कलादालन

उत्सव रानफुलांचा

Primary tabs

जास्वंद Image removed. गेंद Eriocaulon Sedgewickii Image removed. पिवळी अबई_Reinwardtia indica Image removed. शंकासूर Image removed. शंकासूर Image removed. शंकासूर Image removed. शंकासूर Image removed. कारवी_Carvia callosa Image removed. सोनकुसुम_Cosmos Image removed. Image removed. Image removed. कुर्डु_Celosia argentea Image removed. बोगनवेल Image removed. बॉटलब्रश Image removed. एक्झोरा/रुक्मीणी Image removed. मदाम_Abutilon Ppresicum Image removed. Image removed. Image removed. Image removed. कुसुंबी Image removed. Image removed. Image removed. विष्णुक्रांत Image removed. डिंगळा_Crotalaria spectabilis Image removed. सोनकी Image removed. घाणेरी_Lantana Camara Image removed. Image removed. Image removed. संक्रांत वेल Image removed. पांढरा कुडा Image removed. तामण Image removed. तामण Image removed. Image removed. टिकोमा Image removed. Image removed. पांढरी लिली Image removed. Image removed. Image removed. निलवंती_Cyanotis Faciculata Image removed. दशमुळी_Eranthemum Roseum Image removed. शिंदळवान/रानहळद_Curcuma pseudomontana Image removed. निळी पुंगळी_Lpomoea Nil Image removed. इंद्रनील Image removed. Image removed. मोतिया Image removed. गंगी Image removed. कवळा Image removed. पेव Image removed. पानशिंग Image removed. कोरांटी Image removed.
योगेश२४

ज्या फुलांची नावे माहित होती/मिळाली ती टाकलेली आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. :)

जिप्सी

योगेश सगळे फोटो मस्त आहेत्,वेळ काढून एकदा रायरेश्वराच्या पठारावर जाउन या. (मी पण येतो!) अजून फुल मिळतील बघायला.

अवांतर :- श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री वाचलयं का नाही? नक्की वाचा.

चित्रा

पेव फुटले असे का म्हणतात ते आता कळले.

फार सुंदर फोटो.

नंदन

पेव फुटले असे का म्हणतात ते आता कळले.

असेच म्हणतो.
सुरेख फोटो!

मृत्युन्जय

अशक्य फोटो आहेत हे. निसर्गात ठायी ठायी किती सैंदर्य लपले आहे ते एरवी आपण न्याहाळत नाही हे या छायाचित्रांमुळे पटले.

कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?

sneharani

अगदी अप्रतिम फोटो.
मस्त. आवडले.

अस्मी

वाह!! अप्रतिम...सुंदर!!
पांढरी लिली आहे ना तसं माझ्या घरी एक फूल येतं, त्याला आम्ही नागदोणी म्हणतो...हे दोन्ही एकच का?

- अस्मिता

मराठमोळा

एक नंबर योगेश शेट. :)

मस्त फोटुज.

पण ही रानफुले वाटत नाहीत ब्वॉ.. भारतातलीच आहेत की ईतर कुठली?

योगेश२४

प्रतिक्रियेंबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!

जिप्सी अधिक माहितीबद्दल धन्यवाद. रायरेश्वराच्या पठावर जायचे अजुन. बघु केंव्हा मुहुर्त मिळतोय. :)
श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री वाचलयं का नाही? नक्की वाचा.>>>>नक्कीच. धन्यवाद.

हे सगळे कासच्या पठारावरचे आहेत काय ?>>>सगळेच फोटो कासच्या पठारावरील नाही. यातील बरेचसे शिवनेरी, रायगड, सिंहगड, पेठचा किल्ला, जव्हार इ. ठिकाणचे आहेत.

निसर्गात ठायी ठायी किती सैंदर्य लपले आहे ते एरवी आपण न्याहाळत नाही हे या छायाचित्रांमुळे पटले. >>>अगदी खरंय मृत्युंजय :)

कुठला कॅमेरा वापरता तुम्ही?>>>Canon EOS 1000D

त्याला आम्ही नागदोणी म्हणतो...हे दोन्ही एकच का?>>>मधुमतीजी, जर फोटो असेल तर टाका ना, मी चेक करून सांगतो.

भारतातलीच आहेत की ईतर कुठली?>>>मराठमोळा, हि सगळी फुले आपल्या महाराष्ट्रातीलच आहे :)

कलादालन समृद्ध करणारा आणखी एक धागा.>>>मनापासुन धन्यवाद.

नगरीनिरंजन

अप्रतिम फोटो! डोळ्याचे पारणे फिटले.
घाणेरी म्हणजेच टणटणीचे फूल का? टणटणीची फुलेही अशीच दिसतात आणि एकदम छोट्या छोट्या फुलांचा गुच्छ असतो.

योगेश२४

घाणेरी म्हणजेच टणटणीचे फूल का? टणटणीची फुलेही अशीच दिसतात >>>>येस्स, घाणेरीला टणटणीहि म्हणतात

जागु

तु काढलेल्या फोटोंना प्रतिसाद द्यायला शब्दच नसतात. तुला एवढ्या सगळ्या फुलांची नाव कशी माहीत ?

योगेश इंद्रनिलच्या खालची कसई आहे.
तु ज्याला ताम्हण म्हणतोस त्याला आम्ही खोबर्‍याची. फुल म्हणतो.

गणपा

योगेश एकदम जबरा कलेक्शन केल आहेस.
बर्‍याच फुलांची फक्त नावंच माहित होती (पाहिली नव्हती.), तर काही पाहिलेल्या फुलांची नावं ठाउक नव्हती.

सुंदर फोटोज!

अवांतरः यातली अर्ध्याधिक फुलं आमच्या कँपसवरही दिसतात. पण मी येवढे चांगले फोटो काढूच शकत नाही.

सुंदर फोटोज!

अवांतरः यातली अर्ध्याधिक फुलं आमच्या कँपसवरही दिसतात. पण मी येवढे चांगले फोटो काढूच शकत नाही.

सुहास..

काटा फुलं आहेत रे योगेश !! दिल खुष हो गया !!

फुलांचे फोटो खरंच खूप सुरेख आले आहेत....
पांढर्‍या लिलीला आपल्याकडे निशिगंध असंही नांव आहे का? चूभूद्याघ्या....

बाकी रुक्मणी आणि गंगी लई आवडल्या!!!
-शंकासूर
:)