Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोबो भेटला बाळासाहेबांना.

च
चिंतामणी
Tue, 10/05/2010 - 21:51
🗣 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4697 वाचन

💬 प्रतिसाद (27)
स
सुनील Tue, 10/05/2010 - 22:06 नवीन
त्याने आपणास मराठी चित्रपटात काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली मानधनात सूट दिली तरच हे शक्य आहे बॉ!!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 10/05/2010 - 22:11 नवीन
:D सही रे सही.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 10/05/2010 - 22:13 नवीन
डोळे पाणावले हो ऐकून! अजून कोणकोणत्या बातम्या आहेत हो ई-सकाळवर? माझ्या हापिसात ई-सकाळ दिसत नाही तेव्हा मुख्य बातम्यांचे धागे इथे काढलेत तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 10/07/2010 - 14:22 नवीन
>> अजून कोणकोणत्या बातम्या आहेत हो ई-सकाळवर? माझ्या हापिसात ई-सकाळ दिसत नाही तेव्हा मुख्य बातम्यांचे धागे इथे काढलेत तर बरं होईल असेच म्हणतो. आणखी एक : नुस्ता एक परिच्छेद देण्यापेक्षा अख्ख्या बातम्याच कॉपी-पेस्ट केल्यात तर बरं होईल. आमच्याही हापिसात सकाळला ग्रहण लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
श
शुचि Tue, 10/05/2010 - 22:14 नवीन
>> शिवसेनाप्रमुखांना भेटताच तो भारावून गेला. >> हे अ‍ॅक्टर्स अ‍ॅक्टींग कधी करतात आणि खरं कधी असतं कसं कळणार? असो "बेनिफिट ऑफ डाऊट" देऊ या ;)
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/06/2010 - 01:35 नवीन
आपण भारताचे-महाराष्ट्राचे-मुंबईचे सुपुत्र आहोत, अशा प्रकारचा संवाद त्याने मराठी भाषेत साधला. भारत-महाराष्ट्र-मुंबईचे ---- असणे ठीक आहे.. पण सुपुत्र म्हणायचा नक्की काय क्रायटेरीया आहे? ;)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 10/06/2010 - 05:02 नवीन
त्यात क्रायटेरीया काही नाही... ते मेलेल्या आप्ताच्या नावामागे स्वर्गवासी लावण्यासारखेच आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सन्जोप राव Wed, 10/06/2010 - 02:16 नवीन
शिवाजीराव आणि बाळासाहेब यांच्यात अभिनय कुणाचा सरस हे ठरवणे अवघड आहे. अधिक मेकप कोण करतो हे ठरवण्याइतकेच. दोघेही सामान्य जनतेच्या प्रेमाचे ल.सा.वि. आहेत, यामुळे समाजाच्या बुद्ध्यांकावरही प्रकाश पडतो.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 10/06/2010 - 09:33 नवीन
सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/06/2010 - 09:48 नवीन
धाग्याचे शिर्षक वाचल्याबरोब्बर धाग्यापेक्षाही संजोपरावांची प्रतिक्रीया वाचायची घाई झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सन्जोप राव Wed, 10/06/2010 - 13:51 नवीन
धाग्याचे शिर्षक वाचल्याबरोब्बर धाग्यापेक्षाही संजोपरावांची प्रतिक्रीया वाचायची घाई झाली होती. अरे वा! हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिलको खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
निस्का Wed, 10/06/2010 - 04:42 नवीन
बातमीखालच्या काही प्रतिक्रीया अत्यंत मनोरंजक आहेत :-)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 10/06/2010 - 07:22 नवीन
सासरा झाला हा माणूस हल्लीच आणि आता वय झाल्यावर ह्याचा मराठी बाणा का म्हणतात तो उफाळून आला!! मुंबईचा सुपुत्र हा काय प्रकार आहे? 'रोबो'चा जन्म आहे बेंगळूरचा,लहानाचा मोठा तिकडेच झाला,करीयर केले तामिळनाडूत आणि मुंबईचा/महाराष्ट्राचा सुपुत्र कसा ब्वॉ? असो,महाराष्ट्रभूषण लवकरच मिळायची शक्यता वाटतेय.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/06/2010 - 07:26 नवीन
आपण साला फॅन आहोत रजनीकांताचे.. साला शिग्रेट काय मस्त ष्टाईलिष्ट शिलगावतो..! :) तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 10/06/2010 - 07:51 नवीन
"साला फॅन" हा काय प्रकार असतो..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Wed, 10/06/2010 - 08:27 नवीन
मस्त ! आपण तर दोघांचेही फॅन आहोत.... इच्छा असो नसो.. समोरच्याला दखल घ्यायला भाग पाडतात... अगदी ज्यांची बुद्धी आकाशाला भिडली आहे अशा समाजातल्या तथाकथित अभिजनांना सुद्धा !!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 10/06/2010 - 09:36 नवीन
आपण तर नानाचे फॅन झालो बाबा आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Wed, 10/06/2010 - 14:06 नवीन
उध्दव ठाकरेचे कर्तुत्व म्हणजे त्यानी काढलेला फोटोचा अल्बम हेच आहे. त्याना कुणीही भेटले कि त्याला फोटोचा अल्बम भेट देतात. त्यापेक्षा दादरला स्टुडीओ काढला असता तर तो जोरात चालला असता.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/06/2010 - 15:43 नवीन
त्यापेक्षा दादरला स्टुडीओ काढला असता तर तो जोरात चालला असता. इथेच मराठी माणूस मार खातो आणि धंद्यात मागे पडतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/06/2010 - 17:55 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धमाल मुलगा Wed, 10/06/2010 - 17:50 नवीन
सौ सुनार की, एक लोहार की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ई
ईन्टरफेल Wed, 10/06/2010 - 17:42 नवीन
<इथेच मराठी माणूस मार खातो आणि धंद्यात मागे पडतो. > म्हनुनच म्हराठि मानसाचा ईकास झाला नाय व्हय ?
  • Log in or register to post comments
ह
हैयो हैयैयो Wed, 10/06/2010 - 19:45 नवीन
विनंती. प्रतिसादाआधी एक चूक दुरुस्त करू इच्छितो. "रजिनिकांत ऊर्फ शिवाजीराव गाएकवाड" नव्हे, "शिवाजीराव गाएकवाड ऊर्फ रजिनिकांत!" असो. ह्या चर्चेच्या निमित्ताने माझे प्रीतपात्र नटश्री. रजिनिकांत ह्यांचे एक वाक्य आठवते. आमच्याकडे राजकारणात त्यांनी यावे अशी अनेकांची इच्छा आहे, त्यासंदर्भात एकदा त्यांनी "महाराष्ट्रात गेलो, तर मला तमिळ म्हणतात, तर तमिळनाडुत मला मराठी म्हणतात. ना घरका ना घाटका अशी माझी विचित्र परिस्थिती आहे." असे उघड प्रतिपादन केले होते. ही परिस्थिती दुर्मिळ आहे. ह्या पार्श्वभूमिवर आज रजिनि स्वतःला महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणवू इच्छितात ह्यात नवल काही नाही. स्वतःची वोळख शोधण्याचा केलेला तो आणखी एक प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नाला हसण्यावारी नेवू नका ही कळकळीची विनंती. -
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/06/2010 - 19:59 नवीन
स्वतःची वोळख शोधण्याचा केलेला तो आणखी एक प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नाला हसण्यावारी नेवू नका ही कळकळीची विनंती. जरी मला इथे लिहीणार्‍या (माझ्या व्यतिरीक्त) कुणाचाही उद्देश माहीत नसला तरी तसे वाटत नाही की हे हसणे/टाईमपास हा रजनीकांतच्या ओळख शोधण्यास कोणी करत असेल. केवळ त्याची चित्रपटातील प्रतिमा, बाळासाहेबांना भेटणे इतके पुरेसे आहे. तेंव्हा तुमच्या भावना समजत आहेतच पण कृपया जास्त गांभिर्याने घेऊ नका, हलकेच घ्या ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हैयो हैयैयो
च
चिंतामणी गुरुवार, 10/07/2010 - 11:28 नवीन
येथील काही प्रतिक्रीया वाचल्यावर एका ईमेलची आठवण झाली. ती इथे पोस्ट केली आहे. वाचली नसल्यास जरूर वाचा. http://www.misalpav.com/node/14755#comment-245178
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 10/07/2010 - 11:28 नवीन
येथील काही प्रतिक्रीया वाचल्यावर एका ईमेलची आठवण झाली. ती इथे पोस्ट केली आहे. वाचली नसल्यास जरूर वाचा. http://www.misalpav.com/node/14755#comment-245178
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके गुरुवार, 10/07/2010 - 14:31 नवीन
रजनीकांतची प्रसिध्दी आणि ऐश्वर्य इतकं आहे कि तुमच्या लेखाचं शिर्षक "रोबो भेटला बाळासाहेबांना" च्या ऐवजी "बाळा भेटला रोबोसाहेबांना" असं ठेवायला पाहीजे होतं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा