Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

...

प — प्रियाली, गुरुवार, 10/07/2010 - 21:16

प्रतिक्रिया द्या
26904 वाचन

💬 प्रतिसाद (85)
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/07/2010 - 21:38 नवीन
पिवळा डांबिस नशीब माझं, मी काय करू? अवसेच्या राती, हात लागे सुरसुरू बोअर जे मारेल, त्या लिखाणाला पुरू जिंकू किंवा मरू.. जिंकू किंवा मरू :)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 10/07/2010 - 21:39 नवीन
कारने इंटर्व्ह्यु ला निघताना सकाळी ग्लासभर "कारनेशन" घेतलं होतं. इंटरव्ह्युचं टेन्शन, मुख्य ठीकाण तर दूरच पण मधे मैलोनमैल विश्रांती स्थळ देखील येत नव्हतं. अशावेळी भयंकर भीती दाटून आली होती , थरकापच उडाला होता का ते ऐका - :P मला लागली ग बाई घाईची जाऊ कुठे जाऊ कुठे लांब स्थळ विश्रांती मला लागली ग बाई घाईची
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 21:42 नवीन
मला लागली ग बाई घाईची जाऊ कुठे जाऊ कुठे लांब स्थळ विश्रांती मला लागली ग बाई घाईची
हाहाहा! चांगलं आहे पण सर्वपित्रीच्या मुहूर्तावर शोभत नाही. हे काव्य नाही चालणार. ;) भयानक हवं. भुतंखेतं, हडळी, मुंजे, देवचार हवेत. पुन्हा प्रयत्न करा, नाहीतर पिडा बाजी मारतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
विकास Fri, 10/08/2010 - 05:04 नवीन
जर गाडीत बाजूला कोणी बसले असेल तर विश्रांतीस्थळ येईपर्यंत भयानक, भितिदायकच वाटले असणार. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Fri, 10/08/2010 - 13:31 नवीन
गाडीत बसले असेल पण शुचिंना जाणवले नसेल. बाजूचा प्रत्यक्ष दिसत नाही पण आरशात पाहिल्यावर दिसतो वगैरे वगैरे चालले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पुष्करिणी गुरुवार, 10/07/2010 - 21:46 नवीन
बघा बघा फांद्या दिसला का रे मुंजा वाटेवरी उभी ह्डळ संगे घेउनी वेताळा
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 21:48 नवीन
पुष्करिणीतै, यमक जुळवा मग आपण हे गाणं केस मोकळे सोडून (म्हणजे तसे नेहमीच मोकळे असतात) आला आला वाराच्या चालीवर गाऊ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
अ
असुर Fri, 10/08/2010 - 10:59 नवीन
अवसेला आला परा असं गाणं म्हणून पहा एकदा, आपोआप सगळ्याचीच भिती बसेल! अवसेला आला परा, वाजवत दात कराकरा || धृ|| म्हटला, बोलावतो नानाला, आणि बोलावतो डान्याला, सगळे फेर धरून नाचू आणि , मधे उभा करुया धम्याला, उभा करुया धम्याला... याहून भितीदायक काय असू शकेल प्रियाली तै? ते अ‍ॅवार्ड का काय ते भेजून द्या लवकर!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/08/2010 - 12:56 नवीन
Image removed. खपलो !! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
N
Nile Fri, 10/08/2010 - 13:05 नवीन
काय पुरुषांची मंगळागौर बसवली काय रे असुरा? ;-) बाकी भयाली तैंच्या हालोवीनची सुरुवात दणक्यात झालेली दिसते. पिच्चर अभी बाकी होगी ऐसी आशा करते है! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
ध
धमाल मुलगा Fri, 10/08/2010 - 13:30 नवीन
तुला भोंडला म्हणायचंय का? आणि च्यायला मी मध्ये? काय पाटावरचा हत्ती वाटलो काय मी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रियाली Fri, 10/08/2010 - 13:32 नवीन
अबब! यापेक्षा भयानक काही असू शकते काय? चालू द्या. आला आला परा (कलन) मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
असुर Fri, 10/08/2010 - 13:42 नवीन
धात्मारामा, अरे तू या घोळक्यात 'हत्तीचं तोंड' आणलेला वेताळ रे! तुला हत्ती म्हणायची स्वतः हत्तीचीतरी टाप आहे का? प्रियालीतै, तुमी ते अ‍ॅवार्ड लावून द्या बरं रांगेत. आमाला नाय वो, तर या काव्यातल्या परा, नाना, डान्राव आणि धम्सअप या रंगकर्मींना देण्यात यावे ही विनंती! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
पुष्करिणी Fri, 10/08/2010 - 19:32 नवीन
चितेवर जळतय मढं, वाजती कड्कड हाडं सुटली भयाण इथं वावट्ळं, वाजती कड्कड हाडं ये ना गं हडळी, घेउन कवळी जरा फिरून येउ मग रातीच्या पार्‍यात गार गार वार्‍यात चितेची धुंद ही धग आता कवटीची कापतोय फोडं , वाजती कड्कड हाडं चितेवर जळतय मढं, वाजती कड्कड हाडं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/08/2010 - 19:49 नवीन
अल्लाऽऽऽऽऽ जीव गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पैसा Fri, 10/08/2010 - 19:53 नवीन
या सगळ्या कविता वाचून अर्धाच राहिला होता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघवेडा Fri, 10/08/2010 - 20:23 नवीन
सिच्युएशन : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे. पडून आहे गात्र कुजुनि, राजसा खपलास का रे? सोडुनि मजला वेशिवर एकटा जळलास का रे? अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे? बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा गात गाणी ही भुतांची धुंद तू सुटलास का रे पुढची कडवी सवडीने देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मितान Fri, 10/08/2010 - 20:24 नवीन
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा........ !!!! पुष्के, मेव्या संपली रे अमावास्या ! त्या भुतांच्या मानगुटीवर अजून किती काळ बसणार आहात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
च
चिगो Fri, 10/29/2010 - 21:30 नवीन
दंडवत ____^_ च्यायला, आजपर्यंत घाबरुन येवढा कधीच हासलो नव्हतो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
स
सेरेपी गुरुवार, 10/07/2010 - 23:41 नवीन
१. अवसेच्या या भयाण राती दे तुझा हाडाळ हात हाती मिळून दोघं बसू मानगुटी तुला कसली मरण-भीती? २. अक्कणमाती चिक्कण्माती खड्डा तो खणावा अस्सा खड्डा सुरेख बाई मुडदा तो पुरावा अस्सा मुडदा पुरला बाई माती ती लोटावी चवथरा केला बाई क्रुस मात्र लावावा ३. काजळी काळोख गडे जिकडे तिकडे चोहीकडे चितेचा उज्जेड पडे नाचती प्रेते सगळीकडे :P
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/08/2010 - 02:20 नवीन
हा प्रतिसाद निसटला कसा ? मी आताच बघितला. पिंपळाला उल्टाबिल्टा लटकत होता की काय भूतजाणे. ;) तीनही चारोळ्या मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी
स
सेरेपी Fri, 10/08/2010 - 04:28 नवीन
आत्ता परत वाचलं आणि माझा आचरटपणा वाचुन बरीच हसले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्राजु गुरुवार, 10/07/2010 - 22:02 नवीन
लाजवाब! ;)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 10/07/2010 - 22:05 नवीन
नैराश्येचा खवीस मानगुटीवर बसून मेंदू खरवडून काढतोय अन जखीण वेड्या उन्मादाची विचकून वाट बघतेय झोडपण्याची ही हा हा
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 10/07/2010 - 23:16 नवीन
शुची, पुढचं कडवं - खाऊ दे त्या खविसाला मेंदूचा कुस्करा करून ओरपू दे रक्त जखिणीला बघ मग उद्या होते कि नाही पित्त !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
च
चित्रा Fri, 10/08/2010 - 05:07 नवीन
पित्त होण्याची कल्पना झकास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
च
चित्रा Fri, 10/08/2010 - 05:10 नवीन
भारी. खाली धनंजयांची तिसरीही छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अडगळ गुरुवार, 10/07/2010 - 23:09 नवीन
चैत पुनवेचि रात , पिंड फोडणीचा भात , कड्कड हाडकाना चल चावू या , खाऊ गिळु सारं कसं , मान चोच पाय पिसं , रगताच्या खरवसा चल खावू या, कापली कि मुर्गी तुमच्या जोडीनं मी प्याले, "पितरी" च्या या राती राया , टुन्न येडी मी झाले , राया सोडा आता तरी , काळयेळ न्हाई बरी , पुन्हा भेटू कवा तरी मसणा , मला जावु द्या ना घरी ..... आता वाजले की बारा
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 10/07/2010 - 23:13 नवीन
लै लै भारी वाटलं चालीत म्हणताना ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
च
चतुरंग Fri, 10/08/2010 - 00:34 नवीन
फक्त एक किंचित सुचवणी - काळी पुनवेची रात, पिंड फोडणीचा भात.... अशी सुरुवात हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
ग
गांधीवादी Fri, 10/08/2010 - 01:31 नवीन
>>आता वाजले की बारा आता वाजले कि दुपारचे बारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
ब
बेसनलाडू Fri, 10/08/2010 - 01:48 नवीन
चालीत म्हणताना तर एकदम फिट्ट अन हिट्ट!! (गायक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
प
प्रियाली गुरुवार, 10/07/2010 - 22:44 नवीन
येऊ द्या. येऊ द्या. एंट्री यायला मध्यरात्रीनंतरची मुदत आहे. ;)
मला जावु द्या ना घरी ..... आता वाजले की बारा
हडळींच्या राज्यात रात्री बारानंतर घरा सॉरी झाडाबाहेर पडतात ना!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/07/2010 - 23:06 नवीन
(१) आवसेच्या रातीला, असाच होतो जात वेताळाच्या वाटेवर, भूतनाथाचा भाट व्हाळापाशी होत्या, आसरा साती सात आवळल्या मुठीत आला, हडळीचा हात - - - (२) उडाला धुराळा भरारा भरारा पडू लागल्या जोरजोरात गारा ढगांच्या मध्ये गर्जना हो कडाडा घरी एकट्याला नि वाटे थरारा - - - (३) सर्वपित्री किर्र रात्री दार माझे वाजले 'तो' असावा वाटले एक प्याला ना पुरेसा, दोन प्याले ओतले कोण प्याले ना कळे
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 10/07/2010 - 23:04 नवीन
१) भूत म्हणे हाडळीला नाच माझ्या संगं मसणाच्या दारी लागे मुडद्यांची रांग ! २) तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू हाडकांच्या माळा भूत आणखी हडळीला चल रे घालू वेताळा ! तुज कवटी, मज दिवटी आणखी पिंड कोणाला वेड लागले दादाला मला नव्हे ते मुंज्याला ॥ ३) एक कवटी फोडू बाई दोन कवटी फोडू सर्वपित्री आवसेला चार हाडं तोडू
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 10/07/2010 - 23:07 नवीन
मितान सही!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
श
शेखर Fri, 10/08/2010 - 00:31 नवीन
सहमतीचे राजकारण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ब
बेसनलाडू Fri, 10/08/2010 - 01:49 नवीन
हाहाहाहा .. प ड लो!!! __/\__ (हसरा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
इ
इन्द्र्राज पवार Fri, 10/08/2010 - 09:48 नवीन
" एक कवटी फोडू बाई दोन कवटी फोडू सर्वपित्री आवसेला चार हाडं तोडू...." ~~ गेले दोन दिवस बेल्जियमच्या धवल क्रांतीवर लिहिणारी ती हीच का, किसानकन्या? आणि बाई....दोनच का चांगल्या डझनभर फोड......चार नाही चाळीस हाडे तोड....पण ती सेन की झेन नदीकाठी बसून, इकडे कृष्णा-गोदावरी काठंची नको. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/08/2010 - 09:49 नवीन
मितान तू ये गं इथे! आपण सतलजच्या काठावरच्या लोकांना नवा भोंडला शिकवू या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
म
मितान Fri, 10/08/2010 - 09:53 नवीन
अरेरे इंद्रा, किती रे तू संकुचित ! पंछी नदिया पवन के झोंके कोई सरहद ना इन्हे रोके सरहदे इन्सानोंके लिये है। बोलो तुमने क्या पाया ! इन्सां होके ! हे गाणं एका पिशाच्चाने म्हटलेलं आहे. तुझ्यासाठी खास ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
प
प्रियाली Fri, 10/08/2010 - 00:32 नवीन
मस्त मस्त. काय भयानक माणसे आणि काय भयानक डोकी, भयंकर कल्पनाशक्ती बघा एकेकाची आणि उगीच बिच्चार्‍या भुतांना नावं ठेवतात. धनंजय,अडगळ आणि मितान पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत. येऊ द्या आणखी. ;) धनंजयचे नं१ आणि नं३ क्लास. भारी आवडले.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 10/08/2010 - 01:01 नवीन
ही स्पर्धेतली वेण्ट्री नाही! ;) असंच सुचलं नि र ला ट जोडण्याचा एक प्रयत्न आहे. ** पिपळावरचा भस्म्या ** वाखरावरचा पिपळ तो बदनाम पंचक्रोशीत तिथे म्हणे भस्म्याची, अख्खी फ्यामिली आहे सरपंचाचा बैल खाल्ला, उभा चिरून खुषीत कालपासून कुलकर्ण्याची गाय हरवली आहे शेळ्या, बकर्‍या, कोंबड्या वरचेवर गायब होती भस्म्याच्या पिपळाखाली पडती हाडांच्या राशी प्राणिच नाही माणसेही खातो की काय तो? दिसल्या व्हाळामध्ये होत्या कवट्या खडकाशी दिवसाढवळ्या सुद्धा तेथे जात नाही कोणि नाही शाश्वती गेलेल्याची परतुन येण्याची चुकूनमाकुन कुणि पोचला जरी वाखरापाशी हिम्मत नाही होत तयाची रिस्कं घेण्याची एकदा परशा गेला होता मुद्दाम धाडस करून आठ दिवस कोणाशी काहीच बोलला नव्हता आमोशेच्या रात्री तो गायबला घरामधून पडला मुडदा भल्या पहाटे, अखा सोलला होता मांत्रिक केले तांत्रिक केले भस्म्या काही हालेना वाखरावरला पिपळ अजुनहि जनपरित्यक्त आहे सरपंचाला खाईन ऐसी केली तयाने घोषणा पंचायतिचि खुर्ची तेव्हापासुनि रिक्त आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/08/2010 - 01:03 नवीन
आम्ही काही जारण-मारण मंत्र नाही टाकलेले तुम्हाला रोखून ठेवायला. ;)
सरपंचाला खाईन ऐसी केली तयाने घोषणा पंचायतिचि खुर्ची तेव्हापासुनि रिक्त आहे!
सांभाळा सरपंच!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 10/08/2010 - 01:08 नवीन
हा हा हा. नको. "प्रियाली - बस्स नाम ही काफी है" वगैरेतला प्रकार दिसतो एकूण तुमचा. तुम्ही लाख म्हणाल जारण मारण नाही केलेलं, पण उगाच आम्हाला भूतबाधा व्हायची. रिस्क कशाला घ्या! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मिसळभोक्ता Fri, 10/08/2010 - 03:54 नवीन
आमच्या कंपूविषयी आम्ही काहीही कविता वगैरे करीत नाही. (बाकी, खरडवह्यांतून बक्षीस वगैरे ही ऐड्या कुठून तरी चोरलेली वाटते. उद्गात्याला क्रेडिट द्यायला हवे.)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/08/2010 - 14:51 नवीन
बाकी, खरडवह्यांतून बक्षीस वगैरे ही ऐड्या कुठून तरी चोरलेली वाटते. उद्गात्याला क्रेडिट द्यायला हवे
पुन्हा पुन्हा काय क्रेडिट द्यायचे? ही आय्ड्या मागेच चोरली होती. आमचे जुने तापदायक स्नेही सर्किट यांची होती ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
र
राजेश घासकडवी Fri, 10/08/2010 - 04:18 नवीन
माळावरचा पिंपळ झाला रक्त साकळुन काळा कुण्या कपीवर भूतनखांचा निर्घृण हल्ला झाला भुका भडकती, जिभा लपकती, नजर वळे वखवखती ऋषीमुनींवर, फाडुन खाया हिंस्र नखे पारजती
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/08/2010 - 04:45 नवीन
अमावाश्येला प्रतिभेचे पूर आले!!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/08/2010 - 05:37 नवीन
अमूशेचा पार उठे मुडद्यांचे काहूर गुढघाभर रुते पाय रक्तचिखलात थवे भुतोबांचे तेथ मांस चिवडत कुत्री चुकार बसली हाडकं निवडत
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा