भारतीय व्यक्तीचा अपमान - प्रत्युत्तर कसे द्यावे?
💬 प्रतिसाद
(35)
श
शुचि
Fri, 10/08/2010 - 01:23
नवीन
तो बातमीदार एकंदरीत बेतालच वाटला. दुर्लक्षणीय नगण्य जीव आहे. अनेक महत्वच्या समस्या आहेत. हे कुठे बघणार?
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 10/08/2010 - 01:49
नवीन
न्यूझीलंडबाहेर राहात असणार्या भारतीयांनी दुर्लक्ष करावे.
लहानपणी आम्ही जपानच्या तत्कालीन पंतप्रधानांना "नाकात-सोने" म्हणत खिदळत असू. जपान्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. अज्ञ पोरेसोरे हसली म्हणून काही बिघडत नाही.
न्यूझीलंडमध्ये राहाणार्या भारतीयांनी मात्र पूर्ण दुर्लक्ष करू नये. टीव्ही स्टेशनाला तक्रारीची पत्रे लिहावीत. (हा वार्ताहार "सर्वांबद्दलच अपमानास्पद बोलतो" असा दुर्लौकिक असेल तर त्यांनीही दुर्लक्ष करावे. त्याला तशी प्रसिद्धी हवीच असेल.)
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/08/2010 - 03:26
नवीन
न्यूझीलंडबाहेर राहात असणार्या भारतीयांनी दुर्लक्ष करावे. न्यूझीलंडमध्ये राहाणार्या भारतीयांनी मात्र पूर्ण दुर्लक्ष करू नये. टीव्ही स्टेशनाला तक्रारीची पत्रे लिहावीत.
सहमत!
लहानपणी आम्ही जपानच्या तत्कालीन पंतप्रधानांना "नाकात-सोने" म्हणत खिदळत असू. जपान्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले.
अहो लहान पोरांनी म्हणलेले कुणाला कळणार होते? तेंव्हा (मराठीत विनोद म्हणून) भक्ती बर्वे, स्मीता पाटील, ज्योत्स्ना किरपेकर, चारूशीला पटवर्धन, आकाशानंद, विश्वास मेहंदळे वगैरेपैकी कोण असे बोलले होते? आणि बोलले असते तर जपान सरकारने निषेधातला न उच्चारेपर्यंत तरी त्यांचा जॉब भारतसरकारने ठेवला असता का? हा न्यूझिलंडचा माणूस आणि त्याचा विनोद हा आपण लहान असताना केलेल्या विनोदाशी तुलना करणे शक्यच नाही, हा फारच हीन पातळीवरचा वाटला.
अमेरिकेत देखील वाटेल ते जोक्स करताना आपण पहातो. देवाधर्मावरूनपण होतात आणि कधी कधी ज्यूंवरून विशेष तर भारतीय, पाकीस्तानी, मध्यपूर्वेतील लोकांच्या उच्चारपद्धतीवरून होतात. पण असले कधी कुणाच्या व्यक्तीगत आडनावावरून केलेले मी पाहीलेले नाही. त्यबाबतीत आदर आणि त्याही पेक्षा सेन्सेटीव्हीटी असते असे वाटते आणि ते योग्यच आहे.
त्या विनोदात त्याने न्यूझिलंडचे गव्हर्नर जनरल आनंद सत्यानंद हे भारतीयच तर नसावेत असे म्हणत स्पष्ट वांशिकता देखील दाखवली आहे. ते निंदनीय आणि निषेधार्ह आहे.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Fri, 10/08/2010 - 03:51
नवीन
टीव्ही स्टेशनाला तक्रारीची पत्रे लिहावीत.
इंडोनेशियातले मूल-भारतीय प्रतिभाताईंना पत्रे लिहितात. त्यामुळे न्यूझिलंडकरांनीदेखील (अश्लील, म्हणून ओरडू नकोस परा) प्रतिभाताईंनाच पत्रे लिहावीत.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 10/08/2010 - 08:02
नवीन
छे मी कशाला काय ओरडु ? ;)
बाकी सुनीलशेठनी हा असा धागा काढण्यापेक्षा 'पॉल हेन्रीला अनावृत पत्र' असा धागा काढायला हवा होता असे आमचे ठाम मत आहे.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 10/08/2010 - 01:57
नवीन
भारताच्या रुद्रावताराने न्यूझीलंडची थेट माफी
अवांतर :
'भारताच्या रुद्रावताराने ' हा शब्द मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वाचला. असा रुद्रावतार, चीन, पाकिस्तान, यांपुढे कधी दाखविणार देव जाने. गरज नाही तिथे रुद्रावतार, आणि जिथे गरज तेथे गुप चिळी.
संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यूझीलंड सरकारने कडक कारवाई केली पाहिजे,'' असे त्यांना परराष्ट्र सचिव (पूर्व) विजयालता रेड्डी यांनी स्पष्ट शब्दात सुनावले.
असे स्पष्ट शब्द इतर वेळेस घशात अडकतात का काय ?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 10/08/2010 - 03:58
नवीन
>>गरज नाही तिथे रुद्रावतार, आणि जिथे गरज तेथे गुप चिळी.
हा हा हा. दोन्हीकडून ढोलकी वाजवणे.
रुद्रावतार दाखवला नसता तर काय हे!!!! "न्युझीलंडसारख्या चिल्लर देशापुढेसुद्धा भारत शेपूट घालतो" असे वाचायला मिळाले असते याची खात्री आहे.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 10/08/2010 - 09:54
नवीन
'पाकिस्तानसारख्या चिल्लर देशापुढेसुद्धा भारत शेपूट घालतो, असे वाचायला मिळतेच ना ?
(आता पाकिस्तान चिल्लर नाहि, महान आहे , असे काय असेल तर सांगा बुवा, मला माहित नाही. मला फक्त "मेरा भारतच महान आहे" असे वाटते)
(बोटाला थोडे लागले आहे, सुद्ध लेखनाचि माफि द्या.)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Fri, 10/08/2010 - 04:12
नवीन
http://www.nzherald.co.nz/entertainment/news/article.cfm?c_id=1501119&objectid=10679040
ही बातमीची लिंक...जगातील सगळ्या मिडियाने याची नोंद घेतल्याचे अन त्याच्या शिक्षेबद्द्ल बातमी.
मी आताच त्या वाहिनीला एक खरमरीत निषेधाचे पत्र लिहिले आहे...त्यातील मजकूर कदाचित इथे संपादित केला जाईल म्हणून टाकला नाही.. :-)
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 10/08/2010 - 03:32
नवीन
त्या दुव्यात मी एक खूप प्रभावी वाक्य वाचले-
"There may be filth on Indian roads. But there is filth in many Westerner's mind."
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 10/08/2010 - 06:20
नवीन
अशा प्रकारांना उत्तर देण्याचा व असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची व्यवस्था करण्याचा एकच उपाय असतो. स्वतःला इतकं ताकदवान करावं की असल्या फुटकळ देशातले फुटकळ लोक काय बोलतात याने फरक पडू नये. स्वतःला शक्तीवान करण्यातला दुसरा फायदा असा असतो की मग त्या दुसऱ्या देशातले लोकच (राज्यकर्ते, नोकरशाही वगैरे) असल्या प्रकाराचा फटका बसू नये म्हणून ते प्रकार होऊ देत नाहीत, व झाल्यास ताबडतोब शिक्षा करतात.
हा मार्ग कठीण आहे. तिथे पोचायला वेळ लागतो. पण सर्व क्रिकेटर, क्रिकेटिंग बोर्ड्स बीसीसीआयची हाजी हाजी करतात तसं होऊ शकतं. त्यासाठी हळुहळू आपली शक्ती वाढवावी लागते. सर्वात मुख्य म्हणजे असल्या फुटकल चर्चांत वेळ न दवडणं, हाही त्या प्रक्रियेचा एक भाग असतो. दरम्यान खोबारपंतांनी सुचवलेली सर्वात सणसणीत शिवी हासडावी - दुर्लक्ष.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 10/08/2010 - 16:59
नवीन
थोडक्यात, जागतिक राजकारण, अर्थकारण ह्या क्षेत्रात आपण सध्याचे 'चीन' व्हावे, तेव्हा असे करण्याअगोदर माणसे पन्नासदा विचार करतील, आणी त्यांनी नाहीच केला तर त्यांच्या संबंधित माणसे/संस्था/समाज/देश करतील. जोंवर आपली अशी स्थिती होणार नाही, तोंवर आपण असल्या घटनांनंतर कितीही कुल्ले आपटले तरी काही होणार नाही.
सध्या क्रिकेटच्या क्षेत्रात आपण असे स्थान, त्या खेळाच्या अर्थकारणावरील जवळजवळ संपूर्ण ताबा आपल्यापाशी असल्याने मिळवले आहे, आणि आपण त्याचा अत्यंत चांगला उपयोगही करीत आहोत. दोन (तीन) वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात आपंण त्याचा योग्य वापर केला होता. अलिकडेच आय. सी. सी. च्या निवडणूकातही आपण तेच केले. जळफळाट करण्याव्यतिरीक्त त्या देशांना काहीही करता आले नाही, सध्या येत नाही.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 10/08/2010 - 17:49
नवीन
थोडक्यात, जागतिक राजकारण, अर्थकारण ह्या क्षेत्रात आपण सध्याचे 'चीन' व्हावे, तेव्हा असे करण्याअगोदर माणसे पन्नासदा विचार करतील, आणी त्यांनी नाहीच केला तर त्यांच्या संबंधित माणसे/संस्था/समाज/देश करतील
ही बातमी वाचा.
चीनच्या आगाऊ इशार्याला न जुमानता, चीनच्या कैदेत असणार्या ली शाऑबो यांना ह्यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला गेला.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 10/09/2010 - 04:04
नवीन
पण गेल्या काही दिवसात चीनी पंतप्रधान वेन जियाबाओ युरोपच्या दौर्यावर आहेत, तेथे एकेक युरोपीय नेते त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहेत, तेही पहावे/वाचावे.
हे पारितोषिक दिले आहे खरे, पण लगोलग चीनने नॉर्वेच्या राजदूतास बोलावून (नक्की दिवसाच्या कुठल्या वेळी केले ते माहित नाही, बहुदा रात्री/बेरात्री असावे) निषेध नोंदवला आहे, आणि राजनैतिक संबंध बिघडतील असे दटावलेही आहे. पुढे काय होते, पाहूंया.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 10/08/2010 - 06:59
नवीन
हा पॉल हेन्री कितपत महत्वाचा आहे यावर अवलंबुन आहे की भारताने याचा निषेध करावा की नाही. उगाच कोणितरी आज तक वरील सनसनी च्या अँकरसारखा असेल तर त्याच्याकडे लक्ष न देणे हेच उत्तम. उगाच त्याची तक्रार करुन त्याला मोठा करण्यात काहीच अर्थ नाही. मी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकले आहे. माणूस एकुण मुर्ख दिसतो आहे. त्याचे बोलणे, त्याचे हसणे यावरुन एकुण त्याच्या बुद्धीमत्तेचा वकूब दिसुन येतो. त्याला फारशी अक्कल आहे असे वाटत नाही. मुळात मेंदु आहे असेच वाटत नाही. उगाच कशाला अश्या देवाने पिचवलेल्या माणसामागचा त्रास वाढवायचा.
हा पण तो कोणी सरकारदरबारी वजन असलेला माणूस असेल तर त्याला सोडू नये. चुकीचा संदेश जाता कामा नये जगाला यातुन.
बाकी भारतीय असल्यामुळे शीला दिक्षीत बद्दल जे शब्द वापरले आहेत त्याबद्दल त्याचा निषेधच केला पाहिजे. पण त्याने त्या भारतीय आहेत म्हणुन हा उच्चार बरोबर आहे अश्या अर्थाचे जे विधान केले आहे ते केले नसते तरीही आपण एवढ्याच कडक शब्दात निषेध केला असता का? करायला हवा होता का?
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Fri, 10/08/2010 - 07:27
नवीन
त्या भिकारड्या अॅंकरने कॉमेंट करताना शीला दिक्षीत या वयस्कर आणि महिला आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे होते. त्यासाठी त्याला हाकलूनच दिले पाहिजे.
पण एरवी ही कॉमेंट एखाद्या पुरुष भारतीय नेत्याबद्दल केली असती तर माझा संताप तितकासा उफाळून आला नसता कारण आपले पुरुष नेते खरोखरच 'शिट' म्हणावे या लायकीचेच आहेत. त्यांचा अपमान म्हणजे काही देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीरांचा अपमान नाही.
जगभर आपल्या वाट्याला हा उपहास का येतो, याचा विचार भारतीयांनी गांभीर्याने करावा.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Fri, 10/08/2010 - 07:36
नवीन
<<<जगभर आपल्या वाट्याला हा उपहास का येतो,
पुचाट वागण्यामुळे..
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 10/08/2010 - 07:46
नवीन
कोण पॉल हेनी?..!
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/08/2010 - 13:22
नवीन
मी आधी ती बातमी नुसती वरवर वाचून दुर्लक्षित केली होती. मात्र सुनील यांनी तूनळीचा दुवा दिला म्हणल्यावर पाहीली आणि अर्थातच चीड आली. (सुनील यांची नाही! ;) )
मला वाटते अशा बातम्या जर पुढेच आल्या नाहीत तर त्यांना मिळणारी प्रसिद्धी पण मर्यादीत राहू शकते. नाहीतर फुकटचा हा कोण गोम्यासोम्या आहे त्याचे नाव आणि त्या कार्यक्रमाचा टिआरपी वाढायला आपण मदत करतो असे वाटले... परत खुलासा: हे सुनील अथवा इतर कोणीही वर दुवा दिला आहे म्हणून नाही, मी पण आधी इतके बघितले असते तर कदाचीत हा दूवा दिला असता, चर्चा केली असती. पण फक्त आता असे वाटले इतकेच...
बाकी त्याला तेथील भारतीय समाजाकडून विरोध केला गेला आणि त्याची तात्पुरती बडतर्फी ज्या दिवशी उठेल त्या दिवशी म्हणजे १८ ऑक्टोबरला तेथे जाऊन निषेध केला जाणार आहे, हे वाचून बरे वाटले.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 10/08/2010 - 17:10
नवीन
ग्लोबलायझेशनमुळे वेगवेगळ्या संस्कृतीतली नावे, शब्द दुसरीकडे पोचतात. आता इंग्रजीत दिक्षीत शब्दाचा असा अश्लील अर्थ होत असेल तर त्यावर विनोद होणारच. परदेशात चॅनल्सना खूप स्वातंत्र्य असते. सरकार त्यांची मुस्कटदाबी करत नाही. त्यामुळे ह्या आचरटपणाला तमाम न्यूझिलंड जबाबदार नाही.
इथे एक उदाहरण बघा
http://en.wikipedia.org/wiki/Keiko_Aizawa
ह्या नावाची बाई जर मोठी मंत्री वा अध्यक्ष झाली आणि मराठी चॅनलवर हीचे नाव घ्यायचे वेळ आली तर कुणीतरी अशाच प्रकारची प्रतिक्रिया देणे शक्य आहे.
ह्या प्रकरणाचा महंमद कार्टून स्टाईलने राईचा पर्वत करू नये. माफी मागितल्यास माफ करावे.
आता कळले आपल्या माधुरीताईंनी नेन्यांना वरल्यानंतरच अमेरिकेला प्रयाण का केले ते!
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 10/08/2010 - 18:05
नवीन
बरोबर. कुठल्यातरी एका निवेदकाने टवाळकी केल्याबद्द्ल सगळ्या देशाला जबाबदार धरणे चूक आहे. भारतिय राजकारणी लोकांची कोणी टर उडवली की आपली सरकारी यंत्रणा किती वेगात काम करते ते ह्या निमित्ताने दिसले.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 10/08/2010 - 19:28
नवीन
हुप्प्या साहेबांनी क्लीप नीट बघितलेली दिसत नाही. नावाच्या वैचित्र्यामुळे कुणाला हसू आले तर मी समजू शकतो. त्याला ते आवरता आले नाही तरीही एकवेळ समजत येईल. (रसेल पीटर ने पण या प्रकारचे विनोद केलेले आहेत) पण तुम्ही वरच्या क्लीप मध्ये खालील संवाद ऐकलेला दिसत नाही. ऐकला असेल आणि तुम्हाला त्यात काहीही गैर वाटत नसेल तर पुढील बोलणे खुंटले.
Paul :- It looks like Dickshit.
Other man :- I know it does Paul, but it's not.
Paul :- It's so appropriate because she is Indian. So she would be Dick and Shit, wouldn't she?
हे चालू असताना दुसऱ्या माणसाच्या स्वरातील नाराजी स्पष्ट कळते आहे. त्याला हा प्रकार अजिबात विनोदी वाटत नाही आहे हे जाणवते आहे. आणि तो वरील वाक्य बोलल्यावर बाजूला बसलेल्या बाईच्या चेहऱ्यावरील आश्चर्य पण लपत नाही.
बाकी घासकडवी यांचे म्हणणे १००% पटले. (शेवटचे वाक्य सोडून)
- Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ
Sat, 10/09/2010 - 04:50
नवीन
तुम्ही गूगल वर "आइझवा" टाकल आणि ही लिंक मिळाली का ??
मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही "आइझवा" हा सर्च का करत होता ?? :)
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 10/08/2010 - 18:01
नवीन
फार वर्षांपूर्वी जेव्हा ब्रॅड पीट आणि जेनेफर अॅनिस्टन पतीपत्नी होते तेव्हा "लीक" या भाजीची पाककृती टिव्हीवर सांगताना जेनेफरची ब्रॅड आणि मुलाखतकाराने जाम टर्र उडवली होती. पाश्चात्त्य चॅनेल्स अशी टर उडवताना यापूर्वीही पाहिले आहे.
वर धनंजय म्हणतात तसे न्यूझीलंडमधील लोकांनी यावर अवश्य आक्षेप घ्यावा आणि सदर व्यक्तीकडून माफीनामा घ्यावा. याखेरीज, अन्य काही करण्याची गरज वाटत नाही.
काही दिवसांपूर्वी कॉमनवेल्थच्या तयारीची दूरावस्था पाहून लोकांनी दिक्षितबाईंना बर्याच शिव्या घातल्या आहेत. त्यांचे मतपरिवर्तन या प्रकारामुळे झाले असेल किंवा दिक्षितबाईंना सहानुभूती मिळत असेल तर सोडून द्यावे. ;)
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 10/09/2010 - 13:39
नवीन
अनेक पाश्चिमात्य देशांत नावांवरून, लकबींवरून नेत्यांची जाहीर टिंगल करायची संवय आहे,तेथील स्थानिकांना त्यात काहीही गैर वाटत नाही. त्यामुळे न्यूझिलंडमधील 'डिक-शिट' इत्यादि टिंगल, नुसती स्वतंत्रपणे पाहिली तर फारशी गैर वाटू नये. पण ह्याव्यतिरिक्त, ह्या टिंगलीच्या आजूबाजूस पॉल हेन्रीने काही वक्तव्ये केली आहेत त्या संदर्भात ही टिंगल वर्णद्वेषी असावी असे म्हणण्यास जागा आहे. एकतर ही अशी टिंगल केल्यावर त्याने 'ती भारतीय आहे, तेव्हा असे (म्हणजे 'शिट') असणारच', असे पुढे म्हटले. त्याहीअगोदर, नुकतेच त्याने त्याच 'शो'वरून न्यूझिलंडच्या गव्हर्नर- जनरलपदी असलेल्या श्री. आनंद सत्यानंद ह्यांच्याविषयी असेच काही उद्गार काढले होते. तेथील पंतप्रधान श्री. जॉन की ह्यांची मुलाखत घेतांना त्याने प्रश्न केला की 'हे गृहस्थ न्यूझिलंडर आहेत? त्यांच्या दिसण्यावरून व बोलण्यावरून ते तसे दिसत नाहीत'. श्री. सत्यानंद हे मूळ भारतीय वंशातील, पण ते न्यूझिलंडमध्ये जन्मलेले आहेत. ह्या त्याच्या उद्गारांवरून तेथे गदारोळ झाला व त्याची परिणिती हेन्रीस १८ ऑक्टोबरपर्यंत सक्तीची रजा देण्यात झाली.
भारताने राजनैतिक पातळीवरून निषेध नोंदवितांना कदाचित (पण नक्की माहिती नाही) ह्या पार्श्चभूमिस लक्षात घेतले असावे.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Sat, 10/09/2010 - 11:55
नवीन
हे घ्या, अजुन एक अपमान. "भारतीय माकडे आहेत"इति रोलंड शोएमन
आता ढोलकी चे आवाज ऐकणार्यांना एक विचारणे आहे,
आता ते स्पष्ट, परखड, रुद्रावतार वगेरे वगेरे बघायला मिळेल काय ? आता ढोलकी कोणत्या बाजूने बडवायची ? कि आता कोणत्या मंत्र्या संत्र्याचा अपमान न झाल्यामुळे अळीमिळी गुप चिळी ?
- Log in or register to post comments
स
सन्दीप
Sat, 10/09/2010 - 13:25
नवीन
अहो भारतीय काय सारी मानव जातच माकडाचि वन्शावळ नाही काय?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 10/09/2010 - 13:44
नवीन
हरभजन पण सायमंडसला माकड म्हणाला होता.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sat, 10/09/2010 - 13:53
नवीन
४/५ दिवस मिडियाला विषय मिळाला. आता इंग्रजी वृत्तपत्रांचे मथळे ठरलेले.
१)Does western world hate us?
2)Is western world jealous of Indian sucess?
3)Why Indians face racial discrimination everywhere?
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 10/09/2010 - 13:57
नवीन
चला कौलांसाठी ३ प्रश्न मिळाले. ;)
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Sat, 10/09/2010 - 14:12
नवीन
चला मग, ३ ठिकाणी धिंगाणा घालायला जागा मिळाली.
- Log in or register to post comments
ऋ
ऋयाम
Sat, 10/09/2010 - 18:02
नवीन
मला सांगा, नावात काय आहे?
तो म्हटला, डिक्शीट तर का फरक पडावा? स्वतःला 'दिक्षित' असा उच्चार येत नाही आणि
दुसर्याला नावे ठेवतोय हिरा.
१४-१५ बघा. फार्फार तर २० वर्षांच्या पोरांच्या लेव्हलचा जोक मारुन टीव्हीवर हसतोय लेकाचा.
स्वत:ची औकाद दाखवली झालं.
पण नावावरुन आठवलं बघा...
एक तो पॉल आणि एक हा.
तो म्हणजे तो वर्ल्ड-कप वाला. आणि ह्यो पॉल्या ज्युनिअर.
कहां राजा भोज और कहां ये पॉल गंगु तेली...
दंगा करणार्या प्रेक्षकांची चुकही आहेच, आणि माकड म्हणणार्याची.
मिडीआलाही कामं नाहीत..
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sun, 10/10/2010 - 13:10
नवीन
सहमत.
नावात काय आहे?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 10/10/2010 - 13:09
नवीन
New Zealand TV anchor Paul Henry quits over Sheila Dikshit row
http://timesofindia.indiatimes.com/india/New-Zealand-TV-anchor-Paul-Henry-quits-over-Sheila-Dikshit-row/articleshow/6723351.cms
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 05/14/2012 - 13:40
नवीन
हर्भजनने सायमंड्सला माकड म्हटले नसून त्याच्या मातृकुलाशी संबंध जोडला असावा" तेरी माकी....". ते त्याला मंकी वाटलं. येडाच आहे झालं. खरा अर्थ कळला असता तर भज्जीचा मिसळपाव केला असता ;)
- Log in or register to post comments