Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी रॅप ...

ब
बट्ट्याबोळ
Tue, 09/28/2010 - 19:32
🗣 100 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19080 वाचन

💬 प्रतिसाद (100)
प
प्रियाली Tue, 09/28/2010 - 19:42 नवीन
कार्यक्रम हिंदी चॅनेलवर असेल तर स्पर्धकांनी हिंदीतून भाग घेणे योग्य वाटते. तुम्ही काय करता हे परिक्षकांना कळायला हवे परंतु कधीकधी भाषेचे बंध तोडूनसुद्धा कार्यक्रम सादर केला जातो; तसा प्रदीपचा रॅपचा प्रयोग साजिद, सोनाली आणि प्रेक्षकांना आवडला आणि त्यांनी उचलून धरला यातच सर्व आले. एखाद्या मराठी चॅनेलवरील कार्यक्रमात कोणी तमिळ/ मल्याळी संवाद/गाणी म्हटले आणि परिक्षकांनी "तुम्हाला काय सांगायचे हे कळले नाही." असे सांगितले तर काय चुकीचे आहे?
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 09/28/2010 - 21:28 नवीन
२००४ साली वीरझारा नावाचा एक चित्रपट आला होता. थेटरात जाऊन पहिला होता. अर्धा सिनेमा पंजाबीत होता. किरण खेर ला मराठी ऐकण्याचे पैसे तरी मिळत होते, इथे माझे पैसे फुकट गेले. हिंदी सिनेमात अनेक गाणी पूर्ण पंजाबीत असतात. ऐकतो ना आम्ही ती? मग खेर बाईंनी एकदा जरा मराठी ऐकले तर काय भोके पडतात का अंगाला? त्यातून तो काय बोलत होता ते मलाही कळत नव्हते, हिंदीत असते तरी तिला नसते कळले. याच बाईंनी अनेक चित्रपटात पंजाबी भूमिका केली आहेत. तेव्हा अनेकदा काही काही संवाद पंजाबीत म्हटले असतील की, ते ही चालवून घेतले ना आम्ही. साधारण १० वर्षांपूर्वी गुलजार ने हुतुतू नावाचा चित्रपट काढला होता. त्यात मराठी लहेजा वापरला होता. उत्तर भारतात तो अजिबात चालला नाही त्याचे कारण काही जणांनी लोकांना भाषा आपलीशी वाटली नाही असे दिले होते. अर्थात तो चित्रपट इथे पण नाही चालला म्हणा. पण मुद्दा हा राहतोच की आपण इतरांना चालवून घेतो तसे ते आपल्याला करत नाहीत. आणि, खेर बाईंना इतकी वर्षे इथे राहून मराठी कळत नाही? थोबाड वर करून सांगायला लाज पण वाटत नाही, कारण आपण मराठी लोक मूर्ख आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शिल्पा ब Tue, 09/28/2010 - 21:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
इ
इंटरनेटस्नेही Tue, 09/28/2010 - 23:57 नवीन
(मराठी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/29/2010 - 14:41 नवीन
+३ हे पंजाबीचं लोण फार वाढलंय. कधी कधी तर कळत नाही काय बोलत आहेत. आणि हेच लोक मराठी अंगाने जाणार्‍या हिंदीला हसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
स
सविता Wed, 09/29/2010 - 17:55 नवीन
+४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शुचि Wed, 09/29/2010 - 19:52 नवीन
>> आणि हेच लोक मराठी अंगाने जाणार्‍या हिंदीला हसतात. >> +५ गुरमीतचा मित्र यायचा मला विचारायचा "कैसे हो?" मी आपली मराठीचं हिंदी भाषांतर करून म्हणायचे - "मझेमें" :P लगेच दोघं फिदी फिदी हसायचे. मला कळायचं नाही का ते. मग एके दिवशी मी त्याला विचारलं "आप कैसे है?" तो म्हणाला "बढीया जी आप सुनाइये" मग मला कळलं "कैसे है" ला "बढीया" हा सही जवाब असतो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रियाली Tue, 09/28/2010 - 21:33 नवीन
मी पूर्ण विडिओ आता पुन्हा बारकाईने पाहिला. बाईंच्या अंगविक्षेपांवरून शंका घेण्यास जागा आहे खरी. तसेच, कार्यक्रमाच्या नावात 'इंडिया' हा शब्द भारतभरच्या लोकांना आमंत्रित करतो हा मुद्दाही मान्य. बाकी खेरबाईंना मराठी का कळत नाही वगैरे प्रश्नांची उत्तरे त्याच देतील. :) मी कोणत्याही अंगाने किरण खेर नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ब
बेसनलाडू Wed, 09/29/2010 - 01:25 नवीन
पूर्ण पटला. सध्या बॉलिवूडचे जे पंजाबायझेशन चालले आहे, त्या आमच्या नि काही मित्रांच्या निरीक्षणाशी/निष्कर्षाशी पूर्ण जुळणारा प्रतिसाद! म्हणजे चित्रपटाचा नायक अगदी खन्ना, कपूर, कोहली, अरोरा वगैरे; आणि ड्रायवर, घरातील नोकर, कामवाली बाई, पोलीस हवालदार हे सगळे 'डाउनमार्केट रोल्स' (?) हटकून (अनेकदा) मराठी आडनावांचे :) गाण्यांमध्येही सजदा, रब, विच, हुड, मौजा, मैनु-तेनु असे काय काय असते, ते वेगळेच! आमच्या एका जवळच्या मित्राने याचा इतका धसका घेतलाय की गाण्यात कधीही 'हुड' ऐकले की हाड-हुड्च करत सुटतो. चालायचंच :) (समविचारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 03:35 नवीन
>> सध्या बॉलिवूडचे जे पंजाबायझेशन चालले आहे पंजाबायझेशन हे सध्या चालू नसून ते गेली अनेक वर्षे चालू आहे. सध्या त्याला उत आला आहे इतकेच. वीरझारा बघून बाहेर पडल्यावर आमची याच विषयावर तक्रार चालू होती की हिंदी चित्रपटात भारतीय संस्कृती=पंजाबी संस्कृती असे समीकरण मांडण्यात येते. यावर आमच्या एका पंजाबी मैत्रिणीने (जी बरीचशी अग्रेसिव आणि अंमळ ढिली होती) दिलेले स्पष्टीकरण "That's because punjabi culture is the richest culture in the world" असे होते. आणि त्यावर आमच्यातील एका एकारान्ती ची प्रतिक्रिया "No, that's because all the ****ing producers and directors are punjabi" अशी होती (पण उघड नाही, केवळ २-३ जणांसमोर. नाहीतर ती महामाया चालून आली असती याच्या अंगावर) असा माज आपण कधी दाखवणार? इथे आपण सगळ्या गोष्टींचा न्यूनगंड घेऊन चालत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
श
शुचि Wed, 09/29/2010 - 03:49 नवीन
directors are not only punjabi but narrow minded punjabi. इतर एखादा डायरेक्टर असता त्याने इतर संस्कृती एक्स्प्लोर केली असती पण हे पडले माठ पन्जु. दाक्षीणात्य संस्कृती खूप रिच आहे तशीच आहे मराठी, बंगाली, ओरीया देखील असावी. पण कलात्म दृष्टीने पहाणारे लोक हवेत. झापड लावून बल्ले बल्ले करणारे माठ पन्जु नकोत. "आपकी खातीर" पाहीला. ती खन्ना, अरोरा, मेहेरा नावं आली की तिडीकच जाते. एक प्रकारे बरय म्हणा देशपांडे, मोकाशी, कुलकर्णी नावं घेऊन ती शर्ट फाडत नाचणारी सुपरफिशीअल ध्यानं तरी दाखवत नाहीत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 10:27 नवीन
>>एक प्रकारे बरय म्हणा देशपांडे, मोकाशी, कुलकर्णी नावं घेऊन ती शर्ट फाडत नाचणारी सुपरफिशीअल ध्यानं तरी दाखवत नाहीत ते किस्मत कनेक्शन नावाचा एक अतिभंगार चित्रपट पहिला होता. त्यात शाहीद कपूर (गरीबांचा शारूक) एका बाहुल्याला मजेने पटवर्धन असे नाव देतो. आम्ही गडबडा लोळलो होतो थेटरात. आमच्या apartment मध्ये एक पटवर्धन राहायचे, तेच डोळ्यासमोर येत होते सारखे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रियाली Wed, 09/29/2010 - 14:48 नवीन
मराठी माणसांनी चित्रपट काढावा, त्यासाठी लागणारा ब्लॅक-व्हाईट मनी आणावा, गरज पडल्यास डी-गँग किंवा तत्सम गँगची मदत घ्यावी, आयटेम साँगवगैरे ठेवावे आणि पात्रांना एकारान्ती किंवा 'कर'करीत आडनावे द्यावीत. ;) त्या के-गँगला (केकता, करण आणि केकेश कोशन*) त्यांची जागा दाखवून देता येईल. ;) * यांत किरण खेरही शोभून दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 19:07 नवीन
मधुर भांडारकर ह्यासाठीच मला आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शेखर Wed, 09/29/2010 - 19:18 नवीन
महेश मांजरेकर ला विसरलात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 22:08 नवीन
त्याचे केस मला आवडत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
प
प्रियाली Wed, 09/29/2010 - 19:20 नवीन
मधुर भांडारकर ह्यासाठीच मला आवडतो.
तेथे __/\__ माझे जुळती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
र
रेवती Wed, 09/29/2010 - 19:40 नवीन
श्रेयस तळपदे हा निर्माता आहे असं ऐकलय. बाकी हिंदी शिनेमामध्ये गाणी लिहिणे, संगीत देणे, संवाद लेखन वगैरे कामांमध्ये आहेत मराठी माणसे. पण एकंदरीतच सिनेमासाठी लागणारा बक्कळ पैसा ओतणं कितीजणांना जमेल हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
शिल्पा ब Wed, 09/29/2010 - 19:42 नवीन
अय्या!!! कित्ती हँडसम आहे नै तो !! बाकी त्या मांजरेकर, भांडारकराकडे बक्कल पैसा असेलच कि? का नाही दाखवत मराठी संस्कृती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 22:10 नवीन
संस्कृती दाखवणे म्हणजे काय ? इंगा दाखवणे सारखे काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 01:49 नवीन
इंगा दाखवणे हीसुद्धा मराठी संस्कृतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 09/30/2010 - 02:52 नवीन
तो आपण बाहेरच्यांना कुठे दावतो? एकमेकांना हिरीरीने दाखवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
र
रेवती Wed, 09/29/2010 - 19:45 नवीन
तो हँडसम आहे किंवा नाही यापेक्षा किती चांगले सिनेमे काढतो ते बघुयात. आणि आपला आणखी एक तो लगानवाला, जोधा अकबर वाला माणूस्.....नाव विसरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शेखर Wed, 09/29/2010 - 19:54 नवीन
आशुतोष गोवारीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 04:28 नवीन
सिनेमेही बघू अन त्यालाहि बघू...काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रुपी Wed, 09/29/2010 - 20:40 नवीन
बरोबर आहे. हे निर्माते - दिग्दर्शक वर्षानुवर्षे पंजाबातून बाहेर आलेले नाहीत. पण एकच मसाला ते तरी किती दिवस विकणार? कदाचित त्यामुळेच 'यशराज' चे बरेच चित्रपट सध्या आपटले आहेत. बाकी 'राज' भीतीने किंवा अजून कुठल्या कारणाने सध्या काही जण मराठी पात्रे टाकतात, पण तसले प्रकार पाहिल्यावर त्यापेक्षा नसलेलेच बरे असं वाटतं (उदा. मध्यंतरी आलेला अक्षय कुमारचा खट्टा मीठा). टिचकुले आडनाव असलेला हा नायक स्वतःच 'टिच्यकुले' असा हिंदीसारखा उच्चारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 22:11 नवीन
हेराफेरीत परेश रावल ला बाबूराव आपटे हे नाव अगदी शोभून दिसत होते, हे विसरलात ! आणि उत्पल दत्तचे "धुरंधर भाटवडेकर" !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 22:31 नवीन
बघा, झाला की नाही मराठी लोकांचा सन्मान, गेल्या ३० वर्षातील चित्रपटांत मिळून तब्बत ३ मराठी पात्रे आठवली की आपल्याला !!! कोण गळे काढतो आहे रे तिथे, मराठी लोकांना दुय्यम दर्शवतात म्हणून ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 22:50 नवीन
आणखी खूप आठवतात, पण लिहिले नाही. हिंदी सिनेमातील मराठी पात्रे अधिक की मराठी सिनेमांत हिंदी पात्रे अधीक, ह्याचा शोधा घ्या रे कुणी तरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
श
शुचि Wed, 09/29/2010 - 23:18 नवीन
नका ना ठेऊ मराठी पात्रं अजीबात पण मग मोलकरणी, हवालदार, झाडूवाले देखील पंजाबीच दाखवा ना. ती का गंगूबाई, पांडू हवालदार लागतात यांना. आपल्याला कळायला नको त्यांचा कावा. (कावा शब्दावर प्लीज कोटी नको. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सुप्परमॅन Wed, 09/29/2010 - 23:46 नवीन
तुमच्या घरी कधी पंजाबी नोकर होता का? तुमच्या सासरच्या घरी कधी होता का ते पण विचारून घ्या. तुमच्या मोहल्ल्यात पंजाबी नोकर किती त्याची लिस्ट काढा मग आपण पुढे बोलूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 05:02 नवीन
अगदी अगदी. मुंबईत राहणारे निर्माते, दिग्दर्शक, कथा-पटकथालेखक, मोलकरणींची नावे मराठी ठेवणार नाहीत तर मग काय ठेवणार ? प्रियंका गांधी ? बरखा दत्त ? की जयवंतीबेन मेहता ? शांताराम कादंबरीत रॉबर्ट्स ला ड्रग पुरवणारा गाईड म्हणून प्रभाकर खरे हे नाव वाचले आणि धन्य झालो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्परमॅन
म
मस्त कलंदर गुरुवार, 09/30/2010 - 08:41 नवीन
मला आख्य्ख्या पुस्तकात कुठे त्याचे आडनांव नाही दिसलं.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 20:08 नवीन
खर्रे असे स्पेलिंग आहे. नीट वाचा पुन्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
प्रियाली Wed, 09/29/2010 - 23:34 नवीन
करन जोगलेकर - अक्षय कुमार - मैं खिलाडी तू अनाडी डॉ. कुलकर्णी आणि त्यांची बायको - रमेश देव/ सीमा - आनंद सुभाष नागरे - अमिताभ बच्चन - सरकार/ सरकार राज शंकर नागरे- अभिषेक बच्चन - सरकार राज मिली जोशी* - उर्मीला मातोंडकर - रंगीला सध्या चटकन वरचे आठवले. * जोशी हे आडनाव उत्तर भारतीयांपासून दक्षिण भारतीयांत असल्याने 'बेनेफिट ऑफ डाउट' द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नंदन गुरुवार, 09/30/2010 - 06:33 नवीन
सिद्धार्थ मराठे - गुलाम (आमिर खान)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मस्त कलंदर गुरुवार, 09/30/2010 - 08:41 नवीन
नाना पाटेकरची सगळ्या चित्रपटातली नांवे. खुरजुवेकर-ख्वाहिशमधली मल्लिका. मी पाहिलेल्या प्रसंगात ती तिच्या आडनावाचा अगदी व्यवस्थित उच्चार करून इतरांनाही त्यांचा उच्चार चुकतोय हे सांगत होती. बाकी, एक व्यक्तिगत मत म्हणून पिक्चरमधली पंजाबी-तत्सम धाटणीची नांवे आपल्या पोरांना देणार्‍या आईबाबांची पण मला जाम कीव येते. उदा. श्रीदेवी पाटिल, समीरा साळुंखे, खुशी जगदाळे. ही नावे माझ्या परिचयातल्या मुलींची आहेत. मुलांची उदा. पटकन आठवली नाहीत म्हणून लिहिली नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रियाली गुरुवार, 09/30/2010 - 20:16 नवीन
रघुनाथ नामदेव शिवलकर - संजय दत्त - वास्तव राजाराम जोशी* -नसिरुद्दिन शहा - कथा संध्या सबनीस - दिप्ती नवल - कथा इ. साधू आगाशे - नाना - अबतक छप्पन आणि मांजरेकरच्या अस्तित्वमधली पात्रं. * हे जोशी नक्की मराठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/29/2010 - 09:49 नवीन
हहपु. मराठी लोक हिंदी चॅनेलवरचे कार्यक्रम, हिंदी सिनेमे बघतात आणि मग तिथे मराठीला नावे ठेवली म्हणुन गळे काढतात =)) वरतीच एका काकांनी पंजाबी संवादमुळे पैसे फुकट गेल्याचे दु:ख जगजाहीर केले आहे. तसेच दु:ख बहुदा किरण खेरला वेळ वाया गेल्याचे झाले असेल. अब आपका खून खून और किरण खेर का पानी ? आता इतके वर्षे हिंदी चित्रपट बघुनसुद्धा कित्ती कित्ती लोकांना हिंदी येत नाही, येवढी गाणी ऐकुन पंजाबी सुद्धा येत नाही. त्यांना वाटते का लाज ? मग किरण खेरला कशाला वाटावी ? बर त्यात वर कोणितरी म्हणालय की "त्यातून तो काय बोलत होता ते मलाही कळत नव्हते, हिंदीत असते तरी तिला नसते कळले." बघा तुमच्या मातृभाषेत असुन तुम्हाला कळत न्हवते मग परिक्षक म्हणुन तिला कळले नाही तर तिने तक्रारपण करायची नाही ? असो.. आम्ही मराठी आहोत पण मुर्ख नाहीत त्यामुळे लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 11:43 नवीन
>>आम्ही मराठी आहोत पण मुर्ख नाहीत अवांतर आणि व्यक्तिगत शेरेबाजीला फाट्यावर मारण्यात आले आहे. बाकी वादासाठी वाद घालण्यात काडीमात्र रस नसल्याने आमचीही लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/29/2010 - 12:27 नवीन
अवांतर आणि व्यक्तिगत शेरेबाजीला फाट्यावर मारण्यात आले आहे.
अर्रे ? काका तुम्ही कुठला शब्द व्यक्तिगत घेतलात ? मराठी का मुर्ख ? जली को आग कहते है बुझी को राख कहते है.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
श
शुचि Tue, 09/28/2010 - 19:55 नवीन
कधी कधी आपण बोलतो एक वाक्य पण ते अशा रीतीने बोलतो की सूर अगदी वाक्याच्या विपरीत निघतो. मला वाटतं बट्ट्याबोळ यांना असं म्हणायचं आहे की ती बोलली हे साधं वाक्य "आम्हाला समजलं नाही" पण सूर टीकेचा लावला होता, नाउमेद करणारा होता म्हणा, मराठी विरोधी होता. तसं असता कामा नये. "इंडीया हॅज टॅलेंट" मधे स्पर्धेचेदेखील नियम असतीलच ना. ते स्पर्धकांना तसच परीक्षकांनादेखील माहीत पाहीजेत. असे "on the fly" जर परीक्षक नियम बनवत असतील तर ते चूकीचं आहे.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 10/03/2010 - 09:23 नवीन
दुटप्पी पण कशाला म्हणतात बघायचे असेल तर हे पहा http://www.youtube.com/watch?v=L25tcwrla6w&feature=related अगदी योगायोगाने आज मिळाले हे. किरण खेर चा चेहरा पहा हे ऐकताना. महाभारतातील प्रसिद्ध वाक्य आठवले. "तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" अगदी असेच विचारले पाहिजे या खेरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ब
बट्ट्याबोळ Tue, 09/28/2010 - 20:16 नवीन
शुची ताई शी सहमत ... किरण खेर च्या बोलण्यातली तक्रार खटकली. @प्रियाली .. जेव्हा मराठी वाहिनी वर कार्यक्रम असतो तेव्हा त्याला "ईंडिया" चे लेबल लावलेलं नसतं. इथे "ईंडिया" - टॅलंट सर्च आहे ... मला बाकीच्या भाषांचं माहीत नाही, पण मराठी ला तिथे वाव मिळावा :) आणि जर मराठी नको होती तर आधिच्या फेर्‍यांमधेच त्याला बाद करायला पाहिजे होतं. असो, प्रदिप ला शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 09/28/2010 - 22:43 नवीन
मला वाटते आधीच्या आणि आताच्या फेर्यांमध्ये फरक आहे. आता स्पर्धा वाढल्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरून एखादा बाद होऊ शकतो. त्याचे रॅप खरच चांगले असेल तर ते जास्त लोकांपर्यंत पोहचले तर चांगलेच आहे. @ विश्वनाथ : किरण खेर यांच्यावर एवढा राग का? जेव्हा मराठी वाहिन्या विनाकारण कार्यक्रमात "Lil champs" सारखे शब्द जोडतात आणि बहुतेकांची आवडती निवेदिका पल्लवी जोशी उगीचच मध्ये मध्ये इंग्रजी वाक्ये टाकू शकते ते आपण खपवून घेतोच ना? निदान पंजाबी, हिंदी या भारतीय भाषा तरी आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 11:37 नवीन
राग किरण खेर वर नाही. पण समजा याच मंचावर पंजाबी लोककला(किंवा काहीही पंजाबी) सादर झाली असती तर त्या असे म्हणाल्या असत्या का? बाकी पल्लवी जोशीचे म्हणाल तर मला ती उगीच इंग्लिश फाडायला लागली की दोन ठेऊन द्याव्याश्या वाटतात. तीच गत फु बाई फु मधील स्वप्नील जोशीची. (अवांतर :- हा जोशी आडनावाचा परिणाम असेल काय? समस्त जोश्यांनी हलके घ्यावे) व्यक्तिश: मला मराठी बोलताना अनावश्यक इंग्रजी शब्द वापरलेले आवडत नाही. जिथे शक्य असेल तिथे मराठीच वापरतो. आणि इंग्लिश वापरून गेलो तरी लगेच विचार करतो की हा शद्ब टाळता आला असता का? पण इतरांच्या तोंडावर माझी सत्ता नाही चालत ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/29/2010 - 11:42 नवीन
(अवांतर :- हा जोशी आडनावाचा परिणाम असेल काय? समस्त जोश्यांनी हलके घ्यावे)
आम्ही घेतलंच लाईटली (काल डॉक्टरपण सांगत होती, लाईटच फूड घ्यायला), पण या शब्दशः ट्रान्सलेट झालेल्या फ्रेजेसचं काय हो करायचं? एक डब्बल ब्यारल जोशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
अ
अनामिक Wed, 09/29/2010 - 15:00 नवीन
आणि इंग्लिश वापरून गेलो तरी लगेच विचार करतो असं नाही हो "इंग्रजी वापरून गेलो तरी..." असं म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
र
रुपी Wed, 09/29/2010 - 20:23 नवीन
हेच म्हणणार होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 20:57 नवीन
चूक दाखवल्याबद्दल आभारी आहे. (वरीलच प्रतिसादात एका ठिकाणी इंग्रजी हा शब्द वापरला आहे.) आणि तसेही मी काही अगदी चुपके चुपके मधला धर्मेंद्र नाही हो. अगदी धेडगुजरी भाषा बोलू नये असे माझे मत आहे. नेहमीच्या बोलण्यात शर्टाला सदरा आणि टेबलाला मेज नाही म्हणत (बोललो तर बऱ्याच लोकांनाच कळणार नाही), पण सफरचंदाला Apple म्हणणे टाळतो. काही महिन्यांपूर्वी माझ्या मित्राने मला खालील वाक्य ऐकवले होते. "आता मी every alternate wednesday इथे येणार". याला मराठी म्हणावे का?? असो हे सगळेच अवांतर आहे, त्यामुळे पुढील चर्चा खव मध्ये करू किंवा वेगळा धागा काढू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा