Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुसाट..... नादखुळे विनोद..!!

A — Arun Powar, गुरुवार, 10/07/2010 - 11:39

प्रतिक्रिया द्या
3948 वाचन

💬 प्रतिसाद (19)
आ
आप्पा गुरुवार, 10/07/2010 - 11:44 नवीन
गर्लफ्रेण्डच्या नखऱ्यांना वैतागलेला बंडु ठरवतो, 'या बायकांना समजून घेणं कठीण असतं... मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही.... आणि माझ्या मुलांनाही हाच सल्ला देईन!!'
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 15:27 नवीन
हॅ हॅ हॅ. हे सत्यात पण उतरु शकते. विनोदाची गोष्ट नाही काही ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आप्पा
A
Arun Powar गुरुवार, 10/07/2010 - 11:48 नवीन
एका स्टेशन वर ट्रेन थांबते.. Passenger: कोणते स्टेशन आहे? Platform वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: .. आळशी नुसता.. बसल्या जागी पाहिजे सगळं.. डोळे फुटले का तुझे? .... . . Passenger: अरे वा पुणे आलं की !! :-D
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 15:29 नवीन
हे पुणे असणे शक्य नाही. पुण्यात किमान शब्दात कमाल अपमान करतात. अपमान करण्यासाठी एवढे शब्द वापरण्याची गरज किमान पुणेकरांना तरी नाही. आणि पुणेकर अपमान करताना चिडत नाहीत. ते फक्त तिरकसपणे तिरसटपणे बोलतात. त्यात कमाल अपमान भरलेला असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Arun Powar
य
योगप्रभू गुरुवार, 10/07/2010 - 15:48 नवीन
अस्सल पुणेकर फक्त इतकंच विचारेल 'कुठून आलात?'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/07/2010 - 15:50 नवीन
प्लॅटफॉर्मवरचा माणूस मागच्या बोर्डाकडं बोट करुन गाडीतल्या माणसाला विचारतो, "आपण अशिक्षित का?" प्रवासी: अरे वा! पुणं आलं की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 10/07/2010 - 18:12 नवीन
मृत्यूंजया.... १ लंबर....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
A
Arun Powar गुरुवार, 10/07/2010 - 11:49 नवीन
सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ?? . . ... . . . . . . . मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 15:30 नवीन
हीहीहीहीही. हे बेष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Arun Powar
A
Arun Powar गुरुवार, 10/07/2010 - 11:51 नवीन
एकदा एक माणूस नदीत बुडत असतो...आणि ओरडत असतो, "बाप्पा मला वाचवा, बाप्पा मला वाचवा!!" तिथे गणपती बाप्पा प्रकट होतात आणि जोरजोरात नाचू लागतात ... तो माणूस म्हणतो, "बाप्पा मला वाचवायचं सोडून नाचताय काय?" ... ...... बाप्पा म्हणतात...."वा रे वा !, माझ्या विसर्जनाच्या वेळेला किती जोरजोरात नाचत होतास!!
  • Log in or register to post comments
A
Arun Powar गुरुवार, 10/07/2010 - 11:53 नवीन
एकदा एक बाळ इस्पितळात जन्माला येते. तेव्हा नर्स त्याला विचारते,"बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर झालेच असेल ?" तेव्हा ते म्हणते,"च्या मारी !,परत सदाशिव पेठेतच जन्माला आलो वाटते ."
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 15:32 नवीन
बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर झालेच असेल ?" लै ओढुन ताणुन विनोद होता बरं का हा. (हा विनोद आहे असे तुम्हाला म्हणायचे असेल तर). जगातली कुठली नर्स नवजात अर्भकाला नाष्टा पाणी झाले का म्हणुन विचारते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Arun Powar
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/07/2010 - 19:52 नवीन
"इनो घ्या मालक!" -- नक्की मिपावर पोहोचला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 21:01 नवीन
इनो घेतल्यावर हा इनोद वाटायला लागेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
A
Arun Powar गुरुवार, 10/07/2010 - 11:58 नवीन
एक इंग्लिश माणूस कोल्हापूरला मराठी शिकायला आला आणि १५ दिवस राहिला.. शेवटी तो २ वाक्येच शिकला: १. अरे वा! लाईट आले !! .. .. .. २. च्या मारी, परत गेले !!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 10/07/2010 - 12:02 नवीन
पुण्यातील दुकानातील अफ्रीकन बोर्ड: बंबाला पिंपाला कॉईल लावून मिळेल
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/07/2010 - 15:33 नवीन
विजुभौ कुठे आहे हा बोर्ड? अजुन तो श्राद्धाचा बोर्ड कुठे आहे ते पण नाही सांगितले तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
नाना बेरके गुरुवार, 10/07/2010 - 14:14 नवीन
हा.. हा.. विजुभाऊ. लै भारी. हा खरा नादखुळा विनोद.
  • Log in or register to post comments
उ
उपेन्द्र Fri, 10/08/2010 - 19:54 नवीन
एकदा एक पोपट एका ट्रकला धडकला.. ट्रकवाल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत घरी पिंजर्‍यात नेऊन ठेवला.. जाग आल्यावर समोर पिंजर्‍याचे गज बघून पोपट म्हणाला.... .. .. .. .. .. "आयला... जेल... ट्रकवाला मेला बहुतेक टकरीत... !!"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा