...
💬 प्रतिसाद
(85)
ऋ
ऋषिकेश
Fri, 10/08/2010 - 06:09
नवीन
किर्रराती ऐकून तिला, संपलो यमराया,
कानावरी पडती या हाकमारी च्या हाका ,
अचपळ मन माझे नावरे आवरीता,
मागे आता नको बघणे, धाव रे धाव आता
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 10/08/2010 - 06:11
नवीन
चिखलाने माखलेल्या त्याच्या
निळ्या पट्ट्याच्या स्लिपर्स
बघताना प्रश्न पडला
मला पोचवून हा परत कधी आला?
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/08/2010 - 06:22
नवीन
किर्र रात्र, मुसळधार पाऊस
चिखलात पाय बरबटत चाललो तीला घेऊन
आजूबाजूस - मागे वळून पाहीले आणि समजले..
मीच पोचवला गेलो होतो, ती कधीच परतली होती :(
(डिसक्लेमरः हा काव्यात्मक प्रतिसाद केवळ काव्यात्मक विनोदास विनोद म्हणून दिला आहे. :-) )
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 10/08/2010 - 06:30
नवीन
चालू द्या जोडी-जोडीनं... ;)
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 10/08/2010 - 13:35
नवीन
पैले आप पैले आप असं चाललेलं दिसतंय दोघांचं. ;)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 10/08/2010 - 06:16
नवीन
येडे आहेत सगळे च्यायला!!! :)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/08/2010 - 06:22
नवीन
<शरदिनी>
क्रूर भयाली
चित्रमार्दवी
भय पसरवी
पित्रमुहूर्ती
जाल भयकरी
पिशीचपंथी
विकाल हसती
काव्यतर्पणी
<\शरदिनी>
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 10/08/2010 - 06:32
नवीन
(नतमस्तक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 10/08/2010 - 06:36
नवीन
बेलाशी सहमत!
वर पोहोचवणारी जोडी देखील नं १!
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 10/08/2010 - 06:36
नवीन
या पलिकडे काय लिहिणार?
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 10/08/2010 - 15:40
नवीन
__/\__
पुपे!!!
- Log in or register to post comments
म
मितान
Fri, 10/08/2010 - 20:27
नवीन
पुप्या, मेव्या.....
पक्षातले वडे चांगले अंगी लागलेले दिसतायत !!!! :))
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/08/2010 - 06:34
नवीन
पुण्याच्या पेश्व्यानी मारलेला हा एक चौकार =))
केवळ ४ ओळींत यापेक्षा भयानक काव्य करून दाखवावे.
भयानक या ऐवजी बकवास हा शब्द वापरला असता तरी चालले असते
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 10/08/2010 - 06:44
नवीन
आभार.
मसणात आलातर एकादा कट्टा जमवु.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/08/2010 - 07:00
नवीन
टेंपोत बसवला!!! तिच्यायला... काय येडं आहे पब्लिक... रान उठवतात तसं मसण उठवलंय... सगळे अतृप्त आत्मे झुंडीने उपस्थित आहेत कविसंमेलनात भाग घ्यायला.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 10/08/2010 - 09:55
नवीन
श्री.बिका यांना विनंती....
श्री.उत्तम कांबळे आज पुण्यात आहेत. द्या त्यांच्याकडे हे पान कॉपी करून. नक्की 'ठाण्या' ला बोलावतील या समस्त सर्वपित्रीप्रेमीं कविंना, काव्य वाचनात भाग घेण्यासाठी.
इन्द्रा
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 10/08/2010 - 07:15
नवीन
भयालीताईंचा विजय असो..
मिपावरती खविस,मुंज्जे, हडळींचे काव्य संम्मेलन भरवल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
ही घ्या आमची पण एन्ट्री..
(अग्या वेताळ)केशवसुमार
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/08/2010 - 07:30
नवीन
१. काजल रातीनं ओढून नेला, सये मुंजा माझा
दिस जात सरून वाजती हाडं, कधी रे येशील, मुंजाऽऽऽऽ
२. चितेच्या धगीची उब या राती, आले मी आवसेच्या भयाण राती
'विकेट'ही पडं, मुंजा न झाड, मसणात मलाच गावती
दिलाचा दिलबर, भूतांचा भुतवर
इथं मिळाला मिला, गं, हडळे हिथे मिळाला मला,
हितं मिळाला, तिथं मिळाला
जाऊ कुठं, जाऊ कुठं
दिसला गं बाई दिसला, मला बघून भेसूर हसला गं बाई हसला
(बाकी मी "प्रेरणा" दिली तरी आमचा बेड ओ'क्लॉक झाल्यानंतर धागा टाकणार्या भयालीदेवींचा "खतरनाक" निषेध!)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/08/2010 - 07:32
नवीन
अल्लाऽऽऽ जीव घेतला!!!!
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 10/08/2010 - 07:48
नवीन
जबरा...
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 10/08/2010 - 13:40
नवीन
मुहूर्त पाळावा लागतो. अन्यथा, सर्वपित्रीचा मुहूर्त चुकला असता. ;)
बाकी, तुमची प्रतिभाही फुलून आली आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/08/2010 - 19:09
नवीन
विक्षिप्तमॅडमचे काव्य आम्हाला आमच्या दिवसाकाठी वाचायला मिळाले आणि त्यांच्या मुळे दिवसा आकाशदर्शन अर्थात दिवसा तारे देखील दिसले. :-)
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 10/08/2010 - 22:50
नवीन
मस्त मजा आली.
भारी धागा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 10/08/2010 - 07:45
नवीन
प्रियाली,
भुतांबद्दलच्या तुझ्या क्रेझला नमस्कार आहे! :)
उत्तम काव्य..!
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 10/08/2010 - 07:51
नवीन
आवरा !!

- Log in or register to post comments
श
शहराजाद
Fri, 10/08/2010 - 09:34
नवीन
भुतं, हडळी, मुंजे, खवीस, वेताळ एकत्र जमलेले बघून मजा वाटली.
आमची एंट्री इथे पहा : भसभसून उसळे नरड्यामधुनी धार
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 10/08/2010 - 10:35
नवीन
सगळ्या पैशाचिक कविना साष्टांग नमस्कार!
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 10/08/2010 - 13:15
नवीन
हाण्ण तिच्या !!
भुतावळच आहे सारी
_/\_ _/\_ _/\_ _/\_
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 10/08/2010 - 13:38
नवीन
काल स्मशानातल्या वर्तमानपत्रात मोठ्ठी हेडलाईन होती.
समस्त मिपाकरांनी सर्वपित्री अमावास्या भेसूर काव्याने जागवल्यानिमित्त समस्त अतृप्त भूतपरिवारातर्फे अनेक धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 10/08/2010 - 13:51
नवीन
काव्यरक्ताचे पाट असे ओसंडून वाहत असताना भयानक रसात लडबडलेल्या नेमक्या कोणत्या प्रतिभेला बक्षिस द्यावे हे न कळल्याने या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना एक सामायिक बक्षिस दिले जात आहे. आपापल्या आवडीनुसार त्याचे लचके तोडून घ्यावेत.
ही आमच्या घरातली वरिजनल पैदास ;) बक्षिसाच्या रूपाने सर्वांनी भयंकर मानून घ्यावी.

- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 10/08/2010 - 14:58
नवीन
कल्पक धागा
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Fri, 10/08/2010 - 18:39
नवीन
अरे काल कोणीतरी धागा काढला होता ना भुतं आहेत का नाही ते आणि कुठे?? इथे येऊन बघा म्हणावं .. सगळेच प्रकार सापडतील ;)
ह.घ्या.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 10/08/2010 - 22:28
नवीन
इतके चांगले 'मिसळपाव' संस्थळ.....पण विक्रमादित्यदेखील घाबरून जाईल इथल्या हडळीं, खविस, वेताळ, रक्तपिपासू भुतांची दंगल पाहुन.....संपादक मंडळ, मला वाटते, दुलया रजई घेऊन घाबरून झोपी गेले आहे, असले सदस्य पाहून.
असो....गोविंदाग्रजांनी श्रीमहाराष्ट्र गीत लिहिले होते, एक स्वप्न नजरेसमोर ठेवून. पण त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राचे भूतराष्ट्र झाले आहे जणू.....
धागाकर्ती 'प्रियाली' यांनी एकच कडव्याचे बंधन घातले आहे, म्हणून 'हडळगीत' तितकेच.
स्मशान देशा ! खविस देशा ! हडळींच्या देशा
कवटी घ्यावी माझी ही श्रीमहाराष्ट्र देशा ||
नैवेद्याच्या देशा, कटकट देशा, रक्ताळलेल्या देशा
भस्म्या देशा, वेताळी देशा, रुंडमाळाच्या देशा ||
ठाण्यावर ती विक्राळी एक पसरी झिंज्या बिनधोक
डंकर्की ती दुसरी नाव ठेवुनी कवटी खाई रोखठोक
मितानी पसरूनी नख्या शोषिते 'श्याम' प्राणाचा पिंड
ज्योती तर रक्त पिते गटाटा वर काढूनी भटिंडा धिंड
(~~ रक्तास सोकावलेल्या चौघींची मनी भीती बाळगणारा ~ इन्द्रा)
- Log in or register to post comments
आ
आकडा
Sat, 10/09/2010 - 07:49
नवीन
भूतांबद्दल एवढं का बरं प्रेम असावं मराठी माणसांना??
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Sat, 10/09/2010 - 14:33
नवीन
बाब्ब्बो !! डेंजार हाये ब्वा ..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2