ते सोडा हो...
शुगर वगैरे पाहतील आमचे डॉक्टर.
त्यापेक्षा आम्हा म्हाताऱ्यांना वाचता येतील आणि चष्मा न लावता सापडतील अशी बटने बनवली तरी खुप झाले!
शिवाय हे बारके फोन कुठे हरवून जातात तेही कळत नाही. तुम्ही कुणाला सांगणार असाल तर चांगले मोठे फोन बनवा म्हणा त्यांना. हातात धरता येतील असे.
सारखा फोन हरवणारा
गुंडोपंत असे संबोधन मला बरे वाटते!
तरुण असतांना आमचा भर बोलण्यापेक्षा कृतीवर असे. पण हल्लीचे तुमच्या सारखे तरूण कृती करण्यापेक्षा मिपावरच पडीक दिसतात...
राहिला मुद्दा स्वानुभवाचा - अर्थातच स्वानुभव! मी तर नेहमीच वापरतो कारण व्हायब्रेटरने मानदुखी जरा कमी होते. तेव्हा माने जवळ गोलसर आकाराचा व्हायब्रेटर खरोखर बरा पडतो. तुम्ही वापरला नसेल तर वापरून पाहा.
अर्थातच स्वानुभव! मी तर नेहमीच वापरतो कारण व्हायब्रेटरने मानदुखी जरा कमी होते.
आधी ठरवा ब्वॉ काय लिहायचे आहे ते.
आधी म्हणता म्हातारे आहात, मग म्हणता पडत नाही का काय, मग हे सगळेच संपादित काय करतात. साठी बुद्धी की काय?
असो, अश्लिल बोलायचे असाल तर ते बोला की पण मग मान दुखीची फुटकळ सबब कशाला?
दोरी वापरतोच.
पण आंघोळीला जातांना कुठे तर काढून ठेवला तो सापडेचना...
त्यातच तो ढिस्चार्ज झाला.
म्हंट्लं, मरोत तो मोबाईल.
ज्याला असेल गरज तो येईल धडपडत. तेव्हढीच डोक्याला शांतता,
आणि लगेच १० मिनिटात सापडला हो!
आंघोळीहून आल्यावर चुकून मीच त्याच्यावर अंगपुसायचा टावेल टाकला होता. आमच्या हीने तो वाळत घालायला उचलला तर खाली मोबाईल.
चालायचेच!
आगदी बरोबर! माझा मोबाईल एकदा मुम्बई हुन पुण्याला येताना मझ्या हातातुन सटकुन बस खाली आला. सम्पूर्ण एक आठवदा माझ्याकडे फोन नव्हता. कित्त्त्त्त्ती बर वाटल म्हणुन सान्गु!!!
आधी धाग्याचे नाव वाचले अन नंतर....
>>>दोरी वापरतोच.
हॅ हॅ हॅ
>>> पण आंघोळीला जातांना कुठे तर काढून ठेवला तो सापडेचना...
हॅ हॅ हॅ... हॅ हॅ हॅ....
>>> त्यातच तो ढिस्चार्ज झाला.
हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...
>>> म्हंट्लं, मरोत तो मोबाईल.
हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....
>>> आंघोळीहून आल्यावर चुकून मीच त्याच्यावर अंगपुसायचा टावेल टाकला होता. आमच्या हीने तो वाळत घालायला उचलला तर खाली मोबाईल.
हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....
अवांतर: तुम्हाला लागणार्या गोष्टींनीयुक्त मोबाईल (फोन हो) चेनै च्या एका कंपनीने काढलेला आहे. नाव विसर्लो. मार्केटात येईलच. तवा तोच घ्या.
तुमचा मोबाईल वाजतोय खनाखना...
गुंडोपंताशी सहम्त.
बहुतेक मोबाईल फोनचे फॉन्ट्स फारच लहान असतात विषेशतः इन्कमिंग फोन चा नंबर चष्मा लावल्याशिवाय वाचताच येत नाही.
मोबाईल फोनमध्ये काय काय हवे.
माझ्या मते.
१)मोबाईल फोनम्मध्ये रहायला जागा मिळाल्यास मुम्बैतील जागांचे प्रश्न एकदम निकालात येतील.
२) माणसाला मोबाईलफोन तर्फे प्रवासाची सोय झाली पाहिजे. ( इकडून फोनमध्ये लॉगिन्न केले की तिकडून बाहेर पडता आले पाहिजे )
३) एकाच फोनमध्ये नवरा आनि बायको या दोघानाही रहाण्याची सोय असावी. म्हणजे मतभेद झाल्यास कोणालाही सर्रळ डीलीत करता येईल
४) मोबाइल मध्ये बोलणार्या माणसाचा चेहेरा दिसायला हवा. म्हणजे तो नक्की कोठून बोलतोय ते कळू शकेल
५) मोबाइल मध्ये बोलणाराभोवतालचे वातावरण बदलायची सोय असायला हवी म्हणजे आपण कुठे आहोत हे ऐकणाराला कळणार नाही
६) मोबाईलवरून थापा मारणाराना मोबाईलने डीटेक्ट करायला हवे.
७) मोबाइल थेट मेंदूशी कनेक्ट करता यायला हवा. म्हणजे हवी ती महिती/पुस्तके वगैरे डायरेक्ट डाऊनलोड /अपलोड करता येतील ( मॅट्रीक्स ष्टाईल)
८) ..... अजून आठवले की साम्गतो
मला नवीन मोबाईल पाहीजे... कशाला म्हणे?
आहे त्या मोबाईल मधून आवाज जातो - आवाज येतो ना?
पाहिजे त्याला (क्रेडिट असेल तर) फोन करता येतो ना?
हे महत्त्वाचे आहे. अजून काय हवे?
शिवाय एस एम एस करता येतात हेच खूप झाले.
किती वाढवायच्या गरजा? आणि कशासाठी?
१. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि त्याप्रमाणे वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे गाडी चालवताना सुखेनैव बोलता येईल.
२. मोबाईल वापरणारा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मोठ्याने बोलू लागल्यास त्याचा गळा आवळण्याची यंत्रणा.
३. रिंग वाजण्यापुर्वी वेळ आणि आजूबाजूची शांतता याचा अंदाज घेऊन रिंगचा व्हॉल्युम नियंत्रित करणारी यंत्रणा.
४. अवेळी फोन आल्यावर पलीकडून सेल्समन बोलत असल्यास त्याचे तोंड फोडण्याची यंत्रणा.
>> रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि त्याप्रमाणे वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे गाडी चालवताना सुखेनैव बोलता येईल. <<
१०००% सहमत.
याशिवाय मोबाईल फोन जी.पी.एस. नेविगेटर सारखा वापरता येतो का सध्या? नसेल तर तो नेविगेटर म्हणून वापरता यायला हवा. किमान शहरात तरी जी.पी.एस. नेटवर्क ऐवजी मोबाईल सेवा पुरवणार्या कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करता येईल का? असा विचार येतो डोक्यात जेव्हा रस्ता चुकतो तेव्हा ...
(अनेकदा रस्ता चुकणारा) सागर
म्हणजे आवडत्या व्यक्तिचा फोन आला की बघता येईल दिल की धडकन कशी आहे ते. विवाहित व्यक्ती तरी हा फोन घेणार नाहीत. न जाणो हापिसातून यायचा कोणाचा तरी फोन कुटुंब बरोबर असताना आणि व्हायचा सत्यानाश.
झोपेचा दर्जा मोबाईल कसा चेक करेल माहित नाही.घोरणे रेकॉर्ड केले तर ठीक आहे.पण घोरणे म्हणजे चांगली झोप् हा गैरसमज आहे.
छे हो एच टी सीवाले साहेब.
मी तर म्हणालो की,
वाचता येतील आणि चष्मा न लावता सापडतील अशी बटने लावा त्या फोनच्या काडेपेटीला.
चांगले मोठे फोन बनवा म्हणा त्यांना, हातात धरता येतील असे.
शिवाय कानाच्या जागी चांगली मऊ गादी लावून घेता आली तर पाहा, फार वेळ बोलून कानच दुखायला लागतो कधी कधी.
त्यामुळे आहेत ते फोन सुधारले की मग त्यात काय घालायचे हे पाहता येईल...
असो तुमच्या त्या भारीतल्या फोन मध्ये काय काय गंम्मत जम्मत करता येते ते सांगितले नाही आम्हाला?
>>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम
हे हे हे. आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) वयानुरुप वाचता येत नाही. मनगटी घड्याळाच्या आकाराचे मोबाईल म्हणजे त्यात आम्ही लोक काय पाहणार आणि काय वाचणार?
(वर्ड फाईल १६०% झूम करून वाचणारा)
आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) वयानुरुप वाचता येत नाही. मनगटी घड्याळाच्या आकाराचे मोबाईल म्हणजे त्यात आम्ही लोक काय पाहणार आणि काय वाचणार?
आंतरजालावर सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेतच असं नाही तद्वत, फोनची सगळीच मॉडेल्स सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी असली पाहिजेतच असं नव्हे!
-- रा.को, चोता दोन
बर्याचदा मला ऑफिसात फोन हातात ठेऊन फिरावं लागतं जे गैरसोयीचं वाटतं! स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी असा मनगटी घड्याळ्याएवढा फोन आला तर एवढी का हो तुम्हाला जळजळ?
-- अदित्सु
फोन हा पुस्तकाप्रमाणे वापरू नका, गैरसोय होणार नाही. तुमच्या घरात आलेल्या लँडलाईनवर सुरूवातीला काय वाचता येत होतं? आताही फोन लँडलाईन आहे समजा आणि वापरा.
-- आगकथेतील काड्याकुमारी
स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते.
१२ मधली १ बाई भारतीय असे समजले तरी खिशाचे फायदे अजुन जगाच्या त्या १/१२ जनतेपर्यंत का पोहचले नाही? 'खिसा द्या' आंदोलनाची गरज आहे? आजवर अन्य कोणा पारंपारीक वेशभूषा करणार्या खिसा नाही म्हणून गैरसोय म्हणल्याचे आठवत नाही. मिपावर गेल्या तीन वर्षात ह्या प्रश्नाला का बरे पाशवी वाचा फुटली नाही?
भारतात महीला फॅशन डिझायनर असुनही आजच्या जगात ही गैरसोय का खपवुन घेतली जात आहे?
(लेडीज टेलर सिनेमा पाहीलेला) सहज
आयला, तुम्हाला नवीन फोन छोटा बनवता येत नाही तर उगाच आमच्या फॅशनच्या आड येऊ नका. हे म्हणजे फालतू कौलांवर क्लीक करून हात दुखतो म्हणून हात कापा असा उपाय सांगताय तुम्ही! उगाच आम्हाला नको ती आंदोलनं आमच्यावर लादू नका. सहजमामांचा नि षे ध.
(फॅशनेबल) अदिती
स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते
पारंपारीक पोशाखात सुधारणा करा.
धम्याची ती खिशाखिशाची प्यान्ट होती तशा खिशाखिशाच्या साड्याची फॅशन शोधून काढा की
किंवा चष्याच्या काडीत बसवता येईल असा फोन शोधून काढा.
( माझ्या डोळ्यासमोर बिका च्या चष्म्याला काचांऐवजी दोन एच टी सी मोबाईल बसवलेले आहेत असे आले )
किंवा चष्याच्या काडीत बसवता येईल असा फोन शोधून काढा.
चष्म्यातच बसवायचा फोन तर मग रिस्ट वॉच काय वाईट आहे? बांगडी, कडं, ब्रेसलेट, घड्याळ अशा वेगवेगळ्या फॅशनमधे वापरता येईल फोन!
आणि ज्यांना चष्मा नाही त्यांनी काय उगाच चष्मा वापरायचा का? चष्मा काढून सनग्लासेस वापरल्या की पुन्हा "काडीमोड" करायचा का? आणि ज्यांना कॉण्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या आहेत त्यांचं काय?
मोबाईलमधे व्हायरस घुसला म्हणून मोबाईल डिशवॉशरमधे टाका असले सल्ले देऊ नका.
बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच ऐकलेच पाहिजे... हेअर्-पिन मध्ये मोबाईलची सुविधा देता येईल का यावर उल्हासनगर ईथे कार्यशाळा आयोजित केली गेली आहे. जगभरातून अनेक तज्ञ लक्ष ठेऊन आहेत.. निकाल लागल्यास सांगतो..
हेअर पिनमधे मोबाईल लावणारे, तुम्हीच ते कॉमनवेल्थवाले सिव्हील इंजिनियर ना??
जगातला एक बारांशपेक्षा जास्त जनतेची (स्त्रियांच्या, अनेक संस्कृतीमधील फॅशनच्या कपड्यांना, खिसे नसतात) सोय पहाणारासुद्धा फोन असावा असं लिहीलं तर एवढा का हो तुमचा पूल मोडतो? ('पापड मोडतो'च्या चालीवर हा वाक्प्रचार वाचणे.)
नाय वो आमी ते कॉमनवेल्थवाले नाय, आम्ही त्यानंतर तोच पूल ५ दिवसांत ऊभा करून देणारे (लष्कराचे असले तरी ) "भारतीय" ईंजिनीअर ! बाकी मी तुमच्याच बोलण्याला दुजोरा दिला तर तुमचा का हो पापड मोडतो ? (पूल मोडतोच्या चालीवर हा वाक्प्रचार वाचणे )
- छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम! त्यात कॉल्स, एसेमेस वाचणे, गजर एवढ्याच गोष्टी असल्या तरी चालतील.
- बर्यापैकी आकाराच्या फोनमधे चांगले बँडपास फिल्टर्स हवेत.
- अनेक भारतीय लोकांच्या अनेक सवयी पहाता मोबाईल फोनमधे लाऊडस्पीकर्स अजिबात नकोत.
- मोबाईल इंटरनेट संगणकातून वापरण्यासाठी काहीतरी चांगली सोय हवी.
- इथरनेट कनेक्शन करता आलं पाहिजे.
इ. इ. इ.