पिकलं पान
💬 प्रतिसाद
(8)
अ
अथांग
गुरुवार, 09/09/2010 - 22:33
नवीन
पिकल्या पानाचं काय काय घडू शकतं ते समजलं, छान कल्पनाविस्तार!
पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काय काम? ||१||
इथे 'माझं आता काम काय' असं म्हंटलं तर ? यमक पण जुळेल...असं आपलं मला वाटतं.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/09/2010 - 23:14
नवीन
दिवसेंदिवस तुमच्या कवितेत कल्पनांचे वेगळेपण दिसत आहे.
वरती अथांगने म्हटल्याप्रमाणे थोडी यमकांची सफाई साधता आली तर कविता आणखीन खुलेल.
पुकशु.
(आस्वादक)चतुरंग
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 09/10/2010 - 01:19
नवीन
धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब अन वाचकहो.
काय आहे की गाडीच्या कारखान्यात कामगाराने निट ठाकठोकीचे काम न केल्यामुळे असले कोचे गाडीच्या पत्र्यावर राहून जातात अन गाडी शोरूम ला आणायची घाई नडते मग. मग एखादं गिर्हाईक ते कोचे निट पाहते अन कोचा असलेला पत्रा/ भाग बदलावा लागतो शोरुममध्ये किंवा मग गाडी परत कारखान्यात जाते.
कोन भरून देईल मंग नुसकानी मालकाची? :-)
अथांग, चतुरंग यांनी सांगितलेला बदल गृहीत धरूनच आगामी वाचकांनी कविता वाचावी.
अन त्या बरोबरच खालचे अॅडवलेले कडवे पण वाचावे.
पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||
पानची जाळी झाली, जाळी होण्यासाठी पुस्तकात ठेवले, वहीत ठेवले यात कल्पनेची पुनरावृत्ती झालेली आढलेल. त्यासाठी कवितेतील प्रत्येक कडवे चारोळीच्या चालीवर बघीतल्यास योग्य ठरेल.
- Log in or register to post comments
अ
अथांग
Fri, 09/10/2010 - 02:47
नवीन
पाहिलं आहे...
पिकलं पान
डुलत, झुलत अलगद खाली..
पण बघता-बघता,
भरधाव गाडीच्या- चाकाखाली :(
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 09/10/2010 - 02:57
नवीन
लगे रहो अथांग भाय!
पिकलं पान
मनात भरलं
कवितेला मग
कारण सुचलं
इतरही लोकं सामिल होवू शकतात बरं का!
- Log in or register to post comments
च
चिंतामणराव
Fri, 09/10/2010 - 08:02
नवीन
पिकलं पान
कडक उन्हात फांदीवरी
खालच्या नवीन कोंबावर
सांवली धरी
- Log in or register to post comments
व
विदेश
Fri, 09/10/2010 - 20:01
नवीन
पिकल्या पानाचं
वर्णन की हो चांगलं .
- Log in or register to post comments
अ
अथांग
Wed, 09/15/2010 - 00:07
नवीन
पिकल्या पानची
आगळीच तर्हा...
पाषाणभेद
आणि काव्यझरा(?) !!!
बाय द वे - अथांग'भाय' नाय - अथांग 'ताय' हाय - मिपाकरांच्या भाषेत 'तै' हो !
- Log in or register to post comments