी ऑरॅकल आणि डीबी२ ऑर्डर-बाय कसे इंप्लिमेंट करते, हे माहिती असण्यची आवश्यकता नाही ? आणि इन्सर्शन सॉर्ट ? बबल सॉर्ट ? दोघांची कॉम्प्लेक्सिटी महिती आहे ना ? दोघांनाही फाट्यावर मारून हीपसॉर्ट किंवा क्विकसॉर्ट वापरावे, हे तरी किमान माहिती असायला हवे. म्हणजे उरलेले कस्टमायझेशन म्हणजे फक्त वेबपृष्ठांचे रंग बदलणे, एवढेच. खरे ना ? सीबेल मध्ये लोड बॅलन्सिंगसाठी सिस्कोचा लोड बॅलन्सर घ्यावा की सिबेल मधला बिल्ट-इन सॉफ्टवेयर लोड बॅलन्सर वापरावा ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आजवर सिबेलचा एकही भारतीय प्रोफेशनल-सर्विसदाता देऊ शकलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Tue, 09/07/2010 - 15:33 नवीन
आणि इन्सर्शन सॉर्ट ? बबल सॉर्ट ? दोघांची कॉम्प्लेक्सिटी महिती आहे ना ? दोघांनाही फाट्यावर मारून हीपसॉर्ट किंवा क्विकसॉर्ट वापरावे, हे तरी किमान माहिती असायला हवे.
हे माहित असायलाच हवे हे मान्य पण गेल्या काही वर्षात चित्र असे आहे की बर्‍याच वेळा(९९% केसेस्मध्ये) ह्याची गरज भासत नाही. पॅकेज सॉफ्टवेयरवाल्या कंपन्या 'आमचे प्रॉड्क्टच under the hood सगळी काळजी घेतील. तुम्ही business functionality वर लक्ष केंद्रित करा' अशा जाहिराती करतातच ना? दररोजच्या कामात सॉर्टिंगचा प्रोग्रॅम लिहिणारे/अभ्यासणारे किती असतील?(१% किंवा २%)? सर्विस आय टी मध्ये कुठल्या प्रकारची कामे येतात?वर सांगितलेच आहे-JOT ची कामे बहुतांशी असतात्. अशा प्रकारच्या कामातून मुलभूत काही घडेल अशी अपेक्षा करणे म्हणजे हिमेश रेशमिया एखादा शास्त्रिय हिंदुस्तानी नविन राग शोधून काढेल अशी अपेक्षा करण्यासारखे आहे!.
म्हणजे उरलेले कस्टमायझेशन म्हणजे फक्त वेबपृष्ठांचे रंग बदलणे, एवढेच. खरे ना ?
अशा प्रकारची कामे मिळवून विप्रो/इन्फि बराच पैसा मिळवत असतील तर त्यांच्या सेल्स्/मार्केटिंग टीमला सलाम.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
य
युयुत्सु Tue, 09/07/2010 - 04:36 नवीन
किंवा चायना मोबाईल, बायडू, तावबाव, व्हावे ह्यांनी मुक्तस्रोत केलेले प्रकल्प बघा, आणि शोधा इन्फी, विप्रो, टी सी एस ह्यांनी जगाला काय दिले आहे, ते.
भारतात आजतागायत एकही समाधान कारक देवनागरी ocr किंवा text to speech साधन तयार झालेले ऐकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
य
युयुत्सु Tue, 09/07/2010 - 04:23 नवीन
त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा असूनही आम्ही शेवटी हमालच आहोत.
ही श्रींची इच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
R
ramjya Mon, 09/06/2010 - 07:48 नवीन
शक्य आहे ....माझ्या वाचनात आले आहे की चीन जगात दुसर्‍या नम्बरची आर्थीक महासता झाली आहे......आणी चीन ने औलम्पीक स्पधा यशस्वी करुन दाखव्ली होती........आणी आपली कौमनवेल्थ ची तयारी
  • Log in or register to post comments
स
समंजस Mon, 09/06/2010 - 11:01 नवीन
>>आणी चीन ने औलम्पीक स्पधा यशस्वी करुन दाखव्ली होती........आणी आपली कौमनवेल्थ ची तयारी.... तुम्हाला काय वाटतंय? कोण जबाबदार आहे आपल्या कॉमनवेल्थ च्या तयारीला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/06/2010 - 09:23 नवीन
अवांतर :- भारत 'महासत्ता' होणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे कोणी सांगु शकेल काय ?
  • Log in or register to post comments
न
नरेश धाल Mon, 09/06/2010 - 09:47 नवीन
मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नरेश धाल Mon, 09/06/2010 - 09:47 नवीन
मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिरोटा Mon, 09/06/2010 - 13:32 नवीन
भारत 'महासत्ता' होणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे कोणी सांगु शकेल काय
ते अब्दुल कलाम ह्यांना नेमके माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश धाल
ऋ
ऋषिकेश Mon, 09/06/2010 - 09:26 नवीन
बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
अरे वा! रेझ्युमे कुठे पाठवावा? :P (जगाचा नागरीक) ‍ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:54 नवीन
२०० चिन्यांपैकी एक भारतीय आहे बीजिंगच्या आम्च्या ऑफिसात. भारतीय म्यानेजरला कंटाळून त्याच्या कष्टाचे चीज होईल म्हणून आलाय इथे. आणि प्रचंड खूष आहे. पण एक अट. कॉम्प्युटर सायन्स वाला हवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
श
शुचि Mon, 09/06/2010 - 19:01 नवीन
>> भारतीय म्यानेजरला कंटाळून >> I am not the only one !!!! Thank God!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ऋ
ऋषिकेश Tue, 09/07/2010 - 09:56 नवीन
>>कॉम्प्युटर सायन्स वाला हवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला नको. अरेरे अटीत बसत नाही :( (म्हंजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला मागितलात तरी अटीत बसत नाहीच (आमचं कागदोपत्री शिक्षण ह्या दोन्हीमधे नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
क
कुंदन Tue, 09/07/2010 - 11:15 नवीन
बँगलोर तुझ्यासाठी योग्य ठरेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
आ
आजानुकर्ण Mon, 09/06/2010 - 10:47 नवीन
पैशासाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात
जे२ईई मध्ये काम करण्यात नक्की वाईट काय आहे? सर्वलेट, जेसपी, जेएसएफ, स्प्रिंग, फ्लेक्स, वेब सर्विसेस (मेट्रो, जेडब्लूएस, ऍक्सिस), हायबरनेट यापैकी नक्की कलप्रिट कोण आहे ते सांगा बुवा. उद्या कोणी सी++ मध्ये काम केले तर त्याला सी मध्ये काम करत नाही म्हणून हाणायचे. सीमध्ये काम करणाऱ्याला असेंब्ली लॅँगवेजमध्ये काम करत नाही म्हणून हाणायचे. अशी पॉलिसी आहे काय? उद्या चिन्यांनी जे२ईईमध्ये काम केले असते आणि भारतीय प्रोग्रामर सी मध्ये काम करत असते तर चिन्यांनी तंत्रज्ञानात कशी प्रगती केली आहे हे तुम्हीच आम्हाला दाखवले असते. असो.. खालील चित्र पाहा व हसा. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 09/06/2010 - 18:55 नवीन
जे २ ई ई चे अ‍ॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ? कंटेनर म्हणजे काय, हे नक्की समजवून सांग मला. मग बोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 09/07/2010 - 05:56 नवीन
जे २ ई ई चे अ‍ॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ?
नाही.
कंटेनर म्हणजे काय, हे नक्की समजवून सांग मला. मग बोल.
इथे इंटर्व्यू चालला आहे का? कोणता कंटेनर ? इजेबी की वेब? मल्टिथ्रेडिंग, सेक्युरिटी आणि लाईफसायकल म्यानेजमेंट करणारे वेब कंटेनर असते बॉ. आता टॉमक्याट हा ऍप सर्वर कसा नाही हे विचारु नका. (जेबॉस) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
समंजस Mon, 09/06/2010 - 11:02 नवीन
आपल्याला एकदम पटलंय. केव्हा पासून वाट बघतोय मुंबईची शांघाई होण्याची :) म्हणजे काय आपसूकच चीनच्या आर्थिक उन्नतीत भागीदार व्हायला मिळेल. [अवांतर: कुठे गेलेत ते राजकारणी, नेते, सरकार ज्यांनी मुंबईची शांघाई करण्याची घोषणा करून मला हुरळून टाकलंय. बंगलोरचं बीजींग करून टाकता येईल का?]
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/06/2010 - 12:07 नवीन
चीन सध्यातरी आपल्या पुढे आहे हे मान्य करायलाच हवे,परंतु आपल्याला जास्त चिंता करायला पाहिजे असे मला तरी वाटत नाही. डेल आपला चायना बेस सोडुन हिंदूस्थानात येत आहे,गुगल चीन वाद तर आता सार्‍या जगालाच माहित झाला आहे. http://www.2point6billion.com/news/2010/03/23/dell-switching-pc-exports-from-china-to-india-4706.html http://www.2point6billion.com/news/2010/03/26/u-s-tech-companies-follow-google-out-of-china-4795.html हे देखील वाचा :--- http://www.allvoices.com/contributed-news/6674537-foreign-companies-losing-out-in-china http://www.caclubindia.com/articles/shifting-in-out-of-china--4720.asp चीन मधुन हिंदूस्थानात आयात होण्यार्‍या वस्तुंवर जरी निर्बंध घातले तरी चीनला त्याचा चांगलाच फटका बसु शकतो. (टेलिकॉम रिलेटेड सामुग्री चीन्यांकडुन अजिबात घेउ नये अशी स्थिती आहे,कारण चीनी अशा वस्तुंचा वापर करुन हेरगिरी करतो.) डॉटने सुरक्षिततेच्या कारणास्तव टेलिकॉम कंपन्यांना चीनी उपकरणे वापरु नका असे बजावले आहे. http://www.business-standard.com/india/news/dot-for-keeping-chinese-outtelecom-orders/368444/ चीन मधे सध्या दुसराच उद्योग तेजीत आहे,कुठला ? ( http://bit.ly/9IE6EE ) ;)
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Mon, 09/06/2010 - 13:24 नवीन
येत्या काही वर्षात भारतातली परिस्थिती कठीण होणार आहे हे निश्चित. १. भारत महासत्ता होणार आहे हा फुगा लवकरच फुटेल. २. अमेरिकेतून येणाऱ्या आयटी व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होईल. (अगदी आयटी हमाली करने सुद्धा कठीण होइल) ३. उपलब्ध नोकर्या आणि भारताची लोकसंख्या यांचे प्रमाण अगदीच व्यस्त होत जाईल. ४. भारतात मिळणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा इतका खालावेल कि बाहेर पडणारे पदवीधर केवळ नावाचे पदवीधर असतील. कोणत्याही व्यवसायिक समस्येचे ते निराकरण ते करू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 09/06/2010 - 13:40 नवीन
ही 'ओरड' कित्येक वर्षापासून चालु आहे.फोर्ब्स्,ईकॉनॉमिस्ट्,फॉर्चुन,फॉरेस्टरच्या लोकांना अधून मधुन झटके येत असतात.झटका आला की ते फासे टाकून कुठलातरी देश निवडतात. कुठल्या देशाला हरभर्‍याच्या झाडावर चढवायचे आणि कोणाला उतरवायचे हे ठरते.आणि मग आपण कुठलीतरी 'सक्सेस स्टोरी' वाचतो.तर कधी त्याच देशात देशात पाणी प्यायचे वांदे असेही वाचतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय काही खरे नाही असे सांगून लेखाचा शेवट होतो आणि आपली तेवढीच करमणूक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा
छ
छोटा डॉन Mon, 09/06/2010 - 13:48 नवीन
फोर्ब्स्,ईकॉनॉमिस्ट्,फॉर्चुन,फॉरेस्टरच्या लोकांना अधून मधुन झटके येत असतात.झटका आला की ते फासे टाकून कुठलातरी देश निवडतात. कुठल्या देशाला हरभर्‍याच्या झाडावर चढवायचे आणि कोणाला उतरवायचे हे ठरते.आणि मग आपण कुठलीतरी 'सक्सेस स्टोरी' वाचतो.तर कधी त्याच देशात देशात पाणी प्यायचे वांदे असेही वाचतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारल्याशिवाय काही खरे नाही असे सांगून लेखाचा शेवट होतो आणि आपली तेवढीच करमणूक होते
+१, क्या बात है ! एकदम मार्मिक भाष्य, अगदी कट टु कट सहमत . मध्यंतरी 'रिसेशन आणि बेल-आउट्'च्या पिरियडमध्ये तर ह्यांनी मनोरंजनाचा असा धडाका लावला की ज्याचे नाव ते. मी तर मटाचे 'हसा लेको' सोडुन हे वाचत बसायचो ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
मराठमोळा Mon, 09/06/2010 - 14:15 नवीन
हमम्म्म्म्म्म्म्म्म्म, किती जणांनी अभ्यास/विचार करुन प्रतिसाद दिला आहे बरं? आणि हा लेख एका माणसाच्या स्वानुभवावरुन आहे हेही सत्यच. असो, मला तरी वैयक्तिक रित्या लेख अनावश्यक/पँडेमिक वाटला, म्हणजे ४०-५० वर्षे अनुभव असलेल्या अथवा मोठ्या मोठ्या विचारवंतांना वेड्यात काढले आहे सरळ सरळ.. असो, चालु द्या.. मराठी माणसांनो... चालु द्या...
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 09/07/2010 - 02:21 नवीन
असले प्रश्न पडतात त्यावरून तुम्ही मराठी नाहीत असं वाटतं...नुसतंच नाव घेतलंय मराठमोळा म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ग
गोगोल Tue, 09/07/2010 - 03:53 नवीन
ज्यांना ४०-५० वर्षांचा अनुभव आहे ते कोण आहेत? Or did you just pull these "facts" out of your head? संपादक - गोगोल, कृपया भाषा संयत असूदेत, विचार काहीही असले तरी बिलो द बेल्ट वार नको!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
व
वेताळ Mon, 09/06/2010 - 14:31 नवीन
परवा जेवायचे हॉटेलचे वांदे होते .आता एकदम चीन इझ बेस्ट... पण काही ही असो चीन मला खुप आवडतो.मिचमिच बघणारे लोक इतके पुढे आहेत हे बघुन मन भरुन आले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/06/2010 - 16:14 नवीन
मिचमिच बघणारे लोक इतके पुढे आहेत हे बघुन मन भरुन आले.
सहमत..:) चिक्कन चिल्ली लेकाचे..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नि३ Mon, 09/06/2010 - 21:22 नवीन
बाकी भारत सोडुन सध्या तरी कुठला देशाचा अनुभव नाही आयटी क्षेत्रात काम करण्याचा. पण भारतीय आयटी कंपनीत बोलबच्चनगिरी भयानक आहे ..कदाचीत आयटी क्षेत्रात काम करतांना सर्विकड्ची हीच स्थीती असेल. सर्व नुसत हवेत बोलायच Quality,standard,process etc..अबे नक्की काय करायच ते सांग ना..साला बेसीक मधेच मार खातो आपण.....
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 09/07/2010 - 02:23 नवीन
बोलबच्चान्गिरी म्हणजे नेमकं काय करतात हो लोकं? काम केल्याशिवाय तर कोण पैशे देणार नाही...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 09/07/2010 - 05:17 नवीन
मिभो, तुमचं संगणक शास्त्राचं ज्ञान जेवढं आहे त्याच्या एक दशांश जरी तुम्हाला अर्थशास्त्राचं ज्ञान असतं तर तुम्हाला कळालं असतं की बंगलोरला बीजिंगचा काहीही धोका नाही, असलाच तर अमेरिकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा आहे (पण त्यातून फायदा ही होऊ शकतो). शिवाय अमेरिकन अभियंते फार हुषार आणि कार्यक्षम असतात हा जो तुमचा भयंकर गैरसमज आहे ना तो काढून टाका. अमेरिकन अभियंते एवढे भारी असते तर अमेरिकेत रशियन आणि त्या खालोखाल भारतीय लोकाना एवढी मागणी नसती आली आणि बिल गेट्सने H1 विजाचे प्रमाण वाढवण्यासाठी एवढी बोंब नसती मारली. चिनी माल आणि चिनी गुणवत्ते बद्दल एवढ्या ममत्वाने बोलणारे मी पाहिलेले तुम्ही पहिलेच! इथे सिंगापुरात एखादी वस्तू विकायची असेल तर ती 'मेड इन चायना' नाही असं आधी सांगावं लागतं. परिस्थिती हवी तेवढी चांगली नसली तरी इतर देशांच्या मानाने बरीच चांगली आहे आपल्याकडे. पुढे स्पर्धा वाढेल तशी गुणवत्ता ही वाढवावीच लागेल लोकाना. मागणी-पुरवठ्याप्रमाणे स्वतःला कसं बदलावं हे भारतीयाना व्यवस्थित कळतं, काळजी नसावी. अवांतर: भारतीय कंपन्यांनी काहीच नवीन दिले नाही अशी (फक्त)बोंब मारायची फॅशन आहे आजकाल. ज्यानी स्वतः काही नवीन केलं आहे त्यानाच तो अधिकार आहे. बाकीच्यांच्या बोंबलण्याला काहीही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 09/07/2010 - 07:20 नवीन
नाही हो. मी मारलेली बोंब फ्याशन म्हणून मारलेली नाही. "ज्यानी स्वतः काही नवीन केलं आहे त्यानाच तो अधिकार आहे." -ह्या क्याटयागिरीत येण्याचा आटोकाट प्रयत्न करून मगच बोलत आहे. पुन्हा सांगतो - ऑपरेटिंग सिस्टिम्स, इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट्स, मेम्स टेक्नॉलॉजी सेन्सर्स आणि मायक्रोकंट्रोलर्स जोवर भारतीय कंपन्यांमध्ये (भारतात) मोठ्या प्रमाणावर निर्माण होत नाहीत तोवर भारताची इलेक्ट्रॉनिक्स आणि काँप्युटर सायन्समधली प्रगती पांगळी आहे. बाकी आयटी वगैरे डेरिव्हेटिव्हज आहेत. म्हणजे दुधाची आयात करून भारतीय लोणी बनवण्यासारखे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा