Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्लीज व्होट फॉर मी - चिनी शाळेत लोकशाहीचा अंतर्मुख करणारा प्रयोग

च
चिंतातुर जंतू
Fri, 10/01/2010 - 11:01
🗣 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7239 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ऋ
ऋषिकेश Fri, 10/01/2010 - 11:27 नवीन
चित्रपटाची छान ओळख. चित्रपट इंग्रजीत आहे का? लवकरच डाऊनलोडवीन म्हणतो. त्याच बरोबर बाकीचे नऊ चित्रपटही जालावर मिळतील अशी अपेक्षा करतो :)
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 10/01/2010 - 11:25 नवीन
वा छान ओळख, ओळखीवरुन सिनेमा बघावासा वाटु लागला आहे. नशीबाने नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, बघण्याच्या यादीत टाकला आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Mon, 10/04/2010 - 19:41 नवीन
+ १ धन्यवाद रे नाइल्या .. मी पण बघण्याच्या यादीत टाकला :) परि़क्षण मस्तच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
य
यशोधरा Fri, 10/01/2010 - 11:26 नवीन
चित्रपट ओळख आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 10/01/2010 - 11:39 नवीन
धन्यवाद, परिचय करून दिल्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/01/2010 - 12:09 नवीन
वाह छान ओळख करून दिलीत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 10/01/2010 - 12:32 नवीन
छान ओळख! मी इथे PBS वर बघितला होता. हा माहितीपट बघितल्यावर माझा मुलगा म्हणाला होता- ' so we are going to compete with these kids.'
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 10/01/2010 - 18:29 नवीन
स्वातीतै, तुमच्या चिरंजीवांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. धसका बसवणारीच गोष्ट आहे, नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
श
शुचि Fri, 10/01/2010 - 17:10 नवीन
>> इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;. ती ज्यात वाढताहेत ती समाजव्यवस्था आणि स्पर्धात्मक परिसर त्यांच्यातला असेल नसेल तो चांगुलपणा नष्ट करेल की काय अशी भीतीही वाटते. >> बापरे!!! स्वाती यांची प्रतिक्रियादेखील पुरेशी बोलकी आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 10/01/2010 - 17:23 नवीन
मस्त ओळख...आजच पाहुन टाकेन..
  • Log in or register to post comments
P
Pain Fri, 10/01/2010 - 19:19 नवीन
इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;. ती ज्यात वाढताहेत ती समाजव्यवस्था आणि स्पर्धात्मक परिसर त्यांच्यातला असेल नसेल तो चांगुलपणा नष्ट करेल की काय अशी भीतीही वाटते. जर चांगुलपणा ठेवायचा प्रयत्न केला तर ते स्वत: नष्ट होतील. दोन्हीपैकी एक निवडायचे आहे. तिसरा मार्गही आहे पण तो सगळ्यांनाच उपलब्ध नसतो.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 10/01/2010 - 20:20 नवीन
पिच्चर आज बघेनच...पण हा एक पिच्चर आहे...त्यातील मते, संवाद, मांडणी वगैरे मोठ्यांचेच आहे...त्या लहान मुलांचे स्वतःचेच नाही म्हणजे नसावे... त्यामुळे इतके गंभीर होण्यासारखे काही नाही..
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Sat, 10/02/2010 - 07:29 नवीन
पण हा एक पिच्चर आहे...त्यातील मते, संवाद, मांडणी वगैरे मोठ्यांचेच आहे...त्या लहान मुलांचे स्वतःचेच नाही म्हणजे नसावे... त्यामुळे इतके गंभीर होण्यासारखे काही नाही..
हा एक माहितीपट आहे. शाळेत, मुलांच्या घरी आणि इतरत्र घडलेल्या खर्‍या घटनांचं ते प्रत्यक्ष चित्रण आहे. त्यामुळे पटकथा, संवाद वगैरेंसहित, अभिनेत्यांकडून सादर करण्यात येणारा, घडवून आणलेला कल्पित असा हा चित्रपट नाही. त्यातली मतं, संवाद वगैरे त्या त्या क्षणी त्या त्या खर्‍याखुर्‍या व्यक्तीच्याच तोंडचे आणि उत्स्फूर्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
सहज Sat, 10/02/2010 - 07:53 नवीन
अजुन पाहीला नाही त्यामुळे चुभूदेघे पण मुलांची पार टॉयलेटमधे जाउनही शुटींग घेउ शकता अशी परवानगी बरी मिळवली माहीतीपट निर्मात्यांनी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
न
नंदन Fri, 10/01/2010 - 21:31 नवीन
चित्रपटाची ओळख आवडली. पाहण्याच्या यादीत या नावाची भर घातली आहे.
इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;.
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sat, 10/02/2010 - 11:06 नवीन
प्रतिसादातले 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'नाव वाचुन मलापण त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
श
शुचि Fri, 10/01/2010 - 23:53 नवीन
>>सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं>> यातही हा विचार मनात येतोच की "पॉवर फॉर द सेक ऑफ पॉवर" याचं आकर्षण मुलांना वाटतंय की पालकांच्या हव्यासातून ते मुलांच्या वागणूकीत प्रतिबिंबीत होतंय? कारण पालकांनी कौतुक करावं आणि आपल्या मित्रांना आपण आवडावं अशी जर त्यामागची प्रेरणा असेल तर ती बरीच निरागस आणि सहजप्रेरणा आहे. पण पालकच जर दिवसरात्र ब्रेनवॉशींग करत असतील तर मुलं अनैसर्गीक स्पर्धात्मक बनणं शक्य आहे. अर्थात जरी वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे मुलं स्पर्धात्मक झाली तरी इतकं टोकाला जाणं हे तसं अंतर्मुख करणारं आहेच म्हणा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 10/02/2010 - 00:29 नवीन
चिंज चांगली ओळख करुन दिली आहेत. माहितीपट बघायला हवा. सत्ता आणि विशेषाधिकार ह्यांचे आकर्षण हे आपण कोणीतरी स्पेशल आहोत आणि चार लोक आपल्याला विचारणार एवढ्यापुरतेच आधी मर्यादित असावे, त्यांच्या वयामुळे. परंतु जसजसे वय वाढेल तसतशी ही स्पर्धा अधिक जीवघेणी, टोकदार आणि संवेदनारहित होत जाईल की काय ही भीती रास्त आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 10/02/2010 - 00:39 नवीन
तुमचं विवेचन-विश्लेषण करणारं लेखन वाचायचं म्हणजे एक पर्वणी असते. तीन मुलांचं वर्णन वाचताना पात्रं प्रातिनिधिक पण तरीही चांगले वाईट अशी काळीपांढरी नाहीत हे दिसतं. त्यामुळे लेखकाबद्दल आदर वाढला. पण ही खरोखरच घडलेली घटना आहे हे वाचून जीवन हे (सुमार) कलाकृतींपेक्षा किती संपन्न असतं असंच मनात आलं. उत्तम चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 10/02/2010 - 17:10 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रियाली Mon, 10/04/2010 - 13:51 नवीन
असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सहज Sat, 10/02/2010 - 03:04 नवीन
माहीतीपट पहायची उत्सुकता वाढली आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 10/02/2010 - 04:20 नवीन
जय हो! झक्कास!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/02/2010 - 11:19 नवीन
ओळख आवडली. ह्या चित्रपटाचा टोरेंट कुठे उपलब्ध आहे का ?** **विचारजंतांनी पायरसी वगैरेबद्दल गळे काढु नयेत. अन्यथा स्वखर्चाने ह्या चित्रपटाची सिडी आम्हाला पाठवुन द्यावी.
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 10/02/2010 - 11:21 नवीन
आमच्या कडे ये रे फुकट्या, तुला फ्री मध्ये दाखवतो. >)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिंतातुर जंतू Mon, 10/04/2010 - 10:05 नवीन
मुलांची पार टॉयलेटमधे जाउनही शुटींग घेउ शकता अशी परवानगी बरी मिळवली माहीतीपट निर्मात्यांनी!!
मलाही हाच प्रश्न पडला होता. थेट मुलांच्या घरी जाऊन, त्यांचेच पालक स्पर्धेसाठी त्यांची तयारी करून घेतानाचं चित्रण पाहतानाही हा प्रश्न पडला होता. या आर्थिक-सामाजिक वर्गातल्या मराठी पालकांचा विचार केला तर अशी परवानगी इतक्या सहजासहजी मिळाली असती असं वाटत नाही. दोन शक्यता मनात आल्या:
  1. याद्वारे आपल्या मुलाला जी प्रसिध्दी मिळेल तिच्या हव्यासापायी ही परवानगी दिली असेल. पीबीएस आणि त्यासारख्या देशोदेशींच्या प्रतिष्ठित वाहिन्यांवर आपलं मूल झळकणार असेल तर मग आपल्या खाजगीपणाला थोडी मुरड घालायला काय हरकत आहे? असा विचार असावा.
  2. मुळातच चीनमध्ये नागरिकांच्या इतक्या गोष्टींवर सरकारची नजर असते की खाजगीपणाची भावना आपण बाळगू शकत नाही हे नागरिकांच्या अंगवळणी पडलेलं असेल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/04/2010 - 13:49 नवीन
मस्त. राजेशशी सहमत आहेच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा