Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पितृपक्ष

श
शुचि
Sun, 09/26/2010 - 03:11
💬 63 प्रतिसाद
  • पितृपक्ष-२

Book traversal links for पितृपक्ष

  • पितृपक्ष-२ ›

प्रतिक्रिया द्या
17051 वाचन

💬 प्रतिसाद (63)
ग
गांधीवादी Sun, 09/26/2010 - 03:21 नवीन
माझी आजी पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी छान छान मलिदा करते. तसा मलिदा अजून पर्यंत माझ्या आईला आणि सौ. ला जमला नाही. तो मलिदा मला खूप आवडतो. त्यामुळेच पितृपक्ष लक्षात आहे. आणि पितृपक्षात movies release होत नाही, एवढेच माहित आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/26/2010 - 12:47 नवीन
"मलिदा" हा फक्त एक वाक्प्रचार आहे असा माझा आतापर्यंत समज होता. जर तो खराच खायचा पदार्थ आहे, तर कृपया त्याची पाककृति (त्या विभागात) द्या ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
इ
इंटरनेटस्नेही Sun, 09/26/2010 - 12:52 नवीन
+१ असेच म्हणतो. ('मलिदा' खाण्यास उतावळा) इं. स्नेही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मस्त कलंदर Sun, 09/26/2010 - 13:02 नवीन
अगं, पोळी कुस्करून अगदी बारीक करायची. शक्यतो मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये केल्यास छान चुरा होतो. त्यात तूप, गूळ आणि वेलची घालायची. की झाला मलिदा तयार. पीरांना हिंदू-मुस्लिम दोघेही मानतात. पीराच्या उरूसात मलिदा हाच प्रसाद असतो. क्वचित भाकरीचा मलिदाही करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 09/26/2010 - 13:05 नवीन
माझी आजी याचे लाडू करायची. आजीच्या हातच्या लाडवाची चव कशालाच नाही हे बाकी खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
ग
गांधीवादी Sun, 09/26/2010 - 13:10 नवीन
हॅ हॅ हॅ, मी काय IT वाला नाय्ये, जेणेकरून मला हे असला स्वयंपाक/पाककृती वगेरे येत असायला, मला फक्त खायचे माहित आहे. जेवणाचे ताट रोज आयते पुढे येते. थोडे खासगी अवांतर : (सुदैवाने) आमच्या सौ. पण IT वाल्या नाहीयेत. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाक घरात पाय न ठेवणे हा आमच्या घरचा (अलिखित) नियम आहे. त्यात आमच्या सौ. मिपा वाचत नाहीत, मी मिपावर ह्या ID ने लिहितो हे देखील सौ. ला माहित नाही. त्यामुळे (आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे) हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ. तरी सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन, आजीकडे गेलो कि तिला विचारून टाकीन ह्याची पाककृती. रवा, गुळ आणि अजून काहीतरी पासून बनवितात एवढेच माहित आहे. खूप मस्त लागतो. मलिदा खाण्यासाठी पितृपक्षाची वाट बघत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/27/2010 - 04:51 नवीन
अमसूलाची चटणी हा एक अनवट पदार्थ पण पितृपक्षात हमखास खायला मिळतो. कारल्याचे पंचामृत पण असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
अ
अरुण मनोहर Sun, 09/26/2010 - 03:34 नवीन
सिंगापूरला राहून एका चिनी प्रथेची माहिती झाली. आपल्या पितृपंधरवाड्याच्या सुमारासच चिनी लोक पितरांची शांती करतात. पोर्णीमेच्या रात्री खास, मोठ्या प्रमाणावर आणि त्या पंधरवाड्यात रोज रात्री, पितरांना प्रसाद अर्पण केल्या जातो. चिनी कालगणने प्रमाणे हा सातवा महिना मोजल्या जातो. ह्या उत्सवाला छिंगमिंग उत्सव म्हणतात. ह्या पंधरवाड्यात, रोज रात्री पुर्वजांचे आत्मे नातलगांच्या घराजवळ गिरट्या घालतात. त्यांच्या साठी रोज रात्री उदबत्या, मेणबत्या पेटवल्या जातात. डुकराचे वा कोंबडीचे मांस अर्पण केले जाते. पुर्वजांना मिळावे म्हणून कागदाच्या वस्तु, जसे बंगले, कार, खोटे पैसे, म्हणजे 'हेल मनी' च्या नोटा हे सगळे जाळले जाते. धुरांमधून पुर्वजांना ते मिळते अशी समजूत आहे. हा महिना भुतांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ताओईझम मधून ही पद्धत आलेली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/26/2010 - 04:34 नवीन
माहीती चांगली आहे . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/26/2010 - 04:45 नवीन
मला मागच्या आठवड्यात नागाचे स्वप्न पडले. त्या आठवड्यात पंचमुखी नागाचे एक चित्र सकाळ मधे वाचकांच्या पत्रात आले होते ते कुठतरी सुप्त मनात नोंदलेले असावे त्याचा हा परिणाम अशी संगती मी त्याची लावली.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 09/26/2010 - 12:52 नवीन
मी देखील असा कार्यकारणभाव तपासून पहाते. पण मला तो ना यावेळी सापडला ना गेली कित्येक वर्ष पितृपक्ष सुरु होताच सापाचं स्वप्न पडतं तेव्हा सपडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नितिन थत्ते Sun, 09/26/2010 - 06:57 नवीन
प्रेतयोनीत पूर्वजांचे काय भटकत असते? शरीरे तर आपण जाळलेली असतात. आत्मे म्हणाल तर त्या आत्म्यांनी दुसरा जन्म घेतला असणार ना, चौर्‍याऐशी लक्षांपैकी एक? की शरीर आणि आत्मा यांखेरीज तिसरे 'काहीतरी' असते जे भटकत असते? फार तर नुकताच मृत्यू झालेल्याचा आत्मा अजून राहिला असेल जन्म न घेतलेला.... पण आजोबा, पणजोबा, वगैरे पण अजून भटकतच? (अवांतर : अरेरे, कालच मी माझ्या खोलीतल्या बर्‍याच मुंग्या मारल्या. अन्नपाण्याच्या आशेने आलेले माझे पूर्वज असतील तर....... ) टीप : वरील प्रतिसादाचा हेतू खिल्ली उडवण्याचा नसून, लेख वाचणार्‍या इतरांना "विचार करण्यास उद्युक्त" करण्याचा आहे.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 09/26/2010 - 12:42 नवीन
होय हे जे दान करतात तेदेखील गेल्या (रिसेंट) ३ पीढ्यांनाच जातं. त्यांचेच आत्मे प्रेतयोनीमधे भटकत असतात. बाकीच्यांचं माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 09/26/2010 - 13:59 नवीन
किती काळानंतर पुढचा जन्म मिळतो. तीन पिढ्या प्रेतयोनीत म्हणजे माझ्या पणजोबांचा पण अजून पुढचा जन्म मिळाला नाही? तुमच्या म्हणण्यावरून असे दिसते की मी मरेपर्यंत (इनफॅक्ट माझ्या पिढीतले सगळे चुलत भाऊ मेल्याशिवाय) पणजोबांना पुन्हा जन्म मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ग
गांधीवादी Sun, 09/26/2010 - 15:29 नवीन
आमच्या पितरांनी, महान भारतची सद्य परिस्थिती लक्षात घेता पुढचा जन्म कुठे(कोणत्या देशात) घेऊ अशी विचारणा BULK SMS द्वारे नुकतीच केली आहे. थत्ते काका , कृपया जरा मदत करता काय ? कोणता देश सुचवू त्यांना ? चीन, अमेरिका, कि अजून कोणता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 09/26/2010 - 17:48 नवीन
१. बल्क एसेमेस नुकतेच म्हणजे कधी आले होते? कारण २९ तारखेपर्यंत बल्क एसेमेसना बंदी आहे. २. परतचा जन्म माणसाचा मिळत नसून कुठल्यातरी प्राण्याचाच मिळतो. तो या मानवजन्मात केलेली पापे आणि पुण्ण्ये पाहून मिळतो. तेव्हा अनुकूल देशातले हवामान पाहून जन्म मिळेल. ३. तुम्हाला भारतात जे वाईट आहे असे वाटते आहे ते माणसांसाठी लागू आहे. कुत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आणि मनेकाबाईंचे खास संरक्षण आहे. त्यामुळे कुत्र्याचा जन्म भारतात घ्यायला काही हरकत नाही. २९ तारखेनंतर बल्क एसेमेस करून पूर्वजांना कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 02:17 नवीन
आपल्या अमुल्य सल्लाबद्दल धन्यवाद. >>बल्क एसेमेसना बंदी आहे. १) अहो ह्या बंदी वगेरे शुद्र मानवांसाठी, पितरांना नाही. २) आमच्या पूर्वजांनी बरीच पुण्याची कामे केली आहेत, त्यांचा पुण्याचा घडा भरलेला आहे. मला पुणे-मुंबई सोडून जगातले दुसरे कुठलेच हवामान माहित नाही. त्यामुळेच तर विचारणा केली होती. असू दे मीच जरा गुगलतो. ३) 'भारतात माणसांपेक्षा कुत्री बरी' हे माहित आहे. आणि त्यामुळेच जिकडे तिकडे कुत्र्यांचे फोफावले आहे. त्या फोफावलेल्या कुत्रांच्या जमातीती जर का जन्म घेतला तर एका दिवसांत सगळे पुण्य खतम होईल. अशी भीती आमच्या पितरांना आहे. बघू मीच काहीतरी आयडिया काढतो. आणि २९ नंतर त्यांना BULK SMS करतो. (आम्हाला मात्र सध्या BULK SMS बंदी आहे. शेवटी आम्ही काय, एक शुद्र मानव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आंसमा शख्स Mon, 09/27/2010 - 04:09 नवीन
तुम्ही लोक या विषयाची खिल्ली का उडवत आहात? पटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 09/28/2010 - 00:40 नवीन
मिसळपाव वर स्वागत आहे. सवय करून घ्या अशा खिल्लींची. हळूहळू त्याचे काही वाटेनासे होईल (आंतरजालीय प्राथमिक) आणि मग एके दिवशी तुम्हीच अनाठायी खिल्ली उडवू लागाल (आंतरजालीय माध्यमिक). पुढील स्टेप्स बाकीचे जुने आणि जाणते सांगतीलच हळूहळू. (आंतरजालीय प्राथमिक मध्ये शिकणारा) वि. मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स
र
राजेश घासकडवी Sun, 09/26/2010 - 07:25 नवीन
मी पितरांचे आत्मे याकडे रूपक म्हणून बघतो. हिंदू संस्कृतीत पितृऋण मानलं गेलेलं आहे - याचा अर्थ मी आपल्या पितरांनी जसा आपल्याला जन्म दिला तसा जर आपण कोणाला जन्म दिला तर आपल्या मुलांचं प्रेमाने संगोपन करून त्यांना उत्तम व्यक्ती बनवण्याचा मनापासून प्रयत्न करावा, असा मी लावतो. यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sun, 09/26/2010 - 10:05 नवीन
"यापलिकडे अमुक वेळी अमुक रूढी पाळावी याला मी महत्त्व देत नाही." ~~ नेमके हेच माझे मत आहे; आणि यात एकच वाक्य वाढवितो : मात्र जे ही रूढी पाळतात त्यांच्या भावनांना माझ्या मतामुळे धक्का लागणार नाही किंवा ते दुखावले जाणार नाहीत, इतपत पाहतो. शेवटी मी समाजप्रिय आहेच, सबब वेळप्रसंगी तत्वाला मुरड घालायलादेखील शिकलो आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शिल्पा ब Sun, 09/26/2010 - 07:29 नवीन
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय? काळजीग्रस्त (रोज जेवणारी ) शिल्पा
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sun, 09/26/2010 - 12:53 नवीन
+१ लोल्स! असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
क
कवितानागेश Sun, 09/26/2010 - 19:43 नवीन
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय?>>> तुमच्यात रोज चित्राहूती ठेवत नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Sun, 09/26/2010 - 20:00 नवीन
आमच्यात फक्त जिवंत असलेल्यांनाच खायला घालायची पद्धत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
उ
उपेन्द्र Mon, 09/27/2010 - 19:25 नवीन
इथे जिवंत माणसांना खायला पुरेसं अन्न नाही आणि मेलेल्यांची काळजी कशाला.. ? पितृपंधरवड्यात शुभकार्य करायचं नाही असं मानतात.. तर.. श्वास तरी का घेतात.. ते तर जगायला आवश्यक असलेलं सगळ्यात महत्वाचं शुभ कार्य आहे.. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/27/2010 - 04:57 नवीन
हे पितर बितर फक्त या पंधरा दिवसातच खातात का? मग बाकीचे दिवस काय? तुम्ही रोज करून घालात तर रोज येतील. :) बाकी पितर बितर वर्षातून एकदा नाही २दा जेवतात. १ ज्या दिवशी गेले त्या तिथिला आणि २ ज्या तिथीला गेले ती तिथी पितृपक्षात. बाकी हॅलोवीन मला रोज करायला आवडतो पण बाकी कोणालाच आवडत नाही. :( (हॅलोवीनप्रेमी) पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
J
jaypal Sun, 09/26/2010 - 07:43 नवीन
>>या पंधरवड्यात वास्तूखरेदी, वाहनखरेदी, लग्न, मुंज आदि शुभ कार्ये टाळली जातात........... मी गेली केत्येक वर्षे मुद्दमच या पंधरवड्यात खरेदी करतो किंवा शुभ कार्ये करतो अजुन तरी माझे काहीही वाईट झाले नाही. मी माझ्या पुर्वजांना अमंगल/अभद्र मानत नाही म्हणुनच मी त्यांना वाळीत टाकत नाही. उलट पक्षी त्यांना माझ्या आनंदात सहभागी करतो. माझ्या आनंदात त्याचा देखिल आनंद नक्कीच असणार. माझे आजी/ आजोबा, पणजी /पणजोबा ई. माझ्या वर जळतील शक्यच नाही. थत्ते काकांशी १००००००००........% सहमत. खुळचट कल्पनांना थारा देउ नका. दिवसा भरपुर अंगमेहनत घ्या .झोपताना पाणि प्या ,सैल कपडे घाला व आराम दाई बिछान्यावर झोपा म्हणजे असली स्व्प्न पडत नाहीत (जमल्यास उशाशी एक पुंगी व पेटारा ठेवा Image removed.)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 09/26/2010 - 12:54 नवीन
पूर्वज अमंगल नव्हते पण आता ज्या योनीत ते आहेत ती अमंगल गणली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/27/2010 - 04:59 नवीन
जयप्या काहीही लिहीतोस काय रे??? आराम दाई बिछान्यावर . हे काय नवीण बॉ? तू मास्तरांसारखा लिहू लागला आहेस? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
उ
उपेन्द्र Mon, 09/27/2010 - 19:27 नवीन
+१०० आपण थोर अहात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
अ
अवलिया Sun, 09/26/2010 - 07:59 नवीन
पितृपक्षानिमित्त सर्व पितरांना विनम्र अभिवादन..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/26/2010 - 08:43 नवीन
असेच म्हणतो. जयपाल ची सैल कपड्याची कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/26/2010 - 08:01 नवीन
''आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात'' अशा गोष्टींवर आपला काही विश्वास नाही. पण, आमच्याकडे 'पितृपक्ष' उत्सवात साजरा केला जातो. आमच्या पूर्वजांना काय काय आवडत होते ते आठवून जसे, [बीडी काडी] पान, पेग वगैरे, दाखवून आम्ही तो दिवस इंजॉय करतो. आठवणीत काढतो. या दिवशी आमच्याकडे सर्व प्रकारचे नैवद्य असते. उदा.मासे, मटन,चिकन, पुरण-पोळी, कुरडाया,पापडं,भजी,कढी, आमटी,खीर,वरण-भात, पुर्‍या, सर्व प्रकारच्या भाज्या काय नी काय असते जेवायला सॉरी नैवद्य दाखवायला....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Sun, 09/26/2010 - 09:29 नवीन
एकदा यायचंय प्रवरा संगमला. गोड्या पाण्यातले ताजे फडफडीत मासे खायला. केव्हा बोलवताय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/26/2010 - 09:41 नवीन
>>>एकदा यायचंय प्रवरा संगमला. गोड्या पाण्यातले ताजे फडफडीत मासे खायला. केव्हा बोलवताय ? कधीही या....! स्वागत आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
इ
इंटरनेटस्नेही Sun, 09/26/2010 - 12:57 नवीन
बिरुटे सर, एकदा 'बसु' आपण! तेवढीच आपल्या पुर्वजांना शांती, काय? (प्यार्टी प्रेमी) इंटरनेटस्नेही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मितान Sun, 09/26/2010 - 08:53 नवीन
इथे बेल्जियम मध्ये पण याच सुमारास अशाच प्रकारच्या रुढी पाळल्या जातात. १५ ऑक्टो ते ३१ या पंधरवाड्यात आपल्या सर्व आप्तेष्टांना ( जिवंत ! ) वॅफल्स खाण्यासाठी बोलावतात. ( चंगळ असते आमची पण ! ) मग १ नोव्हे ला सर्व संत दिवस ! त्यादिवशी सिमिट्रीत जाऊन सर्व पूर्वजांच्या कबरींवर फुलं वहायची आणि वाईन चा नैवेद्य (!) दाखवायचा. म्हणजे सर्वपितरी अमावास्या :) बाकी या काळात होणार्‍या कार्यांबद्दल, खरेदी विक्री वगैरे बाबत काही वेगळा अनुभव नाही. माझ्या लग्नाची खरेदी याच काळात केली होती. बाजारात गर्दी कमी असते म्हणून !
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Sun, 09/26/2010 - 08:58 नवीन
>>त्यातून कळलं जे आपले पूर्वज प्रेतयोनीमधे भटकत असतात ते या पंधरवड्यामधे आपल्या अवती भवती अन्न-पाण्याच्या आशेने येतात मोक्ष म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 09/26/2010 - 09:15 नवीन
<<<मोक्ष म्हणजे काय? जो दुपारच्या जेवणाने (तासभर का होइना) मिळतो तोच...म्हणूनच या पितरांना गिळायला घालत असावेत... ही ही ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
अ
अनिल २७ Sun, 09/26/2010 - 09:26 नवीन
शिल्पाताई, पितृपक्ष साजरा (?) करणे यावर तुमचे मत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 09/28/2010 - 00:43 नवीन
टोकाचे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
श
शिल्पा ब Tue, 09/28/2010 - 01:12 नवीन
आता मेलेल्यांना खाऊ घालण्याविषयीचे विचार टोकाचेच असणार...एकतर टोकाचे किंवा पकडीचे... त्यात आम्ही टोकाचे...कारण हा विषय पकडीचा वाटत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 09/28/2010 - 17:53 नवीन
शिल्पाताई, बाकी तुम्ही परत आलात हे पाहून आनंद झाला. बरेच दिवस तुमचे फक्त "आवडले", "छान आहे" असेच प्रतिसाद येत होते. तुम्ही परत फार्मात आलात हे बघून बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
व
विसोबा खेचर Sun, 09/26/2010 - 12:30 नवीन
पितृपक्षात कावळ्याचं चित्र लावायची पद्धत मिपावर रूढ केली होती ती तशीच पुढे सुरू ठेवली आहे.. (रुढी-परंपरावादी) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 09/26/2010 - 12:38 नवीन
चांगली पद्धत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वेताळ Sun, 09/26/2010 - 14:15 नवीन
प्राप्त होते असे मी एकले आहे ते खरे आहे का? आमचे पितर आता कोणत्याही योनीत फिरत नसलेमुळे ह्या सणाचा आम्हाला उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sun, 09/26/2010 - 15:39 नवीन
भूत जमातींची एका 'रामगोपाल वर्मा' नामक व्यक्तीशी मैत्री आहे, त्यामुळे जर का आपले (म्हणजे सगळ्यांचे ) पितर भूत जमातीतील असतील असे आपल्याला वाटत असेल तर 'त्या' व्यक्तीला घरी बोलून जेवायला घातले कि सर्व भूत जमात संतुष्ट होईल आणि त्यांना कायमची मुक्ती मिळेल. ~~गांधीवादीदेव बाबा ~~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मदनबाण Sun, 09/26/2010 - 15:52 नवीन
सुर्यवंशी असलेल्या आणि गंगेला आणणार्‍या भगिरथाचे पुर्वज किती काळ ताटकळतं बसले होते कोणास ठावुक ? ;) बाकी या आत्मा बित्मा गोष्टीला अपुन सॉलिट्ट मानतो !!! ( न मानुन रिस्क क्वोन घेणार ? ;) ) काय ते लोक असेल तिथे सुखामंदी असुदे !!! लफडा नको साला !!! ;)
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sun, 09/26/2010 - 16:00 नवीन
मीबी मान्तो. मी त्यांच्या पत्ता पण हुडकून काढलाय. हिथ रहातात ते. Image removed. http://en.wikipedia.org/wiki/Genie
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा