पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!
💬 प्रतिसाद
(130)
अ
अवलिया
Wed, 09/22/2010 - 08:37
नवीन
पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती ;)
पाच का दस ... बाल्कनी फुकाट... पाच का दस ... बाल्कनी फुकाट...
सेंग गरम ... पॉपकार्न.... एय.. सेंग गरम ... पॉपकार्न..
मजा येणार हे नक्की !
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Wed, 09/22/2010 - 09:43
नवीन
यात थोडी दुरूस्ती.
माजोरी रिक्षावाले ही द्वीरुक्ती
रिक्षावाले म्हणजे माजोरी असलाच पाहीजे. (सन्माननीय अपवाद वगळता) मग तो कुठल्याही गावातील असु देत.
जाता जाता पुणेकरांचा उल्लेख माजोरी म्हणून केल्याबद्दल निषेध.
(पॉपकॉर्नचे पुडे आले आहेत. फांदीवर बसलो आता)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/22/2010 - 12:27
नवीन
>>>>रिक्षावाले म्हणजे माजोरी असलाच पाहीजे. (सन्माननीय अपवाद वगळता) मग तो कुठल्याही गावातील असु देत.
सहमत आहे. ट्राफीक पोलिसांनी रिक्षालावाल्यांना दंडाची पावती देत असलेले दृष्य दिसले की मला खूप आनंद होतो. [हा आनंद मनातल्या मनात असतो] रिक्षावाल्यांच्या रिक्षा जप्त करुन आरटीओ कार्यालयात नेल्यावर आणि त्यांना दंड भरायला लावल्यावरचा आनंद क्या कहने. अशावेळी बिचार्यांचे कसे होईल, हातावरचे पोट असते, वगैरे अशा भावनांना मी नम्रपणे ठोकर मारतो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 12:34
नवीन
पुढल्या वेळी असे काही संस्मरणिय दृस्टीपथास पडले तर तर तुमचा आनंद द्विगुणित झाला असे समजा.माझ्या वतीने एखादी टाळी वाजवलीत तरी चालेल.
- Log in or register to post comments
प
पारुबाई
Wed, 09/22/2010 - 19:39
नवीन
पुणेकरांचा उल्लेख माजोरी म्हणून करु नका हो प्लिज.
बंगलोर चे रिक्षावाले तर यांना देखील मागे टाकतील.
आत्ता पण त्या विचाराने माझ्या डोक्यातील शीर ताडताड उडायला लागली आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 09/22/2010 - 10:22
नवीन
आम्ही पुण्याबाहेरचेच.
पुण्याला नाही पण पुणेकरांबद्दल बरेच ग्रह बाळगून आहोत.
पण पुण्याला नावे ठेवायची नाहीत अशी एक फॅशन निघालीय म्हणे.
पुणेरी पाट्या ऐवजी ठाणेरी पाट्यांवर सम्शोधन करायचा विचार करतोय
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 09/23/2010 - 01:29
नवीन
पुण्याबाहेरचे? कालपरवा तर तेथे फ्लॅट भाड्याने घेतल्याच्या गप्पा मारत होता तुम्ही विजूभौ!
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 09/24/2010 - 15:56
नवीन
ऐका हो ऐका....
आज पुणेमुक्कामी, छावणी भागात खरेदीसाठी गेले असता,
परत येताना पहिलाच रिक्षेवाला बि.वाडीला यायला तयार झाला हो!..........
बहुदा मिसळ्पाव वर चाललेली खलबते कानावर पडलेली दिसतात....
म्हणून समस्त मिपाकरांचे आणि पुणेकर रिक्षावाल्यांचे जाहिर आभार!......
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/24/2010 - 15:58
नवीन
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
खरे तर ही बातमी वेगळा धागा करुनच सांगायला हवी तुम्ही!!
=))
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/24/2010 - 20:27
नवीन
सकाळा कडे पण पाठवुन द्या वाचकांच्या पत्रव्यवहारात. लोक अंबळ हळवे होतील हे वाचुन
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Fri, 09/24/2010 - 20:33
नवीन
पण मुक्तपीठ पुरवणीसाठी.
Pl note मुक्तपीठ पुरवणीसाठी
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 09/22/2010 - 08:45
नवीन
२००+ प्रतिसाद. जागा राखीव. १० का बीस १० का बीस (सामना सुरु होण्याआधीच ब्लॅकचे दर वाढतात ना तसेच.)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/22/2010 - 18:18
नवीन
द्यायचे किती ते बोला. पुढे इं स्नेही, नाना आणि पु पे ने जागा धरून ठेवल्या आहेत!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 09/22/2010 - 18:30
नवीन
१० का पचास, १० का पचास १० का पचास १० का पचास १० का पचास १० का पचास
मर्यादित जागा शिल्लक, फर्स्ट कम फर्स्ट सीट बेसिस.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 09/22/2010 - 08:48
नवीन
रिक्षावाल्यांचा हा मस्तवालपणा सर्वत्र सारखाच आहे.
बेंगलोरमध्येही असे अनुभव येतात.
मलाही त्यांची प्रचंड चीड येते.
पण ह्या रिक्षावाल्यांचा एक चांगला गुण म्हणजे तुम्ही एखादा पत्ता हुडकत असाल आणि एखाद्या रिक्षावाल्याला विचारले अमुक अमुक ठिकाण कुठे आहे तर आतापर्यंत तरी मला त्यांनी व्यवस्थित मदत केली आहे.(फक्त पत्ता सांगायला त्या ठिकाणी पोहचवायला नव्हे.)
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 09/22/2010 - 08:53
नवीन
काय बोलणार...परत ६ सिटर चालु करावि म्हणुन दादांना साकडे घातले पाहिजे...
बहुतेक आपणास xyz च्या ऎवजी yz म्हणाचे असेल असे वाटते..
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Wed, 09/22/2010 - 08:52
नवीन
न्युयार्क, लंडन, सिंगापोर, ब्यांककॉक आणि प्यारिस येथील रिक्षावाल्यांच्या अनुभवा विषयीही वाचायला आवडेल.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 09/22/2010 - 08:56
नवीन
तिथे टॅक्स्या असतात असे ऐकले आहे. अनुभव नाही.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 09/22/2010 - 11:03
नवीन
वॉशिंग्टन डी. सी. ला सायकल रिक्शात बसलो होतो. स्मिथसोनियन म्युझियम मधून बाहेर पडल्यावर चार पाच सायकलरिक्शावाले आणि एक वालीपण उभे(भी) होते. त्यातल्या एका ब्लॅकच्या रिक्शात मी , माझी मुलगी व बायको असे 'वाटीत पुरण' अशा अवस्थेत बसलो. पैसे आधीच ठरवले होते. त्या सदगृहस्थाने आमच्या तिघांचे धूड चढाच्या रस्त्यावर लीलया ओढत आम्हाला जेफरसन मेमोरियल, लिंकन मेमोरियल अशी जवळची सर्व ठिकाणे दाखवली आणि ती सुध्दा रनिंग कॉमेंट्री सकट.
एक उत्तम अनुभव!!!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Wed, 09/22/2010 - 11:16
नवीन
चला नानाची सोय झाली
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Wed, 09/22/2010 - 14:35
नवीन
एक जन बी आपुन परदेशवारी केली हे सांगायची संधी सोडत नाही.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 09/22/2010 - 17:49
नवीन
परदेशवारी ही आता कौतुकाची उरलेलीच नाही. तिकडचे अनुभव विचारले म्हणून लिहिले.
आम्ही अनुभवांचे प्रदर्शन भरवत नाही.
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
गुरुवार, 09/23/2010 - 04:04
नवीन
रिक्षा ब्लॅकने? बापरे हा प्रकार इकडे म्हणजे भारतात आलाततर वांदेच आहेत मग!
आम्हाला तिकिटांचाच ब्लॅक माहिती आहे. शोलेच्या वेळी कसला मोठा होता तो... आमचा अनुराधा थेटर वालाच त्यात सामील असे आम्हाला सौंशय होता. असो.
चमत्कारिक असणार तुमची परिस्थिती. किती पैसे दिले नक्की? त्यापेक्षा पोलिसाला बोलवायचे...
मी आजवर असे ऐकले नव्हते...
"वॉशिंग्टन डी. सी. ला सायकल रिक्शात बसलो होतो. "
वॉशिंग्टन... शिवाय सायकल रिक्षा?
काहीच समजत नाहीये मला. तुम्ही कलकत्त्या विषयी म्हणत आहात का?
जरा उलगडून सांगता का हा लोच्या?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 09/22/2010 - 15:45
नवीन
तुम्ही विचारलेल्या सगळ्या शहरांच्या विमानतळावरून मी ट्रांझिट केलेले आहे, पण तिथे कुठे टॅक्सीज्स दिसल्या नाहीत (कदाचित माझ्या जेट लॅगमुळे मला दिसल्या नसाव्यात). नाही म्हणायला हाँगकाँगच्या एयरपोर्टवर काही लोक एका छोट्या, आपल्या इथे गोल्फ कोर्सवर वापरतात तसल्या गाड्यांतून इथेतिथे फिरत होते, म्हटले मूर्खच दिसताहेत इथले लोक, आम्ही हे असले कार्ट्स फक्त गोल्फकोर्सेसवरच वापरतो, ते इथे विमानतळांवर आणणे शोभून दिसते का कुणाला? मी नाक मुरडले आणि त्या तसल्या गाडीवर बसलेल्या बुवाने 'काय' असे मला भुंवया उंचावत विचारले? मी म्हटले 'यू पीपल्स आर स्टूपिड, धिस इज नॉट अ रोड, नो?' आपल्याला काही हे कळलेच नाही असे तो दाखवत निघून गेला. तर ते जाऊ दे, काय सांगत होतो-- परदेशांतील टॅक्सीज. मी उत्तर कोरियात पाहिलेल्या टॅक्सीज छान होत्या. प्रशस्त मोठ्ट्।या टॅक्सीज! पुढपासून मागपर्यंत एक पंगत जेवावयास सहज बसू शकेल, असा विचार माझ्या मनात तेव्हा आला. पण क्यूबातील टॅक्सीजना तोड नाही हो!! तेथे टॅक्सीज स्थानिकांसाठी फुकट आहेत, हे समजल्यावर मी तेथील एका व्यक्तिशी दोस्ती केली व तिच्यासमवेत सगळीकडे फुकटात फिर फिर फिरलो!! त्यातून ते टॅक्सीवाले प्रत्येक गिर्हाईकास (फुकट अर्थात) क्यूबन सिगार देत होते. पहिली घेतली आणी झुरका घेतल्यावर इतका ठसका लागला, टॅक्सी ड्रायव्हरने रस्त्यातच थांबवून त्याच्याकडील टिश्यूने (त्यावर 'चे' चा फोटो होता) माझे डोळे व नाक पुसले. ते सगळे होईंस्तोवर मागे सारा ट्रॅफिक तसाच खोळंबून राहिला होता. नंतर मात्र संवय झाली, पुढील अनेक टॅक्सी प्रवासात मस्त क्यूबन सिगार आणी स्थानिक दारू....फुकटात.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 09/22/2010 - 16:09
नवीन
हाहाहाहा... क्यूबाचा अनुभव मात्र याहीपेक्षा सविस्तर लिहिण्याजोगा आहे. लिहा. वाट पाहतोय.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/22/2010 - 18:57
नवीन
यू टू ब्रुटुस?
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
गुरुवार, 09/23/2010 - 04:08
नवीन
अनुभव जबरा आहे. आवडला. टॅक्सीत सिगार आणि दारू म्हणजे खल्लास!
एक ३०-४० वर्षे आधी कळले असते तर जाऊन तरी आलो असतो कॉ. डांगेंच्या बरोबर.
आता काय उपयोग?
असो, यावर तर एक लेख यायला हवा.
फिडेल क्यास्ट्रोच्या देशा विषयी 'अमेरिका जे सांगेल तेच' जगाला माहिती आहे. तुमच्या कडून पण काही येऊ द्या, एखादा झकास लेख वगैरे?
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 09/22/2010 - 09:03
नवीन
झो प ये ते य ना आ ज का ल व्य व स्थि त !!!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 09/22/2010 - 09:45
नवीन
पुण्यातले रिक्षावाले जस्से पच्चकन थुंकतात तसे मी पच्चकन हसलो अशी स्मायली आहे इथे असे समजुन घ्या.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 09/22/2010 - 10:20
नवीन
साहेब, संवेदनशील लिखाण बंद केलेच आहे तर आता असे असंवेदनशील शेरे पण बंद करा.
मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवणे चूकच आहे का हो? की एकदा मदत मागून मग अनेक दिवस असे टोमणे ऐकत बसावे.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 09/22/2010 - 10:53
नवीन
मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवणे चूकच आहे का हो? की एकदा मदत मागून मग अनेक दिवस असे टोमणे ऐकत बसावे.
>>>
गप्राव !! (सौजन्य : धमाल मुलगा)
जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 09/22/2010 - 10:55
नवीन
जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?
श्री सुहास यांना सुचना - सध्या मस्करीवर बंदी असुन एक एक लिटर एरंडेल पिऊन लेख, प्रतिसाद लिहिणे आवश्यक असल्याची नोंद घ्यावी.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/22/2010 - 11:20
नवीन
हा हा हा...
हा नाना आणि सुहाशा आजकाल फार एरंडेल पियाला लागला आहे.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 09/22/2010 - 20:40
नवीन
>>गप्राव !! (सौजन्य : धमाल मुलगा)
गप्राव चा अर्थ माहित नाही. त्यामुळे तो काहीतरी चांगला आहे असे गृहीत धरतो.
>>जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?
माफ करा, अनेक जणांचा राग तुमच्यावर निघाला. लोकांनी यापेक्षा गंभीर विषयाची पण तर उडवायची संधी नाही सोडली.
जाता जाता अवलिया यांना फुकटचा सल्ला (आम्ही न मागता पण सल्ले देतो).
तुम्ही घ्याच एकदा एरंडेल. एकदा शुद्धीकरण होऊनच जाऊ दे. हघ्याहेवेसांनल
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 09/22/2010 - 09:28
नवीन
गाय छाप , चुनापुडी , सुपारी आनि पार
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 09/22/2010 - 09:37
नवीन
गल्ली चुकली गं.
'राज'दरबादात ने तुझ साकडं.
:)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 09/22/2010 - 09:48
नवीन
घरी कश्या गेलात शेवटी? :)
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 09/22/2010 - 09:56
नवीन
स्वारगेट, पुणे स्टेशन इ. ठिकाणी रिक्षा स्टँडजवळ बूथ बांधले होते. रिक्षा रांगेत असायच्या, स्थानकातून प्रवासी बाहेर आला की बूथपाशी जाउन जिथे जायचय तो पत्ता/ भाग सांगत असे, अंदाजे भाडे आणि रिक्षाचा नंबर हे लिहून ठेवले जात असे आणि हे पाहायला १ पोलीसही तिथे असे. भाडे नाकरणे वगैरे शक्यच नसे.
इतकी चांगली योजना असल्याने ती थोड्याच दिवसात बंद पडली.
मी रिक्षाने कधीच प्रवास करत नाही. फक्त बाईक, ती नसेल तर बस आणि चालणे.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 09:58
नवीन
आधी फिरलेलं डोकं....जर्रा पुढे जाउन एकाला विचारले.अहे का रिक्षा? तो म्हणाला कुठे जायचय? मी सांगितले बिब्वेवाडी कोंढवा रोड. बसा म्हटल्यावर मे बसले. थोडे पुढे गेल्यावर त्याला रस्ता सांगायला चालु केला इथे वळा...तिकडुन घ्या.
आणि मला थांबायचे होते तिथेच थांबले.आणि मीटर प्रमाणे पैसे काढुन ठेवले.
तो वैतागुन म्हणाला कि तुम्हाला कोंढवा रोड ला जाय्चे होते ना.
अहो एक काम आठवलं... urgent होत ओ. sorry हं!
म्हणुन मी गेटमध्ये चालु लागले!
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 09/22/2010 - 09:59
नवीन
शाबास.
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Wed, 09/22/2010 - 10:14
नवीन
तो रिक्षावाला आता मिपा वर लेख टाकेल... ' पुण्यातले (बहुतेक कोल्हपूरवासी) माजोरी,abc...abc...प्रवासी '
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Wed, 09/22/2010 - 10:26
नवीन
हा हा... अगदी अगदी :)
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 09/22/2010 - 19:33
नवीन
मस्त लावली त्याची तुम्ही... वाट हो.. आवडलं हे आपल्याला..
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 09/22/2010 - 10:22
नवीन
पुण्यातले रिक्षावाले तसेच आहेत.
पुढे? ;-)
बाकी क्वोल्हापुरात वडाप अजुन सुरु आहेत का हो? धमाल यायची त्यात बसायला.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 10:38
नवीन
वडाप....
एक ट्रॅक्स .... तिच्या ड्रायव्हर शेजारच्या जागेवर ४ माणसं.ड्रायव्हर शेजारचा बसलेला गियर असा दोन गुड्घ्यांमध्ये घेउन बसलेला.बाकी ३ असे पुढे -मागे "अॅडजस्ट" झालेले.
मध्ल्या जागेत कमीत कमी ५ ते साडेपाच (एखाद्या पोट्ट्याला चिंबवले जातं)
आणि मागे ३+३ ...मध्ल्या रिकाम्या जागेत भाजिच्या बुट्ट्या,पिशव्या.बाहेर लोंबकळत २ जणं...
हे अजुनही चालु आहे.
पण इतके असुन ते मधले केर्ली (गाव) चा ष्टॉप दे रं बाबा असं एखादी आजी म्हणाली तर तो नाही म्हणत नाही.
बस गं म्हातारे...म्हणून तिचे ओझे उतरून देण्यापर्यंत केले जाते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/22/2010 - 11:22
नवीन
वा वा वा. कोल्लापुरचे वडापवाले अंबळ सज्जन दिसतात. त्यांना सांगा पुण्यात येऊन रिक्षा चालवायला. :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/22/2010 - 11:23
नवीन
पेशवे, पुणे कराराला स्मरून सांगा मला, हे वडाप काय असतं?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/22/2010 - 11:29
नवीन
ऐला तुला वडापवाले माहीत नाहीत? इथे विचार सगळी माहीती मिळेल. :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/22/2010 - 11:36
नवीन
पुणे कराराचा अवमान करणार्या पेशव्यांचा निषेध!
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 12:50
नवीन
वडाप....
एक ट्रॅक्स .... तिच्या ड्रायव्हर शेजारच्या जागेवर ४ माणसं.ड्रायव्हर शेजारचा बसलेला गियर असा दोन गुड्घ्यांमध्ये घेउन बसलेला.बाकी ३ असे पुढे -मागे "अॅडजस्ट" झालेले.
मध्ल्या जागेत कमीत कमी ५ ते साडेपाच (एखाद्या पोट्ट्याला चिंबवले जातं)
आणि मागे ३+३ ...मध्ल्या रिकाम्या जागेत भाजिच्या बुट्ट्या,पिशव्या.बाहेर लोंबकळत २ जणं...अश्या प्रकारच्या मानवी खासगी वाहतूक संस्थेला 'वडाप' असे म्हणतात. हे ग्रामिण भागात फुल्ल चालते.
त्याचा मूळ शब्द ओढत नेणे...वरुन ओढाप्...आणि होता होता अपभ्रंश जाहला तयाचा 'वडाप' अशी व्युत्पत्ती व्याख्या असावी असा कयास आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »