Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र

न
नितिन थत्ते
Tue, 09/28/2010 - 19:20
🗣 88 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
35107 वाचन

💬 प्रतिसाद (88)
श
शरभ Wed, 09/29/2010 - 09:07 नवीन
३ idiots पाहिल्यावर...मला असे वाटले कि, तो engineering च्या आधी release व्हायला पाहिजे होता आणि तेव्हाच बघायला हवा होता....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/29/2010 - 09:10 नवीन
उत्तम लेख आणि चर्चा...
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Wed, 09/29/2010 - 09:42 नवीन
चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद उत्तम. अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का? माझ्यासकट बरोबरचे बरेचजण सबमिशन झाल्यावर २-३ महिने अभ्यास करायचो. तेही नोट्सवरुन. अत्यंत बेसीक कन्सेप्टही फिल्डमध्ये आल्यानंतरच माहीत झाले. फिल्डमधील असंख्य किस्से आहेत सागण्यासारखे. कमर्शिअल बाजु पक्की असणारेच उत्तम व्यवसायिक होउ शकतात. कारण आपापल्या क्षेत्रात अत्यंत तज्ञ असलेले अभियंतेदेखील नोकरीच्या आणि मोठ्या पॅकेजच्य मागे पळताना दिसतात. विरोधाभास म्हणजे अनेक मोठे उद्योजक इंजिनिअर नाहीयेत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 09/29/2010 - 11:10 नवीन
शिक्षणक्षेत्र हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे हा विषय चर्चेस आणल्याबद्दल नितीन थत्ते यांना धन्यवाद. मला वाटते की इंजिनियरींग क्षेत्राची जी वाट लागली आहे त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. १. विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अभाव: साधारणपणे डॉक्टर नक्की काय काम करतात याची विद्यार्थ्यांना लहानपणापासून माहिती असते कारण प्रत्येकावर कधिनाकधी डॉक्टरकडे जायची वेळ आलेली असते. पण मेकॅनिकल इंजिनियर नक्की काय काम करतात हे दहावीतल्या विद्यार्थ्याला विचारले तर त्याला ते सांगता येणार नाही. २. पालकांचे दडपण: बहुसंख्य पालकांना असे वाटते की आपला पाल्य इंजिनियर झाला नाही तर त्याचे आयुष्य खड्ड्यात जाईल.त्यामुळे पाल्याची आवड असो वा नसो इंजिनियरींगला जायची सक्ती केली जाते. वेगळे मत मांडल्यास--’तू गप्प बस तुला काही कळत नाही’ असे म्हणत पाल्याला गप्प बसवले जाते. ३. गतानुगतिकता: कारण १ आणि २ मुळे मुळात इंजिनियरींगल्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे दुसरा करतो तेच मी करणार या ’गतानुगतिक’ मनोवृत्तीतून विद्यार्थ्यांनाही आवड असो वा नसो, इंजिनियरींगलाच जावे लागते. महाराष्ट्रात आज दोनशेच्या वर इंजिनियरींग कॉलेज आहेत.त्यात सरासरी ३०० याप्रमाणे दरवर्षी ६० हजार विद्यार्थी इंजिनियरींगची पदवी घेऊन दरवर्षी बाहेर पडतात. त्या ६० हजारपैकी किती विद्यार्थी मुळात स्वयंप्रेरणेने इंजिनियरींगला गेलेले असतात हा अभ्यासाचा विषय ठरेल.जर मुळातच आवड नसेल आणि आपण ज्या फिल्डमध्ये जात आहोत तिथून बाहेर पडल्यावर काय करावे लागेल याचा पत्ता नसेल तर इंजिनियरींगला गेल्यानंतर एकामागोमाग एक धक्के विद्यार्थ्याला बसायला लागतात. मला सर्वात मोठा धक्का बसला होता तो वर्कशॉपमध्ये! मुळात कोणतेही मशीन हाताळणे हा माझा पिंडच नाही.माझी आवड Analytical कामात. त्यातून सुतारकाम, लोहारकाम यासारखी कामे इंजिनियरींगला गेल्यावर करायला लागली.मेकॅनिकलला गेल्यानंतर असले प्रकार करायला लागतील हेच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या गावी नव्हते.त्या कामांची खरे म्हणजे मला अजिबात आवड नव्हती.त्यातच अंगावर वसकन ओरडणारे वर्कशॉप instructors आजूबाजूला. थोडक्यात त्या कामात आवड निर्माण व्हायची जराही शक्यता नव्हती. दुसरे म्हणजे जर्नल लिहिणे हे अगदी जीवावर येणारे काम. कोणतीही गोष्ट करायची म्हणून करायची (पाट्या टाकायच्या) या प्रकाराचा मला मनस्वी तिटकारा पहिल्यापासूनच होता. तेव्हा Lapping, honing सारखी आयुष्यात कधीही न बघितलेल्या प्रोसेसेसविषयी या जर्नलमध्ये माहिती लिहावी लागे. इंडस्ट्रियल व्हिजिट तीन-चार झाल्या. पण त्यात एका मशीनभोवती ६०-७० जणांचा गराडा आणि चला पुढे असा प्राध्यापकांचा दबाव! त्यातून काय शिकायला मिळणार? परीक्षांविषयी तर बोलायलाच नको.मला वाटते पेपर सेट करताना अशा पध्दतीने केले पाहिजेत की त्या विषयातील महत्वाची संकल्पना कळली नाही तर तो पेपर निघताच कामा नये. पण इथे तर काय इंजिनियरींगच्या पेपरात Short notes आणि जितके लांबलचक उत्तर तितके मार्क जास्त! आणि मुख्य म्हणजे एखादी महत्वाची संकल्पनाच option ला टाकली तरी तो पेपर सुटू शकतो असा सगळा बोगस कारभार. आम्हाला शेवटच्या वर्षाला Computer Integrated Manufacturing नावाचा एक विषय होता. अजिबात अतिशयोक्ती नाही पण त्यात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकच असे. Computer Integrated Manufacturing मधील एखाद्या पध्दतीवर प्रश्न विचारला की आमचे उत्तर-- या पध्दतीमुळे ’Direct labour cost reduces, indirect labour cost reduces, direct material cost reduces, indirect material cost reduces......’ आणि 'Efficiency increases, Workers' morale increases, Production speed increases.......'. म्हणजे कॉस्ट किंवा लागणारा वेळ यासारखी गोष्ट आली तर ती कमी करायची आणि efficiency सारख्या गोष्टी वाढवायच्या! असला बोगसपणा इंजिनियरींगला असताना करावा लागला होता! तेव्हा इंजिनियरींगची मुळात आवड असलेल्याची आवडही नष्ट होईल असेच हे वातावरण होते.त्यातून आय.टी. कंपन्या अगदी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनाही घ्यायला तयार होत्या.अजून कोणाला शिकायची इच्छा असेल तर द्या कॅट आणि जा आय.आय.एम मध्ये किंवा इतर ठिकाणी असे पर्याय उपलब्ध झाले. क्लिंटन
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 09/29/2010 - 11:34 नवीन
क्लिंटन यांचा मनास पटणारा प्रतिसाद.. (वालचंद कॉलेज सांगलीला होता काय..?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रमोद्_पुणे Wed, 09/29/2010 - 11:37 नवीन
पालकांचा हा हट्ट का असतो ते मला अजूनही समजले नाहीए. १०-१२ वी चा निकाल लागल्यावर इंजिनियरींग हाच एक अभ्यासक्रम आहे असेच वातावरण असते. मला शाळेत असताना ८ ते १० वी टेक्निकल हा विषय होता. मी टर्नर होतो. ८वी तच त्या लेथची अशी काही तिडीक बसली होती ना.. ती बर, लुब्रीकंट, चटके, तडातड तुटणारे टूल्स आणि त्यावर मास्तरांचा बसणार मार...आठवले तरी भ्या वाटते.. लेखी परीक्षेला तर मी नर्लिंग, व्ही-बेड, लेथ, व्ही-टूल असल्या सगळ्या संज्ञा पाठच करून जायचो रामरक्षा आणि अथर्वशीर्ष पाठ करावे तसे.. कळस म्हणजे इंजिनियरींग ड्रॉईंग हा अगम्य विषय सुधा टेक्निकलचाच भाग होता. त्यात तर मला काहीच गती नव्हती. माझी ९०% शीटं माझ्या मित्रांनीच पूर्ण केली. त्या विषयाचे मास्तर समोर एखादा लाकडी ठोकळा ठेवायचे आणि विचारायचे आता बघा काय दिसते आहे तुम्हाला? ज्यांना खरेच गती होती त्यांना बरेच काही काही दिसायचे माझ्यासारख्या ठोकळ्याला मात्र ठोकळाच दिसायचा. ह्या टेक्निकल विषयाने माझी झोप उडवली होती. आणि तेव्हाच ठरवले होते काही झाले तरी इंजिनियरींग नको रे बाबा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
संजय अभ्यंकर Wed, 09/29/2010 - 18:00 नवीन
आपल्या दोघांच्या प्रतिसादावरून दिसते की आपणास वर्कशॉपची आवड नव्हती. माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर परिस्थीती उलट होती आणी आहे. मला वर्कशॉपच्या कामांची आवड सुरवाती पासुन होती. आपले करीयर मे.क. इंजिनियरिंग मध्ये करायचे हे ७वी पासून्च निश्चित केले होते. मी इ. ८वी पासून टेकनिकल शाळेत गेलो. १०वी १२वी सुद्धा टेक्नीकल शाळेत केली. डीप्लोमा मेक. मध्ये केला. मेंटेनन्स मध्ये नोकरी करताना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रोनिक्सची आवड निर्माण झाली व त्याचेही खाजगी कोर्सेस केले. इलेक्ट्रोनिक्स, मायक्रोप्रोसेसर्स वरची पुस्तके वाचून काढ्ली. नंतर CNC मशिन टूल्स मध्ये सर्विस इंजीनीयर म्हणून कामकरायला लागल्यावर ह्या सर्वांचा उपयोग होऊ लागला. माझ्या मते इंजीनियरिंगच्या कूठल्याही शाखेत (अगदी मॅनेजमेंट करणार्‍याने सुद्धा) शॉपफ्लोअर)वर (सिविल / स्ट्रक्चरल च्या बाबतीत प्रत्यक्ष प्रकलसिविल) काही वर्षे अनुभव घेणे आवश्यक आहे. शॉपचा अनुभव इंजीनियरला नसणे आणी सैन्याधिकार्‍याला युद्धभूमीचा अनुभव नसणे ह्यासिविल)फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे
ह
हेम Wed, 09/29/2010 - 20:46 नवीन
आमच्याकडे अगदी गेल्या दशकापर्यंत सिनियर फोरमन्ससुद्धा स्वतः मशिनशी झटया घेत, पण हल्ली शॉपफ्लोअरवर येणारी ट्रेनी मुलेसुद्धा ऑईलमध्ये हात घालायला बघत नाहीत. हल्लीच्या नविन शॉप इंजिनियरचे कामही मशिन्सच्या प्रॉब्लेमपेक्षा, आजची प्रॉड. कमिटमेंट, मिटींग्ज, प्रेझेंटेशन्स यालाच प्राधान्य देत चालू असते. मोठी कं आहे, २ वर्षे काढूया - एमबीए करुया व भुरर्र्र होवूया किंवा इथेच काही जॅक लावून क्वालिटी/टुलरूम्/ट्रेनिंग प्रोग्रॅ. सारख्या नॉनप्रॉड. मध्ये बसून लठ्ठ पगार घेवूया अशीच धारणा वाढते आहे. शॉप फ्लोअरवर कामगारांशी डोकं लावत काम?....नको रे बाप्पा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
स
संजय अभ्यंकर Fri, 10/01/2010 - 15:54 नवीन
जन्माचार्यजी, ह्याला कंपनीची संस्कृती कारणीभूत असते. दक्षीणेकडे टी.व्ही.एस. ग्रूपच्या कंपन्यां मध्ये आजही इजीनीयर मशीनशी झटापट करत असतो. मिटिंग कशी असावीतर ह्याच गटाच्या टर्बो एनर्जी लि. ह्या कंपनी सारखी. सकाळी आठ वाजता शॉप फ्लोअर वर जी.एम. साहेब येतात. छाती एवढ्या उंचीच्या टेबला भोवती सगळे उभे रहातात (बसायला स्कोप नाही). कालपर्यंतच्या कामाचा आढावा व आजची योजना ह्यावर केवळ १५ ते २० मिनिटे चर्चा होते. आणी सगळे आपापल्या कामा कडे पांगतात. अधिक माहीती हवी असल्यास जी.एम. साहेब स्वतः त्या व्यक्तीकडे जाऊन माहीती घेतात. लोकांना केबीन मध्ये मिटींगला बोलवून लोकांचे तासनतास खाणे एकदम वर्ज्य. तर एकदा पुण्यातल्या एका प्रख्यात फोर्जिंग कंपनीत, मी काही तास मेंटेनन्स इंजीनीयरची वाट पहात ताटकळत होतो. अगदी संध्याकाळी साहेब भेटले. त्यांनी सांगीतले की, उद्या व्ही.पी. यायचेत, त्यांच्यासाठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवत होतो. टी.वी.एस. गटाच्याच टि.व्ही.एस. मोटर्स कंपनीत शॉपफ्लोअरला सुपरवायजरच्या टेबला समोर खुर्ची नसते. आपले म्हणणे उभ्यानेच सांगून तेथुन निघायचे. माणूस एकदा बसला की गप्पांना तोंड फुटते. एका साध्या गोष्टीतून वेळेचा अपव्यय निकालात निघाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेम
च
चतुरंग Sat, 10/02/2010 - 15:40 नवीन
खुर्ची असली की गप्पांना तोंड फुटते, मानवी स्वभावाचा उत्तम अभ्यास! शेवटी खुर्चीचा मोह हा कसाही झाला तरी वाईटच! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/30/2010 - 01:36 नवीन
शॉपचा अनुभव इंजीनियरला नसणे आणी सैन्याधिकार्‍याला युद्धभूमीचा अनुभव नसणे ह्यासिविल)फरक नाही. संजय अभ्यंकर .................................................................. जुग जुग जिओ मेरे लाल..क्या बात कहि है......हल्लीच्या ईंजिनिअरना उभे राहुन काम नको करायला...ए.सी मधे बसायचे व कळफलक बडवायचा...सारे पांढरी कॉलर वाले झाले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
क
क्लिंटन गुरुवार, 09/30/2010 - 05:53 नवीन
अनेकांना इंजिनिअरींगची आवड आपल्याला नाही आणि आपली आवड वेगळ्या क्षेत्रात आहे हे पक्के माहित असतानाही इंजिनिअरींगला जावे लागणे हीच आपल्या शिक्षणव्यवस्थेची आणि कुटुंबव्यवस्थेची शोकांतिका आहे.तुमचे शॉपफ्लोअरवच्या कामाचा अनुभव असावा हे म्हणणे योग्यच आहे.पण आपल्या शिक्षणव्यवस्थेत तसा अनुभव दिला जात नाही.आणि खरोखरच इंजिनिअरींगची आवड असलेलेच स्वत: प्रयत्न करून चार ठिकाणी जाऊन शॉप फ्लोअरचा अनुभव घ्यायची धडपड करतील.मुळातच ज्यांना आवड नाही आणि ज्यांना आपल्या इच्छेविरूध्द इंजिनिअरींगला जावे लागले आहेत असे विद्यार्थी केवळ परीक्षेत पास होण्यापुरतेच कष्ट करतील. They will not go extra mile. आणि असेच विद्यार्थी पुढे कंपनीत कामाला लागल्यावर तेलात हात घालायला, मशिन हाताळायला नाखूष असतील यात काही शंका नाही. तेव्हा अशा इंजिनिअर्सना दोष देण्यापेक्षा आपल्या एकूणच शिक्षणपध्दतीला आणि घरोघरी इंजिनिअरींगला जायची सक्ती चालते त्याला दोष दिला गेला पाहिजे असे मला वाटते. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
प
प्रमोद्_पुणे गुरुवार, 09/30/2010 - 07:51 नवीन
सहमत.. आवड नसतानाही ते करायला लागणे फार त्रासदायक आहे. मला त्या मशीन्स कधी आवडल्याच नाहीत. पण संजय म्हणत आहेत त्यात सुधा तथ्य आहे. जर एखाद्याला त्यामधेच स्वखुशीने करीअर करायचे असेल तर त्याने तो अनुभव घेणे गरजेचे आहेच. माझे शालेय मित्र ज्याना खरेच इंजिनिअरींगची आवड होती त्यांचे करीअर उत्तम चालले आहे आणि त्याना शाळेतच मशीन्सवर काम करायचा जो अनुभव मिळाला तो उपयोगी पडलाच (असे एकले आहे की फर्स्ट इअर इंजिनिअरींगला मशीनवर्क असते). इंजिनिअरींगची एवढी प्रचंड नावड असूनसुधा केवळ वडिलांच्या इच्छेखातर १०वी नंतर मी टेल्कोची apprenticeship exam सुधा दिली होती . लेखी परीक्षेत पास झालो. नंतर interview झाला तेव्हा मी त्या साहेबाला सांगितले साहेब मला मशीन वर काम नाही करायचे आणि मला इंजिनिअरींगची सुधा आवड नाहीए. तुम्ही computers हा ट्रेड शिकवता का? ते नाही म्हणाले. आणि माझी सुटका झाली... सांगायचा मुद्दा एकच की इंजिनिअरींगची प्रचंड craze आहे. आणि आपल्या पाल्याने सुधा (गती असो वा नसो) इंजिनिअर बनावे असे बहुतांश पालकांना वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विसुनाना गुरुवार, 09/30/2010 - 08:29 नवीन
मला मेक्यानिकलची प्रचंड आवड आहे. इंजिनियरिंग ड्रॉईंग हा तर अत्यंत आवडीचा विषय. थर्ड अँगल, आयसोमेट्रिक, पर्स्पेक्टीव्ह, डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस आणि क्रॉस सेक्शन हे फारफार आवडीचे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगला असतानाच सीएनसीवर महिनाभर प्रत्यक्ष काम केले. (तिथे नवी सीएनसी मशीन्स निर्माण होत असत.) हात, तोंड आणि कपडे काळे करायला मजा येत असे/येते. चुकून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो असे वाटते. आता तेही आवडते म्हणा. पण लेथ,सीएनसी यावर अजूनही काम करायला आवडेल. जमेल तेव्हा लेथ चालवत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
संजय अभ्यंकर Fri, 10/01/2010 - 15:28 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विलासराव Wed, 09/29/2010 - 13:39 नवीन
आम्हाला शेवटच्या वर्षाला Computer Integrated Manufacturing नावाचा एक विषय होता. अजिबात अतिशयोक्ती नाही पण त्यात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकच असे. Computer Integrated Manufacturing मधील एखाद्या पध्दतीवर प्रश्न विचारला की आमचे उत्तर-- या पध्दतीमुळे ’Direct labour cost reduces, indirect labour cost reduces, direct material cost reduces, indirect material cost reduces......’ आणि 'Efficiency increases, Workers' morale increases, Production speed increases.......'. म्हणजे कॉस्ट किंवा लागणारा वेळ यासारखी गोष्ट आली तर ती कमी करायची आणि efficiency सारख्या गोष्टी वाढवायच्या! असला बोगसपणा इंजिनियरींगला असताना करावा लागला होता! मी नेहमी किती विषयाचे पेपर द्यायचे ते आधिच ठरवुन ठेवत असे. एटिकेटि वगैरेचा विचार करुन. एसई ला असताना मि एम-३ आनी ईसीएम हे विषय ऑप्शनला टाकले होते. जे पेपर देणार होतो ते सुट्णे अनिवार्य होते टीई ला प्रवेश मिळवण्यासाठी. परंतु एक पेपर अवघड गेला असे वाटल्याने मी ऑप्शनला टाकलेला ईसीएम ह्या विषयाचा पेपर फक्त ओव्हरनाईट वाचन करुन दिला. पेपर लिहिताना सगळं काही अंधुकसं आठवायचं, एकवेळ तर वाटलं होत सरळ पेपर सोडून बाहेर यावं. मग विचार केला तसही वर्ष वाया जाणारच आहे तर लिहू काहितरी. पुर्ण थियरी असल्याने जे काही थोडेसे वाचलेले आठवत होते त्या अनुशंगाने अक्षरशः ठोकुन दिले तेच तेच परत परत. फक्त मोठ्ठी उत्तरे दिसतिल याची काळजी घेतली. निकाल आला तेव्हा न दिलेला एक विषय सोडुन बाकीचे ९ विषय सूट्ले होते त्यात फक्त एक रात्र वाचलेला ईसीएम हा विषयही होता. हा विषय फारसा अवघड होता असे नाही तर पुर्ण थियरी अस्ल्याने मी नंतर देऊ असा विचार केलेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
संजय अभ्यंकर Wed, 09/29/2010 - 18:03 नवीन
९ विषय सूट्ले होते त्यात फक्त एक रात्र वाचलेला ईसीएम हा विषयही होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
ऋ
ऋषिकेश Wed, 09/29/2010 - 11:11 नवीन
चांगला विषय.. हे असे आहेच, यावर दुमत नाही. तेव्हा यावर फार चर्चा करण्यासारखे काहि वाटत नाही.. मात्र ह्यावर उपाय काय? यावर चर्चा घडाविशी वाटते. सरकारी उपाययोजना होतील तेव्हा होतील (किंवा होणारच नाहीत) पण मग तोपर्यत एखाद्याला व्यावसायिक प्रात्यक्षिकाभिमुख सिक्षण हवे असेल तर काय करता तेईल? यावर उहापोह होणे गरजेचे आहे. सरकार काहि करणार नाही हे गृहित धरून(केले तर उत्तम आहे) कंपन्यांनीच उमेदवार निवडीचा वेळी स्वतः अशी प्रात्यक्षिकाधारित परिक्षा सुरू केली तर मुले आपोआप त्या दिशेने प्रयत्न करतीलसे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मिहिर Wed, 09/29/2010 - 13:43 नवीन
सँडविच इंजिनिअरींग COEP, MIT सारख्या काही कॉलेजमध्ये आहे. माझे मित्र आहेत सध्या तिथे.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 09/29/2010 - 15:27 नवीन
सध्या तरी भारतात प्रॅक्टीकल इंजिनीअर ही संज्ञा रुढ नाही आणि अजून अनेक वर्षे तरी तशी चिन्हे नाहीत. :( मी सध्या आय.आय.टी. खरगपुर येथे इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग्मधे एम.टेक. करत आहे. मला इथले स्ट्रक्चर बर्‍यापैकी ठिक वाटले. अनेक विषयांचा इंडस्ट्रीत कसा उपतोग आहे हे शिकवतानाच समजावले जाते. विद्यार्थी त्यावर शिक्षकांबरोबर चांगल्यापैकी वादविवाद करतात. लॅब्जमध्ये जर गणिते असतील तर ती एखाद्या प्रॅक्टीकल गोष्टीबरोबर रिलेट केलेली असतात. जे विद्यार्थी टेस्टमध्ये वगैरे चांगले मार्क मिळवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी असाईनमेंटस देतात, ज्यायोगे विद्यार्थ्याची चांगली तयारी होईल. शिकवण्याची पद्धत वगैरे आणि शिक्षकांचा अनुभव बघून माझ्या कोल्हापुरच्या कॉलेजाचे तोंडही पहावे वाटत नाही. ज्ञान, शिकवण्याची हातोटी आणि प्रत्यक्ष अनुभव याचा अभूतपूर्व संगम इथे मी अनुभवतोय.
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 09/29/2010 - 18:14 नवीन
नितीन थत्ते. सर्व प्रथम अभिनंदन. खुप छान चर्चा विषय सूरू केल्या बद्दल. बहूतेक वेळा विद्द्यार्थी आपली आवड न लक्षात घेता मिळणारी नोकरी, मिळणारे गुण , पालकांचे प्रेशर, पीअर प्रेशर इत्यादी कारणांनी कोर्स निवडतात. आवडी प्रमाणे कोर्स निवडण्याची मूभा असल्यास बर्याच समस्या सुटू शकतील. इंजीनियरींग कॉलेजेस मधे ईंडस्ट्रीशी ईंटीग्रेट करून प्रोजेक्टस आणायची जबाबदारी फॅकल्टी वर असते. बहूतेक कॉलेजेस मधे या बद्दल आनंदच असतो. समर ट्रेनींग कोणीच सिरिअसली घेत नाही. विद्द्यार्थ्यांनाच ते अरेंज करायला सांगितले जाते. कॉलेजमधे खूप पैसे खर्च करून इक्विपमेंटस् / फॅसिलीटीज आणल्या जातात. त्याचा प्रॉडक्टीव्ह किंवा ट्रेनिंग करता उपयोग शून्य असतो. असे आणि वरच्या चर्चेत आलेले अनेक मुद्दे विचारात घेतले तर सध्याच्या टेक्नीकल एज्युकेशनमधे अमूलाग्र बदल हवा हीच गोष्ट प्रर्कषाने जाणवते.
  • Log in or register to post comments
ए
एक Wed, 09/29/2010 - 18:30 नवीन
कळकळ दाखवणारे कितीजण कॉलेजमधे शिकवायला जायला तयार आहेत? .. मिळेल त्या पगारात.. शेवटी हे सगळं मिळणार्‍या मोबदल्याशी रिलेटेड आहे असं वाटतं. कॉलेज चालवणार्‍यांना ईंडस्ट्री ट्रेन्ड, अनुभवी लोकं ठेवणं परवडणारं नसेल तर असेच अनुभव न॑सलेले, नुकतेच डिग्री मिळवलेले लोक प्राध्यापक म्हणून ठेवले जाणार. बाहेरच्या इंडस्ट्री मधे कामाला भरपूर वाव आणि भरपूर मोबदला मिळणार असेल तर लोकं तोच पर्याय प्रथम निवडणार. व्यावसायिक जीवनात भरपूर पैसा कमवून झाला, सगळ्या गरजा भागल्या आता मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कॉलेज मधे शिकवायला जाऊ (गिव्हींग बॅक टू कम्युनिटी!!) असा विचार करणारे फार थोडे असतात. हे जर आपण करू शकत नसू तर वर वर्णन केलेली परिस्थीती कितीही खरी असली तरी नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार आपल्याकडे रहात नाही. असं वाटतं.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 18:42 नवीन
साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले. कामाची वेळ सकाळी ११ ते ३. त्यात दोन तासाची लेक्चर्स. आठवड्याला दहा तासाचे काम. महिन्याला ४० तास. म्हणजे इतरांच्या कामाच्या तुलनेत, महिन्याला २.८ लाख रुपये पगार. कुठल्या आयटी वाल्याला मिळतो हो ? उरलेल्या वेळात इतर जोडधंदे. ट्यूशन्स संध्याकाळी. कॉलेज मध्ये शिकवणे म्हणजे "गिव्हिंग बॅक" वगैरे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ब
बेसनलाडू Wed, 09/29/2010 - 19:49 नवीन
साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले. कोणते कॉलेज आहे? रेज्युमे पाठवावा की काय म्हणतो ;) (संधीसाधू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 21:56 नवीन
सहावा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतरचे सर्वांचे पगार आहेत हे. बाय द वे, आमच्या कॉलेजात, नवीन प्राध्यापक नियुक्ती करण्यासाठी २५ लाख "डोनेशन" घेतले जाते उमेदवाराकडून. आणि बरेच लोक देतात. ७० हजाराचा महिन्याला पगार, म्हणजे ३ वर्षांचा पगार हा डोनेशन म्हणून देतात. यावरून लक्षात यावे. गणिताच्या बारावीच्या ट्यूशनचा रेट सध्या वर्षाला ३० हजार रुपये आहे, लहान गावांत. पि-सी-एम पॅकेजला ७५००० रुपये. २५ लाख डोनेशन देणारा प्राध्यापक, वर्गात काहीच शिकवत नाही. त्यामुळे १०० विद्यार्थ्यांना त्याची ट्यूशन लावावी लागते. म्हणजे, वर्षाचे ३० लाख रुपये मिळतात. करा गणित. इकडे नुसती आय टी वाल्यांच्या पगारांच्या नावाने खडे फोडणारी मंडळी, ह्या द्रोणाचार्यांबद्दल "पवित्र शिक्षकी पेशा" म्हणून मूग गिळून बसतात की नाही, ते बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ए
एक गुरुवार, 09/30/2010 - 02:40 नवीन
लाईन चुकली लेले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 09/30/2010 - 01:18 नवीन
>>साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले ही पक्की माहिती आहे कि शुद्ध लोणकढी ?? (एरवी शंका नसती घेतली, पण आजच दुसऱ्या एका धाग्यावर अशीच एक थाप वाचली आहे) थांबा १-२ दिवस, थेट अश्वमुखातून माहिती काढतो (straight from the horse's mouth)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 04:56 नवीन
मी एक-दोन दिवसात पे-स्लिप मागवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
स
सहज गुरुवार, 09/30/2010 - 05:08 नवीन
सरकारी कॉलेज, पूर्ण अनुदानीत किंवा महागड्या उच्चभ्रु शिक्षणसंस्थेत कायमस्वरुपी तसेच विद्यापीठातील शिक्षकांना असे दांडगे पगार आहेत. सर्वच कॉलजमधील शिक्षकांना नाही असे वाटते. बरेचसे शिक्षणमहर्षी आपापल्या अभियांत्रीकी शिक्षणसंस्थेत मुद्दाम नवखे, कमी पैशावर त्या त्या सेमिस्टरचा / वर्षाचा अभ्यासक्रम उरकतील असे लोक नेमतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 05:17 नवीन
सहावा वेतन आयोग हा केंद्र सरकारने स्थापला असल्याने, सरकारी अनुदाने असलेल्या महाविद्यालयातच सदर आयोगाने निर्दिष्टकेलेली वेतने दिली जात असावीत हे स्वाभाविक आहे. परंतु मूळ मुद्दा हा "पवित्र शिक्ष्हकी पेशा" स्वीकारायला किती लोक तयार आहेत, हा श्री. एक ह्यांच्या प्रश्नावर आधारित होता, त्यामुळे शिक्षकी पेशाचे आजचे अनुभव सांगावे हे उद्देष्य. हल्लीच एका शिक्षिकेने एका ब्लॉगवरून एक निबंध मिपावर कॉपी-पेस्ट करून, स्वतःचा म्हणून ठोकून दिल्याचे (आणि त्याचे उदात्तीकरण करण्याचे) उदाहरण समोर आहे. आय टी वाल्यांच्या मेहनतीच्या कमाईवर तुटून पडणारे किती जण ह्या सडलेल्या (आणि पुढच्या पीढीला, आपल्या भविष्याला सडवणार्‍या) धंद्यावर तुटून पडताहेत हे बघायचे. आणखी एक उदाहरण देतो. पुण्याचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय. यंदा अकरावीचे नवीन १२० विद्यार्थी येथे प्रवेश घेते झाले. अकरावीच्या वर्गात बाके आहेत ८०. शिकवणीच्या प्राध्यापकांनी सांगितले: बघा, तुम्ही कॉलेजात जाऊ नये, हीच कॉलेजाची इच्छा आहे. मग उगाच कशाला जाता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज गुरुवार, 09/30/2010 - 05:30 नवीन
गरवारेचे कॉलेजचे उदाहरण तर घरातले आहे. पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ग
गणपा Wed, 09/29/2010 - 23:08 नवीन
हल्ली ५०-६० च्या वर प्रतिसाद दिसले की मी शक्यतो ते काथ्याकुट/चर्चा वाचायचे टाळतो. आज चुकुनच हा धागा उघडला. आणि कधी कधी चुका ही चांगल्या असतात हे पटल. :) थेत्तेसाहेब एवढा चांगला विषय तेवढयाच चांगल्या रितीने चर्चेस आणल्या बद्दल धन्यवाद. निकोप पणे ही चर्चा तडीस नेतायत म्हणुन समस्त प्रतिसाद कर्त्यांचे ही आभार. खुप दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली. (शिक्षण एकात, करियर दुसर्‍यात आणि आवड तिसर्‍यात असलेला) -गणपा
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/30/2010 - 05:43 नवीन
अश्वमुखातून माहिती काढतो दोन मुखे असतात..नेमक्या कुठल्या मुखातली बातमी अ‍ॅकवणार आहात
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 10/02/2010 - 04:51 नवीन
नितिन, लेख छान लिहिला आहेस. मनापासून आवडला. इतरांच्या प्रतिक्रिया न वाचता मी माझी प्रतिक्रिया लिहितो आहे. कदाचित ही प्रतिक्रिया आधीच कुणी लिहिलीही असेल..... ४६ वर्षांपूर्वीच्या स्वतःच्या शिक्षणावर आधारित अशा माझ्या मतानुसार इंजिनियरिंग कॉलेजे इंजिनियर्सना तर्कशुद्धपणे विचार करायलाच शिकवतात, इतर कांहीं फारसे नाहीं. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात त्याचा प्रवेश एकाद्या 'नव्या नवरी'सारखाच होतो! त्यानंतर मुकुंद कंपनीच्यावतीने अनेक वर्षें campus interviewसाठी जाण्याचे भाग्य लाभले त्यात माझ्या कॉलेजमधील अगदीच सुमार वाटत. फक्त I. I. T. Powai मधील विद्यार्थी well-educated & well-trained वाटत. इतर I. I. T मधील विद्यार्थी so-so असत! आपल्या व्यावसायिक अनुभवाचा फायदा आपल्या तरुण मित्रांना द्यावा या विचाराने मी मध्यंतरी मोकळा होतो म्हणून मी माझ्याच कॉलेजमधे 'चकटफू' ferrous metallurgy शिकविण्यासाठी माझी सेवा देऊ केली, head of deptt यांनी त्याचे स्वागत केले व मला ferrous metallurgyच्या प्राध्यापकाकडे पाठविले पण तेथील कुणीच माझ्या विनंतीकडे गांभिर्याने पाहिले नाहीं. त्यावेळी मी सेवानिवृत्तीच्या पलीकडील वयोगटात होतो (म्हणजे कुणाचाही प्रतिस्पर्धी नव्हतो) तरीही दुर्लक्षच करण्यात आले. (कदाचित) त्यांच्या शिकवण्यातील त्रुटी चव्हाट्यावर येतील या भीतीपलीकडे मला इतर कुठलेच कारण दिसले नाहीं. मग मी पुन्हा नोकरीनिमित्त्य परदेशी गेलो व ते स्वप्न तसेच राहिले. व्यावसायिक इंजीनियर्सना कॉलेजांत निमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा फायदा तरुण विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे या तुझ्या मताशी मी १०० टक्के सहमत आहे. आणखी एक गोष्ट अशी कीं इंजिनियरिंगचे शिक्षण तसे १६ वर्षांत संपायचे ते आताअ १७ वर्षांत संपते. त्या मानाने वैद्यकीय व CA यांचे शिक्षण लांबते!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 10/02/2010 - 12:40 नवीन
मिभो म्हणताहेत ते फारसे चुक नाहीये. पण एक त्रुटी -जे दर महीना म्हणताहेत ते फक्त सिनियर्स ना ते सुद्धा सहाव्या वेतन आयोगानंतर सुमारे ६०००० रुपये. ज्यानी कॉलेज मधे १५ वर्षे काढली आहेत त्यांना. ट्युशन शिकवणार्‍यांचे(कॉलेज करुन) महीना सरासरी उत्पन्न सुमारे ८०००० ते १५०००० सिनियॉरिटी प्रमाणे.
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Mon, 10/04/2010 - 07:31 नवीन
स्टेट बँक ऑफ इंडियाने कारकुनांच्या २७००० जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यासाठी ३८ लाख जणांनी ऑनलाईन अर्ज केले आणि २७ लाख जण लेखी परीक्षेला बसले. निवड झालेल्या २७ हजार उमेद्वारांत ३८०० जण इंजिनिआरिंगचे पदवीधर असून २०० जण तर इंजिनिरिंगचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. रिसेशनमुळे सध्या इंडस्ट्रीत जॉब नसल्याने किंवा जॉब कधीही जाण्याच्या भीतीने सुरक्षित पगाराची नोकरी म्हणून हे लोक बँकेत कारकून म्हणून काम करायला तयार झाले आहेत. स्टेट बँकेच्या मनुष्यबळ विभागाला या बदलत्या ट्रेंडचे आश्चर्य वाटत आहे, पण टेक्निकल ज्ञान असलेले कर्मचारी मिळाले म्हणून ते खूशही आहेत. -मेरा भारत महान-
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 10/04/2010 - 11:03 नवीन
ह्म्म्म. इंजिनिअर्सनी बँकेत काम करने हे काही नवे नाही. अनेक बँका आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनना प्रकल्पांना कर्ज वाटप करताना प्रकल्पाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी इंजिनिअर लागतातच. अर्थात या इंजिनिअर्सनी कोणत्या पदांशाथी अर्ज केले आहेत हे माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 10/22/2010 - 07:50 नवीन
हा आमच्या कॉलेज मधला किस्सा . आमच्या मास्तरांनी मोटोर चालू करून आवाज होतोय पाणी वर जात नाही म्हणून electrical department च्य नावाने खडे फोडले.म्हणे तुम्ही फेज उलट्या जोडल्या मुळे मोटर उलटी फिरते आहे.तिकडून माणूस आणला तो म्हणला कि “हि तर सिंगल फेझ मोटर आहे”.इथे पहिला पचका आणि नंतर त्याने फक्त मोटोर चे कवर जरा हलवले आणि मोटर सुरु .हा किस्सा अजून कॉलेज मध्ये गाजतोय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा