Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.

ग
गांधीवादी
गुरुवार, 09/30/2010 - 13:17
🗣 106 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23627 वाचन

💬 प्रतिसाद (106)
न
नन्दादीप गुरुवार, 09/30/2010 - 13:23 नवीन
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.................असेच.....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/30/2010 - 15:41 नवीन
बरे झाले निकाल लागला. आता भारताचे कल्याण होईल. देशाला पुन्हा ते सोनेरी दिवस येतील. ऑलिम्पीकमध्ये खोर्‍याने पदके मिळतील. रुपयाची क्रयशक्ती वाढेल. बहुतेकाना काम मिळेल. डेंग्यू , मलेरीया , डायबेटीस , अतीरेकी वगैरे संकटे नष्ट होतील. सर्व मुलांना शिक्षण मिळेल. भारत जी ८ देशांत सर्वात बलवान पुढारी होईल . एक शैक्षणीक आर्थीक लश्करी वगैरे वगैरे महामहासत्ता होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप
स
समंजस Fri, 10/01/2010 - 07:27 नवीन
आशावाद आहे :) [अवांतरः असं म्हणता येईल का, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पैसा गुरुवार, 09/30/2010 - 14:29 नवीन
निकाल पाहता काही गडबड होईलसं वाटतं नाही. साधारण हाच निकाल अपेक्षित होता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/30/2010 - 17:17 नवीन
निकाल हाच अपेक्षित होता मान्य आहे. परंतु हाच निकाल द्याय्चा होता तर येव्हडा वेळ लागण्याचे तसे काहीच कारण नव्हते . असे वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
निवेदिता-ताई गुरुवार, 09/30/2010 - 13:34 नवीन
होय..........हाच निकाल अपेक्षित होता............जय श्रीराम........
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे गुरुवार, 09/30/2010 - 13:37 नवीन
बरीच गुंतागुंत असेल निकालात. थोडे थांबूयात. वकफने title claim केले होते. ते रीजेक्ट झाले का? असेल तर ते अपीलात जातीलच.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 09/30/2010 - 13:46 नवीन
Allahabad High Court verdict on Ayodhya title suits out | The ownership of the disputed site is to be divided into three parts: the site of the Ramlala idol to Lord Ram, Nirmohi Akhara gets Sita Rasoi and Ram Chabutara, Sunni Wakf Board gets the rest | Status quo to be maintained for three months TIMES OF INDIA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे
प
प्रमोद्_पुणे गुरुवार, 09/30/2010 - 13:54 नवीन
गांधीवादी ते समजले. But how can Hon'ble HC decide on division of a disputed land? It can at the most suggest. अ आणि ब मधे Title dispute असेल तर मालकी हक्क एकतर अ कडे जायला हवा अथवा ब कडे. असो, हे प्राथमिक मत. सविस्तर लिहिनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
न
नावातकायआहे गुरुवार, 09/30/2010 - 13:44 नवीन
लिंक??
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 09/30/2010 - 13:52 नवीन
अयोध्येतील वादग्रस्त जागा रामजन्मभूमीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
न
नावातकायआहे गुरुवार, 09/30/2010 - 13:58 नवीन
जय श्री राम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गुंडोपंत गुरुवार, 09/30/2010 - 13:56 नवीन
सेंट्रल सुन्नी वक्फ़ बोर्डाची याचिका फेटाळली गेली आहे. आणि कोर्टाने हे मान्य केले आहे की जेथे सध्या मूर्ती आहेत तीच रामजन्मभुमी. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा नुसार मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत. अर्थात दोन्ही बाजू कोर्टात जाणार आहेत. पण मोहन भागवत म्हणत आहेत की चला आता राममंदिर बांधू या!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/30/2010 - 14:02 नवीन
पंत, मिपावर अजूनही अधिकृत निकालाचा दुवा आणि त्यावरील माहिती काही मिळेना. माझं नेट मंद झाले आहे. कोणी या दुव्यावरुन असलेला निकाल वाचून काही माहिती डकवतील काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
स
सुधीर१३७ Tue, 10/05/2010 - 19:11 नवीन
मी संपूर्ण निकाल वाचलेला नाही, परंतु मा. न्या. सुधीर आगरवाल यांचे निकालपत्रातील काही पाने वाचली आहेत व त्यावरून मला असे वाटते की, न्यायालयाने कायदेशीर बाबींचा संपूर्ण विचार करूनच योग्य असा निर्णय दिला आहे. केवळ वाद मिटविणे अथवा दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याच्या हेतूने असा निकाल दिला गेलेला नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे कयदेशीर दृष्ट्या विचारात घेऊनच ह निर्णय दिला आहे. हिंदूंचे म्हणण्यानुसार या जागेवर मंदिर पाडून मशीद बांधली गेली हे न्यायालयाने मान्य केले आहे, कारण... १) याबाबत हिंदूंचे म्हणणे कायम एकच (Consistent) आहे, त्यामध्ये बदल केला नाही व तसा पुरावा न्यायालयासमोर आलेला आहे. २) मुस्लीमांनी मोकळ्या जमिनीवर सदर मशीद बांधली आहे असा पवित्रा दावा लावताना घेतला होता; परंतु त्यांनी पुरावा देताना मात्र A.S.I. चा रिपोर्ट आल्यानंतर , जुना इदगाह पाडून त्यावर नवीन मशीद बांधली अश्या स्वरुपाचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला, जो मुळातच त्यांचा दावा नव्हता, त्यामुळे त्यावर न्यायालयाने अविश्वास दाखवला आहे. असा खोटा पुरावा देण्यास मदत करणारे हिंदू आहेत हे ही येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशा अर्धतज्ज्ञांच्या (हा शब्द माझा आहे) साक्षीवर न्यायालयाने अविश्वास दाखविला आहे. ३) न्यायालयात साक्ष देणा-या साक्षीदारांनी मशिदीचे बाजूला चबुत-यावर रामपूजन कैक वर्षांपासून चालू असल्याचे मान्य केले, इतकेच नव्हे तर हिंदु संपूर्ण परिसराला परिक्रमा करतात व त्यामध्ये मशीदही येते हे देखील मान्य केले. अशी साक्ष देणारे मुस्लीमही आहेत. ४) सीता रसोईचा परिसर निर्मोही आखाड्याचे ताब्यात आहे. ५) ताब्याबाबत संपूर्ण जमीन ही तीनही पक्षकारांच्या ताब्यात वर्षानुवर्षे आहे असेही न्यायालयापुढील पुराव्यात आले आहे. प्रत्येकाच्या ताब्यात विशिष्ट जागा आहे, ती ती जागा त्या त्या पक्षकारांना देण्यात आलेली आहे. ६) न्यायालयीन निकालपत्रात हिंदूंच्या मूळ वादाचे निराकरण झाले असून मंदिर पाडून मशीद बांधली गेली असल्याबाबत उत्खननात मिळालेले पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. याकामी अतिशय जुन्या काळाचा विअचार केला गेलेला आहे. ७) प्रत्यक्ष वाटपाबाबत मात्र १२ वर्षांचे कायदेशीर तत्त्वाचाच वापर केला आहे, यामध्ये प्रामुख्याने १९३४ ते १९४९-५० या काळाचा विचार केला आहे, जे पूर्णपणे कायदेशीर आहे. यापेक्षा अधिक माहिती देणे सध्या शक्य नाही, कारण संपूर्ण निकालपत्र वाचणे व्यक्तिगत कारणांमुळे मला सध्या शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पैसा गुरुवार, 09/30/2010 - 14:12 नवीन
अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल पुढे आहे. लिंक
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 09/30/2010 - 14:10 नवीन
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा नुसार मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत. मग प्रश्न संपायला हवा. हे निर्मोही अखाडा काय प्रकरण आहे? त्यांचा या जागेशी काय संबंध? त्यांना इथे काय उभे करायचय?कोणी जाणकार प्रकाश टाकतील काय? अवांतर : अयोध्येतील वादग्रस्त जागा रामजन्मभूमीच! कोर्टाचे असे म्हणणे असेल तर मधे कुठल्यातरी काँग्रेसी नेत्याला पडलेला "राम होता की नव्हता" हा प्रश्नही अपोआप निकालात निघालेला आहे असे म्हणावे काय?
  • Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी गुरुवार, 09/30/2010 - 14:13 नवीन
होय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
त
तन्गो गुरुवार, 09/30/2010 - 14:52 नवीन
मला एक समजत नाहि कि मुलिमानान्ना ह्यान सगल्या गोश्ति खतकत कश्या नाहित. म्हन्जे.... अयोध्येत राम मन्दिर , इस्रएल मध्येन जेरुस्लेम .... बर ह्या झाल्या इतिहसात्ल्या गोश्ति. पन आता 'New york mosque' बद्दलहिन तेच...... ९/११ नन्तर तेथे मुस्लिमासाथि गूदविल तयार कर्ने हे तेथिल मुस्लिमाचे काम.पन ते सगले सोदुन म्हने आम्हि त्या जागि मशीद बान्धु . आरे काय दोक सतक्लय का?...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 09/30/2010 - 14:11 नवीन
आत्ताच विविध चॅनेल्सवर या संबंधातील बातम्या पाहिल्या; आणि सर्वात शहाणपणाची गोष्ट तिन्ही बाजूच्या दावेदारांकडून झाली असेल तर ती ही की, प्रत्येकाने सर्व देशबांधवांना 'हा निकाल मान्य करावा आणि ज्यांना आपला विजय झाला असेल असे वाटते त्यांनी फटाके उडवून वा मिठाई वाटून तो साजरा करू नये....तर ज्यांना अन्याय झाला आहे असे वाटते त्यांनी त्याविरूध्द उग्रता दाखवू नये. त्यांना सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेतच.' प्रथमच चॅनेल्सवाल्यांनीही भडकाऊ प्रतिक्रिया दाखविणे जाणीवपूर्वक टाळले आहे....तसेच पॅनेलसमवेत कोर्टाच्या निकालातून 'रीड बिटवीन द लाईन्स' हा प्रकारही केल्याचे दिसत नाही. तेव्हा इथेही निकालाचे 'पोस्टमार्टेम' न करता एकतेचे, बंधुत्वाचे, सलोख्याचे वातावरण राहील अशीरितीने या धाग्यावर चर्चेचे रूप ठेऊ या. इन्द्रा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/30/2010 - 14:17 नवीन
>>>>प्रथमच चॅनेल्सवाल्यांनीही भडकाऊ प्रतिक्रिया दाखविणे जाणीवपूर्वक टाळले आहे. अगदी अगदी...! अजूनतरी वाहिन्यांवर संयमित चर्चा चालू आहे. मोहन भागवतांनी जरा दम धरावा, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
प
पुष्करिणी गुरुवार, 09/30/2010 - 14:18 नवीन
एन डी टिव्ही वर जरा वेगळं चित्र आहे. हरिश साळव्यांनी आत्ताच दत्त बाईंना जोरदार झापलय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/30/2010 - 14:33 नवीन
का? पण दत्तबाई झापायच्याच लायकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
प्रमोद्_पुणे गुरुवार, 09/30/2010 - 14:38 नवीन
फार आगाउ आहे. सर्वज्ञानी असल्यासारखे वागते. साळवे म्हणजे लय झाडले असेल बाईला. मिस केले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/30/2010 - 14:41 नवीन
कुठे बघायला मिळेल का इंटरनेटवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे
म
मुशाफिर Sat, 10/02/2010 - 01:18 नवीन
http://www.ndtv.com/video/player/news/harish-salve-on-the-ayodhya-verdict/166722 मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पुष्करिणी गुरुवार, 09/30/2010 - 14:52 नवीन
न्यायमूर्तींची वाक्यं अर्धवट वाचून मतं विचारतेय, भडकावतेय उगाचच . साळवे म्हणाले , 'बाई जरा पूर्ण वाक्य वाचा बरं' , मग पूर्ण वाक्य आणि पुढची २ वाचल्यावर अर्थ बदलला. 'एका जर्नॅलिस्ट्ला हे महत्वाचं वाटत्च नाही आश्चर्य आहे आणि उगाच पूर्ण रिपोर्ट वाचल्याशिवाय कशाला प्रश्न विचारताय, जरा दम खा' असं जोरात म्हणालेत साळवे . अगदी गप्राव :) . थोडी शांत झालीय .. मोहन भागवतांच बोलणं अ‍ॅक्चुअली अत्यंत संयमित वाटलं मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 17:35 नवीन
लिंक द्या... बाकी मन आनंदीत झाले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
व
विनायक प्रभू गुरुवार, 09/30/2010 - 14:39 नवीन
असे का म्हणता हो आपण बिपिन कार्यकर्ते राव साहेब जी.? त्यांना म्हणे पद्मश्री पण मिळाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
निखिल देशपांडे गुरुवार, 09/30/2010 - 14:19 नवीन
इंद्रा चा प्रतिसाद आवडला सध्या http://rjbm.nic.in/ इथे निकालाचा गोषवारा वाचत आहे. त्यानंतरच मत मांडेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
च
चिरोटा गुरुवार, 09/30/2010 - 14:44 नवीन
बरेच वर्षे अडकून पडलेला बोळा तात्पुरता का होईना निघाला आहे असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 09/30/2010 - 16:57 नवीन
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ह्या लिस्टमधे अयोध्या पण घाला आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
मदनबाण गुरुवार, 09/30/2010 - 15:09 नवीन
योग्य निर्णय... परकियांनी सदैव या महान देशावर आक्रमण केलेले आहे. मूर्ती भंजन करणारे परकियच होते., आणि असाच परकिय बाबर... त्यांनी ही बांधलेली मशिद. तेही रामलल्लाच्या जागेवर. ती आज रामलल्लाला परत मिळाली. :) हे बाबराने ( परकिय आक्रमक) केलेले बांधकाम गैरइस्लामी आहे, हे निकालात म्हंटले गेले आहे... जाता जाता :--- पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्। झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी॥१०- ३१॥ अर्थात :--- पवित्र करने वालों में मैं पवन (हवा) हूँ और शस्त्र धारण करने वालों में भगवान राम। मछलियों में मैं मकर हूँ और नदीयों में जाह्नवी (गँगा)। संदर्भ :--- श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० वा. http://alturl.com/5m9zp (जय श्रीराम)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत गुरुवार, 09/30/2010 - 15:13 नवीन
ती जागा मशिद नाहीच... नव्हती असे कोर्टाने सांगितले आहे. मग तेथे नमाज पढलेले, पढलेले... काफिर ठरतात का? म्हणजे ते मंदिरात जात होते त्यांना तर हिंदूच म्हंटले पाहिजे... ;))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/30/2010 - 15:18 नवीन
मी तर बर्‍याचवेळा त्याचा उल्लेख बाबरी ढाचा असाच केलेला वाचला आणि ऐकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
च
चिंतामणी गुरुवार, 09/30/2010 - 22:13 नवीन
ती जागा मशिद नाहीच... नव्हती असे कोर्टाने सांगितले आहे. मग तेथे नमाज पढलेले, पढलेले... काफिर ठरतात का? एक नंबरचा प्रश्ण. जास्त बोलायची जरूरी नाही. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
च
चित्रा गुरुवार, 09/30/2010 - 15:17 नवीन
लिहीता-बोलताना संयम बाळगावा, अशी अपेक्षा आहे. निकाल कोर्टाने दिला आहे, जर चर्चा व्हायची असली तर कोर्टाच्या निर्णयावर व्हावी. येथे आपल्यावैयक्तिक धार्मिक श्रद्धांचे प्रदर्शन करण्याची गरज भासू नये. ते सध्याच्या परिस्थितीत सवंग, भडकवणारे वाटू शकते याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/30/2010 - 15:19 नवीन
लिहीता-बोलताना संयम बाळगावा, अशी अपेक्षा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
क
कवितानागेश गुरुवार, 09/30/2010 - 15:26 नवीन
संयम बाळगून येथे शांतता राखून ठेवत आहे. ||शांतता||
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 09/30/2010 - 15:43 नवीन
मनापासून धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ग
गोरिला गुरुवार, 09/30/2010 - 15:39 नवीन
सग्ला पोपत झाला बाला. कै पन प्रतिक्रियआ नै देनर .
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/30/2010 - 15:41 नवीन
निकाल काय ते नक्की कळले नाहीये अजून. पण एकंदरीत सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न आहे का? कोणाही एका बाजूने निकाल लागणे अपेक्षित असते. मग ती कोणतीही बाजू असो. विशेषतः तिथे खाली मंदिराचे अवशेष आहेत असे निकालातच म्हणले आहे असे ऐकतोय. मग अजून काय कारण होते की १/३ वाटप करावे लागले? जाणकारांनी / अभ्यासूंनी इथे मते मांडावीत अशी अपेक्षा आहे. धनंजय, विकास इत्यादींची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 09/30/2010 - 15:47 नवीन
मला एक गंमतीदार शोध लागला आहे. एका जमिनीच्या तुकड्यावर एका ठिकाणी नितिन थत्तेला बसवला आहे. त्यावर ती जमीन स्वतःची असल्याचे अनेकांचे दावे आहेत. दाव्याच्या सुनावणीत कोणीच काहीच पुरावे (जमिनीच्या मालकीचे) दाखवू शकले नाहीत. निर्णय : १. सगळे दावेदार जॉईंट ओनर समजून तेवढ्या भागात वाटणी करा. २. पुरावे नसल्याने वहिवाटीनुसार नितिन थत्तेला जिथे बसवला आहे तेथून त्याला हटवायचे नाही. त्यामुळे भाग करताना 'ती' जागा नितिन थत्तेलाच मिळेल. ३. दोन हिंदू दावेदार आणि एक मुस्लिम दावेदार होते म्हणून तीन भाग केले. आठ हिंदू दावेदार आणि आणि दोन मुस्लिम दावेदार असते तर वाटणी दहा भागात होऊन चार पंचमांश हिंदूंना आणि एक पंचमांश मुसलमानांना मिळाला असता. उलट असते तर उलट झाले असते. ज्याने 'रामलल्ला विराजमान' ला एक दावेदार केले तो देशातला सगळ्यात हुशार माणूस आहे. :)
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 09/30/2010 - 22:27 नवीन
गंमत मान्य, पण सदर जागा ह्या तिघाही दावेदारांना खाजगीरीत्या वा व्यावसायिक फायद्यासाठी वापरता येणार नाही अशी काही तरतुद केली आहे की नाही? असल्यास गमतीची गम्मत कमी होईल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
समंजस Fri, 10/01/2010 - 10:56 नवीन
<<< ज्याने 'रामलल्ला विराजमान' ला एक दावेदार केले तो देशातला सगळ्यात हुशार माणूस आहे. --- सहमत. तो हुशार माणूस आहेच परंतू सगळ्यात हुशार नाही, कारण त्याच्या पेक्षा किंवा त्याच्या एवढाच हुशार होता तो 'शहेनशहा बाबर' :) 'शहेनशहा बाबर' ज्याने उत्तर हिंदूस्थानात राज्य प्रस्थापित केलं (अयोध्या नगरी सकट) त्या शहेनशहाला संपुर्ण अयोध्येत फक्त एकच जागा सापडावी मशिद बांधायला आणि ती सुद्धा अशी की जिथे पुर्वी एक मोठ्ठ मंदिर होतं आणि त्या मंदिराचे अवशेष तिथे विखुरलेले होते :) सगळीच गमंत आहे. नाही? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
इ
इन्द्र्राज पवार Fri, 10/01/2010 - 13:01 नवीन
"शहेनशहा बाबर' ज्याने उत्तर हिंदूस्थानात राज्य प्रस्थापित केलं (अयोध्या नगरी सकट) त्या शहेनशहाला संपुर्ण अयोध्येत फक्त एकच जागा सापडावी मशिद बांधायला....." श्री.समंजस.....वरील वाक्य काहीसे चुकीचे वा अपुर्‍या माहितीचे आहे. प्रत्यक्षात बाबरने ती मशिद बांधलेलीच नाही. बाबरने आक्रमण करून अनेक हिंदू राजांना पराभूत केले. तो काळ होता १५२७चा! त्याच्या सैन्याने उत्तर भारतातील खूप मोठा प्रदेश व्यापला आणि मीर बांकी यास आपल्या सरदारपदी नियुक्त केले. १५२८ मध्ये या मीर बांकी याने अयोध्येस भेट दिली आणि अनेक मंदिरांना जमीनदोस्त केले. त्यापैकी एका जागेवर त्याने जी मशीद बांधली, तिला त्याने आपल्या राजाचे- 'बाबरा'चे नाव दिले. त्यावेळेपासून म्हणून ती "बाबरी मशीद" म्हणून ती ओळखली जाऊ लागली....असा इतिहास आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
स
समंजस Fri, 10/01/2010 - 17:06 नवीन
बाबरच्या ठिकाणी मीर बांकी याचं नाव वाचू शकता त्यामुळे माझ्या वरील प्रतिसादाच्या मुळ अर्थात फरक पडणार नाही :) [ माझ्या माहिती प्रमाणे 'बाबर मशिद' या नावाने ओळखल्या जाणारी इमारत ही कोणी बांधली आहे यावर बरेच मतप्रवाह आहेत. विकी तसेच आणखी काही ठिकाणी मीर बांकी याने ही इमारत बांधली असा उल्लेख कदाचीत असेल तरी सुद्धा इतर बर्‍याच दस्तवेजांमध्ये मात्र बाबरचं नाव आहे :) उच्च न्यायालयात अश्याच काही दस्तवेजांच्या प्रती पुरावा म्हणून सादर केल्या गेल्या आहेत. सध्या उच्च न्यायालयाचा निर्णय वाचतोय त्यावरून काही निश्चीत मत तयार झालं की या विषयावर बोलेन :) ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
च
चेतन Fri, 10/01/2010 - 12:29 नवीन
एकूण किती दावेदार होते ...? (नक्की फक्त तीनच का?) >>दोन हिंदू दावेदार आणि एक मुस्लिम दावेदार होते म्हणून तीन भाग केले. आठ हिंदू दावेदार आणि आणि दोन मुस्लिम दावेदार असते तर वाटणी दहा भागात होऊन चार पंचमांश हिंदूंना आणि एक पंचमांश मुसलमानांना मिळाला असता. उलट असते तर उलट झाले असते. दावेदार आहेत म्हणुन काहि पुरावा सादर करावा लागतो का? Gopal Singh Visharad ,Zahoor Ahmad , Rajendra Singh अशी बरीच नावे खटल्यात होती मग त्यांना जागेत वाटणी का दिली नाही....? विचारवंतपणा (सुडो-से.) दाखवण्याचा नेहमीचाच प्रयत्न वाटला. चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अविनाश कदम Fri, 10/08/2010 - 22:28 नवीन
कोर्टाने रामल्लालाच दावेदार मानले पण तो हजर राहू शकत नाही हे लक्षात आल्याने त्याचा बालमित्र, सखा याला दावेदार मानले. १९८९ पासून दोघे सखे वारले तेव्हा त्यांचा वारसदार रामल्ला विराजमान दावेदार झाला. आता वाराणसीच्या बालकृष्णाच्या बालमित्रांचा शोध सुरू झाला आहे. त्यांना शोधून कोर्टात खटला जिंकल्यावर बाबरी मशीद पाडली तशी वाराणशीची मशीद लोकांना पाडावी लागणार नाही. कोर्टाच्या आदेशाने सरकारलाच मशीद पाडावी लागेल. एकूण येत्या काही वर्षात डिमॉलीशनची कामे करणार्‍्या कंत्राटदारांची चलतीच आहे. आता असे बरेच दर्गे व मशीदी पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय हे कोर्टाच्या आदेशाने. म्हणजे वाद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता नाहीच. अविनाश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/30/2010 - 16:44 नवीन
जय श्रीराम, सत्यमेव जयते. हायकोर्टात २/३ मिळाली. :) सुप्रीम कोर्टात ३/३ सगळी जागा मिळेल. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा