कलादालन

आमच्या घरच्या महाल़क्ष्मी आणि गणपती...

Primary tabs

वेताळ

खुपच छान मुर्ती आहे. आरास देखिल खुपच कल्पकतेने केली आहे.

डावखुरा

वा...आकर्षक सजावट..गणेशमुर्तीही सुंदर..

मीनल

शब्द संपले.
खूप खूप छान. देखावा, खाऊ, मूर्ती सर्वच सुंदर.
मला तर `श्री गणेश प्रसन्न `असे सुवाच्च्य अक्षरात ते ही रांगोळीने लिहिलेले ते ही खूप आवडले. त्या बाजूची बारिकशी गोपद्म, त्या खाली स्वस्तिक ही सुबक आहेत.
मला तर कधी ही जमणार नाही.
हे सर्व कुणी कुणी केले?
एकटीचे काम दिसत तरी नाही. पण ज्यांनी केले ते देवभक्त कलाकार आहेत हे खरे.

हेच म्हणतो.
मुर्ती, सजावट सगळेच अप्रतिम. त्याचबरोबरीने 'श्री गणेश प्रसन्न' ची सुबकता डोळ्यात भरली.

आमच्या मातोश्रींना मध्ये सतत सापाची स्वप्ने पडायची म्हणुन कोणाच्या तरी सांगण्यावरुन आईने सकाळी देवाच्या रांगोळी सोबतच गरुड देखील काढायला सुरुवात केली. एकदा माझ्या मित्राने आईला विचारले होते 'काकु तुम्ही रांगोळीत पोपट का काढता?'

मेघवेडा

गरूड आणि पोपट?

नैवेद्याच्या वाटीत पेरूच्या फोडी वगैरे? ;)

फुले, सजावट आवडली!

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!! :)

'श्री गणेश प्रसन्न' ही रांगोळी आमच्या मातोश्रींनी काढली आहे!!

आणि उंटाची रांगोळी पिताश्रींची करामत आहे ... :)

फोटो अपलोड करण्याचे महत्वाचे काम कन्येचे अर्थात अस्मादीकांचे आहे!!! ;)