दवाखान्यातील दोन प्रसंग - एक अनुभव
💬 प्रतिसाद
(14)
च
चिरोटा
Sat, 10/09/2010 - 13:24
नवीन
सहसा दवाखान्यात असल्या विनंत्या पुरुषांनी केल्या तर त्या विचारात घेतल्या जात नाहीत.त्यामुळे बायकाच पुढाकार घेतात.पुढे परत ती रिपोर्टवाली बाई परत दवाखान्यात आली तर तुझ्याजागी कोणीही दुसरा पुरुष असेल तरी तो तेच करेल. अशावेळी बायकांना 'पुढे' करायचे असते.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 10/09/2010 - 13:59
नवीन
शक्य आहे.
माझी बायकोही हेच म्हणाली कि तुम्ही पुरुष मंडळी जास्त भांडकुदळपणा करत नाही जर समोर एखादी स्त्री असेल तर. मी तुमच्या जागी असते तर तिला नक्कीच जाऊ दिले नसते.
आणि विशेष म्हणजे ती रिपोर्टवाली बाई आत गेल्यावर मला जाब विचारणारी व्यक्ती ही एक मराठी बाईच होती.तिचा नवराही तिच्याबरोबर होता पण तिने मला "आता आम्ही जाऊ आत का तुम्ही जाताय?" हे विचारल्यावरच त्याला झाला प्रकार कळला आणि तरी देखील तो समजुतदारपणे गप्प बसला.
इकडे बेंगलोरचे गळेकापु व्यावसायिक वातावरण पाहता मला जर कुणी टोकाचे ऑब्जेक्शन घेतले असते तर काय झाले असते ही कल्पना करुनच हुडहुडी भरली.
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Sat, 10/09/2010 - 18:20
नवीन
मुलीला १०३ ताप, आणी तुम्ही लायनीय?
१०३ ताप म्हणजे काय माहीत आहे?
मुलीला घेउन डॉक्टरच्या केबीन मध्ये घुसायचे.
दुनीया बाxxx.
दुसर्या प्रसंगात तुम्हाला घाई नव्हती म्हणून एका स्त्रीला तुम्ही पुढे जाऊ दिलेत, हे उत्तम झाले.
परंतु दुसरी (मराठी) बाई घुसत होती, तीला भीक घालायची नव्हती.
नानाचा डायलॉग " बच्चा समझके कंधेपे बीठाया तो कानमे xxx है!"
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 10/09/2010 - 19:34
नवीन
धन्यवाद संजयजी.
जाण्याआधी पत्नीने डॉक्टरला फोन केला होता.आणि डॉक्टरने पटकन येऊन दाखवायला सांगितले होते आणि जर माझ्यापुढे काही पेशंट असतील तर त्यांना विनंती करुन त्याला दाखवायला सांगितले होते.
दुर्दैवाने माझ्याआधी ७ पेशंट होते. ह्या सिच्युएशनमध्ये डॉक्टरने स्वत: मला प्रायोरिटी द्यायला हवी होती असे वाटले.डॉक्टरचे क्लिनिक म्हणजे एक रुम आणि त्यालगत असलेल्या फुटपाथवर सगळे पेशंट उभे. कुणी रिसेप्शनिस्टही नसल्याने कुणाकुणाला विनंती करणार!(बेंगलोरमध्ये अश्या विनंतीचा काही उपयोग होत नाही असा अनुभव पत्नीला काही ठिकाणी आला होता.).ह्या डॉक्टरची फि कमी आहे आणि डायग्नोसिसही चांगले आहे त्यामुळे त्या परिसरातल्या सार्या वर्गातली लेकुरवाळे कुटुंबे त्याच्याकडे जातात.
पण माझा नंबर येण्याच्या अवधीत तिथेच जवळपास असलेल्या दुसर्या एका चांगल्या चाईल्ड क्लिनिकमध्येही मी तिथे तरी डॉक्टर लवकर भेटेल ह्या हेतुने जाऊन आलो.पण ते क्लिनिक त्या दिवशी बंद होते.
असो.सुदैवाने आता सर्व काही ठिक आहे.मुलीचा ताप दिड दिवसातच उतरला पण अद्यापही थोडी सर्दी आणि खोकला आहे.पण तिथल्याच जवळपासच्या एका चांगल्या हॉस्पिटल बद्द्ल आणि दुसर्या चांगल्या पण महागड्या चाईल्ड क्लिनिकबद्दल माहीती झाली आहे.(महागडे आहे म्हणुन गर्दी कमी असते.)
असो.अशी वेळ पुन्हा कधीही माझ्यावर येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
ती मराठी स्त्री मध्ये घुसत नव्हती.तर मी कुणाला तरी आत जाऊ दिल्यामुळे ती बिथरली.तिला तिच्या नंबरवरच जायचे होते.पण सुदैवाने तो प्रसंग लवकर आटोपला.बेंगलोरमध्ये मराठी बोलणारे कुणी भेटले तर मला खूप आनंद होतो आणि मी स्वत:हुन ओळख वाढवण्याच प्रयत्न करतो.पण ह्या वेळेला त्या कुटुंबाला मी काही भाव दिला नाही.पुन्हा जर ते कुटुंब त्याच क्लिनिकमध्ये भेटलेच तर त्यांचाकडे दुर्लक्षच करेन.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sat, 10/09/2010 - 18:36
नवीन
खरं तर असे काही प्रसंग बहुतेकांच्या येऊन गेलेत ... फार विचार केला तरी त्रास होतो...त्या वेळेस जे योग्य तेच केले असे समजून घ्यायचे अन पुढच्या वेळी विचार करूनच निर्णय घ्यायचा...
कारण होऊन गेलेले तर बदलता येत नाही.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 10/09/2010 - 19:50
नवीन
येस.मी हे हाच धडा ह्या अनुभवांतुन शिकलो.
धन्यवाद शिल्पातै!
- Log in or register to post comments
प
पक्या
Sun, 10/10/2010 - 02:28
नवीन
थोडेसे अवांतर : १०३ ताप असताना आणि डॉक्टरकडे जायला वेळ लागत असताना प्रथमोपचार करायला हवेत. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे आणि थंड पाण्याने वरचेवर पूर्ण शरीराला स्पंजींग (ओल्या कापडाने अंग पुसून काढणे) हे सोपे आणि ताप उतरण्यास मदत करणारे उपाय आहेत. ताप असताना खाणे पिणे नकोसे वाटते. पण पाणी मात्र व्यवस्थित प्यायला हवे. लहान मूल ताप असताना स्वतःहून अजिबातच पाणी पित नसेल तर थोडे थोडे पण वारंवार आपणच मुलाला पाणी पाजायला हवे.
बा़की तुम्ही सांगितलेल्या पहिल्या प्रसंगात डॉक्टरला फोन केला होता तेव्हाच मी आलो की मला आत घ्याल का असे सांगितले असते आणि तुम्ही तिथे पोहचल्यावर आल्याची फोन वरून वर्दी देताच नर्स ने किंवा डॉक्टरच्या कोणा सहायकाने तुमचे नाव पुकारून तुम्हाला लगेच आत घेतले असते तर एवढा वेळ थांबावे लागले नसते . अर्थात हे तुम्ही लिहिल्याप्रमाणे तुम्हाला तातडीची गरज होती असे समजून सांगत आहे. नाहितर नंबर प्रमाणेच जाणे योग्य.
दुसर्या प्रसंगात तुम्ही त्या बाईला कानडी येत नाही असे सांगून माझा नंबर असल्याने सरळ नाही सांगायला हवे होते. जर तिला रीपोर्ट च घ्यायचा होता आणि तुम्हाला वाटत असेल १-२ मि. च्या कामासाठी त्या बाईला पूर्ण लाईन संपेपर्यत खूप वेळ थांबावे लागेल हे योग्य नाही तर तुमच्या बरोबरच आत यायला सांगायचे होते.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 10/10/2010 - 03:57
नवीन
खूप ताप असेल तर थंड नाही तर कोमट पाण्याने अंग पुसावे....तसेच एक विशिष्ट जेल असलेला pack मिळतो जो कायम फ्रीझरमध्ये ठेवायचा अन पटपट डोक्यावर फिरवायचा...ताप लवकर कमी होण्यास मदत होते.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 10/10/2010 - 09:22
नवीन
पक्याजी तुम्ही अगदी परफेक्ट सल्ला दिला आहे.
दुसर्या प्रसंगात डोक्यात अगदी गोंधळ चालु असल्याने मनात नसताना सुध्दा त्या स्त्रीला पुढे जाऊ दिले. पण इथुन पुढे कुणी रिपोर्ट दाखविण्यासाठीच आत जायचे आहे असे विचारायला आला तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे त्याला चला माझ्याबरोबर आत असे म्हणता येईल. (देवळात आणि दवाखान्यात जिथे प्रत्येकजण तुमच्या इतकाच गरजू असतो अश्या ठिकाणी केवळ लोकांच्या सौजन्यशीलतेचा गैरफायदा घेवुन पुढे घुसणार्यांबद्दल माझ्या मनात फार चीड आहे. ह्या निमित्ताने ती बाहेर आली.)
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Sun, 10/10/2010 - 05:10
नवीन
वरच्या प्रत्येक वेळेस 'विचारावे' म्हणून जे जे तुमच्या डोक्यात आले होते ते विचारायला हवे होते. प्रत्येक वेळेस नकारार्थी उत्तर आले असते तरी न विचारल्याने जो वेळ लागला तेवढाच लागला असता.
आजारी व्यक्तीसाठी धावपळ करताना तर हे जास्तच लागू होते. अशा वेळेस आपल्या भिडस्तपणामुळे त्या व्यक्तीस त्रास होण्याची शक्यता असते. (माझेही असे कधी कधी झाले असेल)
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Sun, 10/10/2010 - 06:29
नवीन
कानडाऊ योगेशु - जास्त विचार करू नका. तुमच्याजागी मी असतो तर असेच झाले असते.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 10/10/2010 - 08:29
नवीन
माझी तर कायमच तुमच्या सारखी अवस्था असते, त्यामुळे सल्ला नाही देउ शकत पण समजुन मात्र घेउ शकते की नंतर तुम्हाला चीडचीड का होत होती. पण हा स्वभाव काही बदलत नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे
Sun, 10/10/2010 - 08:33
नवीन
नवीन संशोधनानुसार कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने फार फायदा
होत नाही परंतु अंगभर स्पंजिंगचा नक्कीच होतो. लहान बाळ घरी असेल तर घरात अथवा
प्रवासात काही औषधे जरूर बाळगावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने (प्रसंगी नेहमीच्या डॉक्टरांशी
फोनवरून सल्ला विचारावा; रविवारी वा डॉक्टर गावाला गेले असतील तर गोची होऊ शकते
म्हणून अल्टरनेट डॉक्टर वा आपल्या डॉक्टरचा 'लोकम' असेल तर त्यांचे मोबाईल व
घरचा फोन नं सुद्धा जवळ ठेवावा) त्यांचा वापर करावा.
सध्याच्या व्हायरल प्रादुर्भावात (तसेच मलेरिया टायफॉईडमध्येसुद्धाताप अतिशय वेगाने १०३-०४ पर्यंत चढतो
व कधी-कधी आकडी येते (फेब्राईल कन्व्हल्जन). अश्यावेळीस डॉक्टर प्रत्यक्ष लगेच भेटू शकत नसतील
तर क्रोसिन सिरप हाताशी असावे. १५ मिग्रॅ प्रति किलो वजन असा पॅरासिटॅमॉलचा डोस असतो. १०४ ताप
जर लवकर उतरत नसेल तर (व डॉक्टर सहजी उपलब्ध होत नसेल तर फोनवर विचारून) जोनॅक पेडिअॅट्रीक सपोझिटरी ही गोळी बाळाच्या गुदद्वारात सोडावी; ताप तात्काळ उतरतो.
कित्येक वेळा असे होते की मेडीकल स्टोअर बंद असते वा रात्रीची वेळ असते त्यामुळे हवे ते औषध
पटकन उपलब्ध होतेच असे नाही त्यामुळे अशी काही औषधे स्टॉकमध्ये नेहमी ठेवावीत. अर्थात आपल्या
नेहमीच्या चाईल्ड स्पेशालिस्टला विचारूनच त्यांचा उपयोग करावा.
१) सिरप क्रोसिन- ताप व सौम्य वेदनाशामक
२) सिरप मॅक्स्ट्रा वा टिमिनिक वा अॅलग्रा - अॅन्टि अॅलर्जिक (सर्दी- खोकला, कान दुखणे, घशात खवखवणे वा
एखादा किडा वगैरे चावल्यावर उठणारे लोकलाईझ्ड पुरळ उदा सुरवंट्-स्पर्श झाल्यावर उठणारे पुरळ व खाज
असह्य असते; औषध दुकान बंद असेल तर बाळाचे हाल होतात तेव्हा जरूर घरी ठेवावे)
३) सिरप कोलीकेड - पोटात वेठ येऊन पोटदुखीने बाळ रडत असेल वा जुलाब होतांना मुरडा येत असेल तर
उपयुक्त
४) सिरप कार्मिसाईड वा कार्मिल - गॅस धरल्याने बाळाचे पोट दुखत असल्यास उपयुक्त
५) सिरप न्युट्रोलिन बी - जुलाब होत असतील तर उपयुक्त
६) सिरप कॉसम - कोरड्या खोकल्याची ढास असेल तर उपयुक्त
७) बाळ-दम्याचा त्रास असेल तर नेब्युलाईझर अथवा स्पेसर घरी ठेवावा व श्वासाला धाप लागली
वा चातीतून घरघर आवाज (व्हीजिंग) येत असेल तर तातडीने ड्युओलिनसारख्या औषधाचे नेब्युलायझेशन द्यावे.
८) जोनॅक सपोझिटरी- हाय फीवर उतरविण्यासाठी उपयुक्त
वरील सर्व औषधे नेहमीच्या चाईल्ड स्पेशालिस्टच्या संमतीनेच द्यावीत
लहान बाळांना होमिओपाथिक औषधेसुद्धा चांगली सूट होतात असा अनुभव आहे. त्या तज्ञांचा सल्ला
जरूर घ्यावा. विशेषतः दात येत असतांना मुले वारंवार आजारी पडतात; आमच्या अॅलोपाथीमध्ये त्याचे
विश्लेषण 'मुले ह्या काळात खाली पडलेल्या कोणत्याही वस्तू चोखतात म्हणून पोट बिघडते वा ताप येतो' असे
असले तरी होमिओपाथीत यास वेगळ्या थिअरीज आहेत व त्या क्लिनिकली जास्त सक्सेसफुल आहेत.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 10/10/2010 - 09:08
नवीन
दाढेसाहेब फारच उपयुक्त माहीती तुम्ही दिली आहे.
वेळात वेळ काढुन इतकी सविस्तर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
१०३ ताप आहे हे पाहुन पत्नीने बाळाला त्यावेळी घरी असलेले (इंजेक्शन दिल्यानंतर कधी कधी येणार्या बाळाच्या तापाच्या ट्रीटमेंटसाठीच घेतलेले घरात असलेले) सिनारेस्ट हे औषध बाळाला दिले होते.
आणि पत्नीने सर्व प्रथमोपचारही केले होते पण बाळाची अशा पध्दतीने आजारी पडण्याची ही पहीलीच वेळ असल्याने ती आणि मी दोघेही बिथरलो होतो.
- Log in or register to post comments