Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

ग — गणेशा, गुरुवार, 10/14/2010 - 18:01

प्रतिक्रिया द्या
2357 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अथांग Sat, 10/16/2010 - 00:40 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 10/16/2010 - 05:20 नवीन
गणेशा-जी, आतापर्यंत तुमच्या पाकक्रियेवरील लेखांची शीर्षकेच पहात आलो होतो, पण तुमच्यात एक कवीही दडला आहे हे आताच कळले! (जेमतेम चहा करण्यापलीकडे कांहींही न येणारा मी पाककलेच्या वाटेला कधीच जात नाहीं!) मूळ आंग्ल कवितेच्या माझ्या ओबड-धोबड गद्य भाषांतराच्या जागी तुम्ही अतीशय सुंदर कविता केलेली आहे. मनापासून धन्यवाद. 'प्रेरणे'बद्दलचे श्रेय मला न विसरता दिल्याचे कौतुक वाटले. सुधीर
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 10/16/2010 - 05:20 नवीन
आजच्या वर्तमानपत्रांमधील बातमी पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतासाठी वाढत्या चिंतेचे विषय आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी आज येथे एका परिसंवादात केले. पाकिस्तानी हद्दीतील भारतविरोधी दहशतवादी तळ आणि चीनची वाढती लष्करी ताकद, या गोष्टी आपल्यासाठी चिंतेच्या आहेत, असे सिंग म्हणाले. ‘इंडियन आर्मी- इमर्जिग रोल्स अँड टास्क्स’ या विषयावर आपले विचार मांडताना सिंग म्हणाले की, पाकिस्तानची स्थिती फार वेगळी आहे. तेथे अंतर्गत अस्थिरता असते आणि अतिरेक्यांना पाठबळ देणारा मोठा वर्ग सरकार व प्रशासनातही असतो. त्यामुळे पाकिस्तानचा धोका अधिकच गुंतागुंतीचा आहे. मात्र सरकार कोणतेही येवो आणि अंतर्गत स्थिती कशीही असो भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे तळ कायम राहतात, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, असेही सिंग म्हणाले. चीनबाबत ते म्हणाले, चीन आर्थिकदृष्टय़ा प्रगतीपथावर आहेच त्याच जोडीने तो लष्करीदृष्टय़ाही समर्थ होत आहे. ही गोष्ट बारकाईने लक्ष ठेवण्यासारखी आहे. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे तरी अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. आज देश पारंपरिक लढाईच्या दृष्टीनेही शस्त्रसज्ज राहिला पाहिजेच पण आण्विक धोका लक्षात घेऊनदेखील आपण सज्जता बाळगली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (काळेकाकांचे आणि) मिसळपावच्या सदस्यांचे समाधान व्हावे यासाठीच केवळ लष्करप्रमुखांनी काही माहिती उघड केली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १. चीन आणि पाकिस्तान काय करीत आहेत याची माहिती आपल्याला आहे. आपण गाफील आहोत हे मत चुकीचे आहे. कारण ही माहिती बहुधा लष्करप्रमुखांना काळेकाकांचे लेख आणि पत्रे वाचून मिळाली नसावी. २. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे. ३. अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. म्हणजे आपण पुरेशी कारवाई करीत नाही हे मत चुकीचे आहे. अवांतर : तो धागा इंचाइंचाने वर येऊ नये म्हणून या धाग्यावर उत्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sat, 10/16/2010 - 06:01 नवीन
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108218:2010-10-15-17-46-30&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4 वरील बातमी वाचली, त्यातून मला एकच निष्पन्न झाले कि, पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतासाठी वाढत्या चिंतेचे विषय आहेत, त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. आणि आपण (म्हणजे कोणी, लष्कर कि जनता ? माझ्या मते दोघांनी.) सज्जता बाळगली पाहिजे. म्हणून वेळोवेळी ह्या विषयी उहापोह व्हायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 10/16/2010 - 06:04 नवीन
चीन युद्धाच्या वेळेला सुधा सतर्क आहोत वगैरे वगैरे म्हटले गेल्याचे कळते. पण तेव्हा तर चांगलीच पाचर बसली होती. असो. "वुई आर सॉरी फोर द पीपल ओफ सिक्कीम" असे उद्गारही सतर्क राज्यकर्त्यांकडून निघाल्याचे कळते. प्रश्न खरंतर सतर्क असण्या नसण्याचा नाहीये. प्रश्न त्या सतर्कतेवर काहीही क्रिया न करण्याचा आहे. असो. >>२. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे. बाकी चीन पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची वेळ आली तर भारतीय लष्कराचे ३-१३ वाजण्याची शक्यता जास्त आहे. कमीतकमी पूर्व नौसेना प्रमुखांच्या विधानांवरून तसेच वाटते. आणि स्वातंत्र्यानंतर ५० वर्षात त्या दृष्टीने फार काही प्रगती झाली आहे असे वाटत नाही. >> ३. अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. म्हणजे आपण पुरेशी कारवाई करीत नाही हे मत चुकीचे आहे. सहमत आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेला आपण पुरेशी कारवाई केली होती म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Sat, 10/16/2010 - 06:23 नवीन
अजून एक बातमी वाचली काश्‍मीर भारतात विलीन नाही, हे खरेच - कृष्णा नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीर हे राज्य भारतामध्ये विलीन झालेले नाही, तर ते भारताला येऊन मिळालेले आहे, असे तेथील मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेले विधान योग्यच आहे, त्यात काही गैर नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी आज म्हटले. उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्‍मीरच्या विधानसभेत बोलताना, आपले राज्य भारतात अद्याप विलीन झालेले नाही, ते केवळ भारताशी संलग्न आहे, असे म्हटले. स्वातंत्र्योत्तर काळात जुनागढ व हैदराबाद ही संस्थाने भारतात विलीन झाली, त्याप्रकारे जम्मू-काश्‍मीर विलीन झालेले नाही, त्यामुळे जम्मू-काश्‍मीरची तुलना या दोन संस्थानांशी करू नये, असेही उमर म्हणाले होते. कृष्णा यांनीही जम्मू-काश्‍मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे म्हटले होते. जर काश्मीर खर्च भारतात विलीन झालेले नसेल तर ते भारताचा अविभाज्य भाग कसे होऊ शकते ? तो हिस्सा का भारताच्या नकाशात दाखवायचा ? आम्ही लाऊन घेऊ सवय जसा असेल तसा नकाशा बघण्याची. आणि का त्या काश्मीर पायी इतका आटापिटा करायचा आणि इतके मनुष्यबळ आणि पैसा वाया घालवायचा ? उगाचच वर्षानुवर्षे त्यापायी डोकेफोड का करायची ?
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sun, 10/17/2010 - 10:24 नवीन
हि आहे भारतीय सरकारची सतर्कता. US says 'threat info' shared with India before 26/11 attacks Separately, an Indian source, who was involved in the investigations of the Mumbai terrorist attacks, told PTI on the condition of anonymity, that India did receive the information, which was general and it was not specific in nature. आता specific in nature म्हणजे काय ह्यांना कोण कोण कुठून, कुठे कसे, किती वाजता, काय काय घेऊन येणार अशी माहिती अपेक्षित होती कि काय देव जाने. specific in nature माहिती म्हणजे नक्की काय हवे असते ? जो पर्यंत अशी specific in nature माहिती मिळत नाही तो पर्यंत कारवाई होत नाही का ?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 10/17/2010 - 10:57 नवीन
नक्की काय इन्फो दिली होती हे आपल्याला माहिती आहे का? की भारतीय अधिकारी म्हणतात ते चुकीचेच असणार असे समजून/दाखवण्यासाठी जीभ उचलून टाळ्याला लावली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Sun, 10/17/2010 - 11:30 नवीन
>>नक्की काय इन्फो दिली होती हे आपल्याला माहिती आहे का? नाही हो माहित नाही. पण specific in nature नव्हती हे नक्की. माहिती specific in nature द्यायला हवी होती, तशी न दिल्याबद्दल अमेरिकेचा निषेध करतो. बाकी भारतीय अधिकारी आपले काम एकदम चोख बजावितात हे मान्य. गुप्तहेरांनी काय एक specific in nature माहिती द्यायची मग ते एकदम चोख कारवाही करतात. हे मान्य करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा