Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी रॅप ...

ब
बट्ट्याबोळ
Tue, 09/28/2010 - 19:32
🗣 100 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19080 वाचन

💬 प्रतिसाद (100)
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 05:04 नवीन
भाषेच्या शुद्धतेच्या नादात जातीवाचक लिहिले तर चालते का काका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 09/30/2010 - 07:45 नवीन
धेडगुजरी हा शब्द जातीवाचक नाही. हा घ्या पुरावा मुळात गुजरी हा जातीवाचक शब्द आहे हा जावईशोध तुम्ही लावला आहे. जे गुजरांचे ते गुजरी. जसे गुजराथी, बंगाली, कर्नाटकी तसे. माझा एक गुजर मित्र बोलताना गुजरी जेवण, गुजरी प्रथा असे शब्द सर्रास वापरतो. वरील दुव्यानुसार इथे गुजरी भाषेचा संदर्भ आहे असे वाटते. (गुजर म्हणजे कोण ते माहित आहे? की ते पण सांगू?) हा शब्द जातीवाचक नाही हे माझ्या मते तुमच्या सारख्या उच्चशिक्षित व्यक्तीला माहित असणार. नसेल माहित तर एकदा गुगल केले असते तरी हा अर्थ कळला असता. मुद्दाम विषयाला फाटे फोडू पाहत आहात का? उत्तर देण्यास मी समर्थ आहे. खरे तर मी यावर अजून काही लिहिणार नव्हतो पण तुम्ही जातीवाचक उल्लेखाचा आरोप केलात म्हणून बोलावे लागले. असले आरोप करण्यापूर्वी १० दा विचार करत जा असा अनाहूत सल्ला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सविता गुरुवार, 09/30/2010 - 08:23 नवीन
टाळ्या....टाळ्या....टाळ्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 20:11 नवीन
धेड म्हणजे काय ? ह्यासाठी खानदेशी मराठीच्या डिक्शनरीत गुगलावे लागेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 10/04/2010 - 21:37 नवीन
धेडगुजरी या शब्दाचा शब्दकोषाप्रमाणे काय अर्थ होतो ते आधीच सांगितले आहे. आता तुम्ही म्हणालात त्यानुसार धेड या शब्दाचा अर्थ पाहू. धेड हा शब्द जात दर्शवतो हे खरे आहे. पण म्हणून धेडगुजरी हा शब्द जातीवाचक आहे असे म्हणू शकत नाही. भाषाशास्त्रात अर्थपरीवर्तन नावाचा एक प्रकार (phenomenon) असतो. एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ किंवा संदर्भ न राहता त्याला वेगळाच अर्थ जेव्हा प्राप्त होतो त्याला अर्थपरीवर्तन असे म्हणतात (अत्यंत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अपरोक्ष हा शब्द). केवळ मराठीच नाही तर सर्व भाषांत अशी उदाहरणे असतात. पाहिजे तर हा त्याचा नमुना समजा. त्यातून हा शब्द केवळ भाषेसंदर्भात वापरला जातो, इतर ठिकाणी नाही. त्यामुळे त्याला जातीय रंग नक्कीच नाही. आता धेडगुजरी या शब्दाकडे वळूया. जालावर शोधताना एक मला माहित नसलेली माहिती मिळाली ती म्हणजे खानदेशी भाषेचे दुसरे नाव धेडगुजरी आहे असे या ठिकाणी पुढील अर्थाचे वाक्य सापडते. "१९९७ मध्ये केलेल्या सर्वे(मराठी?) नुसार, १५७९००० लोक खानदेशी भाषा बोलतात. याच भाषेला धेडगुजरी असेही म्हटले जाते." या ठिकाणी पण हिच माहिती आहे.() २००७ साली सनातन प्रभात च्या संपादकांवर (श्री हजारे) हा शब्द वापरल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला होता. कॉंग्रेस चे सरकार सनातन प्रभात वर तत्परतेणे खटला भरते या मागे केवळ भाषिक मतभेत नक्कीच नाहीत. तेव्हा उठलेल्या गदारोळातील काही मते खाली देत आहे. असाच खटला सामना वर पण दाखल केला आहे म्हणे(पक्की माहिती नाही) संदर्भ -इथे आहे भाषांतर करताना घोळ होऊ नये म्हणून मूळ इंग्रजी मजकूर देत आहे. संपूर्ण वृतांत वरील दुव्यावर वाचता येईल. Adv. Nitin Kanitkar :- The Government pleader "Although the word has no controversial meaning in the dictionary,....." Adv. Balasaheb Deshpande, pleading the case of Shri. Hazare :- "The word 'dhedgujari' is not against any caste. It was also used by Shri. Hatkanagalekar, the president of Marathi literary meet and question of hurting anyone's feelings does not arise. All information and address of Gurudev Dr. Kateswamiji from whose article the excerpts were taken has already been furnished to the police even before arrest of Shri. Hazare." Shri. Sagar Javadekar, the chief reporter, Dainik Tarun Bharat :- "'Dhedgujari' is not an abuse and is used in general sense of the term." Senior journalist Arvind Vitthal Kulkarni :- "In the 'Vyutpatti Kosha' compiled by famous linguist late K. P. Kulkarni, the word 'Dhedgujari' has been explained in the following manner "language used by people belonging to 'Mahaar'caste. It is a combination of different languages. This word is therefore, used for any combination (of languages) or for any inconsistent thing." It may be observed from the above that the word 'dhedgujarai' describes the condition of something and is not scandalous or disparaging. 'Dhed' means person from 'Mahaar' community. The language they speak is 'dhedgujari'. As the language is a mixture of many languages, any distortion or mixture/ combination is termed as 'dhedgujari'. One should be determined that the language used by him is not 'dhedgujarai' but an improved version. It is in fact, objectionable to find an excuse for accusing person for a trivial cause and spoil the harmony among people. Dr. Ambedkar, who drafted Indian Constitution, was of the view that it is not proper to create unnecessary bitterness among people. Therefore, finding fault in the usage of the word 'dhedgujari' is against the principles advocated by Dr. Ambedkar. There are proverbs or sayings in Marathi based on Brahmins or other castes; but people from the concerned castes do not seem to mind such usage. One has to see the basic purpose. In the said article, it is not the intention of Dr. Kate to belittle people from 'dhed' community but to show drawbacks of the Constitution and there is no need for any kind of criticism on the said word. " S. G. Shevade, national 'Pravachankaar' :- " 'Dhedgujari' is a figure of speech and should not be misrepresented. It suggests a combination of words taken from different languages. There is no 'Dhed' and no 'gujar' as such and it does not point to any particular community. Therefore, it is not right to take objection to this article." Famous historian Pandurang Balkawade :- "'Dhedgujari' word does not point at any community" अजून काही मते :- 'Dhedgujari' word is used quite often in Marathi language; but it is not directed at any particular caste or community. It implies a combination, something that is not perfect/ correct. It is not proper to use it for political gains and nobody has, so far, broken and interpreted this word in such manner. "The meaning of the word 'dhedgujarai' has been given in a book titled 'Shabda Ratnakar' as a combination of words used from two languages. In the 81st Marathi literary meet, Shri. M. D. Hatkanangalekar, the president of the conference had said in his speech that the most effective medium for propagation of any language is daily newspapers. These newspapers are, however, using tainted/ dhedgujari language and responsible for its ominous condition. He said further that all of us should protest against such distortion of language." चला, इतके पुरेसे असावे. दोन जालिय शब्दकोष, व्युत्पत्ती कोश, शब्दरत्नाकर, अनेक पत्रकार, प्रवचनकार, इतिहासकार, वकील, घटनाकार आंबेडकर या सगळ्यांचा संदर्भ पुरेसा असावा. तरीही पटले नाही, तर मोठमोठ्या साहित्त्यीकांची पुस्तके वाचत रहा (हे तुम्ही करत असणारच), अनेक ठिकाणी हा शब्द सापडेल. वरील परीच्छेदांपैकी के.पी.कुलकर्णी यांचा संदर्भ असलेला परिच्छेद पुन्हा वाचा. त्यात असे आक्षेप घेणे हाच सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचवणे असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर केलात तोच आरोप तुमच्यावर येऊ शकतो. वाद घालावा तितका थोडा आहे. माझा या धाग्यावर, या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Mon, 10/04/2010 - 23:43 नवीन
मेहंदळे काका, आपण ह्या प्रतिसादाचा एक स्वतंत्र लेख बनवावा, अशी नम्र विनंती. (बघा, सगळीकडे विरजण घालत नाही हल्ली आम्ही ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
श
शिल्पा ब Tue, 10/05/2010 - 01:56 नवीन
<<बघा, सगळीकडे विरजण घालत नाही हल्ली आम्ही डोमकावळा म्हंटल्यामुळे का? - गव्हाळ चिचुंद्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 09/30/2010 - 08:28 नवीन
तरीही त्या शब्दात काही चुकीचे असेल तर आधीच माफी मागतो. उगाच नंतर गोंधळ नको. पण हा शब्द सर्रास वापरला जातोच की मराठीत. (मूळ प्रतिसादात हे लिहायचे राहून गेले, आणि आता लिहिता येत नाही म्हणून वेगळा प्रतिसाद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 09/30/2010 - 08:29 नवीन
चुकून दोनदा प्रतिसाद गेला, म्हणून एक काढून टाकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ग
गोरिला Tue, 09/28/2010 - 21:15 नवीन
हातर मराठी भाषेचा अंड त्या कलाकाराचा अपमान आहे वास्तविक त्या प्रोग्राम मध्ये एक मराठी जूरी पण आहे ती नि पण काही प्रतिक्रिया नाही दिली ह्या बद्दल खूप वाईट वाटते . अहो त्या मराठी माणूस वाल्यांना काल्वूया बह्गु ते काही तोडगा काढतात का ते ?
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील Wed, 09/29/2010 - 11:46 नवीन
>>हातर मराठी भाषेचा अंड त्या कलाकाराचा अपमान आहे वास्तविक त्या प्रोग्राम मध्ये एक मराठी जूरी पण आहे >>अहो त्या मराठी माणूस वाल्यांना काल्वूया >>बह्गु ते काही तोडगा काढतात का ते ? अहो त्यांचं ठीक आहे. तुम्ही का रेप करताय पण मराठी भाषेवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरिला
च
चिगो Wed, 09/29/2010 - 07:52 नवीन
मला खरं तर प्रदीप चा ह्या वेळचा रॅप तितकासा आवडला नाही.. बाकी "बाहेरच्यांना महाराष्ट्रात राहून मराठी न येणे" हा चावून आणि वापरुनही चोथा झालेला विषय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर पंजाबी आणि इतर लोक राज्य करतात हे सत्य आहे, आणि त्यांच्याकडे नोकर, काम करणारे मराठी असतात म्हणून ते तसं दाखवतात.. उद्या सुदैवाने (आणि कर्तुत्वाने) मराठी लोकांनी त्यावर ताबा मिळवला तर चित्र बदलेलही... आणि "आम्ही खपवून घेतो, मग त्यांना काय होते तसे करायला?" हा युक्तिवाद मलातरी मान्य नाही. अहो, आपण खपवून घेतो म्हणून तर माज करताहेत ना.. असो.. प्रदीपला शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
व
वारा Wed, 09/29/2010 - 08:24 नवीन
बट्ट्याबोळ रावांचा बट्ट्याबोळ असो (सॉरी विजय असो) :) आणि पद्या काशीकराच्या नावान चांगभल..... Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Wed, 09/29/2010 - 09:37 नवीन
महाराष्ट्रात जे बाहेरील लोक राहातात ( बाहेरुन पोट भरण्यासाठी येतात किरण खेर सारखे ) त्यांना मराठी हि यायलाच हवी. (कमीत कमी समजयला हवी.) साजिद खान ला मराठी कळते ..????? कळलीच पाहीजे ! मला हेवा वाटतो त्या तमिळ भाषेचा (तामिळनाडू) जेथील लोकांना त्यांच्या भाषेचा कडवा अभिमान आहे. आणि आपण ??? (तमिळ लोक हिंदीला कमी लेखतात ! ) महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित राज्य आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे. मग मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे !!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/29/2010 - 15:43 नवीन
चेनैमध्ये गेल्यावर लई फजिती होते राव! असं म्हणतात कि त्यांना विंग्रजी कळतं किंवा तमिळ! आमच्या टॅक्सी आणि रिक्शावाल्याला फक्त तमिळ येत असल्याने नुसते एकमेकांकडे टकमक बघत बसायला लागले. माझी जाउ घरातून बाहेर येउन तिने जेंव्हा ड्रायव्हरशी हुज्जत घातली तेंव्हा आम्हाला भारतवारीचा खरा आनंद मिळाला.;) बाकी मुद्दा राहिला तो इतर भाषांचा! जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी? त्यांचे वर्तुळ सोडून त्यांना तसेही फारसे कुणामधे मिसळायला लागत नाही. अशी कोणी जबरदस्ती करून भाषा कशी शिकता येइल? त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजयशिवाजीरावगडगे
स
संजयशिवाजीरावगडगे Wed, 09/29/2010 - 17:13 नवीन
चेन्नईमध्ये गेल्यावर लई फजिती होते राव! ?! तुमचा व माझा अनुभव सारखाच आहे म्हणायचा ! जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी? त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा! हा तुमचा विचार पटला !@!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
स्वैर परी Wed, 09/29/2010 - 12:56 नवीन
माझाहि हातभार : जर मराठी रॅप चालत नाही शोमधे, तर हे आधीच नियमावलिमधे दाखल करायला हवे होते, नन्तर बोम्बा मारुन काय उप्योग! आणि बाकि महाराष्ट्राबद्दल म्हणत असाल, तर लोकाना महाराष्ट्र म्हणजे मुम्बई असे वाटते. जे काहि अन्शी बरोबर देखील आहे. शिवाय महाराष्ट्रासार्खेच आणखीहि काहि राज्य आहेत जी प्रगत आहेत.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 09/29/2010 - 15:19 नवीन
ते बाकीचं मरु द्या तिच्यायला! आपल्याला तर मराठी रॅप ऐकायला एकदम मजा आली. :) फक्त त्यानं ते 'भॉव्व भॉव्व भॉव्व' कमी तरी करायला पाहिजे नाहीतर नीट 'भाऊ भाऊ भाऊ' तरी म्हणायला पाहिजे :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/29/2010 - 15:24 नवीन
मी त्यातले पहिले दोन व्हिडो बघितले. किरण खेरने काय म्हणले ते दिसलेच नाही. :(
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 09/29/2010 - 15:40 नवीन
+१ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/29/2010 - 15:47 नवीन
मी त्यातले पहिले दोन व्हिडो बघितले. किरण खेरने काय म्हणले ते दिसलेच नाही.
का दिसले नाही ह्याचे एक अतिशय योग्य कारण तुम्हाला सांगणार होतो पण खाली अजुन एक +१ आलेला बघुन गप्प बसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शेखर Wed, 09/29/2010 - 15:51 नवीन
-१ टाकुन सांग रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Wed, 09/29/2010 - 15:53 नवीन
'समाज किती प्रगत झालाय, नै?' (श्रेयअव्हेरःमिभोकाका.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
आ
आमोद शिंदे Wed, 09/29/2010 - 17:29 नवीन
बॉलिवूड चित्रपट नावाच्या निर्बुद्ध प्रकारावर पंजाब्यांनी मक्तेदारी सांगीतली तर मराठी म्हणून मला बरंच वाटलं.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 09/29/2010 - 17:43 नवीन
ह्म्म्म! त्या किरण खेरचं सोडा पहिले प्रदिप काशीकर ह्या माणसाने मराठी असून "रॅप" हा प्रकार हाताळायलाच नको होता. आपण मराठी आहोत, मग असं इंग्रजी संगीताच अनुकरण करूच कसं शकतो? बरं त्यानं ते केलं तर बाकी मराठी लोक ते खपवून कसं घेतात? त्याला बोलायचं सोडून बिचार्‍या किरण खेरला नावं ठेवताहेत लोक!
  • Log in or register to post comments
स
सविता Wed, 09/29/2010 - 18:05 नवीन
ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
N
Nile गुरुवार, 09/30/2010 - 03:16 नवीन
त्या त्याच्या रॅपपेक्षाही (कानाला) काय बोचलं तर त्याचं, "पोवाडा म्हणजे रॅप" हे विधान साला आपल्या समृद्ध परंपरेला पाश्चात्य गोष्टींची नावं जोडल्याशिवाय विकता येतच नाहीत का? च्यायला इथे पोवाडे गायले तर ऐकायला कीती गोळा होतात काय माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ब
बट्ट्याबोळ Wed, 10/06/2010 - 05:49 नवीन
सुरेश भटांनी गझल हा काव्यप्रकार मराठीमधे आणला त्याला देखील तुम्ही हेच म्हणणार का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/06/2010 - 06:52 नवीन
'उपरोध' हा प्रकार मराठीत कोणी आणला, जोडे हाणा त्यांना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ
श
शिल्पा ब Wed, 09/29/2010 - 22:05 नवीन
दोन वर्षापूर्वी मी सीबीडी तल्या MGM हॉस्पीटलातल्या डीन का कोण असतो त्याला "मराठी" या विषयावर बोलले होते... त्याचं काय झालं, मी तिथल्याच एका स्त्री डॉक्टरला भेटले होते...मी मराठीत बोलत असताना सुद्धा ती सौथ इंडिअन काळूंद्री इंग्रजीत चालू होती... मग नंतर मी त्यांच्या मुख्य जो डीन का काय त्याला भेटून सांगितले कि तुम्ही इथे येत, पैसे कमावता अन तुम्हाला इथली भाषा बोलता येत नाही? का? वगैरे .. तर त्याचे म्हणणे असे होते कि आमची दर ३-५ वर्षांनी भारतात कुठेही बदली होते मग कसे काय सगळ्याच भाषा शिकणार? तरीपण मी स्वतः बर्यापैकी मराठी बोलतो ...अजून तिथे कोणीतरी कशाचेतरी पेढे द्यायला आला होता त्याला विचारून म्हणे - मी जमेल तसे जमेल तितके मराठी बोलतो कि नाही? तो "हो" म्हणाला....म्हणणारच..खालच्या rank चा होता..असो. तर मुद्दा हा कि तुम्हाला राग येईल तिथे तो constructive पद्धतीने व्यक्त करा...त्यांना समजू द्या कि साधारण लोक सुद्धा जागृत झाले आहेत...केवळ राज ठाकरे नाही.. आपणच आपल्या भाषेचा अभिमान नाही बाळगला तर दुसरं कोण बाळगणार?
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/30/2010 - 03:52 नवीन
सीबीडी, MGM, हॉस्पीटल,डीन,सौथ इंडिअन, rank .... जमेल तसे जमेल तितके मराठी.... तर मुद्दा हा कि तुम्हाला राग येईल तिथे तो constructive पद्धतीने व्यक्त करा.. 'कंस्ट्रक्टीव्ह' प्रतिसाद अतिशय आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 05:06 नवीन
ती सौथ इंडिअन काळूंद्री मराठीची भलामण करताना आपण वंशभेदी / वर्णभेदी झाल्या आहात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 05:16 नवीन
सौथ इंडिअन हा वेगळा वंश आहे हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि गोर्याला गोरा म्हण्टलेलं चालतं तर काळ्याला काळा का नाही म्हणायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 05:45 नवीन
गव्हाळ ? करड्या ? की आणखी काही ? तुमचा उल्लेख करताना "मराठी गव्हाळ चिचुंद्री" असा केला तर चालेल का ? पण, माझा मूळ मुद्दा बाजूला टाकताहात. (आणि हो, द्रविड हा वेगळा वंश आहे. आर्यांपेक्षा जुना.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 05:56 नवीन
तुम्ही म्हणताय का " मराठी गव्हाळ चिचुंद्री" मला ? आणि तुम्हाला काय माहिती मी आर्य का द्रविड ते? माझेच ज्ञान वाढेल म्हणुन विचारले? आणि आताच्या काळात भारतात कोणी आर्य - द्रविड मानत असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 06:15 नवीन
आणि आताच्या काळात भारतात कोणी आर्य - द्रविड मानत असेल असे वाटत नाही. एक वेळ अर्वाचीन भारतात स्त्री-पुरुष भेद मानणार नाहीत, पण आर्य-द्रवीड भेद नक्कीच मानतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 06:17 नवीन
पुरावा? बाकी आर्य द्रविड हा भेद मानतात हे वाचुन बरीच करमणुक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 06:20 नवीन
*मानतील* हा भविष्य काळ. भविष्य काळाचा पुरावा मागणार्‍या तुम्ही अजबच दिसताय. बाकी आपली करमणूक तथ्यांनी होते, हे वाचून आमची करमणूक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 06:24 नवीन
म्हणण्याचा अर्थ असा कि कशावरून हा भेद मानतील? कशावरून ओळखणार कोण द्रविड अन कोण आर्य ते? तथ्य म्हणण्याजोगे काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 06:28 नवीन
म्हणण्याचा अर्थ असा कि कशावरून हा भेद मानतील? कशावरून ओळखणार कोण द्रविड अन कोण आर्य ते? आपल्या मतानुसार जे काळुंद्रे ते द्रविड. एक्स्टेंशनः जे पांढरुंद्रे ते आर्य, आणि गव्हाळ चिचुंद्र्या = मिक्श्चर. असो, पण सीरियसली: वस्त्रप्रावरणांमुळे, स्वयंपाक करणे-न करणे ह्यामुळे, स्त्री पुरुषांतला भेद कमी होतोय. बर्‍याच लोकांना ओळखू देखील येत नाहीत स्त्री कोण आणि पुरुष कोण ते. पण उडदामाजी काळे गोरे निवडणारे उदंड आहेत. उदा. "काळुंद्री" हा शब्द.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
सविता गुरुवार, 09/30/2010 - 06:06 नवीन
"मराठी गव्हाळ चिचुंद्री" ह. ह. पु. वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 06:15 नवीन
*मी मनातल्या मनात मिभोंना काळा कावळा म्हणून घेतले...अन विरजण घालणारे असल्याने डोमकावळा..* त्यांना सांगू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 06:17 नवीन
ह्या पितृपक्षात आपण मला कावळ्याचा दर्जा दिला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पितरांच्या काय अतृप्त इच्छा होत्या त्याही कळवाव्यात. पूर्ण करेन ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 06:18 नवीन
पितर आम्ही मानतच नाही...पण आमच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या तर नक्की सांगू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 06:22 नवीन
अहो, आम्ही तुमच्या पितरांसारखे. त्यांच्या इच्छा पूर्ण करू. तुमच्या अपुर्‍या इच्छा पूर्ण करण्यास कुणी तुम्च्या पीढीचे लोक शोधा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/30/2010 - 07:20 नवीन
"आई गं" म्हणावं का "बाप रे" असा प्रश्न पडला आहे. असो. तुमच्या पिढीचे लोक शोधा का कावळे शोधा? अवांतरः आमच्या घरात कोणत्याही पिढीतल्या कोणाच्याही कसल्याही इच्छा अपूर्ण नाहीत हे आधीच जाहीर करते. नाहीतर मिभोकाका माझंही रॅगिंग घ्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/30/2010 - 09:19 नवीन
ह्या काकुपण बोर्डात आल्या होत्या का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
वेताळ गुरुवार, 09/30/2010 - 08:44 नवीन
द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष गेली २० वर्षे आलटुन पालटुन पालटुन तामिलनाडुत राज्य करत आहे. तो फक्त द्राविडी लोकांच्या पाठिंब्यावर राजकारण करतो. मला वाटते महाराष्ट्रात देखिल आर्यांपेक्षा द्राविडी लोकाची संख्या जास्त आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/04/2010 - 21:54 नवीन
छानच आहे
  • Log in or register to post comments
न
निखिलेश Tue, 10/05/2010 - 17:26 नवीन
जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी? त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा! हा विचार पटला. सोबतच जरा आमच्या विदर्भात डोकाऊन बघा. काय हिन्दी आणि काय मराठी ..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा