Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२६/११ आणि सलमानची माफी

ह
हुप्प्या
Mon, 09/13/2010 - 04:21
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2584 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ग
गांधीवादी Mon, 09/13/2010 - 04:57 नवीन
'सरकारला सामान्य जनतेच्या जीवाच्या काळजीपेक्षा काही काही पांढर्या कातड्यांची काळजी जास्त आहे', असे काही मत देण्याअगोदर मला पंचतारांकित हॉटेल्स, विमानतळे, संसद (जिथे केवळ धनाड्य लोकांचा वावर असतो) आणि लोकल, रल्वे / बस स्थानके, चौक, बेकरी, (जिथे सर्व साधारण लोकांचा वावर असतो ) यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत किती बदल घडला आहे हे जाणून घेणे महत्वाचे वाटते. >>मी काही सलमान खानचा फॅन नाही. पण इथे त्याचे काही चुकले नाही. त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते. सहमत, खरेतर हि त्याचीच प्रतिक्रिया नसून सर्व सामान्य माणसांत देखील अशीच काही भावना आहे. त्याने फक्त ती चव्हाट्यावर मांडली एवढेच त्याचे पाप. >>मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सलमानच्या वक्तव्यांबाबत खेद व्यक्त केला. खेद, निषेध, कडक निषेध, अति तीव्र निषेध खलिते व्यक्त करणे ह्यापलीकडे अजून काय केलं आहे का ?
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 09/13/2010 - 04:58 नवीन
त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते.
१००% सहमत. आजकाल हे अशोक चव्हाण, राऊत, भुजबळ वगैरेंसारखे विचारवंत फार सोकावले आहेत. कोणालाही कशाहीबद्दल माफी मागायला लावतात. सलमानसारख्या मान्यवर विचारवंताला, केवळ विरुद्ध बाजूचा म्हणून माफी मागायला लावणं ही कंपूबाजी झाली. पण हे करून 'सलमान भारताचं वैचारिक प्रतिनिधित्व करायला लायक आहे' या आम्हाला असलेल्या शंकेला दुजोरा दिला हे चांगलंच केलं. याच स्वरात आम्ही हेही म्हणून घेतो की या धाग्याइतका मौलिक धागा आत्तापर्यंत पाहिला नव्हता. हुप्प्याजी, मिसळपावचं वैचारिक प्रतिनिधित्व तुम्हालाच.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/13/2010 - 12:28 नवीन
सलमानसारख्या मान्यवर विचारवंताला, केवळ विरुद्ध बाजूचा म्हणून माफी मागायला लावणं ही कंपूबाजी झाली.
वाह गुर्जी ! माझ्या मनातले बोललात अगदी. हेच एखादा हिंदु बोलला असता तर सगळ्यांनी "वाह वाह" केली असती. पण आमचा सल्लु पडला 'खान' आणि त्यात आधीच बिचार्‍याचे नाव कानफाट्या पडले आहे ना. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 09/13/2010 - 06:13 नवीन
राज ठाकरे यांनीही सलमानच्या वक्तव्यास पाठिंबा दिला आहे...... दबंग सिनेमा साठी सारे चालले आहे....शहारुखने अमेरिकेत नाटक केले याने काय घोडा मारला? व्यक्ति व अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अतिरेक होत आहे...आवरा...नाहितर याचे हि काश्मिर होईल
  • Log in or register to post comments
A
Arun Powar Mon, 09/13/2010 - 11:48 नवीन
बॉलीवूड मध्ये अनेकवेळा सिनेमे रिलीज व्ह्यायच्या वेळीच, वादग्रस्त होतील अशी विधाने देणे, खळबळ माजवून झालेल्या फुकटच्या पब्लिसिटीचा फायदा सिनेमासाठी करून घेणे, असले प्रकार काही नविन नाहीत. सिनेमा रिलीज होण्याअगोदर, त्या सिनेमात काम करणार्‍या सर्वांवर, सामाजिक विषयावर बोलण्यास बंदी करावी म्हणजे हे असले प्रकार थांबतील.
  • Log in or register to post comments
ए
एक अनामी Mon, 09/13/2010 - 17:33 नवीन
"त्याने माफी मागायची गरज नव्हती. असे मला वाटते." याच्याशी १००% सहमत... कानफाट्या नाव पडलय ना सलमानच म्हणूनच माफी वैगेरे घडलं... याएवजी आमीर खानने ही गोष्ट बोलली असती तर कदाचित कमी गहजब झाला असता... "सिनेमा रिलीज होण्याअगोदर, त्या सिनेमात काम करणार्‍या सर्वांवर, सामाजिक विषयावर बोलण्यास बंदी करावी म्हणजे हे असले प्रकार थांबतील." ह्याला काही अर्थ नाही... सिनेमात काम करणारे काय आपले स्वातंत्र्य गमावतात की काय...? आणि काही मंडळी त्यानिमीत्ताने का होइना काहीतरी संवेदनशील बोलतात तरी...
  • Log in or register to post comments
ब
बजरबट्टु Mon, 09/13/2010 - 19:31 नवीन
अहो पण सामान्य लोकांची काळजी असणार्‍या सलमानने आपल्या भरधाव कारच्या खाली मुक्ती दिली ते कोण होते??? याला खरोखर सामान्य लोकांचा कळवळा आहे का??? हा भंपक पब्लीसिटी स्टंट आहे..बाकी काही नाही
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/13/2010 - 20:11 नवीन
भरधाव गाडीखाली चिरडलेल्यांचे आणि त्या निष्पाप काळविटांचे काय झाले अशी आठवण डोक्यात आली हे वाचून. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बजरबट्टु
अ
अन्या दातार Wed, 09/15/2010 - 21:07 नवीन
हा अजून एक दुवा वाचनात आला. यातील मुद्दाही विचारात घेण्याजोगा आहे असे मला वाटते. "http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/whose-man-is-that-soldier-fighting-in-kashmir"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा