Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निधर्मीपणाचे अनपेक्षित फायदे?

च
चिंतातुर जंतू
Sat, 09/11/2010 - 13:22
🗣 53 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14252 वाचन

💬 प्रतिसाद (53)
इ
इन्द्र्राज पवार Tue, 09/14/2010 - 09:16 नवीन
"देव काय, कोण हे न समजता देवाची पूजा करण्यापेक्षा पाण्याचं महत्त्व ओळखून नळाची पूजा करणं जास्त डोळसपणाचं लक्षण आहे." ~~ अदिती....हा विचार जास्त व्यवहारी आणि विज्ञानाची कास धरणारा आहेच आहे, जो मान्य करायला काहीच हरकत नाही. फक्त वर काही प्रतिसादांतून प्रतिबिंबीत झालेल्या चित्रणावरून (तसेच धागाकर्ते श्री.चिंजं यांनीही दुजोरा दिल्याप्रमाणे) समाजाचा एक घटक म्हणून वावरताना एखाद्याच्या मताला दुजोरा देताना दुसर्‍याच्या (धर्म संदर्भातील) भावनेला धक्का लागणार नाही इतपत बलॅन्स राखला तरी मला वाटते दोन्ही पक्षातून फारसा मतभेदाचा धुरळा उडणार नाही. त्या कॉलनीच्या चेअरमननी दोनदा निरोप पाठवूनही ते श्री. वा सौ. समारंभस्थळी आले नाहीत, ही नंतर अर्थातच चर्चेची बाब झाली आणि मग त्या "पूजा केलेल्या नळातील पाणी तुम्हाला कसे बरे चालत हो?" या टोमण्यासदृश्य तीरांची फेकाफेका झालीच. असो....(म्हणून त्यांना त्या नळाचे पाणी वापरण्यास कुणी अटकाव केला नाही.,.. आणि तो विषयही नंतर संपला.) परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल (वा रूपाबाबत...) जे काही उलटसुलट प्रवाद आहेत त्याची पोतडी खोलण्यापेक्षा निदान तो "आनंदघन" आहे ही संकल्पना वादी आणि प्रतिवादी या दोघांना मान्य होण्यासारखीच आहे. म्हणजे धर्मात असलेल्या कोणत्याही एका देवाचे/देवीचे नाव घेतले म्हणजे जर एखाद्याचा मस्तकशूऴ उठत नसेल तर ते नाव किमानपक्षी किंचित आनंद तरी देते इतपतच त्या आनंदघनाची व्याख्या आहे. माणसाने मग तो आनंद कशाप्रकारे मिळवावा, ही त्याची/तिची व्यक्तिगत बाब आहे. 'मी आज मल्लिकार्जुन मन्सूरांचा मालकंस ऐकला आणि देवळाच्या गाभार्‍यात उभे असल्याची भावना झाली....", 'बिस्मिल्ला खाँसाहेबांची सनई डोळे बंद करून ऐकणे म्हणजे माझ्या दृष्टीने साक्षात कृष्णभक्ती...", "भीमसेनांचा देसकार....!!! अहाहा ! काय सांगू, अहो शंकराच्या पिंडीसमोर हात जोडले..!" "लताच्या 'अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम...!' पुढे मान विनम्रतेने झुकतेच !!" ~~ हे आणि यासदृश्य उदगार ज्यावेळी आपण ऐकतो, वाचतो, त्यावेळी त्या वाक्यांचा कोणत्याही अर्थाने धार्मिकतेशी थेट संबंध जोडला जात नाही (तू त्या मैफिलीत असशील तर तुझी दाद त्या कलाकारांच्या स्वर्गीय कलेला जाणारच, फक्त भाषा सादरीकरणाची धाटणी वेगळी असेल)....संबंध आहे तो त्यामुळे मिळणार्‍या निखळ आनंदाचा, ज्याची तुलना झालीच तर फक्त झर्‍याच्या मुखाशी असलेल्या शुद्ध जलाचा ! इन्द्रा
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Tue, 09/14/2010 - 10:12 नवीन
आता ज्या नळाची इतकी वाजतगाजत धार्मिक कर्मकांडानिशी पूजा घातली, गोड प्रसाद वाटण्यात आला, त्या नळातून यांच्या फ्लॅटमध्ये येणारी पाण्याची धार हे जोडपे थांबविणार काय? त्या कॉलनीच्या चेअरमननी दोनदा निरोप पाठवूनही ते श्री. वा सौ. समारंभस्थळी आले नाहीत, ही नंतर अर्थातच चर्चेची बाब झाली आणि मग त्या "पूजा केलेल्या नळातील पाणी तुम्हाला कसे बरे चालत हो?" या टोमण्यासदृश्य तीरांची फेकाफेका झालीच.
सर्वप्रथम, समारंभाला तोंडही न दाखवणं ही तुमच्या निधर्मी जोडप्याची फारच टोकाची प्रतिक्रिया झाली हे मान्य करूयात. त्यापेक्षा पूजा-प्रसाद झाल्याची शहानिशा करून मगच तिथं पाय ठेवणं हे धोरणी माणसाचं लक्षण होईल, हेही मान्य करूयात. पण तशीच कॉलनीतल्या लोकांच्या वागण्यातही थोडी तर्कदुष्टता/अतिरेक आढळतात असं वाटतं. एक म्हणजे ज्यानं मदत केली तो नगरसेवक आणि त्यानं राबवलेली नगरपालिकेची यंत्रणा हे घरी पाणी येण्यासाठी खर्‍या अर्थानं कारणीभूत होते. ज्याची पूजा झाली तो नळ एक प्रतीक म्हणून पुजला गेला. खरे आभार नगरसेवकाचे मानायला हवे म्हणून त्याच्या हस्ते पूजा केली गेली. यात नळ हा निमित्तमात्र नव्हे का? पूजा करावी की न करावी याविषयी बहुमतानं विचार घेतला गेला असता तरी त्या निधर्मी जोडप्याला हारच पत्करावी लागली असती. त्यामुळे पूजा केलेल्या नळातलं पाणी नको असं म्हणण्याचा पर्याय त्यांना नाहीच आणि म्हणूनच एका खोचकपणातून असा प्रश्न उपस्थित केला गेला. तसंच दुसरं म्हणजे अख्खी कॉलनी पूजेला गेली असेल, तर एका जोडप्याच्या अनुपस्थितीनं असा काय फरक पडणार होता? त्यांनी पूजेत काही अडथळा आणला नाही की सार्वजनिक कार्यक्रमात काही अनुचित वर्तन केलं नाही. फक्त व्यक्तिगत पातळीवर एक निर्णय (अनुपस्थित राहण्याचा) घेतला. यावरून त्यांना टोचून बोलणं हेही जरा टोकाचंच वर्तन नव्हे का? एकंदरीत या प्रकारात एका बाजूला अख्खी कॉलनी आणि दुसर्‍या बाजूला एक जोडपं असल्यामुळे ही एक प्रकारची झुंडशाहीच होत नाही का?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/14/2010 - 10:36 नवीन
संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ... या डॉन्याच्या लेखावरील चर्चा आठवली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा