कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी
Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी
💬 प्रतिसाद
(10)
क
कानडाऊ योगेशु
Sun, 10/10/2010 - 21:08
नवीन
रंगराव ही कथा आहे असे समजुन प्रतिसाद देतो आहे.(भाग नऊ आणि भाग दहा दोन्हींना मिळुन हा प्रतिसाद आहे.)
आतापर्यंत वाचल्यावर एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे ही कथा टिपिकल मसालेदार हिंदी पिक्चरच्या वळणाने जात आहे.म्हणजे नुकताच कंपनीत जॉईन झालेला होतकरु तरुण..त्याला नेहेमीच चुकीचा विचार करणारा मॅनेजर मिळणे..तरुणाला कोणीतरी गॉडफादर भेटणे... हिंदी पिक्चरमध्ये हिरो जसा सर्वगुणसंपन्न असतो तसा हा तरुणही आउटसोर्सिंग/क्वालिटी वगैरेबद्द्ल अधिकारवाणीने बोलतो.. वगैरे वगैरे... (गीता जर विवाहीत नसती तर तिथे थोडा रोमान्सही टाकता आला असता..) थोडक्यात आय.टी च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिच बॉलिवुडची नेहेमीची कहाणी चढवली आहे.
माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन हे निश्चितपणे म्हणु शकतो ही इतकेही मूर्ख लोक आयटीत नसतात.सर्विस कंपन्या क्लायंट्सना एका मर्यादेपर्यंतच मूर्ख (खरा शब्द चुत्या) बनवु शकतात. आऊटसोर्स करण्याआधी कुठलीही कंपनी व्हेन्डर कंपनीला पी.ओ.सी. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) प्रोटोटाईप बनवायला सांगते आणि त्यानंतरच काम सोपवायचे की नाही हा निर्णय घेते.मी स्वतः एका नामाकिंत कंपनीत ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि क्लायंटने कसे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि काम योग्य कंपनीत जातेय की नाही/व्हेन्डर कंपनीत ह्यासाठी योग्य रिसोर्सेस आहेत की नाही ह्याची हरप्रकारे शहानिशा करुन घेतली होती ह्याचा साक्षीदार आहे. (मिपावर इतरही असे अनेक नक्कीच असतील ज्यांनी ह्या प्रक्रिया दोन्ही बाजुंनी हाताळल्या असतील.)
तुमची उमेद खच्ची करण्याचा हेतु मुळीच नाही पण तुम्ही रंगवत असलेल्या मॅनेजरबद्द्ल सहानुभुती निर्माण झाली म्हणुन हे लिहिले.
बाकी कथा नेहेमीप्रमाणेच वाचनीय झाली आहे.
चु.भु.दे.घे.
(आय टी तला हमाल मुलगा) योगेश
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sun, 10/10/2010 - 22:59
नवीन
मी सुद्दा रंगराव यांचे सर्व लेख बारकाईने वाचत आहे...उगाच negative प्रतिक्रिया द्यायला आवडले नाही, म्हणून आजपर्यंत जास्त काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. (फक्त पहिल्या भागात एक असहमती दर्शवली होती.)
कानडाऊ योगेश यांच्याशी १००% सहमत...(माझे नाव सुद्धा योगेश आहे किंवा मी सुद्धा IT मध्ये आहे म्हणून नाही..पण त्यांचे विचार पटले..)
ही जर एक कथा असेल तर ठिक, पण सत्यकथा असेल तर जरा स्व:ताचे कौतूक अति होतेय असे उगीच वाटले. केवळ आपण किती सर्वांपेक्षा वेगळे आणि वरचढ आहोत...प्रत्येक वेळी मॅनेजर आपल्याशी कसा वाईट वाटला आणि आपण कशी कुरघोडी केली हे दाखवले गेले आहे. मॅनेजर लोकं काय इतकी वाईट नसतात..
(माझ्यामते जर एखादा होतकरू(नवशिका..?) तरूण जर खरोखर चांगले काम करत असेल आणि मॅनेजरला त्या तरूणापासून जर स्व:ताच्या अस्तित्वाबद्दल धोका वाटत असेल..तर जास्त पंगा न घेता मॅनेजर लोंक (नमते घेऊन) most of the time अश्या लोकांबरोबर जुळवून घेतात आणि त्यांचा योग्य तो वापर करून स्व:तची सुद्धा तरक्की करून घेतात. मी जर मॅनेजर झालो तर असेच वागेन..)
बाकी सर्व भाग वाचनिय आहेत..लेखनशैली आवडली..पु.ले.शु.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Mon, 10/11/2010 - 05:11
नवीन
तुमचाही नाव योगेश आहे आणि आणि विचारही योगेश सारखे म्हनून त्याना दिलेल उत्तर तुमच्याही प्रश्नांना लागू आहेत ;)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Mon, 10/11/2010 - 05:00
नवीन
सर्व प्रथम प्रामाणिक प्रतीक्रिया दिलीत ह्याबद्दल धन्यवाद.
>>आतापर्यंत वाचल्यावर एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे ही कथा टिपिकल मसालेदार हिंदी पिक्चरच्या वळणाने जात आहे.म्हणजे नुकताच कंपनीत जॉईन झालेला होतकरु तरुण..त्याला नेहेमीच चुकीचा विचार करणारा मॅनेजर मिळणे..तरुणाला कोणीतरी गॉडफादर भेटणे... हिंदी पिक्चरमध्ये हिरो जसा सर्वगुणसंपन्न असतो तसा हा तरुणही आउटसोर्सिंग/क्वालिटी वगैरेबद्द्ल अधिकारवाणीने बोलतो.. वगैरे वगैरे... (गीता जर विवाहीत नसती तर तिथे थोडा रोमान्सही टाकता आला असता..) थोडक्यात आय.टी च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिच बॉलिवुडची नेहेमीची कहाणी चढवली आहे.
कल्पना आवड्ली मला! कॉपीराईट्स घेवून ठेवतो. गीताला अविवाहीत दखवून एकता कपूरच्या सिरिअल सारखी एक लांबलचक सिरियल काढता येइल. किंवा चित्रपट ही. तसा ह्या विषयावर हिंदी चित्रपटही फारसे निघाले नाहित. जोक्स अपार्ट, कंपनीम्ध्ये दोन प्रकारच्या क्षमतांची गरज असते. इंटर पर्सनल आणि टेकनिकल! ह्या गोष्टी मॅनेजमेंट आणि ईंजिनीयर ह्या दोघांसाठी महत्वाच्या असतात हे आपल्याला मी सांगन्याची गरज नाही. आता ह्या दोन्ही स्किल्सवर रंगराव आणि मॅनेजर दोघांनाही अप्लाय करून पहा! तमाशा का म्हंटल आहे ते कळेल! पूर्ण उत्तर आता देवू शकत नाही, पूढच्या काही भागात चित्र पूर्ण होईल.
>>माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन हे निश्चितपणे म्हणु शकतो ही इतकेही मूर्ख लोक आयटीत नसतात.सर्विस कंपन्या क्लायंट्सना एका मर्यादेपर्यंतच मूर्ख (खरा शब्द चुत्या) बनवु शकतात. आऊटसोर्स करण्याआधी कुठलीही कंपनी व्हेन्डर कंपनीला पी.ओ.सी. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) प्रोटोटाईप बनवायला सांगते आणि त्यानंतरच काम सोपवायचे की नाही हा निर्णय घेते.मी स्वतः एका नामाकिंत कंपनीत ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि क्लायंटने कसे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि काम योग्य कंपनीत जातेय की नाही/व्हेन्डर कंपनीत ह्यासाठी योग्य रिसोर्सेस आहेत की नाही ह्याची हरप्रकारे शहानिशा करुन घेतली होती ह्याचा साक्षीदार आहे. (मिपावर इतरही असे अनेक नक्कीच असतील ज्यांनी ह्या प्रक्रिया दोन्ही बाजुंनी हाताळल्या असतील.)
काही अंशी मुद्दा मान्य! पण हे घडण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. मॅनेजर चे टेक्निकल क्वॉलेफिकेशन आणि पर्फेक्शन किती गरजेचा आहे! इथ दोन्हीही गोष्टीची बोंब होती.
>>तुमची उमेद खच्ची करण्याचा हेतु मुळीच नाही पण तुम्ही रंगवत असलेल्या मॅनेजरबद्द्ल सहानुभुती निर्माण झाली म्हणुन हे लिहिले.
बाकी कथा नेहेमीप्रमाणेच वाचनीय झाली आहे.
अमान्यता दर्शवन्यात गैर काहिच नाहि. आणि आतापर्यंतेचे भाग वाचून कुठ्तरी काही तरी अपूर्ण आहे हे तुमच्या लक्षात आलेला दिसतय. that means you are thinking pretty fast, but hold on big picture is not yet clear!
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 10/11/2010 - 08:34
नवीन
विवाहबाह्य संबंध हीच एकता कपूरच्या सिरियलमधुन सातत्याने दिसणारी गोष्ट आहे. लांबलचक सिरियल साठी एकता कपूरकडेच जायचे असेल तर गीताला विवाहीत असलेले दाखवणे ही एक अट एकता कपूर स्वतःच घालेल पाहा. (ह.घ्या.)
ते असो. पण संपूर्ण कथानकात एकदम नॉर्मल (व जिंदादील ) वाटलेले पात्र म्हणजे गीताचा नवरा आदीत्य.त्यामुळे केवळ टी.आर.पी साठी गीता/आदीत्यला कथानकात ओढुन कहानीमे ट्विस्ट आणणे पटले नाही म्हणुन मी तसे डायरेक्ट लिहायचे टाळले.
पण तिच्याशी सातत्याने होणारे तुमच्या नायकाचे वाद/संवाद पाहता कथेतील नायिका तिच असावी/व्हावी असे वाटुन गेले.
मान्य.पण तुम्ही पहील्या भागातच लिहिले आहे .थोडक्यात कथानायक कॉर्पोरेट क्षेत्रात नवा आहे आणि तुम्ही उल्लेखिलेला मुद्दा हा अनुभवांतीच येतो.(कथानायक कोडिंग करत असल्याने एम.बी.ए असण्याची शक्यता कमी आहे.)एकुण कथानायकाला तुम्ही जुन्या काळातील कथेत वा चित्रपटात सातत्याने आढळणार्या सुधारकाचाच आधुनिक चेहरामोहरा दिला आहे आणि त्यासाठी सर्वस्वी योग्य अशी परिस्थिती पण त्याच्या अवतीभवती निर्माण केली आहे.
परंतु खाली पु.पें नी लिहिल्याप्रमाणे तुमचा वापर करुन तुमचा आर्किटेक्ट बॉस मॅनेजरला धोबीपछाड घालण्याचाच प्रयत्न करत असावा असे वाटते. ह्या पध्दतीचे राजकारण कुठल्याही क्षेत्रात पाहायला मिळते.
असो.पु.ले.शु आणि ते नक्कीच वाचेन.
प्रतिक्रिया सकारात्मक घेतल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Mon, 10/11/2010 - 02:26
नवीन
आशी आणी या पेक्षाही वाईट उदाहरणे पाहीली आहेत. त्यामुळे ही सत्यकथा असेल तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही.
रंगरावांनीही स्वतःचे फार कौतुक केलेले नाही. पण दुसर्यांचा मुर्खपणा दाखवला आहे.
त्यांना प्रोजेक्ट्चे संपुर्ण आर्किटेक्चर माहीत होते. डिझाईन फ्लॉज माहीत होते. ते एक्सल्पॉईट करून बग एक्स्पोज करणे फार कठीण नसते. अशी कामे डेव्ह टीम, पॅरलल डेव्ह टीम, आर्किटेक्ट आणी लीड प्रोजेक्ट क्यु.ए. ला डिलीव्हरी करायच्या आधी करतच असतात. फक्त रंगरावांनी सकाळी ताबडतोब मेल न करता शो स्टॉपर बग शेवटच्या क्षणी लॉग केला (मॅनेजर ची मारायला किंवा स्वतःचे महत्व अधोरेखीत करायला).
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 10/11/2010 - 04:28
नवीन
ही कथा म्हणून चांगलीच रंजक आहे पण सत्यकथा असेल तर वरती कानडाऊ योगेश म्हणाले तशा काही गोष्टी निश्चितच खटकतात. ही गोष्ट वाचताना मला राहून राहून एका जपानी माणसाचे उद्गार आठवतात. त्याच्या मताप्रमाणे एका भारतीय इंजिनिअरची क्षमता पाच जपानी इंजिनिअर्सएवढी असते पण दहा भारतीय इंजिनिअर मिळून दहा जपानी इंजिनिअर्सच्या एक दशांशही काम करू शकत नाहीत. याचं कारण सगळ्यानाच माहिती आहे आणी ही कथाही तेच अधोरेखित करते असं मला वाटतं.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/11/2010 - 07:37
नवीन
यात दुसरी बाजू अशीही असू शकते असे वाटते आहे ते म्हणजे सदर रंगरावाचा आर्किटेक्ट बॉस त्याला मॅनेजरचे कच्चे दुवे हेरून रंगरावाकरवी टार्गेट करत असणे.
:) आमच्या धंद्यात आम्ही भांडण करणार्या डेव्हलपर कडून अशा गोष्टी जाणून घेऊन नंतर खुबीने त्याचा टेस्टींगच्या वेळेला वापर करून , डेव्हलपरपेक्षा QA किती Technically , Functionally matured आहे असे प्रशस्तीपत्रक घेणार लोक पाहीले आहेत. अशा गोष्टी फ्रस्ट्रेशन मधे बाहेर काढणारे Developer च फक्त दोषी आहेत असे नाही पण मैत्रीचा असा prefessional वापर करणारे टेस्ट लीडही तितकेच दोषी आहेत.
त्यामुळे आर्किटेक्टाने रंग्याचा वापर करून मॅनेजरला उघडा पाडला असण्याची शक्यता देखील आहेच.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Mon, 10/11/2010 - 19:55
नवीन
थोड हळू पेशवे. ;)
- Log in or register to post comments
अ
अनिल २७
Mon, 10/11/2010 - 07:51
नवीन
रन्गराव - द सुपर हिरो.. भाग - १०.. समाप्त...
हुश्श !
नारायण मुर्तींनंतर आम्हीच !
- Log in or register to post comments