कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
💬 प्रतिसाद
(24)
र
रन्गराव
Mon, 10/11/2010 - 19:54
नवीन
http://www.misalpav.com/node/14540
http://www.misalpav.com/node/14560
http://www.misalpav.com/node/14575
http://www.misalpav.com/node/14584
http://www.misalpav.com/node/14592
http://www.misalpav.com/node/14623
http://www.misalpav.com/node/14625
http://www.misalpav.com/node/14706
http://misalpav.com/node/14839
http://misalpav.com/node/14852
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 10/11/2010 - 20:00
नवीन
लेखन चांगले आहे. पण स्वत:ला चीप लेबर म्हणून हिणवून घेणे नाही आवडले. (आणि तसेच काम करणाऱ्या इतरांनाही). त्याची कारणे अनेक आहेत. काहींबद्दल चर्चा झाली होती थोड्या दिवसांपूर्वी इथेच मिपावर.
(स्वत: चीप लेबर असलेला) वि. मे.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Mon, 10/11/2010 - 20:06
नवीन
असो. जे मला वाटल ते लिहिल. सर्वांना ते मान्य असन्याचा अट्टाहास नाही. मतं ही मानसा मानसानुसार आणि वेळेनुसारही बदलतात! काय बरोबर आणि काय चूक ह्याची व्याखा वैयक्तीक होवून जाते! आपण लेख वाचत राहिलात त्याबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 10/11/2010 - 23:30
नवीन
मान्य, माझेही म्हणणे तुम्हाला पटले पाहिजे असा अट्टाहास नाही.
असे बघा, स्वस्त म्हणजे वाईट आणि महाग म्हणजे चांगले ही धारणा योग्य आहे का हे बाजूला राहू दे, पण एकदा असा विचार करून बघा की आपण स्वस्त लेबर नसून अमेरिकन हे गरजेपेक्षा जास्त महाग आहेत. मग चित्र वेगळे दिसेल.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/12/2010 - 10:18
नवीन
सहमत आहे रंगा. आता आपण चीप लेबर म्हणून काम करतो आहोत पण पुढे जाऊन आपण आपला देश चांगला केला तर आपण चीप लेबर नक्कीच नसू. कितीही पगार मिळाला तरी स्वतःला चीप लेबर म्हणवून घेणे हे स्वतःतली चांगले काहीतरी करायची आग धगधगती ठेवण्यास मदत करते.
-(आयटीवाला (चीप लेबर)) पेशवे :)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 11:55
नवीन
इथ चिप पैसा किंवा काम ह्या द्रुष्टीन नाही म्हंट्लेलं. काम ज्या पद्धतीन आणि ज्या परिस्थितीमध्ये करवला आणि केला जाता त्याला म्हंट्ल आहे
- Log in or register to post comments
उ
उपास
Tue, 10/12/2010 - 03:14
नवीन
रंगराव साहेब, वरती बर्याच जणांनी समजावयचा प्रयत्न केला आहेच (रीक्षाचे उदा. वगैरे) माझेही दोन पैसे ;)
लेबर हा लेबर असतो.. तो चिप म्हणजे नेमका किती हे स्थल, काल आणि व्यक्ति सापेक्ष आहे.. आमच्या इथले रंगारी अमुक एवढं काम देत असाल आणि मोबदला देत असाल तर काम करू नाहीतर नुसते पान्-तंबाखू खात पिंका टाकत बसू.. (थोडक्यात आम्ही चिप नाही) असे म्हणतात आणि तसं करतात देखील. गंमत म्हणजे त्यांच्या अशा वागण्यालाच मी 'चिप' म्हणतो, मग तेच काम मला हवं तसं आणि हवं तितकं मी बाहेरुन आलेल्या एखाद्या बिहारी, उत्तरप्रदेशातील माणसाकडून करुन घेतो.. तो मिळेल तेवढ आणि मिळेल तितकं काम माझ्यापसंती प्रमाणे आणि माझ्या खिशाला परवडेल असं करतो.. त्याला नुसतं बसून राहाण्यापेक्षा चार पैसे मिळतात ह्यात तो खूष आणि माझं काम झालं ह्यात मी. शिवाय माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम त्याला मिळत असेल तर तो माझ काम (अर्धवट न सोडता) केव्हाही नाकारु शकतोच की.
थोडक्यात, चिप लेबर म्हणजे वाईट हे डोक्यातून काढायला हवं.. हे म्हणजे अमेरिकेत आणि जर्मनीत बनलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असं जे आपल्या डोक्यात आहे ना त्याच्यासारखंच पण विरोधी.. तितकाच न्यूनगंड दर्शवणारं!
उलट चिप असणं आणि तितक्याच ताकदीच उत्तम काम देण हे स्पर्धात्मकतेचं लक्षण आहे. .आज भारतियांना काम मिळतायत ऑफशिअरींगची ती नुसती चिप म्हणून नाही तर चिप तसेच क्वालिटी कंडीशन्स ना पुरी पडतील अशी आहेत म्हणूनच मिळताहेत. नुसतं स्वस्त मिळतय म्हणून कोंडा घेण्याइतपत अमेरिकन आणि युरोपियन यडे नक्कीच नाहीत..
सगळे लेख वाचले.. कॉर्पोरेट तमाशा सगळीकडेच असतो. .. थोडा अतिरंजित वाटला तरी चांगला मांडलाय.. शिवाय प्रोजेक्ट मॅनेजर आणि आर्कीटेक्ट ह्या दोन्हीं जागांवर काम केले असल्याने तुमचे मुद्दे मस्तच वाटले वाचायला..
लिखाण आवडलंच..
माझं एक अतिशय आवडतं पुस्तक ह्या विषयातलं.. Neal Whitten's No-Nonsense Advice For Successful Projects - प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये रस असलेल्या (आणि नसलेल्यानेही) प्रत्येक आयटीवाल्याने वाचण्यासारखं पुस्तक..
- उपास (पीएमपी आणि सी.एस्.क्यू.ए. असलेला, जावा आर्किटेक्ट/ डेव्हलपर )
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 10/11/2010 - 22:31
नवीन
हा भाग आवडला..
थोडेफार माझ्याही बाबतीत असेच झाले..मी ज्या माणसाकडून knowledge घेतले, त्यालाच तो चिप नसल्याने जावे लागले..पण तो जाणार हे त्याला आधीच माहित होते तरी त्याने मला देण्यात येणार्या knowledge मध्ये कमीजास्तपणा केला नाही...किंवा एकही loophole सोडले नाही..
हा भाग मला (का कोणास ठावूक) अतिरंजित वाटला नाही..तुमच्या बाकीच्या भागांसारखा...
अजून अनुभव येऊ द्दात..
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 04:50
नवीन
>>हा भाग मला (का कोणास ठावूक) अतिरंजित वाटला नाही..तुमच्या बाकीच्या भागांसारखा...
त्याचा कारण लिहिलेली घटना तुमच्या अनुभवाशी मिळ्तीजुळती होती. आता बाकिच्या कुणाला तस वाट्ल नाही म्हणून तुमची प्रतिक्रिया अतिरंजित ठरत नाही. या आधीचा प्रत्येक भागाखालील प्रतिक्रिया आपण वाचल्या तर आपल्या अस लक्षात येइल की कुणी ना कुणाच्या बाबतीत अस घडलेला आहे. इथ गंमत अशी आहे की सगळ्या गोष्टी एकाच जागी होतात आणि त्याला विरोधही. हे दुर्मिळ असल तरी अशक्य नाही. आणि म्हणून ते लिहिन्याजोगा आहे. आता राहिला मुद्दा मॅनेजरच्या मूर्खपणाचा आणि रंगरावाच्या अतिशहानपणाचा . मॅनेजर मूर्ख होता असा दावा कुठही ठोकला नाही. तो किती चालू होता कळेल लवकरच. आणि रंगरावाची अरेरावी म्हणायाची असेल तर त्याची ही सुट्का नाही. न्यायनिवाडा त्याचाही होइल.
पण तुम्ही वाचत राहिलात आणि परखड प्रतिक्रिया प्रामाणिकपणे दिलीत ह्याच कौतूक केल्याशिवाय रहावत नाही!
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 10/12/2010 - 00:52
नवीन
हे नॉलेज ट्रान्स्फर म्हणजे एकंदरीत आयत्या बिळावर नागोबा प्रकरण दिसतय. आपण मारे मधमाशीसारखं कणाकणानी कौशल्य गोळा करायचं , आपली निश कार्व्ह करायची आणि हा हा म्हणता आपल्या प्रतिस्पर्ध्याला ते कौशल्य दान करून टाकायच? :( टू बॅड!!!!
त्या फ्रेडीला पूर्वकल्पना दिली असेल तर ठीक आहे नाहीतर वाईट वाटलं.
- Log in or register to post comments
उ
उपास
Tue, 10/12/2010 - 01:40
नवीन
जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट करत असाल तुमचं नॉलेज तर Knowledge transfer is Not that bad & difficult.. knowledge घेणार्याचे आणि (सोडून जात असाल तर) त्या प्रॉजेक्ट स्टाफचे/ कंपनीचे तुम्ही दुवेच घेता.. जे ह्या सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्कींगच्या जगात तुम्हाला उपयोगीच पडतील.. ज्ञान दिल्याने वाढते एवढी परिपक्वता मात्र यायलाच हवी मग समोरची व्यक्ती कशीही असली तरी तुमचा चांगुलपणा उपयोगी पडतोच पडतो, तुमचे नुकसान तरी नक्किच करत नाही (हा स्वानुभव...)
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 10/12/2010 - 01:48
नवीन
सोडून जातेवेळीची के टी इज पार्ट अँड पार्सल ऑफ अ गुड एक्स्पीरीअन्स पण इथे फ्रेडी ला न सांगता त्याचं ज्ञान काढून घेतलं आहे की काय अस वाटतं. आणि अचानक त्याला डच्चू दिला आहे असं वाटतं. थोडं पाठीत सुरा भोसकल्यासारखं.
- Log in or register to post comments
उ
उपास
Tue, 10/12/2010 - 03:11
नवीन
पण जेव्हा असं मायग्रेशन आणि त्यातल्या त्यात ऑफशोरींग असतं (विशेषतः मोठ्या प्रमाणावर आउटसॉर्स करायचा कंपनी निर्णय घेते/ किंवा शेअर होल्डर्ससाठी तसा निर्णय घ्यावा लागतो) तेव्हा जाणार्या लोकांपुढे ऑनसाईट लिएझॉन किंवा एस.एम.ई (सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट) होण्याशिवाय पर्याय नसतो.. शिवाय ऑफशोअरींग असेल तर दिवस रात्रीचं गणित आलचं.. आणि नॉलेज घेणारी लोक 'दिलस तर चांगलंच नाहीतर आम्हि कोड रिव्हर्स इंजिनिअर करुच' अशा तयारीत असतातच (म्हणजे ज्या कंपनीला नवीन काम दिलेय उदा. टीसीएस, इन्फोसिस त्यांना त्यांच्या रीसोर्सेना असे तयार करावेच लागते).
फ्रेडीच्या दृष्टीने विचार करता जर त्याला पुढे अशा कंपनीत आणि वातावरणात जुळवून घेता येणार नाही हे चित्र स्पष्ट असेल तर लवकरात लवकर बाहेरचा मार्ग पत्करणे श्रेयस्कर.. आणि पाठीत सुरा म्हणाल तर बरेचदा तो त्याच्याच मॅनेजमेंटने (खूपदा अपरिहार्यपणे ) शेअर होल्डर्सना वाचवण्यासाठी/ कंपनी तारण्यासाठी/ नफ्यासाठी घेतलेला निर्णय असतो.. ह्यासाठीच फ्रेडीला 'हू मुव्ड माय चीज' हे हुंगत राहाणे महत्त्वाचे ;) असो!
अवांतराबद्दल क्षमस्व!
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 10/12/2010 - 04:09
नवीन
काम फ्रेडीने केले असले तरीही ती (code/document/other artifacts) बौद्धिक संपदा (Intellectual property) कंपनीची असते. अनेकदा तर कंपनीची साधनसामग्री वापरून हे काम केलेले असते. त्यामुळे ते काम नवीन माणसाला नीट समजावून सांगणे ही फ्रेडीची नैतिक जबाबदारी असते. त्यातून जाताना KT देणे हे फ्रेडीच्या लीगल contract चा भाग असणार. (इथे फ्रेडी म्हणजे सोडून जाणारा कुणीही माणूस)
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 10/12/2010 - 08:49
नवीन
KT देणे म्हणजे स्किल्स ट्रान्स्फर करणे नव्हे.
फ्रेडी फक्त त्याने केलेल्या कामाबद्द्ल समजावुन सांगु शकतो. त्याचा वैयक्तिक अनुभव ,त्याकरता त्याने वापरलेले स्किल्स,त्याचे इतर विकसित झालेले स्क्लिल्स ह्याबद्दलही त्याने सांगणे वा न सांगणे हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे.
उदा. मार्केटींग क्षेत्रात काम करणारा एखादा कंपनीतुन निघुन जाताना त्याच्या कालावधीत त्याने जमवलेली क्लायंट लिस्ट कंपनीला देवु शकतो पण त्याने ते क्लायंट कसे मिळविले (आणि ते कसे टिकवले!) ह्याबद्द्लची माहीती तो कदाचित देणार नाही.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 09:56
नवीन
हा चांगला मुद्दा मांड्लात योगेश!
- Log in or register to post comments
उ
उपास
Tue, 10/12/2010 - 16:59
नवीन
सहमत..
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 09:55
नवीन
त्याला पूर्व कल्पना दिली नव्हती. Thats why those guys got २-3 months salary as golden handshake.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 10/12/2010 - 08:39
नवीन
रंगराव तुमचे चीप लेबरचे त्रांगडे काही सुटणार नाहीय असे दिसतेय.
समजा फ्रेडीबरोबरच तुम्हालाही कंपनीने "रंगराव तुम्हालाही पगार देणे कंपनीला परवडत नाही आहे हो?" म्हणुन पिंक स्लिप दिली असती तर तुमची प्रतिक्रिय नक्की काय झाली असती?
स्वतः ही चीप नसल्याचा अभिमान वाटला असता का नोकरी गेल्याचे दु:ख?
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 10:00
नवीन
तुमी लै फास्ट पळताय राव. जर दम काढा. नाहितर राहिलेले भागपण तुम्हिच लिहून संपवा! ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 10/12/2010 - 09:56
नवीन
मला उगाचच इतके दिवस तुम्ही फक्त मराठीवरच अत्याचार करता असे वाटत होते.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 09:58
नवीन
आयला. आता काय घोड मारल!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/12/2010 - 10:25
नवीन
ते शेवटचे 'आ'कार आहेत ना ते 'अ'कारात घ्या म्हणजे तुमच्या लिखाणातले मराठी जरा आकारात येईल.
झालंच तर इंग्रजी -हिंदी संभाषण त्यातले तांत्रिक शब्द तसेच इंग्रजीत ठेऊन मराठीत भाषांतरित केले तरी चालतील.
-(मराठी) पेशवे
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 10:27
नवीन
प्रयत्न करतो! :)
- Log in or register to post comments